Site icon InMarathi

स्पेशल ऑप्समधल्या ‘हिम्मत सिंग’च्या स्ट्रगलची पडद्यामागील गोष्ट!

himmat singh kk inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूड, लोकांना आकर्षित करणारे एक महत्त्वाचे क्षेत्र…इथे येण्यासाठी अनेक लोक झटत असतात! प्रत्येकालाच या मायानगरीचं एक वेगळंच आकर्षण असतं!

इथे दर दिवसाला हजारो लोकं येतात कुणी अभिनेता बनायला, कुणी दिग्दर्शक बनायला कुणी संगीतकार बनायला पण सगळ्यांची स्वप्नं पूर्ण होतातच असं नाही!

प्रत्येकालाच अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान बनता येत नाही!

काही येतात, काम मिळवण्यासाठी संघर्ष करतात आणि यशस्वी होतात याउलट काही लोक संघर्ष करूनही अयशस्वी ठरतात.

मात्र काही लोक येतात,संघर्ष करून सुद्धा त्यांना फार प्रसिद्धी मिळत नाही. खरं तर चित्रपटात काम करणाऱ्यांना प्रसिद्धीचं वलय प्राप्त होते पण काही कलाकारांना ते मिळतही नाही किंवा काही लोक त्यापासून फार दूर निघून जातात.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कलाकारांना प्रसिद्धी मिळणे हे जेवढे त्या कलाकाराच्या अभिनयावर अवलंबून असते तेवढेच ते प्रेक्षकांनी दाद देण्यावर सुद्धा अवलंबून असते.

काही कलाकारांना हवी तेवढी दाद किंवा प्रसिद्धी प्रेक्षकांकडून दिली जात नाही आणि काही काळाने ते कलाकार फार मागे जातात.

बऱ्याच कलाकारांचे असे मत आहे की कलाकाराला प्रसिद्धी मिळणे हे त्याच्या नशिबावर अवलंबून असते. आज आपण अशाच एका कलाकाराबद्दल माहिती घेणार आहोत!

जो फार काळ प्रसिद्धी च्या झोतात नव्हता. या कलाकाराचे नाव आहे के के मेनन. याने बॉलिवूड सोबतच तमिळ आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

के के मेनन यांचे बालपण अंबरनाथ आणि पुणे येथे गेले. ते जरी स्वतःचे मूळ गाव मुंबई समजत असले तरी ते मूळचे केरळ राज्यातील आहेत.

 

त्यांचे कुटुंब त्यांच्या लहानपणीच मुंबई मध्ये आले. मेनन यांचे वडील खडकी येथील एका कारखान्यात कामाला होते आणि त्यांना कॅशियर मेनन या नावाने ओळखले जायचे.

मेनन यांचे १० वी पर्यंत चे शिक्षण सेंट जोसेफ या शाळेत झाले.त्यानंतर त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेऊन पुणे विद्यापीठात management ची पदवी घेतली. त्यांना लहानपणी गझल गायची सुद्धा आवड होती.

मेनन यांच्या अभिनयाची सुरुवात जाहिरातीतून झाली. त्यांनी कायनेटिक होंडा या गाडीच्या जाहिरातीत काम केले आणि त्यानंतर मालबोरो या सिगारेट कंपनीच्या जाहिरातीत सुद्धा काम केले.

 

जाहिराती नंतर त्यांनी आपला प्रवास हळू हळू टीव्ही सीरिअल कडे वळवला आणि त्यानंतर ते चित्रपटांकडे वळले. त्यांनी थोडे फार नाटकाचे प्रयोग सुद्धा केले जेथे त्यांची आणि त्यांच्या पत्नी निवेदिता भट्टाचार्य यांनी भेट झाली.

त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते नसीम जो १९९५ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर त्यांचा भोपाळ एक्स्प्रेस हा चित्रपट सुद्धा लगेचच प्रदर्शित झाला.

मेनन यांनी प्रधान मंत्री नावाच्या मालिकेत काम केले तसेच झेब्रा २ आणि लास्ट ट्रेन टू महाकाल नावाच्या लघुपटात सुद्धा काम केले.

 

हजारो ख्वाईशे ऐसी या मालिकेमध्ये त्यांच्या कामाचे सर्वांकडून च कौतुक केले गेले आणि इथूनच त्यांच्या या क्षेत्रातील वाटचालीला सुरूवात झाली. 

मात्र मेनन हे खरे प्रसिद्धीच्या झोतात आले ते ब्लॅक फ्रायडे या चित्रपटांमुळे.

१९९३ च्या बॉमबस्फोटांवर आधारित असलेला हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला आणि त्यात मेनन यांनी केलेली इन्स्पेक्टर राकेश मारिया यांची भूमिका खास आकर्षण ठरली आणि त्याचे सगळीकडून खूप कौतुक सुद्धा झाले.

लोकरनो इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये ब्लॅक फ्रायडे या चित्रपटाचे प्रदर्शन झाले आणि त्या मध्ये मेनन यांची भूमिका कौतुकास पात्र ठरली.

 

आणि यातील एक सीन विशेष ठरला तो म्हणजे एका घराची झडती घेत असताना राकेश मारिया यांना फ्रीज वर केळी दिसतात आणि त्यांनी दिवसभर काही खाल्लेले नसल्याने ते केळी खातात,

आणि सोबतच्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा देतात आणि मग घोळ लक्षात आल्यावर म्हणतात आणखी केळी असतील फ्रीज मध्ये. या सीन मध्ये त्यांनी केलेला अभिनय वाखाणण्याजोगा आहे.

मात्र त्यांचे दीवार आणि सिलसिला हे दोन चित्रपट काही कारणामुळे प्रदर्शित झाले मात्र त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि ते बॉक्स ऑफीस वर आपटले.

सरकार या चित्रपटात मेनन यांनी जी भूमिका साकारली त्यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड चे नामांकन प्राप्त झाले होते.

लाईफ इन अ मेट्रो या चित्रपटातील त्यांची नवऱ्याची भूमिका सुद्धा विशेष लक्षवेधी ठरली होती.

२०१४ मधील हैदर चित्रपटातील खुरम मीर या त्यांच्या भूमिकेला सहाय्यक अभिनेत्याचे फिल्मेअर आणि IIFA पुरस्कार मिळाले होते.

 

त्यांनी गाझी अटॅक या चित्रपटात सुद्धा जहाजाचा कप्तान म्हणून अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच त्यांनी एक सांगायचंय या मराठी चित्रपटात सुद्धा काम केले आहे.

शिवाय नुकतीच हॉटस्टार या ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वर त्यांची स्पेशल ऑप्स ही नवीन वेबसिरिज येऊ घातली आहे!

ज्यात त्यांनी ‘रॉ’ या भारताच्या गुप्तहेर संघटनेच्या मुख्य ऑफिसरची भूमिका बजावली आहे, ही वेबसिरिज फेमस डायरेक्टर नीरज पांडे यांची पहिली वेबसिरिज आहे!

खरं तर के के मेनन या ५३ वर्षांच्या अभिनेत्याने आपल्या अभिनयाचा कस लावण्यासाठी जाहिरात, मालिका ते चित्रपट हे सर्व प्रकार हाताळले आणि आत्ताच्या जमान्यातील वेबसीरीज सुद्धा केली.

 

 

पण म्हणावं तितकं फेम या अभिनेत्याला मिळालं नाही, पण तरीही ते काम करत राहिले आणि आज चित्रपट सृष्टीत त्यांनी स्वतःच असं एक स्थान निर्माण करून आपल्याला दाखवून दिलं की,

माणूस मेहनती आणि प्रतिभावंत असेल तर एक ना एक दिवस तो नक्कीच यशस्वी होतो आणि एखाद्या अभिनेत्या कडे एवढे विविधांगी गुण असणे हेच त्यांचे वेगळेपण आहे!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version