Site icon InMarathi

गंगेचं गुपित – पाणी “पवित्र” असण्यामागचं गूढ वैज्ञानिक कारण : “ब्रह्म द्रव्य”…??!

ganga im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गंगेच्या प्रवाहाने सगळी पापं धुवून माणूस निर्मळ होतो अशी समजूत भारतात खूप आधीपासून आहे. दुःख, पीडा, पाप, रोग सगळं धुण्यासाठी लोक गंगेत स्नान करायला जातात. त्यामागे एक गोष्ट सांगितली जाते – भगीरथ राजाची.

भगीरथ राजाने आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेवांनी मग प्रसन्न होऊन त्याची पर्यायाने मानवाची पापं धुण्यासाठी आकाशातून गंगेला पाचारण केलं. पण आकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या गंगेच्या प्रवाहामुळे पृथ्वी उध्वस्त होऊ शकते.

हे लक्षात आल्यावर महादेव मेरू पर्वतावर उभे राहिले. त्यांनी गंगा नदीला आपल्या जटांमध्ये जागा दिली आणि तिथून गंगा नदी पृथ्वीवर वाहू लागली. तेव्हापासून गंगा नदी मानवा चे “पाप” धुवत आहे.

 

 

पण ही तर पौराणिक कथा झाली. आज ह्या कथेवर विश्वास ठेवावा काय? Well, ज्या प्रकारे वैज्ञानिक संशोधनं होताहेत, त्यानुसार गंगा इतर नद्यांपेक्षा वेगळी, श्रेष्ठ आहे – हे स्पष्ट होत आहे.

वैज्ञानिकांच्या मते, गंगेच्या पाण्यात एक अशी virus ची प्रजाती आहे ज्याने गंगेच्या पाण्याचं अत्यंत जलद गतीने निर्जंतुकीकरण होतं – जे इतर नद्यांमध्ये होताना आढळत नाही.

The Economic Times ने सदर रिसर्चवर एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. ह्या रिपोर्टनुसार, ज्युलियन हॉलिक ह्याने केलेल्या संशोधनानंतर तो ह्या conclusion वर आला की गंगेच्या पाण्यात एक X factor आहे. हा फॅक्टर गंगेच्या पाण्याला झटपट शुद्ध करत असतो. संशोधन करता करता त्याने बाकीच्या नद्यांचं आणि गंगेचं comparison केलं.

किरणोत्सारी – हिमालयातील radioactive खडक, जंगलातील झाडे, बर्फाचं थंडगार पाणी ह्याचं एकत्रितपणे बनतं ते गंगेचं पाणी. पण मग प्रश्न असा पडतो की गंगा नदीच्या सोबत असलेल्या ब्रह्मपुत्रा नदी मध्ये हे गुणधर्म का नाहीयेत?

 

 

Hydrology चे प्रोफेसर D S Bhargav ह्यांच्या म्हणण्यानुसार –

साधारण नदीच्या पाण्यातील oxygen, Organic waste आणि बॅक्टेरिया संपवतात ज्याने बॅक्टेरियाला वाढीसाठी जोर मिळतो. पण गंगेच्या पाण्यात असलेल्या ह्या ‘X Factor’ मुळे गंगेच्या पाण्यातील oxygen २५ पट वाढतो.

पण वाढलेला oxygen पाण्यात साठवून ठेवता येण्याच्या गंगेच्या क्षमतेमागचं कारण कुणाकडेच नाहीये.

 

 

देशातील नामांकित संस्थांच्या संशोधनातून बाहेर आलेल्या काही गोष्टी –

जर ह्या X factor बद्दल असलेले प्रश्न सोडवल्या गेले तर मेडिकल क्षेत्रात खूप प्रगती होईल.

ह्या प्रयत्नांना लवकर यश मिळावं आणि त्याचा लाभ सर्वांना व्हावा!

सदर रिपोर्ट इथे वाचू शकता : Is Ganga water special because of an enigmatic X-factor?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version