आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“दिया मिर्ज़ा” हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते ती प्रसन्न चेहेऱ्याची, पाणीदार, बोलक्या डोळ्यांची, बाहुलीसारखी नाजूक अशी एक लावण्यवती!
जिने २००० सालचा मिस् एशिया पॅसिफिक हा खिताब जिंकला! त्याच कार्यक्रमात तिला मिस् ब्युटिफुल स्माइल आणि सोनी व्ह्युअर्स् हे देखील किताब देण्याते आले.
त्यावेळी ती जेमतेम १८ वर्षांची होती. हैदराबादच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसमधील फॅमिली फ्रेंड असलेल्या एका बाईचा फोन आला तेव्हा तिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती.
त्या ओळखीच्या बाईने दियाला काही फॅशन शो करताना पाहिले होते आणि तिने दियाला ऑडिशनबद्दल सांगितले आणि तिला आश्चर्य वाटले की.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
तिने त्यापूर्वी कधीही विचार केला नव्हता. तिच्यासाठी सौंदर्य स्पर्धेला फारसे महत्त्व नव्हते. पण तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला यात सहभागी व्हायचं होतं, म्हणून दियानेही तिच्याबरोबर फॉर्म भरला.
तिची उंची ५’६’’ असूनही ती जजेस् ना वयाने लहान वाटली पण, आश्चर्य असे की नंतर तिला कॉल आला की तिची निवड झाली आहे आणि तिला मुंबईला बोलावण्यात आले.
त्या वेळी स्वतःच्या बोर्डिंग, लॉजिंग आणि प्रवासाची काळजी स्पर्धकांना घ्यावी लागली. तिच्याकडे काही पैसे होते, जे तिने वयाच्या १६ व्या वर्षी एका मल्टीमीडिया कंपनीत काम करून कमावले होते.
नंतर तिने ‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यात सर्वांनी तिची विशेष दखल घेतली, तिचा अभिनय लक्षात राहतो तो २००३ मध्ये आलेला ‘तहज़िब’ ह्या चित्रपटातला!
यात तिने एका ‘स्पेशल चाइल्ड’ची भूमिका केली होती. मग २००४ मधे विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘परिणिता’ आला. यातही तिने उत्तम अभिनयाने सर्वांवर छाप पाडली.
दिया मिर्ज़ाचा जन्म हैदराबादमध्ये ९ डिसेंबर १९८१ मध्ये झाला. तिचे वडील फ्रॅंक हेंडरिक जर्मन तर तिची आई बंगाली आहे.
–
- हे मराठी सेलिब्रिटी आडनाव लावायचं का टाळतात? जाणून घ्या त्यांची खरी आडनावं!
- दाक्षिणात्य लोक, मुख्यतः तामिळी लोक आडनाव का वापरत नाहीत?
–
दिल्लीतील एका मॅक्सम्यूलर भवनाच्या भेटीत तिच्या आई वडिलांची भेट झाली. विशेष म्हणजे दियाच्या आईने जर्मन भाषा शिकण्यासाठी परदेशी भाषा म्हणून घेतली होती, त्यामुळे ती अस्खलितपणे भाषा बोलू आणि वाचू शकली. ती नऊ वर्षांची असताना तिच्या वडीलांचं निधन झाले.
दिया आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. पण तरीही एकुलती एक मुलगी आहे म्हणून तिचे फालतू लाड झाले नाहीत.
दिया स्वावलंबी व्हावी ह्यासाठी प्रयत्न करताना तिच्या आईने तिच्यावर योग्य ते संस्कार केले. दिया सांगते, तिचे तिच्या आईशी खास संबंध आहेत. दियाची तिच्या आईशी असलेली नाळ तुटली नाही कधीच!
साहिल संघवी हा दिया मिर्ज़ाचा जीवनसाथी आहे, जो आधी तिचा बिझिनेस पार्टनर होता. दियाला सर्वात जास्त त्याचे मन, त्याची मूल्ये, त्याचा विचार करण्याची पद्धत आवडते.
साहिल लोकांशी आपुलकीने वागतो. दियासाठी ती सर्वात मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाला महत्त्व देणे आणि प्रत्येकाशी सन्मानपूर्वक वागणे अशक्य आहे.
पण साहिल तसाच आहे असं दिया सांगते. साहिलच्या स्वभावाच्या प्रेमात असणारी दिया देवावर श्रद्धा असणारी आहे. देवानेच साहिलशी भेट घालून दिली असं ती मानते.
ऑक्टोबर २०१४ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. मात्र काही महिन्यांपुर्वीच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
वडिल जर्मन असूनही दिया का लावते ‘मिर्ज़ा’ आडनाव?
दिया मिर्ज़ा सांगते, “माझ्या दुसर्या वडिलांना “सावत्र” म्हणून संबोधणे मला आवडत नाही कारण ते माझे जन्मदाते वडील नसले तरी एक उत्कृष्ट पालक होते!
ज्यांनी माझ्या वडिलांचे स्थान बळकावून घेतलेले नाही तर त्यांच्या प्रेमळ वागण्याने, पालकत्त्वाने ते वडील बनले माझे.
ते हैदराबादचे मुस्लिम होते. तिच्या वडिलांचा मृत्यू सगळ्यात वाईट गोष्ट मानते दिया. त्यांची पहिली पत्नी गरोदर असताना मरण पावली, मग त्यांनी दियाच्या आईशी – दीपा ह्यांच्याशी लग्न केले.
या सावत्र वडिलांनी खूप माया लावली, त्यामुळे दियाचे नव्या वडिलांशी सूर लवकर जुळले. त्यांनी दियावर प्रेमाची जबरदस्ती कधीच केली नाही. दिया सांगते,
“आम्ही एकत्र असताना वडिलांच्या प्रेमाची जाणीव झाली नाही मला कधीच. मी घर सोडल्यानंतर मात्र खरोखरच त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली आणि जेव्हा मी मुंबईत गेले तेव्हाच माझ्या लक्षात आले,
की त्यांनी माझ्या आयुष्यात काय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि वडील म्हणून माझेही त्यांच्यावर किती प्रेम आहे!
–
- सिंधी लोकांच्या आडनावामागे “आनी” का असतं? प्राचीन इतिहास…
- इंदिरा यांच्या ‘गांधी’ आडनाव पडण्यामागे असलेली ३ कारणे!
–
त्यांच्याबरोबर राहायला मी हैदराबादला परत जाऊ शकले नाही, परंतु शेवटच्या काही वर्षांत त्यांच्यावरील माझे प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे.
मुंबईत येऊन मी खरेदी केलेल्या घरात वडिलांनी प्रवेश केला तेव्हाचा दिवस मी कधीही विसरणार नाही, माझ्या घराबाहेरच्या नेम प्लेटमध्ये ‘मिर्ज़ा’ नाव आहे.
त्यांना ते लक्षात येईल की नाही हे मला माहित नव्हते. पण ते लिफ्टमधून बाहेर आले, त्यांच्या हे लगेचच लक्षात आले, ते तिथेच थांबले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी मला मिठी मारली.
आणि ते म्हणाले, ‘तू मेरी बेटी नहीं, तू मेरा बेटा है।’ त्यानंतर जवळपास एक वर्षानंतर त्याचा मृत्यू झाला.”
“मी लंडनमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणात होते आणि आई माझ्याबरोबर होती. सहसा, ती माझ्याबरोबर कधीच प्रवास करीत नव्हती, जेव्हा मी लांबलचक शूट म्हणून तिला बरोबर येण्याची विनंती केली तेव्हा असेच झाले.
रात्री, माझ्या चुलतभावाचा आम्हाला फोन आला की माझे सावत्र वडील रुग्णालयात दाखल झाले आहेत आणि कोमामध्ये आहे. ती परत धावत गेली.
तिने ऐकले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती कोमामध्ये असते तेव्हा देखील आपण आपल्यास काय सांगितले जात आहे हे ती ऐकू शकते म्हणून ती वडिलांशी बोलू लागली.
तिने मला फोन केला आणि म्हणाली, ‘तुला त्यांच्याशी बोलायचे आहे काय?’ आणि मी म्हणाले, ‘होय.’ तिने वडिलांच्या कानाला फोन लावला आणि मी म्हणाले,
‘आप्पा, तू मला माझं लग्न लावशील असे वचन दिले होतेस. ते झाल्याशिवाय तू कुठेही जाऊ शकत नाहिस. तुला माझी वाट पाहावी लागेल.’
आणि तिकडची लोकं सांगतात, त्यांनी कोमामध्ये असतानाही डोळे मिचकावले आणि मी त्यांना सांगितलेली ही शेवटची गोष्ट आहे.”
वडिलांचा मृत्यु ही आयुष्यातील सगळ्यात वाईट गोष्ट मानते ती! आणि त्याहूनही वाईट म्हणजे त्यांच्या अखेरच्या क्षणी ती तिथे नव्हती.
आई-वडिल तिचे सर्वस्व होते असं ती सांगते. वडिलांनी तिला माया लावली. त्यांच्या मृत्युवर दियाचा विश्वासच नव्हता बसत, ती परदेशात असल्याने तिच्यासाठी न थांबता बाकीच्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
दिया आणि तिची आई दियाच्या वडिलांच्या स्मरणार्थ अल्कोहोलिक आणि ड्रग्ज ऍडिक्ट लोकांसाठी काम करतात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.