' भारतातल्या पहिल्या पेशंटचे कपडे डॉक्टर रोज का जाळायचे? वाचा – InMarathi

भारतातल्या पहिल्या पेशंटचे कपडे डॉक्टर रोज का जाळायचे? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

करोनाचं संकट चीनपासून सुरु झालं असलं, तरी वा-याच्या वेगात ते जगभर पसरलं.

 

corona inmarathi

 

कोणत्याही आर्थिक, सामाजिक संकटापेक्षा हे संकट खूपच भयंकर आहे.

सगळ्यांना सक्तीने घरी बसावं लागलं होतं.

आर्थिक मंदीचा फटका सहन करून सगळ्या कंपन्यांनी ३१ मार्च पर्यंत बंदला पाठिंबा दिला होता .

मात्र मृतांचा वाढणारा आकडा, रुग्णालयात भरती होणारे रुग्ण यांची संख्या टिव्हीच्या पडद्यावर पाहिली की पोटात गोळा निर्माण व्हायचा.

सरकार, हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, नर्सेस आदी सगळेच आपापल्या परीने कोरोनाशी लढायला सज्ज झाले

 

corona ward inmarathi

 

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक साथीचा रोग जाहीर केला.

चीन, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत यांसारख्या सगळ्याच देशात जीवघेणे विषाणु थैमान घालत असतातच.

परदेशातले सगळे मायदेशी परतत होते, विमानतळांवर तपासणी होऊन खबरदारी म्हणून क्वोरोंटाईनचा शिक्का हातावर मारत होते .

 

stamp inmarathi

हे ही वाचा – “डायबेटीस”च्या रुग्णांनी कोरोनाच्या संकटात “ही” काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील

रेल्वे स्टेशन्स, बसस्टॅंड इत्यादी सार्वजनिक ठिकाणी सर्वतोपरी ह्या विषाणूशी लढण्याची माहिती दिली जात होती. हॅंड सॅनिटायझर वापरा, मास्क लावा अशा उद्घोषणा आज ही सगळीकडे दिल्या जात आहेत.

मनुष्य हा असा प्राणी आहे की तो अस्मानी संकट आले की, एकजुटीने, सामर्थ्याने त्याच्याशी दोन हात करायला तयार होतो. हे इतिहासापासून चालत आलेले आहे.

प्लेगचे थैमान असो, लातूर-खिल्लारी येथील सगळ्यादेशाला हादरवून टाकणारा भूकंप असो की २६ जुलै चा महापूर!

 

26tj july inmarathi

 

अचानक आलेल्या संकटांनी सुरवातीला भयभीत झालेला, डगमगलेला मनुष्य स्वतःला त्यातून सावरून संकटाशी सामना करायला सज्ज झाला.

कोरोनाच्या संसर्गाच्या वेळीही असंच झालं!

कोणाला काही कळायच्या आत वेगाने हा विषाणू सर्वत्र फैलावला. चीनमधल्या वूहानमध्ये प्रादुर्भाव झालेला हा संसर्गजन्य रोग काही तासांतच सर्वत्र पसरू लागला.

लोकं,सरकारी यंत्रणा, डॉक्टर्स् सगळेच गडबडून गेले, सगळेच हादरून गेले होते.

हा रोग नेमका काय आहे हे कळायच्या आत हा रोग सगळ्या देशांमध्ये पसरला होता, त्याच्यावर, तसेच त्याच्या इलाजावर संशोधन सुरू असतानाच बळींची संख्या वाढु लागली. 

 

corona virus 10 inmarathi

 

दिवसेंदिवस या कोरोना व्हायरस्ची लागण झालेले आणि बळी गेलेल्यांची संख्या वाढत चालली होती.

सगळीकडे भयाचं, दहशतीचं वातावरण आहे. पण, मनुष्य हार मानणारा प्राणी नाही.

स्वच्छतेसह घराबाहेर न पडणे यांसारख्या गोष्टी कसोशीने पाळल्या जात आहेत.

ह्यातच भर टाकणारी, दिलासा देणारी एक बातमी आली आहे.

भारतातील करोना बाधित २० वर्षीय मुलगी आता पूर्णपणे बरी झाली आहे.

केरळमधील त्रिशूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या या मुलीच्या तपासणीत आता करोना विषाणू संदर्भातील चाचणीचे निदान  नकारात्मक असल्याचे दिसून आले होते.

 

kerala inmarathi

हे ही वाचा – कुटुंबव्यवस्थेला निर्माण झालाय धोका; कारण आहे कोरोनाचा “भलताच” परिणाम!

ती आता रुग्णालयातून घरी गेली . तरीही, त्यानंतर तिचे निदान कसं केले गेले आणि ती कशी रोगमुक्त झाली, ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया.

करोना व्हायरसची लागण झालेली ही भारतातील पहिली पेशंट होती जी चीनमध्ये शिक्षण घेत होती.

चीनमध्ये शिकणारी ही २० वर्षीय वैद्यकीय क्षेत्रातली विद्यार्थीनी काही इतर विद्यार्थ्यांसह चीनहून भारतात केरळमध्ये परत आली.

 

china student inmarathi

 

ती चीनच्या वुहानमध्ये शिकत होती जिथे कोरोना विषाणूचा पहिला आणि जबरदस्त हल्ला झाला.आणि काही कळायच्या आतच तो सर्वत्र, इतर देशांमध्येही पसरला.

जेव्हा तिला सर्दी आणि तापाची लक्षणं जाणवली, तेव्हा ती डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली.

एकापाठोपाठ एक चाचण्या झाल्या. जेव्हा भारतात नोवेल कोरोना विषाणूच्या पहिल्या सकारात्मक घटनेची बातमी समोर आली तेव्हाच ती रुग्णालयात होती.

 

corona test inmarathi

 

करोना व्हायरसची तपासणी केल्यावर असं आढळलं की तीच पहिली सकारात्मक रुग्ण आहे.

व्हायरस सापडल्यानंतर काय झालं?

डेक्कन हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत ती मुलगी म्हणाली,

“’डॉक्टरांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळताच, मी माझ्याबरोबर तेथून आलेल्या सुमारे २० लोकांशी संपर्क साधून त्यांना याबद्दल माहिती दिली.

मी त्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगितलं. माझी तब्येत ठीक होती, मला इतर कोणताही आजार नव्हता, म्हणून मला खात्री होती की मी नक्की ठीक होईन. मी पूर्णपणे व्हायरसमुक्त झाल्यानंतर माझे बरेच नातेवाईक आणि मित्र मला भेटायला आले. परंतु, मला लोकांचे लक्ष माझ्याकडे वेधून घ्यायचे नाहीये, म्हणून मी आत्ता आपले नाव, आपली ओळख सांगू इच्छित नाही.”

‘नवभारत टाईम्स’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ती मुलगी म्हणाली की तिला वेगळ्या वॉर्ड मध्ये (आयसोलेशन) ठेवण्यात आलं होतं.

डॉक्टर तिचे दररोज कपडे जाळत असत.

 

burn dress inmarathi

 

विषाणू कपड्यांवर पण असू शकतात आणि ते नष्ट करण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे कपडे जाळणं! कारण हा विषाणू सहजासहजी नष्ट होणारा नाहीये.

जास्त वेळा फोन हाताळण्याची तिला परवानगी नव्हती. फोनपण स्वच्छ ठेवावा लागत असे.

आयसोलेशन वॉर्डमध्ये पूर्णतः एकटी असल्याने तिला अस्वस्थता वाटायची, बेचैनी वाटायची किंवा एकटेपणा असह्य व्हायचा.

 

corona inmarathi

 

तिच्याकडून श्वसनाचे व्यायाम करून घेण्यात येत होते.

यातून असं लक्षात येते की, या रोगातून मुक्त व्हायचं असेल तर दृष्टीकोनही सकारत्मक हवा. बरं होण्य़ाची जबरदस्त इच्छा हवी. तरच उपचारांना योग्य ते प्रतिसाद मिळतात.

कधी सोडण्यात आले?

११ फेब्रुवारी रोजी तिच्या चाचण्या नकारात्मक झाल्या होत्या, परंतु त्याबाबतची खात्रीची प्रतीक्षा होती. तिला ९ ते १० दिवस देखरेखीखाली ठेवून अखेर २० फेब्रुवारी रोजी तिला त्रिशूर मेडिकल हॉस्पिटलमधून सोडण्यात आले.

 

home inmarathi

 

परंतु खबरदारी म्हणून ती १ मार्चपर्यंत घरातच राहिली होती. आता तिची कथा समोर आली आहे.

जेव्हा चीनमध्ये कोरोना विषाणू नियंत्रित होईल, तेव्हा ती तिथे परत जाईल आणि तिची डिग्री पूर्ण करेल. त्यांचा अभ्या भरून यावा याकरिता त्यांचे वर्ग आधीच ऑनलाईन सुरू करण्यात आले होते.

आपण देखील आता सर्वतोपरी खबरदारीआज ही घ्यायला हवी. अन्यथा दुसरी लाट शक्यता आहे असे तज्ज्ञ  लोकांचे म्हणणे आहे.

वैयक्तिक हेवे-दावे बाजूला ठेवून, जे आवाहन केले आहे त्याची खिल्ली न उडवता त्यामागचा वैज्ञानिकदृष्ट्या विचार लक्षात घेवून सरकारला, डॉक्टरांना सहकार्य करायला हवे.

 

stay at home inmarathi

 

हा रोग बरा होणंही शक्य आहे हे ह्या मुलीच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं.

दिल्लीतल्या रोहित दत्त ह्या युवकाचे देखील उदाहरण आहे जो कोरोना व्हायरस संसर्गग्रस्त होता पण, डॉक्टर्सचे अथक प्रयत्न, त्याची प्रचंड इच्छाशक्ती ह्यामुळे तो रोगमुक्त झाला.

वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या त्या २० वर्षीय मुलीच्या धैर्याला खरोखरच सलाम! ती तर चीनमध्येच होती आणि त्यावेळी ध्यानीमनी नसताना त्या विषाणूचा फैलाव झाला,त्यामुळे तिला लागण झाली असावी.

आपण तर सूज्ञ आहोत! सगळ्या सूचनांचे पालन करणे आपलेआद्य कर्तव्य आहे. चला तर मग एकजुटीने आपण ह्या कोरोना नावाच्या संकटाच्या हल्ल्यालापरतवून लावूया!

===

हे ही वाचा – कोरोनाग्रस्त रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी या डॉक्टरांनी जे केलंय, ते पाहून तुम्हीही आनंदी व्हाल!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?