' कोरोनामुळे ऑफिसमधील कामात घडलेल्या “या” अनपेक्षित बदलाला सामोरे जाण्याच्या टिप्स – InMarathi

कोरोनामुळे ऑफिसमधील कामात घडलेल्या “या” अनपेक्षित बदलाला सामोरे जाण्याच्या टिप्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या कोरोनामुळे  वर्क फ्रॉम होम हे सगळीकडे होताना दिसून येत आहे. घरून काम केलं की निवांतपणे करता येतं, वेळेच बंधन नसतं. ऑफिसला याच वेळेत जा, त्याच वेळेत निघा, असं काहीही नसतं.

धावपळ न करता घरून काम करता येणे ही सगळ्यांसाठी, विशेषतः महिलांसाठी एक चांगली गोष्ट असते.

आणि आजकाल कंपन्यादेखील जर तुम्हाला घरून शक्य असेल तर घरूनच काम करा असं आपल्या एम्प्लॉईजना सुचवत आहेत.

कारण कमर्शियल ऑफिस घेऊन त्या ठिकाणी कंपनी चालवणे, तिथल्या सर्व सोयी सुविधा एम्प्लॉईजना देणे आर्थिक दृष्ट्या कधीकधी अवघड गोष्ट असते.

अमेरिकेतूनच पहिल्यांदा ही संकल्पना आली. सध्या अमेरिकेत जवळपास ३.५ दशलक्ष लोक घरून काम करतात. आणि तिथल्या कंपन्यादेखील असं करण्यासाठी प्रोत्साहन देतात.

आता असं वाटायला लागलंय की भविष्यातलं नोकरीचे ठिकाण हे तुमचं घर असेल. तुमचं करिअर करण्यासाठी तुम्हाला बाहेर जायची आवश्यकता नाही.

घरातून काम करणे खरंच इतका सोपं आहे का? कारण माणसाला ऑफिस आणि त्याच्या वातावरणाची इतकी सवय असते की ऑफिसचं काम घरी करणं तसं अवघड असतं.

 

work from home inmarathi 1
business insider india

 

घरात काम करताना वेगळीच आव्हानं समोर येतात. घरात अचानक कोणी पण येऊ शकतो मग बोलण्यात टाईमपास होतो, जेवण वगैरे झाल्यावर घरातला बेड बघून दुपारी झोप यायला लागते.

म्हणूनच कदाचित ऑफिसमध्ये आपण जो आउटपुट देऊ शकतो तो घरी बसून देऊ शकत नाही. शिवाय ऑफिसमधल्या लोकांनाही वाटतं ह्याला काय काम आहे, घरी आराम चाललाय.

त्यामुळे केलेल्या कामाचं ॲप्रिसिएशन मिळत नाही. प्रमोशनच्या वेळी देखील घरून काम करणाऱ्या व्यक्तीचा विचार केला जात नाही, कारण एकतर ती व्यक्ती डोळ्यासमोर नसते आणि महत्वाची कामं अशा व्यक्तीला द्यावी की नाही याबद्दलही साशंकता असते.

पण जर खरोखरच तुम्हाला घरून काम करायचं असेल तर त्यासाठी काही सवयी लावून घेणे गरजेचे आहे जेणेकरून आपण घरातून केलेलं काम देखील ऑफिसमध्ये केलेल्या कामाप्रमाणेच गणले जाईल.

१: कामाचे तास ठरवून घ्या

 

work from home inmarathi 2
womens web

 

घरून काम करणार असाल तर कामाचे तास ठरवून त्याप्रमाणे शिस्तीत काम केलं पाहिजे.

नाहीतर २४ तास देखील कमी पडतील. परंतु अगदी नऊ ते पाच यावेळेत ऑफिसमधल्या सारखं बसणं शक्य होणार नाही. त्यावेळेस आपण जास्त काळ काम, कोणत्या वेळेत करतो, तो वेळ ऑफिसच्या कामासाठी ठेवला पाहिजे.

त्याचप्रमाणे आपल्या वरिष्ठांशी बोलण्यासाठी पण एक ठराविक वेळ ठेवली पाहिजे. वेळोवेळी ई-मेल्स चेक केल्या पाहिजेत.

ज्यावेळेस बॉस शक्यतो बीझी नसेल, त्यावेळेस तुमच्या वरिष्ठांशी कामाविषयी बोलून घेतलं पाहिजे. तुमच्या ऑफिसमधल्या को वर्कर्सशी फोनवरून संपर्क ठेवला पाहिजे.

 

२: कामाच्या वेळा आणि तुमच्या वैयक्तिक वेळा वेगळ्या केल्या पाहिजेत

 

work from home inmarathi 5
iss campus

 

घरून काम करताय म्हणून दिवस-रात्र केवळ ऑफिसचं काम करू नये. ऑफिसच्या कामाची वेळ ही ठरवून घेतलेली असावी. त्यामध्ये तुमचे कॉल्स, तुमच्या मीटिंग याविषयीचं कम्युनिकेशन, ऑफिसमधल्या लोकांशी व्हायला पाहिजे.

आणि त्यांनाही सांगितलं पाहिजे की ठराविक वेळेनंतर मी ऑफिसच्या कामासाठी उपलब्ध नाही. जेणेकरून तुमच्या वेळेतच जे काही महत्त्वाचं काम असेल ते ऑफिसची लोक पूर्ण करतील.

आणि ऑफिसची कामं करताना घरातल्या लोकांनाही सांगून ठेवायचं की मला डिस्टर्ब करू नका, मी ऑफिसचं काम करत आहे.

तसचं घरच्यांसाठी देखील वेळ दिला पाहिजे. संध्याकाळी थोडा वेळ घरच्यांसाठी ठेवला पाहिजे. त्यावेळेस कोणतेही ऑफिसचे काम करायचं नाही.

 

३: कामाचे नियोजन करा

 

business woman working late in the office InMarathi

 

आदल्या दिवशी झोपताना कामाची लिस्ट बनवा, त्याप्रमाणे शेड्यूल बनवा. तुमचा व्यायाम आणि नाश्ता झाल्यावर कामाकडे लक्ष द्या.

जे काम महत्वाचे आहे त्याला प्राधान्य द्या. अवघड काम तुम्ही फ्रेश असताना करा. दिवसातून थोडा थोडा ब्रेक प्लॅन करा. ब्रेक मध्ये थोडं उठून घरातच चाला, फ्रेश हवा घ्या. एखाद फळं खा.

घरातील व्यक्तींशी थोडं बोला. साधारणपणे दहा मिनिट, अर्धा तास, एक तास असा ब्रेकचा वेळ ठरवा.

 

४: ऑफिस सारखे कपडे घालून काम करा

 

work from home inmarathi
dna india

 

घरात राहिल्यावर बऱ्याचदा घरचेच कपडे घालून काम केले जाते. त्यामुळे कामामध्ये लक्ष लागत नाही. ऑफिसच्या कामाच्या फील येत नाही. घरातले कपडे घालून काम केल्यास आळस येतो.

झोपून काम करावं अशी इच्छा होते. ऑफिसला जाताना जे कपडे घालतो तेच कपडे घालून घरातही काम करावं. त्यामुळे ऑफिसचा फील येतो. आणि ऑफिस चे काम भरभर होते.

 

५: कामाची जागा ठरवून घ्यावी

 

work from home inmarathi 3
the balance career

 

आपल्या कामाची जागा ठरवून घ्यावी, कुणालाही त्या जागेवर बसू देऊ नये. आपली टेबल खुर्ची ठरवून घ्यावी. टेबल देखील ऑफिस मध्ये असतं त्याप्रमाणे त्याची रचना करावी.

कुणालाही आपल्या टेबलाजवळ येण्यास बंदी करावी. आपण ज्या खोलीत काम करणार आहोत त्या खोलीच्या दारावर “ऑफिस” अशी पाटी लावावी, म्हणजे घरातल्यांना कळेल की तुमचं काम सुरू आहे.

मग ते तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत. काम संपल्यावर पाटी काढून ठेवावी. आपलं टेबल आपणंच स्वच्छ करावं. ऑफिस सारखं तिकडे साफ करायला माणूस नसेल.

 

६: संगीत ऐकत काम करा

 

work from home inmarathi 4

 

घरून काम करताना हा एक फायदा असतो की तुम्हाला तुमच्या आवडीची गाणी ऐकत काम करता येते. आपल्या सहकाऱ्यांना डिस्टर्ब होईल, ही भीती नसते.

त्यामुळे तुमचा मूड फ्रेश होतो आणि तुमच्या कामाची प्रॉडक्टिव्हिटी वाढते.

 

७: सगळ्यांबरोबर रहा

घरातून काम करताना असा फील येऊ शकतो की, आपण समाजापासून लांब चाललोय. बाहेर नक्की काय होतंय हे कळत नाही, त्यामुळे सोशल राहण्याचा प्रयत्न करा.

कधीतरी ऑफिस मध्ये जा. इतरांशी गप्पा मारा.

 

office inmarathi

 

तुमच्या ऑफिस मधले कलीग किंवा सहकारी यांच्याबरोबर देखील कधीकधी बाहेर जात राहावं, कारण त्यामुळे त्यांना देखील असं वाटत राहिलं की तुम्ही देखील त्यांच्या टीमचा भाग आहात.

मुख्य म्हणजे स्वतःला शिस्त लावून घ्यावी. तीच work from home करण्यासाठी उपयोगी पडते. आणि स्वतःच स्वतःला प्रेरित करत रहा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?