कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असणारे हे “सेलिब्रिटीज” देखील अडकले आहेत कोरोनाच्या विळख्यात
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोना ने आत्तापर्यंत १२३ देशांना विळखा घातला आहे. १३५४०० जणांना COVID 19 ची लागण झाली आहे आणि त्यापैकी जवळजवळ सहा हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत.
अनेक चित्रपट, टीव्ही सिरियल्स यामध्ये काम करणारे कलाकार याबरोबरच राजकारणी आणि खेळाडू हे देखील कोरोना व्हायरसने आजारी आहेत.
टॉम हँक्स आणि रिटा विल्सन

हे दोघेही ६३ वर्षे वयाचे हॉलीवुड मधील प्रसिद्ध स्टार कपल. दोघांनाही सध्या COVID 19 झाला असून त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याची माहिती टॉम हँक्स ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर दिली.
ते दोघे सध्या ऑस्ट्रेलिया मधील सिडनी मध्ये असून दोघांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
“सध्या आम्हाला त्याचा काहीही त्रास होत नसून आम्ही व्यवस्थित आहोत, मात्र आमच्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून सध्या आम्ही आयसोलेटेड आहोत”
असे टॉम हँक्स ने आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
इद्रीस एलबा

ह्या हॉलिवूड स्टारला देखील कोरोना ची लागण झाली असून तोही सध्या विलगीकरण कक्षात आहे.
त्यानेही असेच म्हटले की,
“सध्यातरी खूप गंभीर परिस्थिती नाही, परंतु एका ठिकाणी राहून दुसऱ्यांना त्याचा त्रास होऊ न देणं हे जास्त चांगलं, म्हणून मी आयसोलेटेड आहे”.
ख्रिस्तोफर हुवूजू
“गेम ऑफ थ्रोन्स” या प्रसिद्ध सिरीज मधला लोकप्रिय कलाकार ख्रिस्तोफरला देखील कोरोना झाला आहे.
नॉर्वेला त्याच्या घरातच सध्या तो आणि त्याचे कुटुंबीय आयसोलेटेड राहात आहेत. याची माहिती त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून दिली.
ओल्गा कुरीलिंको

“काँटम ऑफ सोलयास” या प्रसिद्ध जेम्स बॉण्ड पटातील अभिनेत्री ओल्गा कुरीलींको हीला देखील सध्या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तिला ताप आणि थकवा जाणवत आहे.
असे तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर म्हटलं आहे. आता घरीच तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असेही तिने सांगितले आहे.
सोफी ग्रेगरी

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊव यांच्या पत्नी सोफी ग्रेगरी यांनादेखील COVID 19 ची बाधा झाली आहे. सोफी लंडनमध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या, तिथून आल्यावरच त्यांना त्रास जाणवायला लागला.
त्यांची कोरोना ची टेस्ट घेण्यात आली, जी पॉझिटिव आली. आता त्यांची प्रकृती सुधारत असून त्या लवकरच बऱ्या होतील, असं कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान जस्टिन यांची टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. तरीदेखील त्यांना काळजी घेण्यासाठी १४ दिवसांसाठी वेगळं ठेवण्यात आलं आहे.
ते घरातूनच आपलं कामकाज सांभाळतील असं पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे. जस्टिन यांना जे लोक भेटले त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
कारण जस्टिन यांची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे.
नादीन डोरिस

६२ वर्षीय नादिन डोरिस या इंग्लंडच्या स्वास्थ आणि आरोग्य मंत्री असून त्यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
डॅनियल रुगानी

डॅनियल रुगानी या २५ वर्षीय इटालियन फुटबॉलपटुला सध्या COVID 19 ने ग्रासले आहे. तोही सध्या आयसोलेटेड आहे. आता त्याच्या टीममधील आणखी एकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
म्हणून त्यांच्या सगळ्या मॅचेस कॅन्सल करण्यात आल्या आहेत. त्याच्या काळजीपोटी लोकांनी त्याला मेसेज केले आणि कसा आहेस?, हे विचारलं त्यावर त्याने सांगितले की,
‘मी सध्या व्यवस्थित आहे आणि घरीच स्वतःला आयसोलेटेड केलेले आहे’.
त्याचा टीम मेट क्रिस्तियानो रोनाल्डो याला देखील सध्या घरामध्ये वेगळं ठेवण्यात आलं आहे. मात्र त्याची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
रूडी गोबर्ट

२७ वर्षीय हा हॉलीबॉलपटू सध्या कोरोनाग्रस्त आहे. आता तो खेळत असलेल्या सगळ्या मॅचेस कॅन्सल करण्यात आल्या आहेत.
परंतु त्याची टेस्ट पॉझिटिव्ह यायच्या आधी त्याने प्रेस कॉन्फरन्स मध्ये बेजबाबदाररीत्या मायक्रोफोन्स हाताळले याबद्दल त्याच्यावर टीका होत आहे.
परंतु गोबर्ट ने झालेल्या प्रकारावर इतकंच म्हटलं आहे की,
“मला तोपर्यंत अजिबात जाणीव नव्हती की मी कोरोना पॉझिटिव आहे. माझ्यामुळे किती लोकांना याचा त्रास होईल याचा विचार करून देखील मला त्रास होत आहे.
त्या सगळ्यांची मी मनापासून माफी मागतो. मला जेव्हा कळलं की मी करोना पॉझिटिव आहे, तेव्हा मला खरंतर खूप भीती वाटली, अस्वस्थपणा जाणवला आणि या आजाराचं गांभीर्य कळलं.
या आजाराने मला बरंच काही शिकवलं आहे.”
फॅबियो वाजिंगर्टान

ब्राझीलचे कम्युनिकेशन डायरेक्टर फॅबियो वाजिंगर्टन हे देखील कोरोना ग्रस्त आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर सहभाग नोंदवला होता.
त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील कोरोना व्हायरसची चाचणी करून घेतली, परंतु ती चाचणी निगेटिव्ह आलेली आहे.
फ्रान्सिस सुवरेज
फ्रान्सिस सुवरेज हे मियामी चे मेयर असून त्यांनादेखील कोरोना झाला आहे. ब्राझीलच्या अधिकाऱ्यांबरोबर फ्रान्सिस यांनी मियामी इव्हेंटमध्ये सहभाग नोंदवला होता.
त्यानंतरच ब्राझीलच्या धिकार्यांना देखील कोरोनाची लागण झाली.
मायकल आरटेटा

मायकल आरटेटा या आर्सेनलच्या मुख्य कोचला देखील कोरोना ची लागण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण टीमला सेल्फ आयसोलेशन वर ठेवण्यात येणार आहे.
ती टेस्ट पॉझिटिव आल्यामुळे मायकल सध्या नर्वस झाले आहेत, आणि लवकरात लवकर बरे होऊन परत मला माझं काम करायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
कॅरम हडसन कोडाई या फुटबॉलपटूला तरुणाची लागण झाली होती मात्र आता तो त्यातून बरा होत आहे.
मी सगळ्या हेल्थ गाईडलाईन्स पाळल्या, स्वतःला आयसोलेटेड करून घेतलं. आणि आता बरा होत आहे आणि लवकरच खेळायला देखील सुरुवात करेन. असे तो म्हणाला.
ख्रिस्तियन वूड
ख्रिस्तियन हा देखील २४ वर्षीय व्हॉलीबॉल प्लेयर असून त्याला देखील सध्या कोरोनाने ग्रासले आहे.
दोनोवन मिचेल ,पॉला डायबेला या फुटबॉलपटूंना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
कोरोना ने सगळ्यांनाच एका पातळीवर आणून सोडले आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.