या `सुपरस्प्रेडर’ स्त्रीमुळे ५५० लोकांना झाली कोरोनाची लागण! ही चूक तुम्ही करू नका..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एक दिवसीय जनता कर्फ्यु, त्यानंतर कलम १४४ आणि आता २१ दिवसांचा ल़ॉकडाऊन, कल्पनेपलिकडच्या परिस्थितीत आपण सापडलो होतो.
लोकलबंद, कामं ठप्प. घरात राहण्याची सक्ती, या नियमांवर अनेकांनी ताशेरे ओढले.
अनेकांना घरी राहणं म्हणजे सक्ती किंवा अनाठायी केलेले नियम वाटत होते, मात्र दक्षिण कोरियातल्या सुपरस्प्रेडर महिलेविषयी तुम्ही माहिती घेतलीत, तर करोनाच्या पार्श्वभुमीवर घरात थांबणं, गर्दीत न मिसळणं हे किती महत्वाचं आहे, याचा तुम्हाला अंदाज येईल.
जगभर थैमान घालणारा करोना विषाणु कोरियातही दाखल झाला.
दक्षिण कोरिया मधील कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे मुख्य ठिकाण ठरले आहे तेथील शॅडोवी चर्च.
या विषाणूचा संसर्ग पसरवण्याच्या केंद्रस्थानी आहे एक ६० वर्षीय महिला जी तिथे जवळपास १२०० लोकांना भेटली.
दक्षिण कोरिया मधील या चर्चमध्ये झालेला धार्मिक सोहळा आता संशोधनाचा विषय झाले आहे.
रविवार, २३ मार्च रोजी दक्षिण कोरिया मध्ये १२३ नवीन रुग्ण आढळले आणि एकूण संसर्ग बाधित रुग्ण संख्या झाली आहे ५५६. तसंच ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
ह्यातील अर्ध्याहुन अधिक रुग्णाचा संबंध शिंचीओंजी चर्च ऑफ जीजस येथील धार्मिक सोहळ्याशी आहे.
हे चर्च डाइगु शहरात असून तेथील सोहळ्यात एक ६१ वर्षीय महिला जिला “पेशंट ३१” म्हटलं जातं, तिने सहभाग घेतला होता.
ही महिला कोरोना संसर्गित असल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट झाले आहे.
काय खास आहे ह्या “पेशंट ३१” मध्ये?
या महिलेने नजीकच्या काळात देशाबाहेर कुठेही प्रवास केलेला नाही. येथील अधिकारी तिला “सुपर-स्प्रेडर” संबोधत आहेत तर इतर जनता तिला “crazy ajumma” (कोरियन भाषेत आन्टी ) म्हणते.
१८ फेब्रुवारी रोजी ह्या महिलेस न्यूमोनिया सदृश लक्षणे दिसल्यावर तेथील डॉक्टरांनी कॉरोना टेस्ट करण्यास सांगितले. परंतु तिने त्यांचे म्हणणे एकदा नव्हे तर दोनदा टाळले.
या महिलेची कहाणी एखाद्या चित्रपटात शोभेल अशीच आहे.
तिला ७ फेब्रुवारी रोजी अपघात झाल्याने इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.
तिथेच तिला ताप आला, तरीही तिने करोना चाचणी करण्यास नकार दिला.
अखेरीस १७ फेब्रुवारी रोजी तिची चाचणी करण्यात आली आणि १८ तारखेस ती संसर्गबाधित आहे हे सिद्ध झालं.
परंतु ७ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी ह्या दरम्यानच्या काळात तिने ४ ठिकाणी विविध कार्यक्रमात भाग घेतला आणि ४ ही ठिकाणे सार्वजनिक गर्दीची ठिकाणे होती.
तिथेच नेमकी धोक्याची घंटा वाजली.
दक्षिण कोरिया मधील अधिकाऱ्यांवर या केसच्या परिणामांचा प्रचंड दबाव आला आहे.
यातील सर्वात जास्त संसर्ग पसरण्याचे ठिकाणी होते एका चर्च मधील रविवारचा धार्मिक कार्यक्रम.
या कार्यक्रमात ती महिलीही उपस्थित होती, त्यामुळे नेमक्या कितीजणांना याचा संसर्ग झाला आहे हे सांगणे सुरवातीला कठीण होतं.
या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या १००० जणांना त्यांच्या घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे आणि त्यांची संसर्ग चाचणी करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाकडून इतरही अनेक लोकांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.
शिंचीओंजी चर्चने या घटनेची संपूर्ण जबाबदारी संबंधित महिलेवर असल्याचं म्हटलं आहे.
तसंच ,जानेवारी पासूनच भाविकांना, आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले असल्यास किंवा फ्लू सदृश लक्षणे असल्यास कुठल्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याविषयी स्पष्ट सूचना चर्च कडून देण्यात आल्या असल्याचे चर्च कडून सांगण्यात आले.
या चर्चच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ७४ शाखां बंद ठेवण्यात आल्या आहेत, आणि भाविकांना ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.
हे चर्च एका विशिष्ट पंथाचे असून त्यांचा प्रमुख हा स्वतःला जीजसचा दूत समजतो. परंतु इतर चर्चची या पंथास मान्यता नसल्याचं आढळून आलं आहे.
हा पंथ प्रामुख्याने बायबलच्या न्यू टेस्टामेन्ट मधील बुक ऑफ रेव्हिलेशन यावर आधारित आहे, ज्यात भविष्यकाळात घडणाऱ्या भयंकर घटना आणि त्याचे साक्षात्कार या विषयी भाष्य केले आहे.
सध्या येथील अधिकारी,”पेशंट ३१” या महिलेला चीनला न जाताही कोरोनाची लागण कशी झाली याचा शोध घेत आहेत.
याच दरम्यान चर्चने उत्तर चीन मध्ये त्यांच्या पंथाचे काही कार्यक्रम घेतल्याचे मान्य केले आहे.
यातील काही जणांना दक्षिण कोरिया मध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. तसेच चर्च मध्ये जाणाऱ्या अनुयायी आणि चेंगदो हॉस्पिटल मधील वाढती कोरोना बाधितांची संख्या ह्यांचा काही संबंध आहे का ह्याची चौकशी अधिकारी करत आहेत.
शिंचीओंजी चर्च
शिंचीओंजी ह्या शब्दाचा अर्थ आहे नवीन स्वर्ग आणि नवीन जग. हा पंथ १९८४ साली स्थापन केला होता. इतर ख्रिस्ती बांधव मात्र या पंथाला मान्यता देत नाहीत,
तसेच पंथाचे संस्थापक ली मान ही, यांनाही बोगस मानतात.
ह्या चर्च चा दावा आहे कि त्यांचे १५०००० पेक्षाही अधिक अनुयायी आहेत. ह्या पंथातील अनुयायांची अशी मान्यता आहे कि ली मान ही हे अमर आहेत.
ह्या पंथातील अनुयायी एकमेकांच्या अगदी जवळ बसतात आणि एकमेकांचे हात धरतात, तसेच येथे चर्च मध्ये जाणे अनिवार्य आहे. त्यांना चष्मा आणि मास्क लावण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होणे सहज शक्य आहे.
ह्या पंथातील लोक, आजारी पडणे म्हणजे एक गुन्हा असल्याचे समजतात, कारण त्यामुळे देवाच्या कामात अडथळा निर्माण होतो.
त्यांना व्यावहारिक जीवनातील सर्व गोष्टी जसे, नोकरी, यश, पैसे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास शिकवले जाते.
“पेशंट ३१” ला संसर्ग झाल्याचं सिद्ध झाल्यापासून, चर्चचे काम अनुयायांचे लहान लहान गट करून करण्यात येत आहे आणि विचारणा झाल्यास ह्या कार्याबद्दल स्पष्ट नकार देण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.
सर्वात महत्वाची बाब ही, की हे चर्च एक मोठा कार्यक्रम चीन मधील वुहान या करोनाच्या केंद्रबिंदू असलेल्या प्रांतातही झाला होता.
या केस मधून भारतीयांनी फार मोठा धडा घ्याल हवा.
केवळ एक रुग्ण त्याच्या संपर्कात येणाऱ्या अनेकांना बाधित करतो आणि हा आकडा बेरजेने नव्हे गुणाकाराने वाढत जातो हे लक्षात घ्यायला हवे.
ही साखळी तोडायची असेल तर संपुर्ण लॉकडाऊनला पर्याय नाही.
करोनाशी लढा यशस्वी करण्यासाठी घरातच थांबण्याचे आवाहन माननीय पंतप्रधानानी केले आहे,
त्याचे तंतोतंत पालन करूया आणि कोरोना ला पळवून लावूया.
मात्र या काळात करोनाची कोणतीही लक्षणं आढळली तरी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणं आणि गर्दीत न मिसळणं ही खबरदारी घ्या, अन्यथा तुमच्यामुळे तुमचं कुटुंब आणि संपुर्ण शहराला त्याचा फटका बसु शकतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.