Site icon InMarathi

टेक्नोसॅव्ही युगात ‘या’ ७ सवयी ठरू शकतात तुमच्या मेंदुसाठी अत्यंत घातक

human brain inmarathi

free press journal

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आप्ल्याला सगळं झटपट आणि सहजरित्या उपलब्ध होतं. गणितं, काही माहिती आणि बरंच काही आपल्याला एका क्लिक् वर मिळतं.

त्यामुळे आपल्याला मेंदूला जास्त ताण देण्याची गरज नसते. आयतं सगळं मिळतंय मग कशाला डोक्याला ताण द्या अशी लोकांची मानसिकता होत चालली आहे.

त्याचप्रमाणे अत्याधुनिक गॅझेटस् मुळे शारीरिक हालचाली पण कमी होऊ लागल्या. सोयी सुविधा वाढल्या तसा शरीरावर वाईट परिणाम होऊ लागला माणसाच्या!

जेव्हा आपल्या आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा आपण आपल्या मेंदूच्या आरोग्याचा विचार करत नाही.. परंतु आपण, आपल्या मेंदूला जेव्हढे कार्यक्षम ठेवू तेव्हढे आपले शरीर क्रियाशील राहते.

 

free press journal

 

त्यामुळे आपल्याला आपल्या काही सवयी बदलाव्या लागतील. या काही सर्वसाधारण, आधुनिक सवयी टाळल्या तर नंतर आपणच आपले आभार मानू.

 

१. शारीरिक निष्क्रियतेचा मेंदूवर होणारा परिणाम :

शारीरिक निष्क्रियतेची किंमत – हृदयरोग, लठ्ठपणा, औदासिन्य, वेड आणि कर्करोग सारख्या दीर्घकालीन आरोग्याच्या समस्येच्या विकासाशी संबंधित आहे.

बरेच लोक “दैनंदिन कामासाठी” खूप वेळ लावतात, ज्यामुळे संज्ञानात्मक घट होते, गतिहीनता येते. गतिहीन असण्यामुळे मेंदूतील काही न्यूरॉन्सचा आकार बदलतो!

जर्नल ऑफ कॉम्पॅरेटिव्ह न्यूरोलॉजी (Journal of Comparative Neurology) च्या एका नवीन अभ्यासानुसार, निष्क्रियता आणि मानसिक असंतुलन यांच घनिष्ठ संबंध असतो.

 

india today

 

नियमित शारीरिक हालचालीमुळे आपणास संज्ञानात्मकपणे फायदा होतो – मेंदूची रसायने वाढतात जी चांगल्या स्मृती आणि शिक्षणाला प्रोत्साहित करतात.

आधुनिक युगामध्ये व्यायाम आणि व्यायामाच्या फायद्यांविषयी माहिती मिळवणे ही कठिण बाब नाही.

 

२. आपण मल्टीटास्किंग करत आहात?

आमचे स्मार्टफोन स्विस सैन्याच्या चाकू सारखे बनले आहेत. आपण सदैव फोन वापरत असतो.

रस्त्यावरुन फिरत असताना, जेवताना, रांगेत उभे असताना, वाचताना, अगदी टॉयलेट मध्ये पण फोन घेऊन जातात कित्येक जण!

आपण ऐकले असेल की, असे मल्टीटास्किंग आपल्या तब्येतीसाठी खराब आहे. तपासणीत असे निष्पन्न झाले आहे की ही एक सवय आहे ज्यामुळे मेंदूला त्रास देखील होतो आणि आपल्याला सुस्त बनवते.

 

yourstory

 

अर्ल मिलर, एमआयटीचे न्यूरो सायंटिस्ट आणि विभक्त लक्ष देणाऱ्या जागतिक तज्ञांपैकी एक असे म्हणतात, मल्टीटास्किंग आपल्या मेंदूसाठी हानीकारक असते!

जेव्हा लोकांना वाटते की ते मल्टीटास्किंग करीत आहेत, तेव्हा खरं तर ते फक्त एका कामातून दुसऱ्या जागी वेगात बदलत आहेत…आणि प्रत्येक वेळी ते असे करतात तेव्हा असे करण्याची एक मानसिक किंमत असते.

मल्टीटास्किंग तणाव संप्रेरक कोर्टिसोल वाढवते, जो आपल्या मेंदूला उत्तेजित करू शकतो आणि मानसिक धुके किंवा असंतुलित विचारांना कारणीभूत ठरू शकते.

 

३. गरजेपेक्षा अधिक माहितीमुळे मेंदूत अनावश्यक उत्तेजन होते :

आम्हाला प्राप्त होणारे ईमेल, सोशल मिडिया वरील माहिती आणि सूचना ह्यांचे परिमाण जबरदस्त असू शकतात – बर्‍याच लोकांना याचा दिवसभर खूप त्रास होतो.

ह्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यास ताणतणावामुळे मेंदूवर ताण येतो.

 

tech wire asia

 

“गरजेपेक्षा खूप जास्त माहिती” म्हणजे, “आधुनिक आयुष्यातील सर्वात जास्त चिडचिडेपणा” हे इकॉनॉमिस्ट शम्पीटर लिहितात.

लंडन येथील ग्रॅशॅम कॉलेजमधील मानसशास्त्रचे भेट देणारे माजी प्राध्यापक ग्लेन विल्सन यांना आपल्या संशोधनात असे आढळले की,

आपण एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहात अशा परिस्थितीत असताना आणि आपल्या इनबॉक्स मधे जर न वाचलेली ईमेल असेल तर आपला प्रभावी बुद्ध्यांक १० पर्यंत कमी करू शकतो.

आपला मेंदू दररोज जास्तीत जास्त सक्रिय ठेवण्यासाठी, दिवसभर माहिती फिल्टर करण्यासाठी अधिक चांगली साधने आणि सेटिंग्ज वापरा.

आपण मीडिया कशा प्रकारे वापरता याबद्दल सक्रिय व्हा. अनावश्यक माहितीकडे दुर्लक्ष करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.

जेव्हा आपण विचार करून आपल्या दिवसाचे नियोजिन करता तेव्हा तुम्ही आपल्या मेंदूत कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ करू शकता.

 

४. जास्त वेळ बसून राहणे :

 

rotten tomatoes

 

आपल्या आरोग्यासाठी आपण करू शकणार्‍या सर्वात वाईट गोष्टींपैकी बसून राहणे ही एक गोष्ट आहे.

नवीन यूसीएलए अभ्यासानुसार असे म्हटले आहे की जे लोक जास्त बैठी कामं करत आहेत त्यांच्या स्मृतीवर वाईट परिणाम होतो.

संशोधनात असे आढळले आहे की बसणे म्हणजे केवळ शारीरिक आरोग्याचा धोका नाही – तर मेंदूशी निगडित जोखीम देखील आहे.

तुम्ही जास्तीत जास्त बैठं काम करत असाल तर, काम करताना उभे राहणे, पाय हलविणे, पाठीला आराम मिळेल असा व्यायाम करणे, अगदी एका वेळी फक्त १० मिनिटे हालचाल,

यासारख्या मार्गांचा अवलंब करुन आपण बसण्याचे प्रमाण कमी करू शकता – यामुळे कमी बसण्याची, अधिक हालचाली करण्याची संधी मिळते.

 

५. आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो :

आज, डिजिटल माध्यमां मुळे समोरासमोरील संवाद कमी होत आहे. पूर्वीपेक्षा लोक जास्त वेळ ऑनलाइन घालवतात.

समोरासमोर संभाषण आपल्या मेंदूसाठी निश्चितच फायदेशीर आहे. मिशिगन विद्यापीठाच्या अभ्यासानुसार असे आढळले आहे

की दुसर्‍या व्यक्तीशी दररोज फक्त  १० मिनिटांच्या संभाषणामुळे स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती सुधारते.

 

scoopwhoop

 

“आमच्या अभ्यासानुसार, स्मृती आणि बौद्धिक कार्यक्षमता वाढविण्याकरिता पारंपारिक प्रकारच्या मानसिक व्यायामाइतकेच सामाजिक कार्य प्रभावी होते,”

असे यूएम इन्स्टिट्यूट फॉर सोशल रिसर्च (आयएसआर) चे मानसशास्त्रज्ञ आणि आयएसआरच्या अभ्यासाचे अग्रणी लेखक ऑस्कर यबरा यांनी सांगितले.

दिवसभर स्क्रीन पाहिल्यास आपले डोळे, कान, मान, खांदे, पाठ, मनगट आणि तळवे दुखू शकतात.  झोपेत व्यत्यय येऊ शकतो.

तज्ञांच्या मते, जास्त वेळ स्क्रीन बघितल्यामुळे बौद्धिक क्षमतेवर तसेच भावनिक आरोग्यावरही नकारात्मक प्रभाव पडतो.

हानिकारक सवयी टाळण्यासाठी ऑनलाइन अस्ण्य़ाची, टी.व्ही बघण्याची एक वेळ ठरवा. ऑनलाइन असणे, स्क्रीन बघणे टाळू शकत नाही.

तथापि, आपण एखादे डिव्हाइस वापरत असल्यास, सावधगिरी बाळगा.

 

६. हेडफोन्सचा अतिरिक्त वापर :

 

the indian express

 

आज-काल हेडफोन्स लावऊन मोबाईलवर, कॉम्पुटर-लॅपटॉपवर संगीत ऐकणे, चित्रपट बघणे अगदी सामान्य गोष्ट झालीये.

हे हेडफोन्स् आपल्या श्रवणशक्तीला सहज नुकसान करू शकतात.

जर आपण सतत हेडफोन्स वापरले तर आपण आपल्या श्रवणशक्तीला हानी पोहोचवू शकतात. परंतु हे फक्त आपले श्रवणशक्तीवरच परिणाम करतात असे नाही तर,

अल्झाइमर आणि मेंदूच्या ऊतींचे नुकसान यासारख्या मेंदूच्या समस्यांशी संबंधित आहे.

हेडफोन्स चा अतिरिक्त वापर टाळा, आवाज कमी ठेवावा ज्यामुळे श्रवणश्क्तीवर तसेच मेंदूवर पडणारा ताण कमी होण्याची शक्यता असते.

 

७. कमी झोपल्याने आपल्या मेंदूला त्रास होतो :

अनेक व्यस्त व्यावसायिकांसाठी अपुरी झोप ही एक मोठी समस्या आहे. झोपेच्या अभावमुळे गंभीर अल्प-मुदतीचा किंवा दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतो!

 

the indian express

 

यामुळे ग्लूकोजची पातळी कमी होणे, मनःस्थिती बिघडणे, डोकेदुखी, दृष्टीदोष, स्मृती आणि संप्रेरक असंतुलन विलंब होऊ शकतो.

अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की, पुरेशी झोप न घेतल्यास खरोखर आपला मेंदू बिघडू शकतो.

झोपेचा अभाव तुमची विचारसरणी मंद करते, तुमची स्मरणशक्ती, एकाग्रता, निर्णय घेण्याच्या क्षमतेत आणि शिक्षणास अडथळा आणते.

व्यवस्थित, पुरेशी झोप मेंदूचे आरोग्य सुधारण्याचा एक महत्वाचा मार्ग असू शकतो. मेंदूच्या आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी रात्री ७ ते ८ तास चांगली झोप आवश्यक आहे.

जर आपण आपल्या मेंदूच्या आरोग्याबद्दल आता किंवा भविष्यात काळजीत असाल तर आपल्या मेंदूची काळजी घेणे शिका.

आपल्या जीवनशैलीत काही सोप्या बदलांमुळे तुमची स्मरणशक्ती, शिकणे, मानसिक लवचिकता आणि मेंदूचे सर्वांगीण आरोग्य वाढेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version