Site icon InMarathi

या १४ लोकप्रिय कंपन्यांची धुरा चक्क ‘भारतीयांच्या’ हातात आहे – वाचून अभिमान वाटेल!

indian CEO inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात जर तुमच्याकडे गुणवत्ता आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन व्यवसाय अथवा नोकरी करू शकता.

आज काल तर तुम्ही भारतात बसल्या बसल्या दुसऱ्या देशाला वस्तू आणि सेवा पुरवू शकता.

 

 

पण तरीही भारत अजून विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. आपल्याकडे भरमसाठ लोकसंख्या, मूलभूत गरजांची असलेली वानवा, अपुऱ्या आरोग्य सोयी अशा अनंत समस्या आहेत.

पूर्वी ‘भारतामध्ये टाटा-बाटा शिवाय आहेच काय’ असं म्हणून भारताची हेटाळणी केली जायची.

परंतु आता हे चित्र बदलतंय जरी आपल्या कडे विकसित देशांसारख्या सोयी सुविधा नसतील.

 

inext.live

 

मोठ्या कंपन्या सुद्धा नसतील पण जगातल्या बऱ्याच प्रमुख कंपन्यांचे सर्वोच्च अधिकारी हे भारतीय आहेत.

आपल्या गुणवत्तेवर दुसऱ्या देशातील कंपनीमध्ये सर्वोच्च पद भूषवणे नक्कीच सोपी गोष्ट नाही. चला तर मग जाणून घेऊ अश्या भारतीय नागरिकांबद्दल जे आज जगातील काही प्रमुख कंपन्या चालवतात.

 

१. गुगलचे सीईओ – सुंदर पिचाई

 

fortune

 

मदुराई, तामिळनाडू मधे जन्मलेले पिचई आज गुगल सारखी बलाढ्य कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

अगदी सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म १० जून १९७२ ला झाला. त्यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनियर होते आणि आई स्टेनोग्राफर म्हणून काम करत होत्या.

चेन्नई च्या अशोक नगर मधे सर्वसाधारण भारतीय कुटुंबात त्यांचं पालन-पोषण झालं.

शालेय शिक्षण केंद्रीय बोर्डा नुसार झालं आणि बारावी नंतर त्यांनी IIT खरगपूर येथून Metallurgy (धातू शुद्ध करण्याचं शास्त्र) मधे डिग्री मिळवली.

त्यानंतर स्टॅनफर्ड विद्यापीठातून मटेरियल सायन्स घेऊन MS केलं.

नंतर त्यांनी अमेरिकेतच Applied Materials मधे कामाला सुरुवात केली नंतर McKinsey त सुद्धा पदे भूषवली. २००४ ला त्यांनी गुगल मधे प्रवेश केला.

तिथे सुरवातीला Product Management, Innovation सारख्या क्षेत्रांच नेतृत्व केलं. १० ऑगस्ट २०१५ पासून ते गुगल चे CEO आहेत.

इंटरनेट वर तुम्हाला हवी असलेली माहिती सेकंदात तुम्हाला शोधून देणाऱ्या, आपल्या दैनंदिन जीवनात ई-मेल, मॅप्स सारख्या सुविधा देऊन अविभाज्य घटक बनलेल्या वस्तू- सेवा देणाऱ्या कंपनीचा प्रमुख भारतीय, इथेच वाढलेला- शिकलेला आहे!

 

२. मायक्रोसॉफ्ट चे सीईओ – सत्या नडेला

 

geekwire

 

हैद्राबादेत एका साधारण कुटुंबात सत्या यांचा जन्म १९ ऑगस्ट १९६७ ला झाला. त्यांची आई संस्कृत विशारद होत्या तर वडील प्रशासकीय सेवेत होते.

बेगमपेट मधल्या हैद्राबाद पब्लिक स्कूल मधे त्यांचं शालेय शिक्षण झालं. नंतर ‘मणीपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मधून त्यांनी इंजिनेररिंग केलं. पुढील शिक्षण त्यांनी अमेरिकेत घेतलं.

संगणक शास्त्रात MS पूर्ण केलं आणि नंतर शिकागो विद्यापीठातुन MBA सुद्धा पूर्ण केलं. सुरवातीला त्यांनी Sun Microsystems मधे काम केलं.

नंतर मायक्रोसॉफ्ट मधे जाऊन ते संशोधन आणि विकसन भागाचे प्रमुख बनत गेले.तिथे आपल्या कामाने एक एक पायरी चढत ते ४ फेब्रुवारी २०१४ ला मुख्य कार्यकारी अधिकारी झाले!

मायक्रोसॉफ्टचं ‘तंत्रज्ञान सेवा’ देणारी कंपनी पासून ते क्लाऊड प्रॉडक्ट्स आणि सेवा बनवणाऱ्या कंपनीत रूपांतरण करण्याचं श्रेय त्यांचंच!

 

३. एडोब सीईओ – शंतनू नारायण

 

university of Pennsylvania

 

Adobe चं Pdf टूल आपण नेहमी वापरत असू. या कंपनीचे प्रमुख हैद्राबादेत १९६३ ला जन्मले. त्यांची आई अमेरिकन साहित्य शिकवायच्या आणि वडीलांची प्लास्टिक ची कंपनी होती.

हैद्राबाद पब्लिक स्कूल मधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून BE इलेक्ट्रॉनिक आणि टेली कम्युनिकेशन घेऊन पूर्ण केलं.

त्या नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठातून MBA पूर्ण करून अँपल मध्ये आपल्या करियरला सुरवात केली. १९९८ ला त्यांनी Adobe मध्ये सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम पाहू लागले.

त्यानंतर आपल्या कौशल्याने ते यश पादक्रांत करत २००७ पासून Adobe चे CEO झाले.

२०११ मध्ये तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांनी शंतनू ना आपल्या Management Advisory Board चे सभासद बनवले.

शंतनू नारायण यांच्या नेतृत्वात २०१८ ला Adobe फॉर्च्युन ४०० कंपन्याच्या यादीत सामील झाली.

 

४. नेट अँप चे सीईओ – जॉर्ज कुरियन

 

YouTube

 

NetApp ही जगातील Storage, Data Manage क्षेत्रातील मोठी कंपनी आहे.

केरळ मधील कोट्टयाम मध्ये जन्मलेले जॉर्जे कुरियन यांनी आपलं शिक्षण केरळ मधे घेतलं नंतर IIT मद्रास मध्ये त्यांना प्रवेश मिळाला!

परंतु IIT मधील शिक्षणाला ६ महिन्यातच राम राम ठोकून ते प्रिन्स्टन विद्यापीठात शिकण्यासाठी गेले.इंजिनियर झाल्यावर त्यांनी स्टॅनफर्ड मधून MBA पूर्ण केलं.

NetApp मधे येण्यापूर्वी त्यांनी Cisco, Akamai Technologies, McKinsey& Company, Oracle सारख्या बऱ्याच नावाजलेल्या कंपन्यात काम केलं.

२०१५ पासून ते NetApp चे प्रमुख आहेत.

 

५. नोकियाचे सीईओ – राजीव सूरी

 

GoK news

 

नवी दिल्लीत १० ऑक्टोबर १९६७ ला जन्मलेले राजीव सूरी यांचं पालन पोषण मात्र कुवैत ला झालं. मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून BE ची डिग्री मिळवल्यावर.

२०१४ पासून ते नोकिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले.सूरी हे जगातल्या फार कमी व्ययवस्थापकांपैकी एक आहेत ज्यांनी MBA किंवा PG केलेलं नाही.

 

६. मास्टर कार्ड – अजयपाल सिंग बंगा

 

news and story

 

आपल्या पुण्यातल्या खडकी येथे जन्मलेल्या अजयपाल यांचे वडील सैन्यात अधिकारी होते.बंगा परिवार मूळचा जालंधर -पंजाब चा.

अजयपाल यांचे वडील हरभजनसिंग बंगा हे सैन्यातून लेफ्टनंट- जनरल होऊन निवृत्त झाले.

वडिलांच्या सैन्यातील नोकरीमुळे अजय यांचं शिक्षण भारतातल्या बऱ्याच शहरात झालं जस की-सिकंदराबाद, जालंधर, दिल्ली, हैद्राबाद.

शालेय शिक्षण हैद्राबाद पब्लिक स्कूल मधून पूर्ण झाल्यावर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात BA ची पदवी पूर्ण केली. नंतर IIM अहमदाबाद मधून त्यांनी MBA केलं.

अवघ्या २१ व्या वर्षी नेस्ले मधून त्यांनी नोकरीला सुरवात केली. तिथे १३ वर्षात अजयपाल यांनी विक्री, विपणन, व्ययस्थापनात काम करण्याचा अनुभव घेतला. नंतर त्यांनी पेप्सिको त काम केलं.

एप्रिल २०१० ला मास्टर कार्ड ने त्यांना आपला सीईओ म्हणून नियुक्त केलं. ते अजूनही या पदावर आहेत.

२०१५ ला तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामांनी अजयपाल यांना अध्यक्षांच्या व्यापारिक धोरण सल्लागार समिती मध्ये सभासदत्व बहाल केलं.

अजयपाल सिंग बंगा यांना भारत सरकारने २०१६ ला पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं.

 

७. DBS बँकेचे प्रमुख – पियुष गुप्ता

 

CNBC.com

 

डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर चे प्रमुख पियुष गुप्ता यांचा जन्म २४जानेवारी १९६० ला मेरठ ला झाला. त्यांचं बहुतांश शिक्षण दिल्लीत झालं.

सेंट कोलंबिया हायस्कूल मधून शालेय शिक्षण आणि दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन कॉलेज मध्ये BA ची पदवी पूर्ण केली.नंतर IIM अहमदाबाद मधून MBA पूर्ण केलं.

वयाच्या २२ व्या वर्षी सिटीबँकेत ‘Management Trainee’ म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. तिथे आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी बरीच मजल मारली.

भारतात chief of staff राहिले नंतर १९९१ ला त्यांना सिंगापूर ला पाठवण्यात आलं तिथे ते Asia chief staff बनले.सिटीग्रुप च्या आशियातील बऱ्याच देशांचे कंट्री हेड म्हणून त्यांनी काम पाहिलं.

२००९ ला त्यांनी सिटीबँके सोडून DBS मध्ये सीईओ म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्यांच्या नेतृत्वात बँकेने सलग १९ तिमाहीत वाढीचा विक्रम नोंदवला.

 

८. मैक्रोन चे – संजय मेहरोत्रा

 

barron’s

 

Micron Technology संगणक डेटा स्टोरेज मधील एक अमेरिकेन कंपनी आहे. मैक्रोन चे सध्याचे सीईओ संजय मेहरोत्रा कानपुर ला जन्मलेले आहेत.

दिल्ली मधून शालेय शिक्षण घेतल्यावर ते Bits पिलानी ला महाविद्यालयिन शिक्षणासाठी गेले नंतर तिथून कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेतला.

इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकी ची पदवी त्यांनी घेतली. मेहरोत्रा यांच्या नावावर ७० पेक्षा अधिक पेटंट्स आहेत.

मैक्रोन च्या पूर्वी ते SanDisk चे संस्थापक सदस्य आणि २०११ ते २०१६ सीईओ राहिले आहेत. २०१७ पासून ते मैक्रोन च्या प्रमुखाची जबाबदारी पार पाडत आहेत.

 

९. हरमन इंटरनॅशनल – दिनेश पलीवाल

 

the wall street journal

 

आग्ऱ्यात १९५७ ला जन्मलेले दिनेश पालिवाल यांना ६ भावंड होती. त्यांचे वडील रामचंद्र पालिवाल हे नावाजलेले सामाजिक नेते होते त्यांनी महात्मा गांधी सोबत काम केलं होतं.

दिनेश यांचं शिक्षण भारतातच झालं. IIT रुरकी मधून त्यांनी इंजिनिअरिंग ची पदवी घेतली. पालिवाल यांनी बऱ्याच कंपनीच्या बोर्ड वर काम केलं आहे ज्यात नेस्ले चा सुद्धा समावेश होतो!

हरमन कंपनी ऑटो मोबाईल कंपन्याना व्हिडिओ सेवा आणि अंतर्गत डिजिटल सेवा पुरवण्यात मदत करते. ही सॅमसंग परिवारातील एक कंपनी आहे.

गेल्या १३ वर्षांपासून दिनेश पालिवाल यांनी सीईओ पद भूषवत आहेत.

 

१०. पॅलो-अल्टो नेटवर्क – निकेश अरोरा

 

india west

 

निकेश यांचे वडील भारतीय हवाई दलात होते. उत्तर प्रदेश मधल्या गाझियाबाद ला जन्म झालेल्या निकेश यांचं शालेय शिक्षण The Air force school मधून झालं.

१९८९ ला IIT मधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ची पदवी घेतली. त्यांनी तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात बऱ्याच कंपन्यांत काम केलं.

गूगल मध्ये त्यांनी Chief Business Office पदापर्यंत मजल मारली होती. २०१४ ला गुगल सोडून ते Softbank Group चं अध्यक्षपद भूषवलं.

२०१८ पासून ते palo-alto networks चे सीईओ आहेत. ही अमेरिकन कंपनी मुख्यत्वे संगणक सुरक्षा क्षेत्रात कार्य करते.

 

११. रेकीट- बेंकिसर – लक्ष्मण नरसिंहन

 

bloomberg

 

रेकीट ही इंग्लंड ची कंपनी आरोग्य,स्वच्छता विषयक घरगुती वस्तू बनवणारी एक नावाजलेली कंपनी आहे.

त्याचे सध्याचे सीईओ लक्षण नरसिंहन यांनी पुण्यातल्या COEP मधून मेकॅनिकल इंजिनियरिंग ची पदवी मिळवली आहे. McKinsey,Pepsico सारख्या बड्या कंपन्यात त्यांनी काम केलेले आहे.

२०१९ पासून ते रेकीट-बेंकिसर चे सीईओ आहेत. या व्यतिरिक्त बऱ्याच भारतीयांनी प्रमुख कंपन्यांच प्रमुख पद भूषवलं आहेत!

 

१२. कॉग्निझंट – फ्रान्सिसको डिसुझा

 

kuch naya

 

भारतीय वंशाच्या डिसुझा १२ वर्ष कॉग्निझंट चे सीईओ होते. अमेरिकन कंपनी कॉग्निझंट चे बरेच भारतीय कर्मचारी आहेत. डिसुझा यांच्या कारकिर्दीत कंपनीची प्रचंड भरभराट झाली.

 

१३. सिटीग्रुप – विक्रम पंडित

 

merco press

 

नागपूर चे विक्रम पंडित जगातल्या सर्वात मोठ्या बँकेचे- सिटी बँक ग्रुप चे प्रमुख राहिले आहेत. २००७ ते २०१२ अशी पाच वर्षे ते सिटीग्रुप चे सीईओ होते.

भारत सरकार ने २००८ ला पद्म- भूषण पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे.

 

१४. पेप्सिको- इंद्रा नुयी

 

techstory

 

इंद्रा नुयी ह्या २०१८ पर्यंत पेप्सिको च्या सीईओ होत्या. चेन्नई मधून आपलं शिक्षण पूर्ण करणाऱ्या इंद्रा नी IIM कोलकाता मधून MBA पदवी मिळवली.

त्यांनी बऱ्याच खाद्य पदार्थ आणि शीतपेय कंपन्यांमध्ये मोठी पदं भूषवली. २०१५ ला जगातल्या सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा दुसरा क्रमांक होता!

त्यांचा समावेश फॉर्ब्स च्या प्रभावशाली महिलांच्या यादीत सुद्धा करण्यात आला होता! पेप्सिको ला वेगळ्याच उंचीवर नेण्यात इंद्रा यांचा मोठा हातभार आहे.

गुणवत्ता ही सर्वोच्च असते आणि मेहनतीने तुम्ही आपल्या क्षेत्रात सर्वोच्च पदी जाऊ शकता हेच ही भारतीय अधिकाऱ्यांची उदाहरणे सिद्ध करतात.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version