कुकुर देव मंदिर – कुत्र्यांची पूजा करणाऱ्या अजब मंदिराची कहाणी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अनेक जाती-धर्मांचे लोक इकडे गुण्या-गोविंदाने नांदताना दिसतात.
भारतात वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी श्रद्धास्थानं आहेत.
मूळातच भारतीय लोकं श्रद्धाळू आहेत. त्यांच्या आपापल्या श्रद्धास्थानांची मंदिरे उभारली आहेत.
भारतात वेगवेगळ्या देवी-देवतांची मंदिरं आहेत. त्यातील काही प्रसिद्ध, श्रीमंत म्हणून ओळखली जातात.
–
- देशासाठी काम करणाऱ्या श्वानांना निवृत्तीनंतर खरंच ठार केलं जातं का, सत्य जाणून घ्या
- परदेशी जातीच्या कुत्र्यांच्या प्रेमापोटी, “या” देशी जातींचे कुत्रे दुर्मिळ होताहेत..!
–
तर काही मंदिरे एकाकी, फारशी प्रसिद्धी न मिळालेली आहेत.
काही प्राचीन आहेत तर काही नवीन. काही साधी आहेत तर काही अद्भूत्, नवसाला पावणाऱ्या देवतांची मंदिरं देखील आहेत.
काही काही मंदिरांचा आगळावेगळा इतिहास आहे तर काही मंदिरे नवल वाटायला लावणारी आहेत.
देवी- देवतांची मंदिरं तर आहेतच पण काही चमत्कारिक, आगळी-वेगळी मंदिरे देखील आहेत.
जसं करणी माता मंदिर, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन ह्यांची मंदिरं, विमान गुरुद्वारा अशी वेगळीच श्रद्धास्थाने आहेत इकडे!
काही काही मंदिरं तर इतकी अद्भूत् आहेत की, आश्चर्यचकित होणं स्वाभाविक आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
उत्तर प्रदेशमध्ये एका मंदिरात मस्तक नसलेल्या मूर्तीची पूजा केली जाते, तर उज्जैन मधल्या काल भैरव मंदिरात मूर्तीला चक्क मद्य तीर्थ म्हणून दिलं जातं, कोलकात्याच्या चाइनिज् काली मंदिरात तर नूडल्स्चा नैवेद्य दाखविला जातो.
प्रत्येक मंदिराच्या बांधणीमागे थक्क करून सोडणारा इतिहास असतो जो खूप कमी लोकांना माहित असतो.
आज-काल भारतात आणि त्याही पेक्षा भारताच्या बाहेर जास्त प्रमाणावर कुत्रा पाळण्याची पद्धत आहे.
कुत्र्यांना अगदी आपल्या कुटुंबातला एक सदस्य मानले जाते आणि त्यांचे भरपूर लाड देखील केले जातात.
कुत्र्यांना खास कपडे शिवले जातात, त्यांचे दात घासणं, त्यांना डॉग फूड देणं, खास कुत्र्यांसाठी शांपू वापरणं इतकेच काय तर डॉग शोज् सुद्धा आयोजित केले जातात.
पण असं असलं तरी बहुतेक ठिकाणी या प्राण्यांना मंदिरात किंवा इतर श्रद्धास्थानामध्ये प्रवेश दिला जात नाही.
मंदिरातले पुजारी वगैरे प्राण्यांना बाहेरच ठेवण्यास सांगतात.
काही काही मंदिराबाहेर तर “पाळीव प्राण्यांना प्रवेश निषिद्ध” अशी पाटी देखील दिसते.
पण आज आपण ज्या मंदिराची माहिती घेणार आहोत तिथे देवी किंवा देवतांची पूजा केली जात नाही तर इथली देवता आहे कुत्रा!
होय, हे मंदिर कुकुर देव मंदिर म्हणून ओळखले जाते.
या मंदिराविषयी एक विचित्र श्रद्धा आहे आणि या मंदिराच्या बांधणीची कथा जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
हे मंदिर छत्तीसगडमधील रायपूरपासून १३२ किमी अंतरावर असलेल्या दुर्ग जिल्ह्यातील खापरी गावात आहे.
मंदिराच्या आत गाभा-यात या कुत्र्याची मुर्ती बसविली असून या कुत्र्याशेजारी शिवलिंगही आहे.
छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील खापरी या गावात कुकुर देव नावाचे एक प्राचीन मंदिर आहे.
हे मंदिर कोणत्याही देवतेसाठी नाही तर कुत्र्याला समर्पित आहे, जरी तिथे शिवलिंग असलं तरी कुत्र्याची पूजा मुख्यत्वे इथला आकर्षणाचा विषय आहे.
चला तर, मंदिराचा इतिहास जाणुन घेऊयात
फणी नागवंशी राज्यकर्त्यांनी १४ व्या – १५ व्या शतकात हे मंदिर बांधलं होतं.
कुकुर देव मंदिर २०० मीटरच्या परिसरात बांधलेले आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कुत्र्याचा पुतळा बसविला गेला आहे.
सामान्य शिव मंदिरात नंदीची पूजा केली जाते त्याचप्रकारे लोक शिव तसेच कुत्रा (कुकुरदेव) यांची पूजा करतात.
–
- कुत्रा पाळा….हृदयरोग टाळा..!
- परदेशी जातीच्या कुत्र्यांच्या प्रेमापोटी, “या” देशी जातींचे कुत्रे दुर्मिळ होताहेत..!
–
कुकुरदेव मंदिरात घुमटाच्या चारही दिशांना सर्पांची छायाचित्रे आहेत
त्याच प्रमाणे मंदिराच्या सभोवताली शीलालेख देखील आहेत परंतु ते स्पष्ट नाहीत. यावर, बंजारची वस्ती, चंद्र आणि सूर्याचे आकार आणि तारे बांधले आहेत.
राम लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचे पुतळेदेखील ठेवले आहेत. याशिवाय त्याच दगडात कोरलेली दोन फूट गणेशमूर्ती देखील मंदिरात स्थापित केली आहे.
श्रावण महिन्यात या मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते.
शिव मंदिरात नंदीची पूजा केली जाते त्याचप्रमाणे लोक शंकराबरोबरच कुत्रा (कुकुरदेव) यांचीही पूजा करतात.
कुकुरदेव मंदिर स्थापनेची कहाणी
ऐकीव कहाणी नुसार, एक बंजाराची वस्ती होती.
मालिघोरी नावाच्या एका बंजार्याकडे पाळीव कुत्रा होता.
दुष्काळामुळे मालिघोरी यांना आपला प्रिय कुत्रा सावकाराकडे तारण ठेवावा लागले.
दरम्यान, सावकाराच्या घरात चोरी झाली. एका खड्ड्यात सावकाराच्या घरातून चोरलेले सामान लपवताना कुत्र्याने पाहिले होते.
सकाळी कुत्रा सावकारांना लपवून ठेवलेल्या ठिकाणी घेऊन गेला आणि सावकाराने त्या जागी खोदले असता त्याला चोरीचा माल जसाच्या तसा सापडला.
कुत्राच्या निष्ठेबद्दल कौतुक वाटल्याने सावकाराने कुत्र्याला त्याच्या खऱ्या मालकाकडे- बंजाराकडे परत देण्याचे, मुक्त करण्याचे ठरविले.
त्याने सर्व तपशील एका कागदावर लिहून आपल्या गळ्यास बांधला आणि खर्या मालकाकडे जाण्यासाठी मुक्त केले.
सावकाराच्या घरातून आपला कुत्रा परत येत पाहून मालिघोरी ह्याला वाटले की आपला कुत्रा तिकडून पळून आला म्हणून त्याने त्या कुत्र्याला काठीने मारहाण केली.
त्याने कुत्र्याला इतके मारले की त्यात त्या कुत्र्याचा मृत्यु झाला.
कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या गळ्याला बांधलेले पत्र पाहून मालकाला आपल्या चुकांची जाणीव झाली, त्याला पश्चात्ताप झाला आणि त्याने आपल्या प्रिय स्वामीभक्त कुत्र्याच्या स्मरणार्थ मंदिर प्रांगणात त्या कुत्र्याची समाधी बांधली.
नंतर कुणीतरी कुत्र्याचा पुतळा देखील स्थापित केला. आजही हे ठिकाण कुकुर देव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
इकडे कुत्रा चावलेली लोकं येतात, त्यांच्यावर इकडे इलाज न करताही इकडे येऊन ते बरे होतात अशी श्रद्धा आहे.
असंही मानले जाते की, जे इथे दर्शन घेतात त्यांना रेबिज होत नाही किंवा त्यांना कुत्रा चावण्याची भीती नसते.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.