प्रवास करताना आजारपण दूर ठेवण्यासाठी ह्या गोष्टींची काटेकोरपणे काळजी घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सहलीला जायला सगळ्यांनाच आवडतं.
व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढावा, तेच तेच काम करून कंटाळा आला, कामाचा शीण घालवावा असं सगळ्यांनाच वाटतं!
कसा घालवायचा हा शीण? कसं व्हायच फ्रेश? ह्याचं उत्तर आहे, कुठे तरी दुसर्या गावी, शहरात फिरायला जाणं!
तसंच आज-काल ऑफिस, कंपनीच्या कामासाठी, मीटिंग्ज साठी दुसर्या शहरात (कधी कधी दुसर्या देशात पण) जावं लागतं.
सतत फिरतीच्या देखील नोकर्या असतात काही जणांच्या! म्हणजेच प्रवास आला.
हा प्रवास कंटाळवाणा असू शकतो आणि लांबचा असेल तर मग फ़ारच त्रासदायकही असू शकतो. एक तर सतत प्रवास, बसून राहायचं, त्यात खाण्या-पिण्याचे हाल.
हवाबंद डब्यातले अन्न, ताजे अन्न मिळण्याची शक्यता फारच कमी. त्यात हवामानात बदल! म्हणजे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. जंतुसंसर्गाची शक्यताही जास्त असते अशा वेळी.
वारंवार प्रवास करणार्या व्यक्तीने आपले शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नेहेमी लक्षात घेतले पाहिजे. प्रवास आपल्याला थकवू शकतो. पुरेशी झोप न मिळणे, अन्न (अनेकदा अनारोग्य) खाण्यामुळे अशा प्रावासाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.
पण, प्रवास तर अपरिहार्य आहे. त्याला पर्याय नसतो.
मग प्रवास पण हवा आणि आजारपण नको असेल तर ह्या टिप्स् जरूर वाचा!
१) व्यायाम आणि योगासने
प्रवास कोणत्याही वाहनाने केला, तरी तुमचं शरीर फिट असेल, तर वातावरण, थकवा या गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही.
त्यामुळे प्रवासाची चिंता करण्यापेक्षा त्यापुर्वी तुमचं शरीर सुदृढ कसं होईल याचा विचार करा.
सुरुवातीला व्यायामाला १०-१५ मिनिटे द्या. हळूहळू व्यायामचा वेळ वाढवा.
व्यायाम आपल्या शरीराला फक्त सुडौल बनवायचे काम करत नाही तर आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास देखील मदत होते.
योगासनं आपल्याला शरीरासाठी उपयुक्त ठरतात. शरीराची मजबूती, लवचिकता वाढविण्याबरोबरच इम्युनिटी, प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी योगासनं महत्त्वाची कामगिरी बजावतात.
योगासनांमुळे जंतुसंसर्गाची शक्यता फारच कमी असते. योगासनांमुळे संयोजी शरीराला बळकटपणा येतोच, पण मन शांत होते आणि सकारात्मकता वाढते.
या गोष्टी प्रवासासाठी निश्चित पूरक असतात.
२) चालण्याचा व्यायाम
आपण चालण्याचा जितका जास्त व्यायाम करू तितके आपण ऍक्टिव्ह राहतो. आपली सहनशक्ती त्याचप्रमाणे स्टॅमिनाही वाढतो.
३) आहार
प्रवासात आहाराची निवड ही बाब सगळ्यात महत्वाची ठरते.
शक्यतो मांसाहार टाळावा. भोजनात प्रामुख्याने भाज्या, फळे, अंडी, दही, पनीर, चीज ह्यांचा समावेश करा.
या अन्नपदार्थांमुळे इम्युनिटी वाढते. मोड आलेली कडधान्ये खावीत. पचण्यास हलके पदार्थ सेवन करावेत. फास्ट फूड टाळावे.
जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ सेवन करण्यापेक्षा तंदुरुस्ती वाढविणारे पदार्थ आहारात घ्यावेत.
४) पाणी पिणे
प्रवासात टाइम झोन बदलतो, हवामानात बदल होतो आणि विमानतळांवर किंवा हॉटेलमध्ये बसून प्रतीक्षा केल्याने शरीरातली पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशन होतं.
त्यामुळे तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितकीच सहलही सुखकारक होईल. जास्तीत जास्त पाणी पिणे हा डिहायड्रेशन होऊ न देण्याचा चांगला उपाय आहे.
आपली त्वचा आपल्या शरीरातील सर्वात मोठा डिटोक्सिफायर आहे.
आपल्याला आपल्या त्वचेवर डाग किंवा मुरुम दिसल्यास, ते सुचत करत की, आपले शरीर एखाद्या गोष्टीपासून स्वत: ला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.
आपण काय खातो याचा विचार करा आणि अधिक पाणी प्या. एक बदल करा. जरी आपली त्वचा परिपूर्ण दिसत असली तरीही – आपल्या पाण्याचे प्रमाण वाढवा.
आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले वाटेल ज्यामुळे प्रवासात चांगला अनुभव येईल.
५) प्रवासातील खाणे
प्रवासात आपण शक्यतो घरूनच ३/४ दिवस टिकतील असे अन्नपदार्थ घेऊन निघावे.
मग ते परोठे, सुकी भाजी-पोळी किंवा तत्सम पदार्थ असोत, प्रवासात बाहेरचे अन्न आणि मांसाहार तर जरूर टाळावा.
स्थानिक खाद्यपदार्थांना जास्त प्राधान्य द्यावे कारण ते तिथल्या हवामानानुसार पचण्यास सोपे असते आणि असे स्थानिक पदार्थ सहज उपलब्ध होतात.
काही निरोगी पदार्थांसाठी सुपरमार्केट शोधा. फ्रिज किंवा मायक्रोवेव्हसह हॉटेलची खोली मिळवण्याचा प्रयत्न करा.
दही, कॉटेज चीज, फळे, व्हेज आणि काही अंडी खरेदी करा, आपला स्वतःचा नाश्ता बनवण्याचा प्रयत्न करा.
६) झोप
प्रवासामुळे आपण थकतो, प्रवासात आपण जास्तीत जास्त वेळ बसलेल्या स्थितीत असतो.
सतत एकाच स्थितीत बसल्याने काही स्नायूंवर ताण येतो, तर काही अवयव आखडण्याची शक्यता असते.
अशा वेळी झोप हा पर्याय सुखकारक असतो. झोपेमुळे आपण रिलॅक्स होतो आणि मनही प्रसन्न होते.
७) स्वच्छता
जंतू सगळीकडे असतात हे सत्य नाकारता येत नाही.
यासाठी जागरूकता जास्त महत्त्वाची आहे. थोडी सावधगिरी आणि जागरूकता आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते.
आपले हात वारंवार धुवून स्वतःचे रक्षण करा.
आपल्या बॅग किंवा पर्स मधे हॅंड सॅनिटायझर ठेवा. आपल्याबरोबर टिश्यू पेपर सतत राहू द्या.
रेलिंग्ज् वगैरे पकडल्यावर जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते तेव्हा हे टिश्यू पेपर उपयोगी पडतात. शक्य तितका स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा.
स्वच्छतेने आजारपण येण्याची शक्यता जवळ जवळ नसतेच.
आता नवीन नवीन जीवाणू-विषाणू पसरत आहेत ज्यांच्या संसर्गाने जे रोग होतात ते अटोक्यात आणणे कठिण जातंय, करोना हे त्याचंच उदाहरणं.
याकरता स्वच्छतेची जितकी काळजी घेतली जाईल तेव्हढी चांगली! अगदी प्रवासात सुद्धा स्वच्च्ता बाळगणे जरूरीचे आहे.
८) रिकाम्या पोटी प्रवास करु नका
बर्याचदा जे लोक काहीही न खाऊन प्रवासाला जातात त्यांना जास्त त्रास होतो.
रिकाम्या पोटी प्रवास म्हणजे ऍसिडिटी, थकवा, चक्कर येणे अशा आजारांना आमंत्रण!
परंतु याचा अर्थ असा नाही की आपण पचनास कठिण असा आहार घ्या. कोठेही जाण्यापूर्वी नेहमी हलका नाश्ता करूनच घर सोडा.
९) दूरच्या बिंदूवर लक्ष ठेवा
सहसा प्रवास करताना आपण सतत खिडकीच्या बाहेर पाहतो. यामुळे गती आजारपण (motion sickness) देखील होऊ शकते.
प्रवासादरम्यान तुम्हाला काही अस्वस्थता वाटल्यास, खिडकीच्या सभोवतालच्या गोष्टीऐवजी दूरच्या बिंदूवर लक्ष केंद्रित करा किंवा थोड्या वेळासाठी डोळे बंद ठेवा.
१०) प्रतिबंधात्मक औषधे
ताप, थंडीताप, सर्दी, खोकला इत्यादी रोगांसाठी असणारी प्रतिबंधात्मक औषधे आधीच डॉक्टरांच्या सल्ल्याने जवळ ठेवा.
आपण आपली सहल बुक करण्यापूर्वी किंवा आपण जेथे जाणार आहोत तिथे जाण्यापूर्वी तिकडची सगळी माहिती करून घ्या आणि तिथल्या हवामानानुसार आपण अद्ययावत असल्याचे सुनिश्चित करा.
आपण मलेरियासारख्या आजाराची लागण होण्याचा धोका असलेल्या अशा एखाद्या ठिकाणी प्रवास करत असाल तर आपणास प्रतिबंधात्मक औषध देखील लिहून देण्यात येईल.
“लोकांनी प्रवासासह असलेल्या लसींसाठी सीडीसी वेबसाइटचा वापर करावा किंवा ट्रॅव्हल क्लिनिक पहावे,” तिथल्या स्थानिक दवाखान्यांची माहिती आगोदरच मिळवून ठेवावी.
११) कपडे
आपण प्रवास करत असताना आपली त्वचा तसेच शरीर आच्छादित ठेवण्यामुळे आपण गंभीर उन्हामुळे किंवा तीव्र थंडीमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होऊ शकते.
“गरम भागात श्वास घेण्यायोग्य सामग्री असलेले सुती (कॉटनचे) लांब बाही असणारे शर्टस्/कुडते आणि पँटसारखे संरक्षणात्मक कपडे घाला, तसेच बर्फाळ प्रदेशात लोकरीचे कपडे वापरा.
१२) पचन
आपण जेव्हा दुसरीकडे जातो किंवा प्रवासात असतो तेव्हा देखील तेव्हा तिथले हवामान, भोजन ह्यांचा आपल्या पचनावर परिणाम होतो, अन्नपचनास अडथळा येतो किंवा पचन नीट होत नाही.
अशा वेळी, प्रवास करताना पचन करण्यास मदत करणारी एक छानशी युक्ती म्हणजे भोजनापूर्वी साधारण १५ मिनिटे आधी योग्य तापमान असणार्या कप सोडाचा एक छोटासा ग्लास किंवा एक ग्लास कोमट पाणी लिंबू पिळून प्यावा.
आपण जेव्हा भोजनास सुरुवात करतो तेव्हा प्रथम यापैकी एक पेय ऑर्डर देऊन मग भोजनाची ऑर्डर द्यावी.
“जेवण येईपर्यंत तुम्ही पचन चालू केले असेल आणि छातीत जळजळ / अपचन होण्याची शक्यता कमी होते.
१३) लिप बाम
आपण प्रवास करतान लिप बाम कदाचित आपल्यास सुरक्षित आणि निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली असू शकते.
प्रवासात लिप बाम लावा. कोरडे, क्रॅक ओठ जंतुसंसर्गास पोषक असतात.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.