ड्रग अॅडीक्ट ते हॉलिवूड चा सर्वात महागडा अॅक्टर – रॉबर्ट डाउनी ज्युनियरचा प्रेरक प्रवास!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आज हॉलिवूडमध्ये रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर हे नाव खूप मोठं आहे. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर यांनी अगदी कोवळ्या वयात पहिल्यांदा चित्रपटात अभिनय केला होता.
नंतर रॉबर्टच्या आयुष्यात दुर्दैवी घटनांची मालिकाच सुरू झाली होती. बऱ्याचदा होणारी अटक, कारागृहात घालवलेला वेळ आणि नंतर पुनर्वसन केंद्रातील वास्तव्य.
जवळपास संपलेली अभिनयाची कारकीर्द आणि एक अयशस्वी संसार सुद्धा!! पण आज परिस्थिती पूर्णतः उलट आहे. डाऊनी ज्यु. हा जगप्रसिद्ध नट आहे आणि सर्वाधिक गल्ला जमवून देणारा कलाकार.
‘फोर्ब्स’ च्या हॉलिवूड मधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत सलग ३ वर्ष डाऊनी अव्वल क्रमांक राखला आहे.
एकीकडे अविश्वसनीय गुणवत्ता आणि दुसरीकडे विक्षिप्त स्वभाव, रॉबर्ट ने स्वतःच्या बळावर त्याच्या आयुष्याला संपूर्ण कलाटणी देऊन आपलं साम्राज्य उभं केलं ती कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे.
वयाच्या १० वर्षापर्यंत काही सिनेमात काम केल्यावर रॉबर्ट ने क्लासिक बॅले आणि सादरीकरणाची कला आत्मसात केली.
तो फक्त १७ वर्षांचा होता जेव्हा त्याचे पालक एकमेकांपासून विभक्त झाले. परिणामी रॉबर्ट ला शिक्षण सोडून देऊन पूर्णवेळ अभिनयाकडे वळावं लागलं.
काही काळ वाटलं की त्याचा हा निर्णय अगदी बरोबर होता. त्यावेळी निःसंशय त्याचा उल्लेखनीय कामगिरी असलेला चित्रपट म्हणजे १९९२ ला आलेला ‘चॅप्लिंन’!
केवळ सिनेमातल्या भूमिकेसाठी डाऊनी ने व्होएलिन आणि डाव्या हाताने टेनिस खेळणं आत्मसात केलं! त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने त्याला त्या वर्षी चं ऑस्कर नामांकन सुद्धा मिळालं.
रॉबर्ट च्या दुर्दैवी काळाला सुरवात त्याच्या Less than Zero सिनेमातील त्याच्या भूमिकेपासून झाली असावी. या चित्रपटात रॉबर्ट ने एका श्रीमंत परंतु संपूर्ण व्यसनाधीन होऊन आपलं आयुष्य धोक्यात टाकलेल्या व्यक्तीची भूमिका केली होती.
एका मुलाखतीत डाऊने म्हणतो “ही भूमिका the Ghost of Christmas Future होती”. दुर्दैव असं की या भूमिकेची अतिशयोक्ती म्हणता येईल इतकं त्याचं वैयक्तिक आयुष्य बदललं.
व्ययसाय आणि व्यसन हे डाऊनी परिवाराची खानदानी सवय होती. डाऊनी सिनियर सुद्धा मादक पदार्थांच्या अनियंत्रित आहारी गेले होते. रॉबर्ट ज्युनिअर केवळ ६ वर्षांचा असताना त्यांनी आपल्या मुलाला मेरिजुआना घेण्याची परवानगी दिली होती.
१९९६ च्या पीपल आर्टिकल नुसार ड्रग ने बाप लेकांमध्ये ‘मायेचे बंध’ निर्माण केले होते! याचा परिणाम रॉबर्ट ज्यू. च्या नियमित दारू पिण्यात झाला.
“मी आणि माझे वडील एकत्र ड्रग्स घायचो. त्यांच्यासाठी बापाचं प्रेम दाखवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ड्रग्स होता.” रॉबर्ट ला या व्यसनापासून दूर जाणं अशक्य होऊन गेलं होतं.
१९९६ ते २००३ ह्या सात वर्षांत ड्रग्स सेवन संबंधित गुन्ह्यात बऱ्याचदा त्याला अटकही झाली.
१९९६ मधे प्रसिद्ध Sunset Boulevard च्या रस्त्यावरून कोकेन आणि हेरॉईन, शॉटगन सारख्या अमली पदार्थांच्या अमलाखाली येऊन भरधाव वाहन चालवतांना पकडण्यात आलं होतं.
महिनाभरातच मादक पदार्थांच्या अंमलाखाली असतांना शेजारच्या घरात बळजबरीने घुसखोरी केल्याबद्दल रॉबर्ट ला परत अटक करण्यात आलं.
ह्या सर्व घटना घडत असतांनाच प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम Ally McBeal मध्ये तो प्रमुख भूमिकेत चमकला आणि त्याच्या अभिनयाला गोल्डन ग्लोब पुरस्कार सुद्धा मिळाला!
एक बालकलाकार म्हणून ८० च्या मध्य आणि शेवटच्या दशकात बऱ्यापैकी नाव रॉबर्ट ज्युनियर ने कमावलं होतं.
परंतु वारंवार होणारी अटक आणि जेलवारी ह्याच दुष्परिणाम दिसू लागला. २००१ मधे जामिनी वर असताना रॉबर्ट डाऊनी ज्युनियर कॅलिफोर्नियातील कलव्हर शहरात विमनस्क अवस्थेत भटकतांना सापडला.
मादक पदार्थांच्या अंमलाखाली असल्याच्या संशयावरून त्याला परत अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात आली. याचा तात्काळ परिणाम म्हणजे मालिकेतून त्याची हकालपट्टी करण्यात आली.
यादरम्यान बरेच चित्रपट, स्टेज शो त्याने गमावले. विमा नाकारल्याने वूडी एलन इच्छा असून सुद्धा रॉबर्ट ला चित्रपटात घेऊ शकते नाहीत. मेल गिब्सन यांना त्यांचं रंगभूमीवरचं सादरीकरण याच कारणांमुळे रद्द करावं लागलं.
या कारणांच्या मुळाशी कुठेतरी रॉबर्ट ची व्यसनाधीनता हेच होतं. मादक आणि अमली पदार्थांच्या अति सेवनाने त्याची मैत्रीण सराह जेसीका पार्कर रॉबर्ट पासून दुरावली.
याच कारणामुळे त्याच्या पत्नी देबोरा फालकोनेर ने घटस्फोट घेतला. व्यसनाधीनतेने वैयक्तीक आणि व्ययसायिक आयुष्याची राख रांगोळी झाली होती.
अखेर रॉबर्ट ला जाग आली आणि त्यानं या व्यसनांच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचं ठरवलं.
सुसॅन लेव्हीन (त्याच्या Gothika फिल्म ची निर्माती) च्या मदतीने तो यातून यशस्वी पणे बाहेर येऊ शकला आणि अगोदरच्या सर्व अडचणींना तो पुरून उरला. सुसॅन च्या रुपात त्याला आयुष्याचा जोडीदार मिळाला.
Air America सिनेमात एकत्र काम केल्यापासूनचा रॉबर्ट चा जवळचा मित्र मेल गिब्सन याने The Singing Detective फिल्म साठी रॉबर्ट च्या विम्याचे पैसे स्वतःच्या खिशातून दिले!
आणि सुदैवाने चित्रपट चालला आणि रॉबर्ट डाऊनी चा चित्रपट सृष्टीच्या मुख्यधारेत पुनःप्रवेश सुकर झाला!
एका निर्मात्याने त्याचं ४०% मानधन चित्रपट पूर्ण होईपर्यंत रोखून धरलं होतं आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचं व्यसन आणि बेताल वागणं. त्या काळातल्या रॉबर्ट च्या बहुतेक फिल्म साठी मानधन रोखून धरणं हा एक प्रमुख नियमच झाला होता.
पण त्याच काळात रॉबर्ट ने चिरकाल स्मरणात राहतील अश्या भूमिका केल्या उदाहरण द्यायचं तर, २००५ ला आलेला विनोदी थरारपट Kiss Kiss Bang Bang. २००८ मात्र रॉबर्ट साठी सर्वार्थाने परिवर्तनाचं वर्ष ठरलं!
Iron Man आणि Tropic Thunder या दोन मोठ्या चित्रपटात त्याने मुख्य भूमिकेचं काम केलं. या फिल्म मधल्या त्याच्या कामामुळे जगाला त्याची ‘ड्रग्स च्या आहारी गेलेला कलाकार’ ही ओळख बाजूला ठेवून रॉबर्ट च्या अभिनय पराक्रमाची दखल घेणं भाग पडलं!
Iron Man चा दिग्दर्शक जॉन फेवरू रॉबर्टलाच प्रमुख भूमिकेत घेण्यासाठी आग्रही होता.जॉनी डेप ने ज्याप्रमाणे ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’ ला अजरामर केलं त्याप्रमाणेच Iron Man च्या भूमिकेला योग्य न्याय केवळ रॉबर्ट डाउनी च देऊ शकतो अशी त्याची समजूत होती.
आयर्न मॅन आणि रॉबर्ट डाऊनी हे समीकरण गाजलं आणि चित्रपटाने सबंध जगात सुमारे ५०० दशलक्ष डॉलर चा गल्ला कमावला!
Tropic Thunder मधे चमकतानाच रॉबर्ट ने ऑस्ट्रेलियन नट पद्धत पूर्णतः आत्मसात केली! या भूमिकेने त्याला अजून एक ऑस्कर नामांकन मिळवून दिलं.
“मला आतून असं वाटतं की दैव तुम्हाला त्याच गोष्टींकडे वळवतं ज्या तुम्ही केल्याचं पाहिजेत”- रॉबर्ट
नंतरच्या वर्षात रॉबर्ट, गाय रीची च्या शेरलॉक होम्स मधे झळकला आणि या फिल्म ने सुद्धा बॉक्स ऑफिस वर ५००मिलियन डॉलर ची कमाई केली!या भूमिकेसाठी डाऊनी ला त्याचा दुसरा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला!
नंतर रॉबर्ट ‘अवेंजर्स एन्ड गेम’ आणि ‘अवेंजर्स इनफिनिटी वॉर’ मध्ये सुद्धा झळकला.
अगदी कोवळ्या वयात लागलेली ड्रग्स ची सवय सोडणं ही अत्यंत कठीण गोष्ट होती. पण रॉबर्ट या व्यसनातून प्रयत्नपूर्वक यशस्वीपणे बाहेर पडला आणि आपल्या आयुष्याच्या खऱ्या ध्येयाकडे झेप घेतली!
ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचंय किंवा काहीतरी मिळवायचं त्यांच्यासाठी रॉबर्ट डाऊने ज्युनियर एक चालतं बोलतं उदाहरण आहे. कठोर परिश्रम आणि सातत्य राखून कुठलीही गोष्ट मिळवता येतेच याचं जिवंत उदाहरण म्हणजे रॉबर्टचा हा जीवनप्रवास.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.