Site icon InMarathi

घरबसल्या सततच्या सहवासामुळे नकळत भांडणं वाढण्याचा धोका टाळायचा असेल तर हे वाचा

jab we met fight inmarathi

firstpost

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

करोना विषाणूने जगभरात थैमान घातलेलं आहे, आणि संसर्ग टाळण्यासाठी संपर्क टाळणं हाच एक पर्याय प्रत्येकाकडे आहे.

सरकार, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वजण हे युद्ध आपल्यासाठी लढत असताना आपण घरातूनच त्यांना साथ द्यायची आहे.

अर्थात मागील चार महिन्यांपासून आपण सारेच घराच्या चार भिंतीत कैद आहोत.

 

the week

 

या परिस्थितीत ज्यांना शक्य आहे ते वर्क फ्रॉम होम करत आहेत.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात, अनेक दिवस, सतत २४ तास घरातच कुटुंबाबरोबर एकत्र राहण्याचा योग फारच विरळ आहे.

अशात बाहेरच्या जगात घडणाऱ्या घडामोडी काही फार सुखकर नाहीत, त्यामुळे प्रत्येकावर या सगळ्याच कळत नकळत दडपण येणं अगदी स्वाभाविक आहे.

अचानक आलेला हा बदल पचवणं आव्हानात्मक आहे.

सततचा सहवास, घरून काम पूर्ण करण्याचं दडपण, करोना संदर्भातील नकारात्मक घडामोडी, आजूबाजूच्या एरवी कायम गजबजलेल्या जगात अचानक ठप्प झालेले व्यवहार यांमुळे अस्थितरत आली आहे.

बाहेर फिरायला जाणे, मजा करणे यावर आलेली बंधनं या साऱ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे चिडचिड आणि त्यातून घरातल्यांशी होणारे वादविवाद, भांडण हे अगदी सहज घडू शकत तुमच्याही नकळत.

 

 

परंतु विचारपूर्वक काही पथ्य पाळल्यास आपण हे सार टाळू शकतो.

चला जाणून घेऊया अशा काही गोष्टी ज्या केल्याने तुम्ही ह्या आव्हानात्मक परिस्थितीत एक उत्तम जोडीदार बनू शकता.

संयम बाळगा 

संयम हा एक असा मित्र आहे जो जितका अधिक जवळ असेल तितका राग, चिडचिड ह्या गोष्टी तुमच्या पासून दूर पळतील.

घरातील इतरांचा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचा मुद्दा शांतपणे मांडा. तसंच तो लगेच मान्य होईल ही अपेक्षा ठेवू नका.

काही गोष्टी सोडून द्यायला शिका.

 

stress

 

यासाठी दिवसातला काही वेळ एकटे रहा आणि आत्मपरीक्षण करा.

मन शांत आणि संयमित ठेवण्यासाठी तुम्ही ध्यान धारणा ही करू शकता. ध्याना मुळे मन प्रसन्न आणि सकारात्मक होते

वाद विवाद टाळा 

गप्पा मारता मारता अचानक अशा वळणावर गाडी येते जिथून मतभिन्नता निर्माण होऊन त्याचे रूपांतर वादात होऊ शकते.

 

jagoinvestor

 

अशा प्रकारचे विषय नक्कीच टाळायला हवेत. तसंच एकूण परिस्थिती विषयी आणि इतर सदस्यांविषयी सतत तक्रारीचा सूर ठेवून बोलत राहणे टाळा.

“तुझ्यामुळे .. ” , “तुझं हे नेहमीच आहे” अशी वाक्य न वापरलेलीच बरी.

 

shutterstock

 

इतरांना जबाबदार ठरवण्यापेक्षा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करा आणि त्यांची बाजू जाणून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा.

टीकाकार होऊ नका

एखादी गोष्ट न आवडल्यास ती सांगताना टीकेचा सूर ठेवू नका.

“ह्या ऐवजी आपण अस करून पाहूया का ?” , “अमुक अमुक करताना हा एक मुद्दा ही विचारात घ्यायला हवा…” अशा प्रकारची वाक्य वापरल्यास तुमचा जोडीदारही तुमची बाजू जाणून घेण्यास उत्सुक असेल आणि भांडण न होता शांतपणे सार काही हाताळलं जाईल.

घरात अशा सकारात्मक ऊर्जेची अत्यंत गरज आहे.

शांत रहा 

आपण २४ तास एकत्र आहोत आणि दोघांनाही आपाआपलं काम करायचे आहे, अशा वेळी नेहमीपेक्षा थोडे “कमी बोलणं” हे धोरण तुम्हाला लाभदायक ठरू शकते.

सतत बडबड करून वाद वाढवण्यापेक्षा थोडा वेळ स्वतःला आवडणा-या गोष्टी करा.

 

pinkvilla.com

 

याबरोबर जेंव्दा चर्चा कराल तेंव्हा दर वेळी प्रत्येक बाबतीत प्रतिक्रिया, मत देणे गरजेचे आहे का? ह्याचा विचार करून मगच बोला.

मितभाषी होण्याचा प्रयत्न करा. अशा अवस्थेत जेंव्हा सारेचजण थोडे वैतागलेले असतील, कुणालाही दुसर्याकडून मोठे लेक्चर ऐकण्यात नक्कीच रस नसणार.

तेंव्हा इतर वेळेस जर तुमची ही सवय घरातले चालवून घेत असतील तरी तसे करण्याची आत्ता ही वेळ नव्हे.

हे साध्य करण्यासाठी दिवसातला ठराविक वेळ अशा गोष्टीसाठी ठेवा ज्या तुम्ही एकटेच शांतपणे करू शकता.

 

 

जसं वाचन, हेडसेट लावून संगीत ऐकणं. कोडं किंवा सुडोकू सोडवणे, चित्र काढणं.

ह्या साऱ्यातून तुम्ही स्वतःला वेळ तर द्यालाच शिवाय काही वेळ आपोआपच मौन पाळाले जाईल.

स्वतः सकारात्मक रहा आणि घरात सकारात्मकता पसरवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करा.

सोशल मीडिया, टिव्ही/रेडिओ वरील बातम्या या साऱ्यातून सतत करोना विषयी आणि त्या अनुषंगाने इतर सर्व विषयावरील नकारात्मकता पसरत आहे.

तेंव्हा तुम्हाला घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी नक्कीच आवर्जून प्रयत्न करावे लागतील.

छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही जोडीदाराला आनंद देऊ शकता, त्यांच्या बरोबर घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा देता येईल.

ते कायम तुमच्यासाठी जी मेहनत घेतात त्याची दाखल घेणं, धन्यवाद म्हणणं यासाठी तुम्हाला फारसा वेळ खर्च करायचा आहे ना पैसे.

 

 

परंतु आपल्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर हास्याची आणि समाधानाची लकेर जर तुम्ही आणू शकलात तर घरातले वातावरण एकदम हलके फुलके होऊन जाईल.

मदत करा 

नवरा बायको दोघेही वर्क फ्रॉम होम करत असल्यास दोघांवरही ऑफिसच्या कामाची जबाबदारी असते तेंव्हा घरातील कामे ही दोघांनी वाटून घ्यायला काहीच हरकत नाही.

 

shutterstock

 

सध्या घरातील मदतनीस देखील येऊ शकत नाहीयेत त्यामुळे घरातील कामाचा ही बोजा आहेच.

दोघातील एकावरच ऑफिसच्या कामाची जबाबदारी असल्यास मात्र दुसर्याकडून संपूर्ण घरकामाची अपेक्षा केली जाऊ शकते.

असे होत असल्यास ऑफिसचं काम सांभाळून आपल्या जोडीदाराला घर कामात आवश्यक ती मदत जरूर करा, आणि ती देखील त्यांनी सांगितल्याशिवाय.

 

floora2000

 

त्यांनाही आरामाची गरज आहे आणि कुटुंबाच्या आरोग्याची, खाण्यापिण्याची काळजी या सगळ्याचे दडपण त्यांच्यावरही आहे हे विसरू नका.

घर आवरणं, दूध तापवणं, भाजी निवडणं, कपड्यांचे मशीन लावणं, झाडांना पाणी घालणं, मुलांबरोबर वेळ घालवणं, या व अशा अनेक छोट्या छोट्या कामातून तुम्ही हातभार लावू शकता आणि तुमचा जोडीदार याची योग्य दखल घेतल्याशिवाय राहणार नाही.

एकमेकांसाठी वेळ काढा

सध्या बिगबॉसच्या घराप्रमाणे सर्वच कामे स्वतः ची स्वतः करायची आहेत, त्यामुळे घरातले कर्ता पूरूष आणि स्त्री या दोघांनाही कामाचा प्रचंड ताण आहे.

त्यात ऑफिसचे काम, एरवी सुटीच्या दिवशी बाहेर फिरायला जाण्यात आपण एकमेकांबरोबर वेळ घालवत असाल परंतु सध्या ते शक्य नाही, तेंव्हा या साऱ्याची कमी भरून काढण्यासाठी दिवसातला काही वेळ जोडीदारासाठी नक्की काढा.

 

 

एकत्र चहा घेणं किंवा रात्री झोपण्यापूर्वी बाल्कनी मध्ये थोडा वेळ गप्पा मारणं, एकत्र व्यायाम या सारखे काही निवडक क्षण एकमेकांसाठी तुम्ही राखून ठेवू शकलात तर एकूणच ताण कमी होऊन ह्या साऱ्यातून सहज वेळ निभावून न्याल.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version