' करोनाशी २ हात करताना “या चुका तुम्ही करू नका” – ‘इटालियन’ प्रोफेसरचं आव्हान! – InMarathi

करोनाशी २ हात करताना “या चुका तुम्ही करू नका” – ‘इटालियन’ प्रोफेसरचं आव्हान!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

गेल्या काही दिवसांपासून आपल्या प्रत्येकाच्या ओठांवर एकच नाव आहे ते म्हणजे ‘करोना’! चीन मध्ये सापडलेल्या एवढ्याशा विषाणूने आज साऱ्या जगाला बंदी बनवून ठेवलं आहे!

भारतात तर आता करोना संशयित आणि बाधित लोकांची संख्या मिळून ४०० च्या घरात पोहोचली आहे, जी अत्यंत चिंतेची बाब आहे!

संपूर्ण जग आता करोनाच्या विळख्यात आलेलं दिसत आहे.जगातला प्रत्येक देश वेगवेगळ्या उपाय योजना राबवून करोना विरोधात लढत आहे.

जागतिक आरोग्य संगठना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या ताज्या आकडेवारी नुसार जगातले १८४ देश करोना बाधित आहेत तर ११२०१ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

corona virus inmarathi 2
India Today

 

करोनाचा सगळ्यात जास्त इफेक्ट हा इटलीला पडलेला आहे. २२ मार्च पर्यंत ४०३२ इटालियन नागरिकांनी आपला जीव गमावला. २० मार्च ला ६२७ तर २१ मार्च ला ७९३ लोकांनी इटली मध्ये आपला जीव गमावला.

चीन जिथे या विषाणू चा जन्म झाला, तिथे त्यांनी करोनामुळे होणारे मृत्यू कंट्रोल मध्ये आणले बोलले जात आहे. आता पर्यंत ३२६१ जणांनी तिथे जीव गमावला आहे.

चीनने दावा केला आहे की मागच्या एक आठवड्यात नवीन केसेसचं प्रमाण हे कमी झालेल आहे. खरं की खोटं त्यांनाच माहीत.

चीन मध्ये उदय झालेला आणि जवळपास सगळ्याच देशात पसरलेल्या कोरोनाचा फटका इटलीलाचं का जास्त बसला.? याच विश्लेषण करताना लंडन स्थित इटालियन प्राध्यापक वेलेरियो कॅप्रारो काही मुद्दे मांडतो.

 

valario capraro inmarathi
facebook

 

नेमकं काय त्याने त्यात मेंशन केलं आहे ते बघूया.

कॅप्रारो म्हणतो,

१. फेब्रुवारी मध्ये करोना ची पहिली केस सापडली.

पहिल्या आठवड्यात ११ शहरं ही लॉक डाऊन करण्यात आली. मृतांची संख्या खूपच कमी होती. राजकारणी आणि साथीच्या रोगाचे तज्ञ टीव्ही डिबेट मध्ये आपलं शहाणपण दाखवत होते.

एक साधा फ्ल्यू असल्याचं सांगून ते कोरोना ला अंडरएस्टीमेट करत होते.

 

italy corona inmarathi
al jazeera

 

२.  दुसरा आठवडा संपेपर्यंत उत्तर इटलीच्या बहुतेक भागात करोनाचा संसर्ग झाल्याचा दिसून आलं. एका दिवसात ५०-५० लोक मृत व्हायला लागली.

इटली च्या सरकारने लोंबार्डी सारखे मोठी राज्य लॉक डाऊन करायचा निर्णय घेतला.

पण तिथल्या राजकारण्यांना भलताच विचार आला.त्यांनी कोरोना च्या विरोधात घेतलेल्या निर्णयाचा ड्राफ्ट मीडियाला दिला.

आणि झालेल्या निर्णयाचा कायदा व्हायच्या आधीच जनता घाबरून लोंबार्डी सोडून जाऊ लागले. लोंबार्डी ला नंतर रेड झोन घोषित केले गेले. तोपर्यंत बराच उशीर झालेला.

३. तीन दिवसानंतर मृतांची संख्या ५० वरून थेट २०० वर गेली. रेड झोन च्या बाहेरून पण करोना चे केसेस दाखल व्हायला लागले.

परिणामी इटलीचे पंतप्रधान ज्यूसीपी कोंटे यांनी संपूर्ण इटली लॉक डाऊन चा निर्णय घेतला.

 

 

italy lockdown inmarathi
metro

 

४. चौथ्या आठवड्यात तर करोनाचा कहर दिसून यायला लागला.

इटलीची संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली. बर्गामो शहर जिथले शव आपण आर्मीच्या ट्रक मधून घेऊन जाताना पाहिले त्या शहरात ऍम्ब्युलन्स पोहोचायला ६-७ तास लागायला लागले.

एकूण मृतांपैकी ८५ ते ९० टक्के लोक ही घरातच मृत पावली. कारण हॉस्पिटलमध्ये ते वेळेवर पोहोचू शकले नाही. आणि पोहोचले तरी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ऍडमिट करुन घ्यायला जागा नव्हती.

पाय ठेवायला जागा नव्हती. शवांचे ढिगांचे ढीग उभे राहायला लागले. आणि याच शवांची विल्हेवाट लावायला आर्मी ला पाचारण करण्यात आले.

५. याच दरम्यान दक्षिण इटली मध्ये करोना चा संसर्ग वाढू लागला.कारण, उत्तर इटली मधून पळून आलेली लोक! सोबत येताना ही लोक करोना चा विषाणू सुद्धा घेऊन आले.

 

corona dead bodies inmarathi
time

 

आज महिना होत आला.

एक दिवसात मृतांची संख्या ७०० पार झाली. एक सुपरमार्केट बंद कराव लागलं कारण तिथल्या एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली. आणि हळूहळू सगळे सुपरमार्केट बंद केले गेले.

भारताने यातून काय धडा घेतला पाहिजे.?

महाराष्ट्रापेक्षा अर्धी लोकसंख्या असलेल्या इटली मध्ये कोरोनाने माजवलेला हाहाकार आपण बघतच आहोत.

विचार करा १३० करोड लोकसंख्या असलेल्या भारतात जर असाच विषाणू फोफोवला तर काय परिस्थिती ओढवू शकते.

भारतात आतापर्यंत ४०० च्या वर केसेस तर ७ मृत्यू कोरोना मुळे झालेले आहेत.

 

corona virus in india
the week

 

महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, दिल्ली सारख्या राज्यांनी लॉक डाऊन घोषित केले आहे. ३१ मार्च पर्यंत दळणवळण आणि इतर व्यवहार देखील  बंद केले गेले आहे.

परंतु तरी ही लोक घराबाहेर पडतच आहेत.

२२ मार्च ला झालेल्या जनता कर्फ्यु मध्ये सुद्धा लोकांनी प्रवास केलेला दिसून आला आहे. लोक आपली कर्मभूमी सोडून आपल्या मूळ ठिकाणी प्रवास करत आहेत!

ज्यामुळे करोना चा संसर्ग फोफावण्याचे चान्सेस भरपूर वाढलेले आहे. आता सरकारला मोठ्या शहरांसोबत गाव-कसब्यांसाठी पण उपाययोजना करावी लागणार आहे.

तज्ज्ञांच्या मते,

भारत आता दुसऱ्या स्टेज वर आहे. म्हणजेच लोकल ट्रान्समिशन. म्हणजे आतापर्यंत जे केसेस आले आहेत ते बाहेरून संसर्ग घेऊन आले आहेत.

 

janta curfew inmarathi
CineJosh

 

आणि भारतावर आता तिसऱ्या स्टेज चा धोका जाणवायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच कम्युनिटी ट्रान्समिशन.

यामध्ये सरसकट लोकांना करोनाची लागण व्हायला सुरुवात होते. इराण-इटली मध्ये आता ह्या तिसऱ्या स्टेजचा परिणाम दिसून येत आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात जास्त सावधानी बाळगणे अत्यंत गरजेचे होणार आहे.

सरकारने कितीही उपाययोजना केली तरी आपण स्वतः किती याबाबत सिरीयस आहोत हे एकूणच महत्त्वाचे ठरणार आहे.

कलम १४४ लागू असताना विनाकारण एकत्र येणे हे आपण टाळलं पाहिजे. कम्युनिटी ट्रान्समिशन चे चान्सेस आता वाढले असल्याने प्रवास करणे आपण टाळले पाहिजे.

 

corona patient inmarathi
deccan herald

 

आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत त्यामुळे नुकसान होत आहेत हे मान्य, परंतु मानवी जीव हा पैशां पेक्षा महत्वाचा आहे. त्यामुळे स्वतः सोबत दुसऱ्यांची काळजी घेणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.

देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सतत जनतेला आवाहन करावे लागत आहे! खरंच आपण एवढे मूर्ख आहोत का.?

विचार करा!! स्वतः सोबत इतरांचा सुद्धा विचार करून या महामारी च्या संकंटातून यशस्वी बाहेर पडण्याचा आपण संकल्प करूया.!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?