' रोबोटिक्स विश्वातले “हे” १० आविष्कार बघून तुम्ही थक्क नाही झालात तर नवल…. – InMarathi

रोबोटिक्स विश्वातले “हे” १० आविष्कार बघून तुम्ही थक्क नाही झालात तर नवल….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

@!$%^&*@”!~ %%.. अशा एखाद्या भाषेत भविष्यात कोणी बोललं तर आश्चर्य वाटायची गरज नाही.

कारण आपलं आहे तंत्रयुग इतकं झपाट्यानं प्रगती करतंय की ह्यापुढे आपल्याला अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतील ह्यात शंका नाही.

विचार करून बघा हं. तुम्ही घरात निवांत बसलायत, दाराची बेल वाजली आणि तुम्हाला उठायचा प्रचंड कंटाळा आलाय; तितक्यात तुमचा रोबोट जाऊन दार उघडतो आणि पाहुण्यांना आत घेऊन पाणी आणून देतो!

नुसता विचार करूनही मस्त वाटतं ना? हे दिवास्वप्न नसून येत्या काही काळात सत्यात उतरेल असं साधन आहे. आजवर विविध चित्रपटातून आपल्याला रोबोटचं दर्शन झालंच असेल.

 

robot at hospitals inmarathi
washington post

 

आपल्याकडेही असा एखादा सोबती, मदतनीस असावा असं तुम्हालाही वाटलंच असेल. Las Vegas मधील annual Consumer Electronics Show (CES) expo मध्ये अनेक रोबोटिक्स अविष्कार पाहायला मिळतात.

मित्रांनो, विज्ञान तंत्रज्ञान इतका पुढं गेलंय की रोबोट्स मध्येही बरेच आधुनिक बदल झालेले आहेत. त्यामुळे ‘रोबोट युग’ आता फार लांब नाही असं म्हणायला हरकत नाही.

विश्वास नाही ना बसत?  रोबोटिक्स विश्वातले हे १० आविष्कार बघून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल!

 

१. UBTECH ROBOTICS WALKER :

 

robot inmarathi 9
youtube

 

हा पहिला bipedal रोबोट आहे. हा रोबो आपल्या आवाजाने किंवा टचस्क्रीन पद्धतीने ऍक्टिव्हेट करता येतो आणि हा रोबोटिक बटलर सारखं काम करतो.

तुमचं स्मार्ट घर हा ऑटोमॅटिक घरघुती मदतनीस नियंत्रित करू शकतो, नाच आणि गाणी वाजवू शकतो तसेच तुमचं कॅलेंडर सुद्धा सेट करायला सहकार्य करू शकतो.

घराची रक्षा करणं, visual surveillance तसेच मोशन डिटेक्टशन ह्या गोष्टीही हा रोबो करतो. सध्या ह्या रोबोला हात नसले तरीही भविष्यात त्याची उपयुक्तता वाढवण्यासाठी योग्य ते बदल नक्कीच केले जातील.

 

२. ForwardX CX-1 Robotics Suitcase:

 

robot inmarathi 8
shoptoship

 

आपल्या पैकी जे नियमित प्रवास करतात त्यांना नक्कीच ही रोबो सुटकेस CX -१ आकर्षित करेल ह्यात वादच नाही.

फिरायला जाताना वजन उचलावं लागू नये म्हणून चाकाच्या बॅग्स आल्या आणि आता जर त्या स्वतःहून त्याच्या मालकाच्या मागोमाग फिरू लागल्या तर कोणाला आवडणार नाही?

ह्यातील सेन्सरमुळे ही बॅग आपल्या मालकाला ओळखून त्याच्या बरोबरीने चालते व इतर गोष्टींना धडकत पण नाही.

जर का चुकून आपल्यापासून ही बॅग लांब गेली तर त्याच्या मालकाला लगेच स्मार्ट wristband वर notify होतं. 

 

३. Somnox Sleep Robot :

 

robot inmarathi 7
youtube

 

आपल्या जवळील उशीचा कधी रोबोट बनेल असं आपल्या कधी चुकूनही डोक्यात आलं नसेल.

इथे तर चक्क आपल्या शेजारी एखादी व्यक्ती झोपलीये असं जाणवेल अशाप्रकारे श्वासोश्वास करणारा उशीचा रोबोट बनलाय.

काही जणांना एकट्याने झोपायला भीती वाटते किंवा anxiety असते. अशा व्यक्तींसाठी हा रोबोट अगदी उत्तम आहे.

त्यामुळे अशी माणसं न घाबरता कोणत्याही अडचणीशिवाय पटकन झोपू शकतात.

 

४. Boston Dynamics SpotMini :

 

robot inmarathi 6
CNET.com

 

boston dynamics चे कुत्र्यासारख्या हालचाली करणाऱ्या आणि उड्या मारणाऱ्या रोबोट्स चे व्हिडिओ अनेकांनी पाहून आश्चर्य व्यक्त केलं. त्यात सर्वात प्रभावी असलेला spotmini धावू शकतो आणि उद्या मारू शकतो.

इतकंच नाही तर तो दार ही उघडू शकतो. खरंच काय भन्नाट आहे ना हे?

 

५. Care OS Smart Mirror:

 

robot inmarathi 5
careos.com

 

‘सांग दर्पणा मी कशी दिसते ?’ हे वाक्य आपल्या सगळ्यांना परिकथेची आठवण करून देतं. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देणारा खरा खुरा आरसा आपल्याकडे असेल तर?

आपली हीसुद्धा इच्छा पूर्ण झालीये कारण हा रोबो आरसा आपल्या वैशिष्ट्याने आपल्याला स्किन केअर बद्दल सांगतो, सेल्फीज घेतो, गाणी सुद्धा प्ले करतो.

जसा स्मार्टफोन मधील कॅमेरा analyse  करतो अगदी तसाच हा आरासाही आपल्याला त्वचेबद्दल तसेच hydration बद्दल गाईड करतो.

 

६. ROBOMART :

 

robot inmarathi 4
solar impulse foundation

 

आजकालच्या ऑनलाईन ऑर्डरच्या जमान्यात सगळं घरपोच मिळणं शक्य झालंय. पूर्वी एखाद्या स्टॉल वर मिळणारा खाऊ फूड ट्रकमुळे मोबाईल झालाय.

हल्ली भाज्यासुद्धा घरपोच मिळतात. पण जर एखादा रोबो तुम्हाला घरपोच भाज्या द्यायला आला तर किती छान होईल! ह्या Robomart मुळे ते सहज शक्य झालय.

हा रोबो २५ माईल प्रति तास ह्या वेगाने सामान पोहचवू शकतो. सध्याच्या लॉक डाऊनमध्ये असे रोबो किती उपयोगी पडतील ना.

 

७. sophia :

 

robot inmarathi 3
medium

 

मनुष्य प्राण्याला जसा मेंदू असतो तसा मेंदू रोबोट मध्ये असला किंवा मानवी भावभावना समजून घेणारा व स्वतःला ही भावना असतील असा रोबोट बनवण्यावर अनेकांचा भर होता.

ह्यातूनच सोफियाची निर्मिती झाली. अगदी खऱ्या माणसासारख्या बोलणाऱ्या सोफियाची सिस्टिम गूगलला कनेक्टेड आहे त्यामुळॆ ती योग्य गोष्टी बोलू शकते आणि विनोदही करू शकते.

तिने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्याचंही आपण पाहिलंय. इतकंच नाही तर ती अशी पहिली रोबो आहे जिला एका देशाचं नागरिकत्व प्राप्त झालं आहे! धन्य ते तंत्रज्ञान.

 

८. Aeolus Bot :

 

robot inmarathi 2

 

तुम्हाला घरी छोटा मदतनीस हवा असेल तर हा रोबो नक्कीच तुम्हाला मदत करेल. अलेक्सा वर चालणार हा रोबो तुमच्या घराची राखण करू शकतो, तुमची डायरी मेंटेन करू शकतो आणि अगदी तुम्हाला शॉप्पिंगलाही मदत करू शकतो.

घरातला केर काढणं, साफसफाई ह्यासारखी रोजची कामं करायला एक हक्काचा मदतनीस म्हणून ह्या रोबोकडे बघण्यास हरकत नाही.

 

९. Giles Walker’s Robotic Strippers :

 

robot inmarathi1
maxim

 

स्ट्रीप क्लब, पोल डान्स ह्या गोष्टी आपल्यासाठी अपरिचित नाहीत. त्यामुळे तिथला माहोल आणि गोष्टी आपल्याला माहित आहेत. स्ट्रीप डान्सर ऐवजी छान अदाकारीत स्ट्रीप डान्स करणारे रोबोट आता आपल्या मनोरंजनासाठी तयार झाले आहेत.

ह्या रोबोची वाढती लोकप्रियता बघता, इंग्लंडमध्ये कोर्पोरेट पार्टीसाठी भाड्याने हे रोबो दिले जातात .

१०. Kuri : 

 

robot inmarathi
IEEE spectrum

 

हा इटुकल्या पिटुकला रोबो आता मार्केट मध्येही आलाय. त्याच्या विविध फिचर आणि वापरण्याच्या सुलभतेमुळे सर्वांना तो प्रिय आहे. घरावर लक्ष ठेऊ शकणारा हा गोड सोबती लवकरच ठिकठिकाणी दिसला तर फार आश्चर्य वाटायला नको.

अर्थात आपल्याकडे हे रोबोचं फॅड घरापर्यंत आलेलं नाहीये पण आपल्या घरात असा रोबो यायला फारसा वेळ लागणार नाही हे नक्की.

विचार करूनच हायसं वाटतं. आपली कामं सुलभ करणाऱ्या अश्या मित्राची तुम्हीही वाट बघताय ना?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?