आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
“कोरोना चा अंत जवळ” हे वाचूनच बरं वाटेल यात शंका नाही. कारण कोरोनाच्या भीतीने संपूर्ण जग सध्या धास्तावलेलं आहे. बलाढ्य अमेरिका, युरोप खंड देखील सध्या हतबल दिसत आहेत.
कोरोना ची लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तरीही नवीन नवीन देशांमध्ये करोनाची लागण होताना दिसत आहे. बऱ्याच देशांमध्ये लॉक डाऊन ची परिस्थिती आहे.
यावर कधी औषध निर्माण होईल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे आणि यातच ही आनंदाची बातमी आलेली आहे.
मायकेल लेवीट या इस्रायली नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार,
बऱ्याच लोकांची प्रतिकारक्षमता चांगली असते. चीनमधील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरून त्यांनी एक निष्कर्ष काढला आहे की, कोरोनाचा अंत जवळ आला आहे.
त्यांनी सांगितलं होतं की, फेब्रुवारीमध्ये चीनमधील रुग्णसंख्या कमी होत जाईल, आणि कोरोना व्हायरस पसरण्याचं प्रमाणही कमी कमी होत जाईल.
आता खरोखरच चीन मध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण नगण्य होत आलेलं आहे. म्हणून चीनमधील घराघरात त्यांचं नाव पोहोचलं आहे.
त्यांच्या या निष्कर्षामुळे, गेले दोन महिने लॉक डाऊनचा सामना करणाऱ्या चिनी लोकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
तसं पाहायला गेलं तर ते काही संसर्गजन्य रोग यामधले तज्ञ नाहीत. ते अमेरिकन, ब्रिटिश, इस्रायली बायोफिजिस्ट आहेत. २०१३ मध्ये त्यांना रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं.
कोरोना व्हायरसचा अभ्यास करताना, तो कसा पसरतोय? त्याच प्रमाण काय आहे? त्यामुळे किती लोकांना लागण होते? किती मृत्यू होतात? याची त्यांनी काही आकडेवारी घेतली आणि त्यावरून त्यांनी काही निष्कर्ष काढले.
ज्यात त्यांनी सांगितलं की कोरोनाचा अंत आलाय.
मायकल रॅवीट यांच्या पत्नी सुशौन ब्रॉश या चिनी कला संशोधक आहेत. त्यामुळे त्यांचं चीनमध्ये येणं-जाणं होतं. जेव्हां वुहान प्रांतांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा त्यांनी आपल्या चिनी मित्रांना त्याबद्दल विचारलं.
त्यांच्या मित्राने त्यांना तिथली परिस्थिती किती गंभीर आहे हे सांगितले. भीतीच्या छायेत जीवन जगतोय हे सांगितलं. म्हणून मग माईकेल रॅबिट यांनी या विषयात लक्ष घालायचे ठरवले.
त्यांनी चीनमध्ये, रोज करोना व्हायरसची किती जणांना लागण होते याची आकडेवारी पाहिली. आणि अत्यंत धक्कादायक आकडे त्यांच्या समोर आले.
त्यानुसार, चीनमधल्या हुबई प्रांतातील व्हायरस पसरण्याची आकडेवारी होती दररोज ३०%. ते म्हणतात, मी काही इन्फ्लुएन्झा तज्ञ नाही. पण आकड्यांवरून जे विश्लेषण केलं, त्यातून दिसत होतं की ही वाढ कैकपटीने होती.
माईकेल म्हणतात, “की ही वाढ जर अशीच राहिली असती तर केवळ ९० दिवसांमध्येच संपूर्ण जग कोरोना व्हायरसने संक्रमित झाले असते”.
त्यासाठीच त्यांनी आकड्यांवरती लक्ष केंद्रित केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आता आकड्यांचा पॅटर्न बदलतोय.
म्हणजे १ फेब्रुवारी ला नव्याने लागण झालेल्या रुग्णांची संख्या होती १८००. तर ६ फेब्रुवारीला ४७०० नवीन रुग्ण एकाच दिवशी ॲडमिट झाले. परंतु ७ फेब्रुवारीला ग्राफ या मध्ये अचानक चेंज आला.
त्यादिवशी ४७०० पेक्षा कमी रुग्ण ॲडमिट झाले आणि मग पुढे हा आकडा कमी कमी होत गेला. एक आठवड्यानंतर मृत्यूच्या प्रमाणातही हाच पॅटर्न दिसला. दररोज होणारे मृत्यू कमी कमी होत गेले.
चढत्या आलेखाचा एक मध्यबिंदू मिळाला. त्यावरून निष्कर्ष काढला की येत्या दोन आठवड्यातच चीनमधील परिस्थिती आटोक्यात येईल. आता आपण पाहतच आहोत की चीनमध्ये कोरोना व्हायरस ची लागण होणाऱ्यांची संख्या अत्यल्प झालेली आहे.
लेवीट यांनी याचं विश्लेषण अत्यंत सोप्या भाषेत केलेलं आहे.
उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या बँकेत पैसे ठेवले आणि त्यावर पहिल्या दिवशी ३० टक्के, दुसऱ्या दिवशी २९ टक्के, तिसऱ्या दिवशी २८ टक्के आणि पुढे असेच चालू, प्रमाणे व्याज मिळणार असेल तर तुम्हाला खूप फायदा होणार नाही.
चीनमध्ये नवीन नवीन रुग्ण येत होते त्यावरही ते इंटरेस्ट रेट च उदाहरण देतात. त्यांचं म्हणणं आहे की पहिल्या दिवशी ३० टक्के व्याज मिळत होते तर सहाव्या दिवशी २५% म्हणजे इंटरेस्ट रेट कमी झाला तरी थोडंफार तरी व्याज मिळत होतं.
याचं लॉजिक ने नवीन रुग्ण चीनमध्ये मिळत होते, पण त्यांचे प्रमाण कमी होत होतं.
पण जेव्हा आपण आजाराचा विचार करतो त्यावेळेस माणूस आधीच घाबरलेला असतो, रोज नवीन केस किती सापडल्या हे ऐकत असतो. परंतु जर इन्फेक्शन रेट कमी होत असेल तर साथीचं प्रमाणही कमी होत आहे.
हाच रेट जर कायम राहिला तर चीनमधून कोरोना मार्च महिना संपताना संपूर्णपणे जाईल.
साथीच्या रोगाचा इन्फेक्शन रेट कमी होण्याचं कारण म्हणजे जेव्हा एखादी साथ येते, त्यावेळेस रोज नवीन नवीन लोकांना इन्फेक्शन ची लागण होते. म्हणून सुरुवातीच्या काळात त्याचं प्रमाण जास्त असतं.
परंतु आपलं फ्रेंड सर्कल किंवा कामाची ठिकाणं ठरलेली असतात. त्यामुळे आपण रोज रोज त्याच माणसांना भेटतो. फक्त जेव्हा गर्दीच्या ठिकाणी जातो त्याच वेळेस नवीन लोकांना भेटतो.
त्यातले काही आपल्या इन्फेक्शनमुळे आजारी पडतात तर ज्यांची प्रतिकार क्षमता चांगली असते त्यांना काही होत नाही. त्याचा अर्थ असा नाही की सरकारने सांगितलेली काळजी आपण घ्यायची नाही.
लोकांशी हस्तांदोलन टाळायचं, आजारी शिंकणाऱ्या, खोकणाऱ्या लोकांच्या अगदी जवळ जाऊन बोलायचं नाही, गर्दीची ठिकाणं टाळायची. असं केल्याने इन्फेक्शन होण्याचा रेट आणखीन कमी होत जातो.
म्हणूनच आयसोलेशन किंवा विलगीकरण कक्षात अशा रुग्णांनी राहिलं तर इन्फेक्शन पसरण्याचा धोका कमी असतो. वूहान मध्ये सुरूवातीला हा धोका संपूर्ण लोकसंख्येसाठी होता, परंतु त्याची लागण केवळ तीन टक्के लोकांना झाली.
कारण सरकारने सांगितलेले सगळे नियम त्यांनी पाळले.
चीनमधला इन्फेक्शन रेट कमी झाला असून तो मार्चअखेर संपून जाईल. तर साऊथ कोरियाला देखील आता मध्य पॉईंट मिळाला आहे त्यामुळे तिथे संसर्ग होण्याचं प्रमाणही कमी होऊन जाईल.
इटली मधली कंडिशन पाहिले तर तिथली जीवन पद्धती ही मुख्यतः व्हायरस पसरायला कारणीभूत आहे. इटालियन लोक हे खूप सोशल आहेत. एकत्र जमणे, मजा मस्ती करणे हे त्यांचं जीवन जगण्याचा भाग आहे.
म्हणून तिकडे सध्या कोरोना ने थैमान घातले आहे. त्याकरता आजारी लोकांना वेगळे ठेवणे आणि निरोगी लोकांना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये येऊ न देणं हाच सध्या उपाय आहे.
इस्राईल मध्ये कोरोना बाधित इतक्या केसेस झाल्याचं नाहीत. इस्रायली सरकारने कोरोना रोखण्यासाठी राबवलेल्या योजनांचे त्यांनी कौतुक केले आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी जितके कठोर बचावात्मक उपाय करता येतील तितके केले पाहिजेत. जेणेकरून उपचारांच्या तयारीसाठी आणि लस तयार करण्यासाठी जास्त वेळ मिळेल.
मार्चच्या मध्यावर ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल.
===
मूळ स्त्रोत : The Jerusalem Post
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.