आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आज काल लोकांचे राहणीमान बदललं आहे. सोयी-सुविधा वाढल्या असल्या तरी आहारात झालेला बदल, फास्टफुडचा वापर, अपुरी झोप यांमुळे तब्बेतीच्या अनेक समस्या लहान वयापासून जाणवत आहेत.
त्या बरोबरच ग्लोबल वॉर्मिंग सारख्या पर्यावरणीय समस्या आहेतच.
त्यामुळे लोकांच्या तब्येतीमध्ये बिघाड होऊ लागलाय.
वातावरणातल्या बिघाडाला मनुष्यच जबाबदार आहे. तसंच या बिघाडामुळे माणसाच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ लागलाय.
हवामान, ऋतू बदलला की लगेच आजारपण येतं.
हवामान बदललं की लगेच अनेकांना सर्दी-ताप ह्यांचा त्रास व्हायला लागतो.
सर्दी तापाने खूपच अस्वस्थपणा येतो. या सर्दी तापामुळे अंगदुखी, घशाची खवखव असे इतर त्रास ओघाने आलेच!
तसंच सर्दीमुळे डोकेदुखी होते ज्यामुळे आपल्याला काहीच सुचत नाही.
वरकरणी सर्दी-ताप ही लक्षणं अगदी साधी वाटतात पण त्याने होणारा त्रास भयंकर असतो.
सर्दीची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. बहुतांंश सर्वांनाच कधी ना कधी सर्दीचा त्रास जाणवतो.
वातावरणातील बदल किंवा परिसरातील अस्वच्छतेमुळेही सर्दी होऊ शकते.
सर्दीची सामान्य लक्षणे
शिंका येणे, नाकातून पाणी येणे किंवा कफ येणे, डोके व नाक जड होणे, डोके दुखणे, नाक चोंदणे इत्यादी लक्षण दिसून येतात.
तसंच सर्दी-ताप बहुतेकदा संसर्गजन्य असतात. त्यामुळे आसपासच्या लोकांनाही याची लागण होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांनाही योग्य ती काळजी घ्यावी लागते.
जेव्हा जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा बर्याच लोकांना अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो आणि यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढविणं हा योग्य मार्गांपैकी एक मार्ग आहे.
जो खात्रीशीर, फायदेशीर आहे आणि ज्याचा साईड इफेक्ट होत नाही.
याच विषयी बोलताना हेल्थ प्रॅक्टिशनर आणि न्यूट्रिशनिस्ट शिल्पा अरोड़ा एनडी यांनी म्हटले आहे की,
“रोगप्रतिकार शक्ती बळकट करणे ऋतु बदलांचे आजार टाळण्यास किंवा त्यांच्याशी लढण्यास मदत करू शकते. योग्य प्रमाणात हायड्रेशन आणि व्हिटॅमिन सी समृध्द फळे आणि भाज्यांचे सेवन हे रोगप्रतिकार वाढविण्यासाठीचे दोन सामान्य मार्ग आहेत. “
म्हणूनच, आम्ही येथे आपल्यासाठी एक अतिशय जलद होणारा आणि सुलभ अशा ज्युसची पाककृती सांगत आहोत, जी केवळ तीन घटकांनी बनविली जाऊ शकते आणि ज्यात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे गुणधर्म असतात.
ते तीन घटक म्हणजे आवळा, आले (अद्रक) आणि कोथिंबीर किंवा पुदिना!
आवळा, आलं आणि कोथिंबीर किंवा पुदिना हे सहजरित्या उपलब्ध होणारे घटक आहेत. जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत.
सगळ्यांना सहजरित्या मिळणारे हे घटक आणि जे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत.
आपल्याकडे आयुर्वेद हा आरोग्यासाठी खूप मोठा खजिना आहे.
त्यामध्ये अनेक आजारांवर केले जाणारे उपचार आहेत. बरेचसे इलाज आपल्याला सहज उपलब्ध होणार्या पदार्थातून औषध बनवून करता येणारे आहेत.
आवळा (हिरवी फळे येणारे एक झाड), आलं आणि कोथिंबीर पानं किंवा पुदीना पानं यांच्या वापरामुळे रोगाचा प्रतिकारशक्ती वाढते.
कोथिंबिर आणि पुदिना हे दोन्ही व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहेत, म्हणून आपण ज्युस साठी ह्यांचा रस वापरणे फायदेशीर आहे. आपण ह्यांचे आणखीन काही फायदे सविस्तर रित्या जाणून घेऊया.
व्हिटॅमिन सी ने समृद्ध असणाऱ्या आवळ्याचे आरोग्य विषयक फायदे
आवळा नेहमीच सर्दी आणि तापावर उपचार करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून प्रसिद्ध आहे.
हा व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे, जे शरीरात पांढर्या रक्त पेशी (डब्ल्यूबीसी) च्या उत्पादनास चालना देते. तसंच जे अनेक संसर्गजन्य विषाणू आणि रोगांशी लढायला मदत करते.
याव्यतिरिक्त, आवळा लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक खनिजांनी देखील समृद्ध आहे, ज्यामुळे ते संपूर्ण पौष्टिक फळ म्हणून ओळखलं जातं.
आवळ्याने इम्युनिटी जलदरित्या वाढते. आवळा बहुगुणकारी आहे.
आल्याचे फायदे
आल्याबद्दल महत्त्वाचं म्हणजे, आल्यामध्ये जिंझोल नावाचे कंपाऊंड असते, ज्यामध्ये अनेक औषधी गुण असतात.
आल्यामध्ये वेदनाशामक, अँटीपायरेटिक आणि बॅक्टेरियाच्या, विषाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ प्रभाव आहे.
आल्याचे अँटीबैक्टीरियल प्रभाव सर्दी आणि घशाची खवखव कमी करण्यास मदत करतात.
आलं रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते. म्हणूनच आपल्याकडे हिवाळ्यात आलेपाक आणि पावसाळ्यात आल्याचा चहा करण्याची पद्धत आहे.
कोथिंबीरचे फायदे
कोथिंबीर आपल्या मस्त सुवासाने केवळ अन्नाची चवच वाढवतेच पण आरोग्यासाठी तिचे बरेच फायदे आहेत.
कोथिंबिर अँटीऑक्सिडेंटचे समृद्ध स्रोत आहे. कोथिंबीरीमध्ये डिटोक्सिफाइंग, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आवश्यक घटक असतात.
कोथिंबिर रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते.
पुदिन्याचे फायदे
पुदीना देखील अँटिऑक्सिडंट आणि विरोधी दाहक गुणधर्मांचा समृद्ध स्रोत आहे, जो तीव्र खोकल्यामुळे होणारी जळजळ शांत करण्यास मदत करतो.
पुदीन्याचा मस्त आणि रीफ्रेश सुवासही डोकेदुखी थांबण्यास मदत करते.
आता हा ज्युस कसा बनवायचा ते पाहूया
१. ५ किंवा ६ चिरलेले आवळे, १ चमचा चिरलेले आले आणि ८ ते १० पुदीना किंवा कोथिंबीर पाने घ्या.
२. त्यांना स्वच्छ करा, सर्व घटक स्वच्छ धुवून घ्या आणि मिक्सरमधून किंवा ज्युसर मध्ये हे मिश्रण बारिक करून घ्या.
आवश्यकतेनुसार त्यात पाणी मिसळावे.
३. हे मिश्रण एका काचेच्या पेल्या मध्ये गाळून त्यात काळे मीठ, चाट मसाला आणि मध घाला.
चाट मसाल्याऐवजी भाजलेला मसाला (धणे, जीरे आणि लाल तिखट) देखील वापरु शकता.
आता हे ज्युस सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
ह्या ज्युसचे दररोज सेवन करा आणि दररोज व्हिटॅमिन सी हा घटक मिळविण्याची चिंता सोडा.
आणि हो! हे ज्युस घरी तयार केल्यामुळे हायजेनिक असतो, पिण्यासाठी अगदी सेफ असते.
मुख्य म्हणजे आबालवृद्ध हे ज्युस पिवू शकतात आणि सर्दी ताप ह्यासारख्या आजारांना दूर ठेवू शकतात.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.