आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
क्रिकेट.! फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिघांची सांगड घालून जन्माला आलेला खेळ.
उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यामुळे सामन्यात चुरस निर्माण करता येतेच,पण फलंदाजांनी आपल्या सुरेख खेळीच्या बळावर सामन्यावर सामने फिरवल्याने दिसून येतात.
सामन्याच्या शेवटी कोणत्या संघाने सर्वाधिक धावा केल्या यावरून सामन्याचा निर्णय होत असतो. त्यामुळे बॅट्समनचं योगदान नाही म्हटलं तरी सर्वाधिक असत असं म्हणायला हरकत नाही.
टेस्ट मध्ये संयम, वनडे मध्ये अचूक टायमिंग आणि टी२० मध्ये मारझोड अशा प्रकारचे सध्या तरी स्किल्स नवीन जनरेशनच्या बॅट्समन मध्ये दिसून येत आहेत.
त्यात रोहित शर्मा, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर सारखे खेळाडू तर तिन्ही फॉरमॅट मध्ये उत्तम फलंदाजी करताना दिसतात.
तर बघूया भारताचे ऑल टाईम ग्रेट फलंदाज ज्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वात स्वतःला अजरामर केलं आहे.
१०.युवराज सिंग
टेस्ट-४० सामने, १९०० धावा, ३x१००, सर्वाधिक-१६९
वनडे-३०४ सामने, ८७०१ धावा, १४x१००, सर्वाधिक १५०
टी२०-५१ सामने, ११७७ धावा, ८x५०, सर्वाधिक-७७
भारताच्या मधल्या फळीतला हुकुमी एक्का.!आणि आपली उपयोगीता वेळोवेळी त्याने सिद्ध करून दाखवलेली आहे.
२००७ चा टी२० वर्ल्डकप असो वा २०११ चा ५०-५०चा वर्ल्डकप,दोन्ही युवराज शिवाय अपूर्णच.!
२००७ च्या वर्ल्डकप मध्ये स्टुअर्ट ब्रॉडला ठोकलेले ६ बॉल ६ सिक्स आणि त्याच सामन्यात फटकवलेलं फास्टेस्ट ५० आजही ते रेकॉर्ड अबाधीत आहेत.
सेमी फायनल ला ब्रेट ली सह ऑस्ट्रेलियन बोलर्सची पिसे काढत झोडलेले ३० बॉल ७० कोण विसरेल.? (खास करून ब्रेट लीच्या १५० किमी/तास च्या आलेला चेंडूला फ्लिक करून ठोकलेला छक्का.!)
२०११ चा वर्ल्डकप तर त्याला स्वतःला आणि भारतीयांना कायम लक्षात राहील असा.
३६२ धावा आणि १५ विकेट घेऊन मालिकाविराचा पुरस्कार जो पटकवलेला त्याने.
९.महेंद्रसिंग धोनी
टेस्ट-९० सामने, ४८७६ धावा, ६x१००, सर्वाधिक २२४
वनडे-३४१ सामने, १०५०० धावा, १०x१००, सर्वाधिक १८३
टी२०-९८ सामने, १६१७ धावा, २x५०, सर्वाधिक ५६.
“धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल” रवी शास्त्रीचे हे बोल क्वचित कोणी तरी विसरेल.
ऑल टाईम बेस्ट भारताला लाभलेला वनडे फिनिशर. कुलसेकराला सिक्स मारून २८ वर्षांनी भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार कम फलंदाज.
वनडे मध्ये त्याने सेट केलेले स्टँडर्ड क्वचित कोणी लेव्हल करू शकेल.
टेस्ट मध्ये गिलख्रिस्ट,बाऊचर यांच्या नंतर सर्वाधिक धावा करणारा धोनी तिसरा विकेट किपर फलंदाज आहे.
८.व्हीव्हीएस लक्ष्मण
टेस्ट-१३४ सामने, ८७८१ धावा, १७x१००, सर्वाधिक २८१
वनडे-८६ सामने, २३३८ धावा, ६x१००, सर्वाधिक १३१
व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण!
टेस्ट मध्ये लक्ष्मणची फलंदाजी कोणाला आवडणार आहे? टेस्ट क्रिकेट जर कला असेल तर त्या कलेचा उत्तम कलाकार म्हणून लक्ष्मणला संबोधले जाईल.
हत्ती गेल्यानंतर उरलेल्या शेपटीसोबत किल्ला लढवताना अनेकदा त्याला पाहिलं गेलेलं आहे. लक्ष्मण म्हटलं आणि ईडन गार्डनची ती जगप्रसिद्ध टेस्ट आठवणार नाही असं होणार नाही.
फॉलोऑन त्यात सुरवातीचे ४ फलंदाज माघारी, सोबत द्रविड आणि दोघांनी केलेली ३७६ धावांची पार्टनरशिप!
क्रिकेट मंथली ने टॉप ५० टेस्ट क्रिकेट मूव्हमेंट मध्ये लक्ष्मणच्य त्या २७१ धावाना पहिली पसंती दिलेली.
टीम ऑस्ट्रेलिया जेव्हा यशाच्या सर्वोच्च शिखरावर होती, तेव्हा त्यांची पिसे काढणारा लक्ष्मण एकमेव फलंदाज होता.
७.मोहम्मद अझरुद्दीन
टेस्ट-९९ सामने, ६२१५ धावा, २२x१००, सर्वाधिक १९९
वनडे-३३४ सामने, ९३७८ धावा, ७x१००, सर्वाधिक १५३
आपल्या पहिल्या तीन टेस्ट सामन्यात सलग शतक लगवणारा एकमेव फलंदाज.!तसेच करियरच्या पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात शतक ठोकणारा सुद्धा एकमेवच!
आपल्या कलात्मक शैलीने लेग साईड ला खेळण्यासाठी अजहर प्रसिद्ध होता.
त्याने वनडे मध्ये ६२ बॉल मध्ये शतक ठोकून वेगवान शतक ठोकणारा भारतीय बनला, नंतर सेहवाग ने तो विक्रम मोडला.
टेस्ट मध्ये वेगवान शतक त्याच्याच नावावर आहे. ७४ बॉल मध्ये शतक. तो विक्रम अजून त्याच्याच नावावर आहे.
६.विरेंदर सेहवाग
टेस्ट-१०४ सामने, ८५८६ धावा, २३x१००, सर्वाधिक ३१९
वनडे-२५१ सामने, ८२७३ धावा, १५x१००, सर्वाधिक २१९.
टी२०-१९ सामने, ३९४ धावा, ५०x२, सर्वाधिक ६८.
मुलतान का सुलतान.!
पाकिस्तानी गोलंदाजी फोडून काढत पहिली ट्रिपल सेंच्युरी ठोकणारा पहिला भारतीय.
तिन्ही फॉरमॅट मध्ये सर्वोत्तम असा फलंदाज.तिन्ही फॉरमॅट मध्ये टॉप रँकिंग ला जेव्हा भारतीय संघ आला त्यात सर्वाधिक योगदान म्हणजे सेहवागचं.
तो खेळताना त्याची बॅट अक्षरशः आग ओकत असते. लवकर बाद झाला तर ठीक नाही तर गोलंदाजांची काही खैर नाही.
सुरवात स्लो करून नंतर स्ट्राईक रेट कव्हर करण्याचा प्रत्येक फलंदाजाचा एक माईंड सेट असतो. तो बदलला सेहवागने.
सामन्याची सुरवात चौकाराने करणारा फलंदाज म्हणजे सेहवाग.
६ मारून ३०० धावा पूर्ण करणारा फलंदाज सुद्धा सेहवागच.!
५.सौरव गांगुली
टेस्ट-११२ सामने, ७२१२ धावा, ३४x१००, सर्वाधिक २३९.
वनडे-३११ सामने, ११३६३ धावा, २२x१००, सर्वाधिक १६३
‘गॉड ऑफ ऑफसाईड’ म्हणून क्रिकेट जगतात प्रसिद्ध असलेला ‘दादा’.
संधी मिळून सुद्धा चार वर्षे उशिरा मैदानात उतरलेल्या गांगुलीने आपली कारकीर्द गाजवून सोडली आहे.
सचिन सोबत ओपनिंगला येऊन ६६०९ धावांची भागीदारी विथ २१ शतकीय भागीदारी एकूणच त्याच्या खेळीचा अंदाज देतो.
वनडे मध्ये तेव्हा सचिन आणि इंझमाम नंतर १०००० पेक्षा जास्त धावा करणारा गांगुलीच होता.
तत्कालीन जलद ६०००, ७०००, ८०००, ९००० धावा करण्याचा रेकॉर्ड गांगुलीच्या नावावर होता.
४.सुनील गावस्कर
टेस्ट-१२५ सामने, १०१२२ धावा, ३४x१००, सर्वाधिक २३६
वनडे-१०८ सामने, ३०९२ धावा, १x१००, सर्वाधिक १०३
टेस्ट मध्ये १०००० धावा करणारा पहिला फलंदाज, १९ वर्ष अबाधित असलेला ३४ शतकांचा रेकॉर्ड गावस्कर यांची फलंदाज म्हणून ओळख गडद करते.
१९७०-८० च्या काळात जिथे विंडीज-ऑस्ट्रेलिया चे पेसर्स आग ओकत होते,तिथे गावस्कर खोऱ्याने धावा बनवत होते.
लिटल मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेले गावस्कर आपल्या चौथ्या इनिंग च्या खेळी साठी प्रसिद्ध होते.
३.विराट कोहली
टेस्ट-८६ सामने, ६६१३ धावा, २७x१००, सर्वाधिक २४३
वनडे-२४८ सामने, ११८६७ धावा, ४३x१००, सर्वाधिक १८३
टी२०-८१ सामने, २७९४ धावा, ५०x१००, सर्वाधिक ९४
तिन्ही फॉरमॅट मध्ये क्रमांक एक चा खेळाडू, तिन्ही फॉरमॅट मध्ये ५०+ एव्हरेज यावरून विराट कोहलीच्या खेळीचा दर्जा दिसून येतो.
चेस मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोहलीचा रेकॉर्ड अचंबित करणारा आहे.
२४ शतक हे चेस करतानाच त्याच्या बॅट मधून निघाले आहेत शिवाय ९७.९८ चा तगडा एव्हरेज.
२०१८ चे आयसीसीचे सगळे पुरस्कार पटकवणारा कोहली क्रिकेट जगतात एकमेव खेळाडू आहे.
२.राहुल द्रविड
टेस्ट-१६४ सामने, १३२८८ धावा, ३६x१००, सर्वाधिक २७०
वनडे-३४४ सामने, १०८८९ धावा, १२x१००, सर्वाधिक १५३
सचिन नंतर सर्वाधिक टेस्ट धावा,सर्वाधिक टेस्ट शतक ठोकणारा फलंदाज म्हणजे राहुल द्रविड.
दोन्ही फॉरमॅट मध्ये १०००० पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा भारतीय. तब्बल ३१२५८ बॉल फेस केलेला एकमेव खेळाडू.
भारतीय फलंदाजीची भरवश्याची ‘भिंत’! ‘द वॉल राहुल द्रविड.!’
लक्ष्मण सोबत केलेली विक्रमी ३७६ धावांची भागीदारी.अँडलेड टेस्ट मध्ये केलेले २३३ आणि ७२ धावा,असेच पराभव टाळणारे असंख्य खेळी द्रविड ची उपयुक्तता सिद्ध करते.
१.सचिन तेंडुलकर
टेस्ट-२०० सामने, १५९२१ धावा, ५१x१००, सर्वाधिक २४८
वनडे-४६३ सामने, १८२४६ धावा, ४९x१००, सर्वधिक २००
‘क्रिकेटचा देवता’
क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅट मध्ये सर्वाधिक सामने, सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतक असे डझनभर विक्रम आपल्या नावे करणारा खेळाडू म्हणजे ‘सचिन तेंडुलकर’.
१६ व्या वर्षी क्रिकेट ला सुरवात करून ४० व्या वर्षी ब्रेक घेणाऱ्या सचिनचा जन्मच मुळात क्रिकेट साठी झालेला.
डेझर्ट स्टॉर्म, झिम्बाब्वे सोबतची खुनशी खेळी, आफ्रिके सोबतचे २०० असे असंख्य अविस्मरणीय खेळी सचिन ने साकारल्या आहेत.!
१०० शतक ठोकणारा खेळाडू.त्याच्या मागे असलेला पॉंटिंग तब्बल २९ शतक मागे आहे.
करोडो जनतेचे भार आपल्या खांद्यावर उचलणारा हा खेळाडू जेव्हा बाद व्हायचा तेव्हा लोकांचे टीव्ही बंद व्हायचे,यावरून सचिनची क्रेझ काय होती ते कळत.!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.