सावधान! तुमच्या घरातील “या” दोन ठिकाणी असू शकतात कोरोनाचे विषाणू…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
संपूर्ण जगाला सध्या एका मोठ्या समस्येने घेरलं आहे आणि ती म्हणजे कोरोना! कोविड -१९ विषाणूची साथ आता सर्वव्यापी झाली आहे. या संसर्गिक विषाणूपासून आपल्या घराचा बचाव करण्याच्या उपायांकडे सर्वांचं लक्ष आहे.
तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेलच की हाताची स्वच्छता किती आवश्यक आहे ते. वारंवार सॅनेटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुतलेच पाहिजेत.
कदाचित ऑफिसकडून तुम्हाला घरून काम करण्यासाठी सांगितलं असेल आणि घरात असल्याने तुम्ही स्वतःला सुरक्षित समजत असाल तर सावध व्हा.
तुमच्या घरात अशा दोन वस्तू किंवा जागा आहेत ज्यांना स्पर्श केल्याने तुम्हाला कोरोनाच नाही तर इतर कुठल्याही विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. सामान्यतः कोरोना विषाणू हा खोकताना किंवा शिंकतांना पसरतो.
जर एखाद्या संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हालाही कोरोनाची बाधा होऊ शकते.
जरी तुम्ही सतत साबणाने हात स्वच्छ धुत असाल किंवा चेहऱ्याला वारंवार स्पर्श न होण्याची खबरदारी जरी घेतलीत तरी या गोष्टींच्या संपर्कात येताना तुमच्या श्वसनसंस्थेपर्यंत विषाणू पोहचू शकतो!
–
हे ही वाचा – रोजच्या वापरातील ‘या’ २ पदार्थांचं मिश्रण आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी
–
याला प्रतिबंध घालण्यासाठी घरातल्या या विषाणू आणि जंतूंच्या हक्काच्या वस्तूंपासून सावध राहायलाच पाहिजे.
पहिली वस्तू म्हणजे आजकालच्या युगातील अन्नपाणी आणि निवाऱ्या नंतर गरजेचा झालेला आपल्या सगळ्यांचा लाडका आपला मोबाईल!
मोबाईल अशी वस्तू आहे ज्याला तुम्ही दिवसभरात सर्वाधिक स्पर्श करत असता. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या अभ्यासानुसार, कोरोनाचा विषाणू- कोविद-१९, हा दूषित प्लास्टिक किंवा स्टीलवर ३ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो!
घरामध्ये जरी आपण स्वच्छता पाळून छोट्या- छोट्या गोष्टी जसं की, दाराच्या कड्या, हँडल, लाईटची बटणं, भांडी, पाण्याच्या बाटल्या इ. जरी वारंवार साफ ठेवलं तरी मोबाईलला आपला सतत स्पर्श चालूच असतो.
त्याहून वाईट गोष्ट म्हणजे ही एकमात्र वस्तू आपल्या चेहऱ्याच्या सर्वात जवळ असते! आपला मोबाईल आपण बऱ्याच ठिकाणी ठेवत असतो.
ऑफिस मध्ये डेस्कवर, प्रवास करताना हातात घेऊन सर्फिंग साठी किंवा अगदी घरी आल्यावर सुद्धा मोबाईल आपल्या हातात असतो किंवा कानाला.
त्यामुळे दूर संभाषणाचं हे माध्यम सगळीकडे संचार करत असल्याने आपोआपच जंतू आणि विषाणू यांचं प्रमाण आपण वापरत असलेल्या इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा यात सर्वाधिक असतं.
एका संशोधनानुसार असं समोर आलंय की, आपला लाडका मोबाईल हा टॉयलेटच्या सीट पेक्षाही जास्त जंतूना आश्रय देतो.
मोबाईल आपल्या त्वचेच्या प्रत्यक्ष संपर्कात वारंवार येत असल्याने आपण कितीही वेळा हात स्वच्छ धुतले तरी जंतू आणि विषाणू ग्रस्त ह्या सेलफोन ला स्पर्श करताच आपल्याला सुद्धा त्या विषाणूंची लागण होऊ शकते.
मोबाईलची स्वच्छता
काही तज्ज्ञांच्या मते डिसइनफेक्ट वाइप्सचा वापर करून मोबाईल स्वच्छ ठेवता येऊ शकतो. यामधील ‘आइसो प्रॉपाईल अल्कोहोल’ हे रसायन मोबाईलची स्क्रीन जंतुविराहित करण्यात मदत करतो.
मोबाईलचा बादशहा असलेल्या अँपल ने सुद्धा अश्याच सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तुमच्या मोबाईलला या प्रकारे साफ करण्यात कुठलाही धोका नक्कीच नाही. फक्त हे रसायन फोनच्या मध्ये जाणार नाही याची मात्र काळजी घ्या नाहीतर मधले भाग खराब होऊ शकतात.
आश्चर्य म्हणजे अजूनही बरेच मोबाईल उत्पादकांनी फो च्या स्क्रीनची काळजी कशाप्रकारे घ्यावी यावर प्रकाश टाकलेला नाही!
एकदा तुम्ही फोनची स्क्रीन साफ केली म्हणजे मोठं काम झाल्यासारखं आहे. नंतर मोबाईल च्या कडांना असलेली धूळ,मळ साफ करण्यासाठी टूथपिक चा वापर करता येईल. मळ साफ केल्यावर ही जागा सुद्धा वाईप ने स्वच्छ करून घ्या.
वॉटरप्रूफ फोन :
सगळ्यात उत्तम म्हणजे, जर तुमच्याकडे वॉटरप्रूफ मोबाईल असेल – म्हणजे जर तुमचा मोबाईल IP६८ मानांकित असेल तर तुम्ही बिनधास्तपणे मोबाईल स्वच्छ करू
वॉटरप्रूफ मोबाईल आहे म्हणून पटकन जंतू विरहित करण्यासाठी कृपया तो पाण्याच्या बादलीत वैगेरे टाकू नका.
त्याचप्रमाणे खालील पदार्थ मोबाईल साफ करण्यासाठी कधीच वापरू नका.
१) विंडो क्लिनर्स
२) पेपर टॉवेल
३) मेक अप रिमूव्हर
४) व्हिनेगर
५) कुठल्याही प्रकारचे अल्कोहोल
मानवी विष्ठा
गॅस्ट्रोलॉजीच्या जर्नल अनुसार, कोरोना बाधित रुग्णांपैकी बहुतांश जणांना जुलाब, मळमळ आणि उलट्या सारखी लक्षणं ही श्वसनासंबंधी लक्षणांपेक्षा अगोदर आढळून आली आहेत.
–
हे ही वाचा – मास्क वापरताना लोक या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अनेकांना संसर्ग होतोय…
–
पण नक्की याचा संसर्ग होतो कसा?
बाधित रुग्णाच्या विषाणू जन्य विष्ठेद्वारा सुद्धा हा इतर निरोगी व्यक्तीला पसरू शकतो. समजा पेशंटने टॉयलेटला जाऊन आल्यावर स्वच्छ हात न धुता कुठल्या वस्तूला स्पर्श केला तर तिथे हा व्हायरस राहू शकतो.
त्या वस्तूद्वारे तो निरोगी माणसाच्या त्वचेला चिकटून त्याच्या शरीरात प्रवेश करू शकतो. म्हणूनच टॉयलेटला जाऊन आल्यावर साबणाने स्वच्छ हात धुणे अत्यावश्यक आहे!
डॉ.अश्विनी सेत्या यांच्या मते अशा प्रकारे, विष्ठा ते निरोगी माणसाच्या चेहऱ्यापर्यंतचा कोरोना विषाणूचा प्रसार रोखणं हा प्रतिबंधात्मक उपायांमध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.
टॉयलेटमधून विषाणू संसर्ग अजून एकप्रकारे होऊ शकतो. विषाणू युक्त विष्ठेचे काही विषाणू बाष्पीभवन झाल्याने हवेत पसरू शकतात!
सार्स साथीच्या वेळेस या प्रकारे संसर्ग झाल्याची उदाहरण आहेत. मात्र ,कोविद-१९ चे अश्याप्रकरे संसर्ग झाल्याचे पुरावे अजून तरी उपलब्ध नाहीत!
डॉ. इमागी जे लस विकसित शाखेत मार्गदर्शन करतात ते सांगतात,
“जेव्हा तुम्ही टॉयलेट फ्लश करता त्यावेळेस, पाण्याच्या प्रवाहात विष्टेद्वारे बरेच विषाणू – जिवाणू मिसळतात. नुकत्याच झालेल्या अहवालांवरून हे स्पष्ट आहे की कोविड -१९ विष्टे द्वारे पसरू शकतो. त्यामुळे फ्लश केल्यानंतर उडणाऱ्या पाण्याच्या थेंबामधून कोरोना विषाणूचा प्रसार शक्य आहे”.
यातील सगळ्यात धोकादायक बाब म्हणजे श्वसनसंस्थेमधून कोविद-१९ जरी निघून गेला तरी तो आतडे आणि विष्ठेमधे सापडू शकतो.
जर तुम्ही टॉयलेट मध्ये फोन घेऊन जात असाल तर मग हा विषाणू सहज तुमच्या फोन च्या माध्यमातून तुमच्या चेहऱ्यावर पसरू शकतो! जरी आपण वारंवार हात धुत असलो तरी या प्रकारे जंतू आपल्या हाताला परत सहज चिकटू शकतात.
याप्रकारे विषाणू चा प्रसार रोखण्याचा एक सोपा उपाय म्हणजे टॉयलेट सीटचे आवरण असताना फ्लश करणे जेणे करून विषाणू मिश्रित पाण्याचे थेंब शरीराला लागणार नाहीत.
अर्थात या व्यतिरिक्त स्वतःची स्वच्छता, स्वछतागृहाची सफाई, स्वयंपाक घर आणि घरातील नेहमीच्या वापरातील साधनाची स्वच्छता सुद्धा तितकीच महत्वाची ठरते.
सध्या जेव्हा कोरोना सारख्या विषाणूजन्य संसर्गाने जगाला विळखा घातलेला असताना. प्रत्येकाने अगदी साधे स्वच्छेतचे नियम पाळून आपला बचाव करता येणं शक्य आहे.
आपल्या राज्यातील बऱ्याच प्रमुख शहरांत संचार बंदी झालेली आपण पाहतो आहेच! आपणसुद्धा बऱ्यापैकी अनसोशल होऊन संसर्गापासून स्वतःचा आणि दुसऱ्यांचा बचाव करू शकतो.
कोरोनाची पहिली लाट गेली, दुसरी लाटसुद्धा आता ओसरत चालली आहे. लवकरच तिसऱ्या लाटेचे संकेतसुद्धा मिळत आहेत त्यामुळे हा रोग काही इतक्यात नष्ट होणारा नाहीये, त्यामुळे आपल्याला त्याच्यासोबत जगायला शिकणं अपेक्षित आहे.
घाबरून न जाता सतर्क राहणं महत्वाचं!
===
हे ही वाचा – कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणं धोक्याचं आहे का? जाणून घ्या!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.