' स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर अंदमान -निकोबार मध्ये भारतीय रेल्वेची एन्ट्री! – InMarathi

स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर अंदमान -निकोबार मध्ये भारतीय रेल्वेची एन्ट्री!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अंदमान-निकोबार ही बेटे म्हणजे भारताचाच भाग आहेत हे आपण सर्वजण जाणतोच! पण फारच कमी जणांना याची माहिती असेल की, ज्या भारतीय रेल्वेचा संपूर्ण जगभरात आदर्श घेतला जातो तीच भारतीय रेल्वे भारताच्या या दोन प्रदेशांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्या इतक्या वर्षांनतरही पोचली नाहीये. पण आता मात्र ही उणीव देखील भरून निघणार आहे, कारण नरेंद्र मोदी सरकारने स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर अंदमान-निकोबार बेटे भारतीय रेल्वे अंतर्गत जोडण्याला ग्रीन सिग्नल दाखवला आहे.

indian-raliway-marathipizza01

स्रोत

२४० किमी अंतराची broad-gauge railway line या दोन बेटांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करणार आहे. ही रेल्वे लाईन समुद्रतटाच्या जवळून जाणे अपेक्षित असून या मार्गात अनेक लहान मोठे ब्रिज उभारण्यात येतील. हा मार्ग अंदमानच्या उत्तर भागाला दक्षिण भागात असणाऱ्या पोर्ट ब्लेयर या राजधानीच्या शहराशी जोडेल. सध्या या मार्गावर प्रवास करायचा म्हटला तर ३५० किमी अंतर बसने कापावे लागते, किंवा फेरी सेवेचा वापर करावा लागतो. या दोन्ही मार्गाने प्रवास करायचा तर हमखास १४ तास लागतात. पण भारतीय रेल्वेने येथे पाउल टाकल्यास प्रवासाचा हा मनस्ताप बऱ्यापैकी कमी होणार आहे, सोबतच पर्यटन, संरक्षण आणि व्यवसाय क्षेत्राला देखील चालना मिळेल.

andman-nicobar-marathipizza

स्रोत

या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च २,४१३.६८ कोटी रुपये इतका आखण्यात आला आहे. पण या गुंतवणुकीवर भरघोस उत्पन्न सरकारला मिळेल याची मात्र खात्री नाही. परंतु या तोट्याकडे दुर्लक्ष करत संपूर्ण भारतभर भारतीय रेल्वेचे जाळे पसरवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मंत्रालयाने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

andman-nicobar-marathipizza01

स्रोत

या रेल्वे लाईनमुळे पर्यटनाला चालना मिळणार हे जरी खरे असले, तरी सोबतच भारतीय सैन्याच्या दृष्टीने ही रेल्वे लाईन strategic link म्हणून उभारण्यात येईल. ज्यामुळे भारताच्या प्रदेशांना एक भक्कम सुरक्षा प्रदान केली जाईल. अश्याच प्रकारची strategic link या पूर्वी अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील उभारण्यात आली आहे. या strategic link मुळे युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा देशावर एखादे विपरीत संकट कोसळल्यास सैनिकांना आणि लष्कराच्या साधनांना वाहून नेणे सोपे जाते.

strategic-line-marathipizza

स्रोत

सरकारच्या या निर्णयामुळे आता खऱ्या अर्थाने अंदमान-निकोबार बेटे भारताशी जोडली जातील असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?