“काय सांगशील ज्ञानदा?” – व्हायरल झालेल्या सर्वोत्तम मिम्स…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
संकलन – अनुप कुलकर्णी
===
सध्या लोकांच्या ओठांवर मोबाइल वर तसेच दैनंदिन जीवनाच्या चर्चेमध्ये सुद्धा एकच विषय आहे तो म्हणजे ‘करोना’! जिथे पहावं तिथे हा विषाणू झपाट्याने पसरताना आपल्याला दिसतो आहे!
या जीवघेण्या विषाणूशी लढण्यात पोलिस, डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार हे त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून या संकटातून बाहेर पडायचा पूर्ण प्रयत्न करत आहेत!
२२ मार्च २०१९ पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू जाहीर केला आणि त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद सुद्धा दिला!

देशभरात लोकांनी ५ वाजता आपापल्या बाल्कनीत येऊन थाळी टाळी आणि शंखनाद करून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले! पण हे चित्र फारकाळ सुसह्य नव्हते!
बऱ्याच ठिकाणी लोकांनी नियमांचे उल्लंघन करत रस्त्यावर गर्दी केली आणि हे एकंदर रूप पाहता २ दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी संपूर्ण देश ‘लॉकडाउन’ ची घोषणा केली!
सगळ्या लोकांना आहे तिथेच थांबण्याचे आव्हान केले, बरीच लोकं आता घरून काम करत आहेत!

पण संपूर्ण देश बंद असला तरी देशातली सगळी मीडिया हाऊसेस सुरळीत चालू आहेत, कारण नवीन येणारे अपडेट्स तसेच नवीन बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते अगदी तत्परतेने करत आहेत!
यात बरीचशी चॅनल आहेत! अरणब गोस्वामीच रिपब्लिक चॅनल, तसेच आज तक, न्यूज १८ लोकमत, झी २४ तास अशी चॅनल्स त्यांच्या बातम्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करत आहेत!
पण यामध्ये सध्या एक चॅनल आणि त्या चॅनल ची एक सूत्रसंचालक सध्या प्रचंड चर्चेत आहे, ते चॅनल म्हणजे एबीपी माझा, आणि ती सूत्रसंचालक म्हणजे ज्ञानदा कदम!

एबीपी माझा हे चॅनल तसं बऱ्याच वेळा चर्चेत राहिलेले आहे, चांगल्या आणि वाईट कारणांनी सुद्धा पण असो त्यावर आत्ता भाष्य नको करायला!
पण सध्या हे चॅनल आणि त्यांची सूत्रधार ज्ञानदा एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहेत, आणि ती गोष्ट तुम्हाला कळली तर तुम्हालाही हसू आवरणार नाही!
सध्या लॉकडाउन मुळे प्रत्येक न्यूज चॅनल नागरिकांना घरात बसायचेच आव्हान करत आहेत!
आणि यात एबीपी माझा च्या ज्ञानदा ने तर चक्क घरी बसून रिपोर्टिंग केले आणि त्याचे फोटोज सुद्धा तिने तिच्या इनस्टाग्राम अकाऊंट ला शेयर केले!

शिवाय यातून तिने लोकांना एक असा मेसेज दिला की रिपोर्टर सुद्धा घरी बसून काम करू शकतात तर तुम्ही सुद्धा घरीच थांबून काम केलं पाहिजे!
अर्थात यामागे तिचा नक्कीच काही चुकीचा हेतू नसणार, पण या एका पोस्ट मुळे ज्ञानदा ही नेटीझन्स साठी एक ट्रोलिंग चा विषय होऊन बसली!
ज्ञानदा ही एक उत्तम पत्रकार तर आहेच शिवाय तिच्या देखण्या चेहऱ्यामुळे आणि पर्सनॅलिटी मुळे तिच्या फॅन्स ची संख्या सुद्धा चांगलीच आहे!

तर नेमक्या याच विषयाला घेऊन नेटीझन्स नी सोशल मीडिया वर ‘काय सांगशील ज्ञानदा?’ असा एक ट्रेंड च चालू केला आणि या हॅशटॅग च्या नावाखाली कित्येक मीम्स सोशल मीडिया वर व्हायरल झाले!
खरंतर हे कितपत योग्य किंवा अयोग्य यात न पडता हे विचित्र मीम्स नक्की काय आहेत ते आपण बघूयात तरी! लोकांची ही अशी क्रिएटिव्हिटी पाहून खरंच तुम्हाला हसू आवरणार नाही!
या मीम मध्ये लोकांनी पंतप्रधानांनी सांगितलेले मनावर घेतले नाही पण ज्ञानदा ने सांगितले तेंव्हा लगेच मनावर घेतले हे असेच सांगितले आहे!

ज्ञानदा ची वाढती लोकप्रियता बघून ऑफीस मधल्या बाकीच्या कर्मचाऱ्यांना आणि रिपोर्टर्स ना सुद्धा हाच प्रश्न पडला असणार! असेच नेटीझन्सना यातून सुचवायचे आहे!

ह्या फोटोमध्ये तर चक्क नेटीझन्सनी ज्ञानदा ला आमीर खानच्या बाजूलाच बसवले आणि त्याच्या फेमस गाण्यावर एक असा जोक केला!

ज्ञानदाची वाढती लोकप्रियता बघून राजीव खांडेकर यांनी सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’ मधला हा फेमस डायलॉग मनातल्या म्हंटला असेल!

नेटीझन्स च्या मते प्रत्येक ज्ञानदा फॅन्स ची भावना हीच आहे! आणि कित्येक ज्ञानदा फॅन्स चा अगदी हाच रोख असतो!

बाकी काही असो पण ज्ञानदा च्या ह्या ट्रोलिंग मुळे चॅनलचा टीआरपी नक्कीच वाढला असणार असेही नेटीझन्स नी ट्रॉल केले!

नेटीझन्स च जेंव्हा अनलिमिटेड ४जी नेट संपेल तेंव्हा ते किंवा ज्ञानदा फॅन्स ची अशीच अवस्था असेल असेही त्यांनी यातून सांगितले आहे!

हौशी कलाकारांनी तर या ट्रोलिंग च्या विषयावर चक्क अशा कविता करून सुद्धा ती मीम्स व्हायरल केली आणि ती लोकांनी तितकीच पसरवली!

एबीपी चा प्राइम टाइम चा चेहरा म्हणजे प्रसन्न जोशी, पण नेटकऱ्यांनी आता प्राइम टाइम ला सुद्धा प्रसन्न ऐवजी ज्ञानदाला बघायची इच्छा अशा कित्येक जोक्स मधून व्यक्त केली आहे!

आणि हे शेवटचा फोटो म्हणजे कहरच आहे! खुद्द पंतप्रधानांच्या सुद्धा ट्विटर अकाऊंटला एडिट करून त्यांच्या अकाऊंट वरुन “काय सांगशील ज्ञानदा” हे ट्विट केले गेले आणि ते प्रचंड व्हायरल केले!
पंतप्रधान सुद्धा ज्ञानदाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे चिंतित आहेत असंच यातून दर्शवले गेले आहे!

एकंदरच हे सगळे फोटोज आणि जोक्स बघता लोकांच्या क्रिएटिव्हिटी ला दाद द्यावी तितकी कमी आहे!
कोण कसा या ट्रोलिंग चा विषय होईल आणि कशाप्रकारे त्यावर वेगवेगळे मीम्स आणि जोक्स व्हायरल होतील हे कुणीच सांगू शकत नाही!
बाकी काही उपयोग असो वा नसो सोशल मिडियाचा एक उत्तम उपयोग या मीमकऱ्यांनी करून घेतला आहे त्यामुळे लोकांचे सुद्धा चांगलेच मनोरंजन होत आहे!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.