' प्रत्येक गोष्टीत ‘आनंद’ मिळवण्यासाठी तुमच्यात हे ७ गुण असणे अत्यावश्यक आहे! – InMarathi

प्रत्येक गोष्टीत ‘आनंद’ मिळवण्यासाठी तुमच्यात हे ७ गुण असणे अत्यावश्यक आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या स्पर्धेच्या युगात ताण-तणाव, निराशा ह्यांचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स् आहेत.

पूर्वी सगळे समाधानी असायचे, कमीत् कमी पैशात जास्तीत जास्त आनंद होता तेव्हा! कारण माणसांच्या गरजा कमी होत्या.

चैनीच्या वस्तूंपेक्षा समाधानाला जास्त महत्त्व दिले जायचे. पैशांपेक्षा माणसांना, त्यांच्या आनंदाला जास्त महत्त्व दिले जायचे तेव्हा. पण आता माणसाच्या आयुष्यातला आनंद हरवत चाललाय कुठे तरी!

 

indian girls having phone inmarathi

 

कारण माणसाच्या आनंदापेक्षा पैशांना, गरजेच्या वस्तूंपेक्षा चैनीच्या वस्तूंना जास्त महत्त्व दिले जात आहे!

त्यामुळे आनंद हरवला त्यच्यापाठोपाठ आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या. आज काल मानसिक आरोग्य पण हरवत चालले आहे.

मोठ्यांनाच नाही तर शालेय मुलांनादेखील ह्या जीवघेण्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे, त्यांचेही मानसिक आरोग्य हरवत आहे.

निराशा, ताण अशा वरवर किरकोळ वाटणाऱ्या पण गंभीर समस्या वाढत चालल्या आहेत सगळ्यांमधेच. त्यातूनच आरोग्याच्या भयंकर परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपले आयुष्य फारच कमी असते. ते आनंदात घालवायचे असे प्रत्येकालाच वाटते. आनंद हा मनुष्य जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्यकजण आनंद शोधण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत असतो.

 

alone man inmarathi

 

प्रत्येकालाच काळजी, जबाबदाऱ्या असतात. “सुख के सब साथी दुख मे न कोई” ह्या उक्तीमधे सांगितलय की सुखात सगळे साथी असतात पण दुःखात कोणीच साथ देत नाही.

एकटेपणा अजूनच दुःखदायक, निराशाजनक असतो. त्यामुळे रडत न राहता, चिंता न करता मजेत राहायचे. दुःखावर, संकटावर मात करायची!

आणि “मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुवे में उडाता चला” ह्या उक्तीनुसार मजेत जगायचे.

मग आनंद मिळावा म्हणून काय करायचे? त्याच्याच काही छोट्या, सोप्या टिप्स् आज आम्ही घेऊन आलोत.

१. मैत्री –

 

krishna and sudama inmarathi

 

एखादी व्यक्ती जी सहजतेने एखादी जागा तयार करते आणि एकमेकांची मने आपोआप जुळतात, बेस्ट फ़्रेंड जिला असतो ती व्यक्ती खूप भाग्यवान मानली जाते.

कारण मैत्री ही जीवनाची सर्वात मोठी गोष्ट मानली जाते, जी आपली चॉइस असते, आपल्या मर्जीने आपण मैत्री करतो.

आपल्याला जरासं दुःख झालं तर आपण मित्रांकडे मन मोकळं केल्याने आपल्याला बरं वाटतं. ते मित्रही दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात, धीर देतात.

कृष्ण-सुदामाची गोष्ट तर जगजाहिरच आहे. मूठभर पोहेच तर दिले होते सुदाम्याने कृष्णाला! त्यावरून कृष्णाने त्याची परिस्थिती जाणली.

सुदामा पण मित्रप्रेमाने इतका भारावून गेला होता की मदत मागायला गेलेला तो फक्त मैत्री अनुभवत होता आणि सुदाम्याच्या नकळत कृष्णाने त्याची समस्या सोडविली.

हे ही वाचा –  जपानी लोकांच्या आनंदाचं “रहस्य” जाणून घ्या, आणि कायम आनंदी रहा!

 

२. आरोग्य –

 

health freak girl inmarathi

 

उत्तम आरोग्य ही आनंदाची गुरूकिल्ली असते. जर आपण आजारी असलो तर चिडचिड होते आपली. हताश होतो. म्हणून उत्त्म आरोग्यासाठी प्रयत्नशील असावे.

आरोग्यं परमं भाग्यं, स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥ उत्तम आरोग्य हे खूपच भाग्यदायी असते आणि स्वास्थ्य नीट असेल तर ते सर्वार्थ मिळविण्यासाठी फायदेशीर असते.

सर्व गोष्टी मिळाल्या तर साहजिकच आनंदही होतो.

शरीराच्या आरोग्याबरोबरच आनंद मिळावा म्हणून मनाचेही आरोग्य नीट असणे जरूरीचे आहे. मनःस्वास्थ्य नीट ठेवण्यासाठी ध्यान-धारणा, संगीत ह्यांचा खूप उपयोग होतो.

 

३. शौर्य –

 

daring inmarathi

 

इतरांच्या भीतीमुळे किंवा दबावामुळे बरेच लोक चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडतात. म्हणून, प्रत्येकाकडे निर्भयपणे त्यांचे मत मांडण्याची आणि सत्य बोलण्याची गुणवत्ता असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा – आयुष्यात फक्त त्रास देणाऱ्या या गोष्टींना आजच “नाही” म्हणालात तर कायम आनंदी राहाल

४. क्षमा –

 

forgive inmarathi

 

इतरांचे दोष क्षमा करणे मानवाचा सर्वात विशेष गुण मानला जातो. ज्या लोकांमध्ये इतरांना क्षमा करण्याची क्षमता असते, त्या लोकांच्या जीवनात नेहमीच शांती आणि आनंद असतो.

एखाद्याने काही चूक केली असेल तर आपण चिडतो, रागवतो, ज्यामुळे आपल्यालाच त्रास होतो पण आपण जर त्याला क्षमा केली तर आपण आनंदी होऊ.

 

५. परोपकार –

 

indian helping girl inmarathi

 

परोपकार म्हणजेच दुसर्याच्या अडी-अडचणीत मदत करणे! परोपकार केल्यानंतर मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.

आपल्याकडे सर्व संतांनी परोपकाराचे महत्त्व आणि त्यातून मिळणर्या आनंदाचे वर्णन केले आहे.

परोपकारार्थमिदं शरीरम्। परोपकारामुळे होणारा आनंद अवर्णनीय असतो.

 

६. आशावाद –

 

optimistic inmarathi

 

आशावाद म्हणजे केवळ समजूतदारपणाची युक्ती नाही. तर काचेचा पेला अर्धा भरलेला पाहण्याची वृत्ती आहे आणि त्या अर्ध्याचे खरोखर कौतुक करणे म्हणजे आशावाद.

अर्धा पेला रिकामा आहे हे सत्य नाकारता येत नाही तथापि, जेव्हा आपण अर्ध्या रिकाम्या भागावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपले जीवन अधिक दुःखी, अधिक कठीण होते.

खरं तर, दुखापत होणाऱ्या घटनांमध्ये देखील धडे असतात आणि बर्‍याच वेळा जेवढी दुखापत होते, आपण तितके जास्त शिकतो.

दुःख विसरून आणि अजूनही आशावादी असणे ह्यामुळे आनंदी राहणे शक्य होते. आशावाद देखील आपल्याला भविष्याबद्दलच्या भीतीवर फुंकर घालतो आणि भूतकाळातील दु: खाला विसर्ण्याचे सामर्थ्य देतो.

 

७. दया –

 

kind people inmarathi

 

इतरांबद्दल प्रेम आणि दयाळूपणाची भावना असावी. देव नेहमी उदार स्वभावाच्या माणसावर प्रसन्न असतो आणि त्याची सर्व इच्छा पूर्ण होते.

संत तुकारामांनी दयेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांना चिडवायला लोकांनी त्यांच्या घरची पुरणपोळी गाढवाला दिली, संत तुकाराम चिडले नाहीत तर त्यांनी गाढवाची दया येऊन त्या पुरणपोळीवर तूप घातले.

आनंदी लोकांना ते का आणि कशासाठी जगत आहेत ह्याची पुरेपुर कल्पना असते, आनंदी लोकांना माहित आहे, त्यांची उद्देश्ये काय आहेत जगण्याची ते!

त्यांना जे करायचे आहे ते करीत आहेत. ते त्यांच्या जीवनात समाधानी असतील.

 

happy man inmarathi

 

आपण आपल्या जीवनाच्या उद्देशाबद्दल अस्पष्ट असल्यास, आपल्या मूलभूत मूल्यांची ओळख करुन प्रारंभ करा आणि त्यांना आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करण्यासाठी प्रयत्न करा.

ज्याने आपले आयुष्य आनंदाने परिपूर्ण होते. आपले आयुष्य आनंदापासून जितके दूर असेल तितके आपण अधिक दयनीय, दुःखी व्हाल. परिणामी एकाकी व्हाल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – नैराश्य, बॅड-मुड मधून बाहेर येण्यासाठी हे मस्त खाद्यपदार्थ खा आणि आनंदी राहा!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?