Site icon InMarathi

भारतीय मंदिरांमध्ये “घंटा” का असते? हे आहे “घंटानादा”मागील अद्भुत शास्त्र…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लहानपणी मंदिरात जायचं एक कारण असायचं म्हणजे तिथली घंटा वाजवायची आणि आवाज कसा येतो ते पाहायचं. सगळी लहान मुलं हे करताना आपण पाहतो. ज्यांचा हात घंटेपर्यंत जात नाही ते उड्या मारून मारून घंटा वाजवण्याचा प्रयत्न करतात.

तुमच्यापैकी अनेकांनी असं केलं असेल. भारतीय मंदिरांमध्ये घंटा का असेल याचा विचार केला आहे का? त्यामागे कोणते शास्त्रीय कारण आहे?

भारतीय मंदिर जी बांधलेली आहेत ती देवाला आठवण्यासाठी, त्याला नमस्कार करण्यासाठी आणि थोडावेळ शांतचित्ताने राहण्यासाठी. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.

एक सकारात्मकता, नवीन ऊर्जा स्वतःसोबत घेऊन जाण्यासाठी. परंतु हल्ली लोक आपली एखादी इच्छा पूर्ण होऊ दे हे मागण्यासाठीच देवळांनी गर्दी करतात. असो…

 

 

भारतीय मंदिरं जर पाहिली तर त्यांच्या आसपास एक सकारात्मक भारून राहिलेली असते, आणि ती आपल्याला जाणवते देखील. मंदिरात असलेल्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असतो.

मंदिराचं बांधकाम, शिल्पकला याबरोबरच मंदिरातील गर्भगृहासमोरील कासव, शंकराच्या मंदिरातील नंदी या सगळ्यामागे काहीतरी शास्त्रीय कारणं आहेत, कथा आहेत.

माणूस जेव्हा मंदिरात प्रवेश करतो तेव्हा तो त्याच्याबरोबर त्याच्या जवळचे दुःख, कष्ट, नकारात्मकता घेऊन प्रवेश करतो. मग ती नकारात्मकता घालवायची कशी?

ती नकारात्मकता गर्भगृहापर्यंत जाऊ द्यायची नाही म्हणून मंदिरासमोर घंटा बांधलेली असते. मंदिरासमोरची घंटा वाजवली तर माणसामधली नकारात्मकता त्या आवाजाने दूर होते.

आणि त्याच्या लक्षात येतं, तो स्वतःला सावध करतो की, आपण मंदिरात आलोय आणि आता आपल्याला देवाशी एकरूप व्हायचं आहे.

 

 

असंही म्हटलं जातं की, आपण आल्याची वर्दी देवाला देण्यासाठी देखील घंटा वाजवली जाते. घंटेचा नाद, आवाज देवाला देखील आवडतो. घंटा वाजवल्यामुळे आपण देखील मंदिरात कशासाठी आलो आहोत याची आठवण होते आणि देवावर लक्ष केंद्रित होतं.

भक्तीभावाने हात जोडले जातात. एखाद्या शांत मंदिरातील घंटा वाजवून पाहिली आहे का? ती घंटा वाजल्यानंतर थोडा काळ त्याचा ध्वनी येत राहतो. आणि आता जर तुम्ही ते आठवायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्या घंटेचा आवाज ऐकू ही येईल!

या घंटा पितळ, तांबे, जस्त, निकेल- मॅंगनीज, शिसे, क्रोमियम इत्यादी धातू वापरून बनवल्या जातात. त्यांचे प्रमाणही ठरलेलं असतं.

त्यामुळे घंटा वाजवल्यावर जो आवाज येतो त्याची साधारणपणे सात सेकंदापर्यंत कंपन जाणवतात, त्याचा इको आपल्याला ऐकू येतो.

जर हा प्रतिध्वनी सात सेकंदापर्यंत ऐकू येत नसेल तर ती घंटा योग्यरीत्या बनवलेली नसते. घंटेच्या आवाजामुळे आपल्या डाव्या आणि उजव्या मेंदूतील भाग एकत्र येतात आणि आपली षटचक्र जागृत होतात.

म्हणून घंटा बनवताना सगळ्या धातूंच योग्य प्रमाण घेऊनच बनवली जाते. त्यात फेरफार झाला तर घंटेचा आवाज नीट येत नाही.

 

the score magzine

 

घंटे ध्वनतून, ओंकाराचाही आवाज येतो असं म्हटलं जातं. कारण ओम हा हिंदू धर्मातील पवित्र मंत्र आहे. घंटा वाजवताना खालील मंत्राचा जप केला जातो,

– “आगमर्थमत्तु देवानाम गमनार्थमत्तू रक्षसाम, कुर्वे घनतरवम् तत्र देवतहवाहना लक्षणाम ”

मंत्राचा अर्थ असा आहे की,

“मी ही घंटा वाजवितो आणि देवतेचे आवाहन करतो, जेणेकरुन सद्गुण आणि उदात्त शक्ती माझ्या हृदयात प्रवेश करील. आणि आसुरी आणि वाईट शक्ती, आतून व बाहेरून माझ्यापासून निघून जाऊ देत.

घंटा वाजवून सकारात्मक शक्तींना आकर्षित केले जाते. घंटा म्हणूनच गर्भगृहाच्या बाहेर लावलेली असते.

कारण माणूस आपल्या दिवसभरातल्या काळज्या, सगळ्या चिंता आपल्या सोबत घेऊन फिरत असतो. तसेच काही नकारात्मक विचारही माणसाच्या मनात असतात ते सगळे घालवण्यासाठी घंटेचा नाद केला जातो.

 

indiadivine.org

 

काही काही लोक घंटा वाजवताना जय श्रीराम किंवा हर हर महादेव असाही उच्चार करतात.

घंटेचे वेगवेगळे प्रकार आहेत जसे की, शंकराची पूजा करण्यासाठी घंटेमध्ये नंदीची प्रतिकृती असते. तर विष्णूची आराधना करण्यासाठी वापरायच्या घंटेत गरुड किंवा पांचजन्य शंखाची प्रतिकृती असते.

हिंदू लोकांच्या घरात त्यांच्या देवघरात देखील एक छोटी घंटी असतेच आणि ती घरातल्या पूजेच्या वेळेस, आरतीच्या वेळेस वाजवली जाते.

भारतात उत्तराखंडमध्ये एक ठिकाण आहे ज्याचं नाव भीमताल. त्या भीमताल जवळ एक मंदिर आहे घोडाखाल. त्या घोडाखाल मंदिरात अशी प्रथा आहे की जर देवाकडे काही मागणी असेल तर तिथे लोक नवस करतात.

अर्थात भारतात बऱ्याच ठिकाणी देवाला लोक नवस बोलतात. पण इथे जो नवस बोलतात ते आपली इच्छा पूर्ण झाल्यावर देवाला घंटा द्यायची असा असतो.

 

trip advisor

 

त्या मंदिरात जाताना आजूबाजूला पाहिले तर झाडे आहेत. त्या झाडांवर, त्या मंदिराकडे जायला पायऱ्या आहेत. तिथल्या पायऱ्यांवर झाडांवर सगळीकडे तुम्हाला घंटा बांधलेल्या दिसतील. लहान मोठ्या आकाराच्या विविध घंटा तिथे आहेत.

काही काही जण असंही म्हणतात की, घंटा आणून बांधायची आणि नवस करायचा आणि तो नवस पूर्ण झाला किती घंटा काढून घ्यायची न्यायची.

खरं -खोटं माहित नाही मात्र देवाने आपल्या मागण्या मान्य कराव्या म्हणून त्या घंटा कायम वाजत रहाव्यात अशी सोय केलेली आहे. कारण तिकडे बरीच माकडे फिरत असतात.

हिंदू धर्माप्रमाणेच जपान मधल्या बौद्ध धर्मात देखील घंटेला महत्त्व आहे त्यांच्या मंदिरात देखील अशा घंटा बांधलेल्या असतात. त्यांना बोंशो असं म्हटलं जातं.

 

muza chan

 

त्या ब्रांझ या धातूपासून बनलेले असतात. या आकाराने मोठ्या असतात तर वजनाने ही जास्त असतात. बौद्ध भिक्षूंच्या प्रार्थनेचा कालावधी निश्चित करण्यासाठी या घंटा वापरल्या जायच्या.

तिथली सगळ्यात जुनी घंटा इसवी सन ६०० मधली आहे. तिथल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देखील या घंटा वापरल्या जातात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version