नाझी राजवटीत १२०० ज्यू लोकांचे प्राण वाचवणारा ‘ऑस्कर शिंडलर’ होता तरी कोण?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दुसरे महायुद्ध आणि हिटलर याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. हिटलरच्या महत्त्वाकांक्षेपोटी सुरू झालेलं युद्ध ज्यांने जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला!
जर्मनी मध्ये सुरू झालेली नाझी राजवट, त्यांच्या क्रूर कहाण्या ज्यू लोकांबद्दलचा त्यांचा द्वेष याची जगाला हळूहळू ओळख होत गेली.
ज्यू लोकांवर केलेले अत्याचार, त्यांच्या झालेल्या सामूहिक हत्या हे जर्मनीच्या पाडावानंतर जगाच्या समोर आल्या. जर्मनीतल्या ज्यू लोकांना पकडून त्यांना गॅस चेंबर मध्ये घालून मारून टाकण्यात येत असे!
किंवा पकडून त्यांना गुलामासारखे वागवले जात असे. तेंव्हा शक्य होईल त्या ज्यू लोकांनी जर्मनी सोडलं पण जे तिकडे राहिले त्यांचे मात्र हाल झाले.
त्या जर्मनीतलाच एक जर्मन माणूस असा होता की ज्याला हे हत्याकांड बघवलं नाही. त्याच्या आश्रयाला आलेल्या ज्यू लोकांना मोठ्या शिताफीने मृत्यू दंडापासून वाचवले.
त्याचं नाव म्हणजेच ऑस्कर शिंडलर. त्यांने जर्मन अंकित पोलंडमध्ये बाराशे लोकांना यातून वाचवलं.
ऑस्कर शिंडलर हा एप्रिल १९०८ साली जर्मनीमध्ये जन्मला. त्याचे वडील उद्योगपती होते तर आई गृहिणी. १९२० पासून तो वडीलांना त्यांच्या बिझनेस मध्ये मदत करायचा.
पण १९२८ साली एमिली नावाच्या मुलीशी त्याचं लग्न झालं, हे लग्न त्याच्या कुटुंबाला मान्य नव्हतं म्हणून त्याने वडिलांबरोबरचा बिझनेस सोडला आणि सेल्स मॅनेजर ची नोकरी करायला लागला!
आणि तेच करत करत तो पोलंडला पोहोचला. नंतर तिकडे त्याने स्वयंपाकाच्या वस्तू बनवायची फॅक्टरी काढली.
सगळ्यांसारखाच त्यानेही सुरुवातीला प्रॉफिट मिळवण्यासाठीच धंदा करायला सुरुवात केली. त्यासाठी लागणारी सगळी कामे तो करायचा आणि भरपूर नफा कमवायचा.
सरकारच्या गुडविल मध्ये राहावं म्हणून त्याने १९३५ नंतर नाझी पक्षातही प्रवेश केला. जेणेकरून त्या राजकीय ओळखीचा वापर आपल्या बिझनेस मध्ये होईल. आणि त्याचा आपल्याला भरपूर फायदा होईल.
१९३९ मध्ये त्याने सगळ्या नाझी ऑफिसर्सची ओळख करून घेतली. आपलं काम व्हावं म्हणून तो त्यांना महागड्या वस्तू भेट दे, लाच दे, महागड्या सिगारेट्स दे अशा गोष्टी करू लागला.
त्याच्या फॅक्टरीमध्ये कामगारांची आवश्यकता होती, आणि त्याला त्याच्या मित्रांनी सांगितलं की इथे खूप ज्यू लोक गरीब आहेत तुला कामगार म्हणून सहज मिळतील.
त्यावेळेस पोलंडमध्ये ६५००० ज्यु लोक होते आणि ते गरीब होते. त्याने त्याच्या फॅक्टरी मध्ये ज्यू लोकांना कामगार म्हणून ठेवले.
ऑस्कर शिंडलरने या लोकांना कामावर ठेवलं. जर्मनीमध्ये ज्यू लोकांवर अत्याचार मात्र वाढलेले होते.
सरसकट त्यांचे सामुहिक हत्याकांड घडवले जायचे, त्यांना एका गॅस चेंबर मध्ये जमा करून तिकडे गॅस सोडला जायचा आणि त्यात गुदमरुन त्या लोकांचा मृत्यू व्हायचा. त्यालाच ‘होलोकॉस्ट’ म्हणतात.
नाहीतर एका रांगेत उभे करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जायच्या. ऑस्कर शिंडलरने हे सगळं पाहिलं,आणि त्याच्या मनात कुठेतरी माणुसकी जागी झाली.
त्यानंतर त्याने शक्य होईल तितक्या ज्यू लोकांना वाचवायचे ठरवले. त्यासाठी मग स्वतःचा फायदा न बघता त्याने स्वतःचा पैसा खर्च करून त्यांना वाचवायचे ठरवले.
१९४२ मध्ये जेंव्हा ज्यू लोकांना पकडले जात होते, वेगळे काढले जात होते. त्यावेळेस ऑस्करच्या फॅक्टरीमधील लोकांनाही पकडले.
पण ऑस्करने त्या नाझी अधिकाऱ्यांना धमक्या देऊन, आपल्या नाझी मित्रांची ओळख सांगून त्या कामगारांना सोडवले.
परत १९४४ मध्ये जेव्हा ज्यू लोकांना वेगळे काढायला लागले त्यावेळेस त्याने आपली फॅक्टरी दुसऱ्या ठिकाणी हलवली आणि या कामगारांची का गरज आहे, हे तो नाझी अधिकाऱ्यांना पटवून देऊ लागला.
हिटलरला युद्धासाठी लागणाऱ्या गोष्टी कामगार बनवतील असेही त्याने सांगितले.
त्यावेळेस त्याने स्वतः जवळच्या ११०० कामगारांची लिस्ट आणि दुसऱ्या शंभर कामगारांची लिस्ट त्या अधिकाऱ्यांना दाखवली आणि मग तो त्या बाराशे कामगारांना घेऊन आपल्या फॅक्टरीमध्ये आला.
त्या कामगारांना आपल्या फॅक्टरी मध्ये लपवून ठेवले. त्यानंतर पुढच्या सात आठ महिन्यात त्याच्या फॅक्टरी मधून कोणतीही वस्तू बनली नाही.
उलट चुकीच्या वस्तू बनवल्या आणि त्या अधिकाऱ्यांना मशीन्स मध्ये प्रॉब्लेम्स आहेत वगैरे कारणे दिली.
८ मार्च १९४५ ला जर्मनीने शरणागती पत्करली. युद्ध थांबलं. त्यानंतर त्याने सगळ्या कामगारांना एकत्र केले आणि सांगितलं की
“आता तुम्ही फ्री आहात,परंतु या सगळ्याचा बदला घेण्याचा विचार करू नका, हे खूप वाईट दिवस होते.”
आणि आत्तापर्यंत जे ज्यू लोक मृत्यू पावले त्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्या बाराशे लोकांना,’ शिंडलरजुडेन’ असे म्हणतात, म्हणजे शिंडलरने वाचलेले ज्यू लोक.
ऑस्कर शिंडलरने युद्धानंतर बिजनेस वगैरे करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला यश आले नाही. १९५७ साली तो दिवाळखोर झाला. नंतरचा त्याच आयुष्य हे सिंडलरजुडेन लोकांनी दिलेल्या मदतीवर व्यतीत झालं.
१९६८ मध्ये इस्रायलने त्याला बोलावले. तिकडे गेल्यावर तिथल्या ज्यू लोकांनी त्याचं खूप मोठं स्वागत केलं.
जेरुसलेम मधल्या ‘याद वाशेम म्युझियम’ मध्ये होलोकॉस्ट मध्ये मृत्यू पावलेल्या ज्युंच्या स्मरणार्थ त्याने वृक्षारोपण केले. त्यानंतर दरवर्षी तो इस्त्राईलला जायचा.
त्याची शेवटची इच्छा हीच होती की त्याच्या मृत्यूनंतर त्याला इस्राईलमध्ये दफन करण्यात यावे आणि ती पूर्ण झाली त्याच्या अंत्ययात्रेत ५०० शिंडलर्सजुडेन लोक सहभागी झाले होते.
ऑस्कर शिंडलरच्या जीवनावर हॉलिवूडमध्ये ‘ शिंडलर्स लिस्ट ‘ नावाचा एक सिनेमा प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी १९९३ मध्ये बनवला. त्याची एक भन्नाटच गोष्ट आहे.
१९८० मध्ये इटलीमधील सोरेंतो येथे फिल्म फेस्टिवल होते ऑस्ट्रेलियन कादंबरीकार थॉमस केंनली हे चित्रपट बघून बाहेरच्या पुस्तकांच्या स्टॉलवर आले.
आणि त्या स्टॉल मालकाला कळलं की हे प्रसिद्ध लेखक आहेत. आणि तो स्टॉल मालक पेज हा एक सिंडलर्सजुडेन लोकांपैकी होता.
त्याने लगेच थॉमस केनली यांना ऑस्कर शिंडलरबद्दल सांगितलं, त्यांचे फोटो दाखवले, त्यांनी लोकांना केलेली मदत सांगितली. आणि त्याच्याकडे असलेल्या लिस्टमधील लोकांची नावे दिली.
नंतर त्या केन्ली यांनी त्या सगळ्या लोकांच्या गाठीभेटी घेतल्या त्यांच्याशी बोलून त्याने एक कादंबरी लिहिली तीच ‘सिंडलर्स आर्क’.
आणि जेव्हा स्टीव्हन स्पीलबर्गने ही कादंबरी, सिनेमा बनवण्यासाठी वाचली तेंव्हा त्याला असं वाटलं की,
“मला हा सिनेमा बनवणे शक्य होणार नाही होलोकॉस्ट बद्दल आपण चित्रपट बनवणं योग्य होणार नाही.” पण शेवटी त्याने सिनेमा बनवायचा निर्णय घेतला.
आणि त्यासाठी स्टीव्हन स्पीलबर्ग ने कोणतेही मानधन घेतलं नाही. उलट झालेला नफा’ USC शोह फाउंडेशन’ या संस्थेला दिला, जी होलोकॉस्ट मध्ये वाचलेल्या लोकांना मदतीसाठी प्रस्थापित झाली होती.
१९९३ साली हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्या वर्षीचे सगळ्यात जास्त ऑस्कर अवार्ड याच सिनेमाने पटकावले. २३ दशलक्ष डॉलर मध्ये हा सिनेमा बनवला गेला.
‘ऑस्कर शिंडलर’ ही मध्यवर्ती भूमिका ‘लियाम निसन’ या आयरिश अभिनेत्याला दिली.
चित्रपट बनवण्यासाठी स्पीलबर्गने स्वतः अभ्यास केला. त्यासाठी तो पोलंडला जाऊन राहिला, सिंडलर्सजुडेन लोकांना भेटला त्यांच्याशी बोलला आणि नंतर त्याने हा सिनेमा बनवला.
दुसऱ्या महायुद्धा वर आधारलेला हा रक्तरंजित सिनेमा मात्र ब्लॅक अँड व्हाईट आहे.
या संपूर्ण सिनेमामध्ये एक छोटी मुलगी तेवढी लाल कोट मध्ये दिसते. जी स्पीलबर्गने निरागसतेचं प्रतीक म्हणून वापरली.
जेव्हा ज्यूंच हत्याकांड होतं, त्यात त्या मुलीचाही मृतदेह दिसतो आणि त्यानंतरच ऑस्कर शिंडलर हादरून जातो. आणि ज्यू लोकांना मदत करायचे ठरवतो.
या सिनेमाने ऑस्कर शिंडलर कोण होता हे तर सांगितलंच मात्र युद्धाची भयानकता काय असते हे जगाला दाखवून दिलं.
केवळ द्वेषावर आधारित जर युद्ध होत राहिली तर निरागस लोकांचाही बळी जातो ही गोष्ट अधोरेखित केली.
सध्याच्या काळातील द्वेषभरल्या वातावरणात हा सिनेमा पाहणे म्हणूनच महत्त्वाचा आहे. असं स्पीलबर्गचं म्हणणं आहे. आणि ऑस्कर सिंडलर सारखं मानवतेचा विचार करणं जरुरीचं आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.