Site icon InMarathi

भडकणा-या अॅसिडीटीला शांत करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्कीच उपयोगी ठरतील!

stomach ache inmarathistomach ache inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात अन्नाला पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे अन्न व्यवस्थित चावून सावकाश खाण्याची पद्धत आहे तसेच त्या अन्नाचे नीट पचन होणे सुद्धा गरजेचे आहे.

निसर्गाने आपल्या पचन संस्थेची रचना खूप विचारपूर्वक केली आहे ज्यामध्ये आपण खाल्लेल्या अन्नात अनेक पाचक द्रव्य मिसळून, त्यातील आवश्यक घटकांचे पचन होऊन नको असलेला भाग शरीराबाहेर टाकला जातो.

जर अन्न नीट चावलं गेलं नाही किंवा त्याचं नीट पचन झालं नाही तर विविध प्रकारचे आजार उद्भवू शकतात. अन्नाचे नीट पचन न होणे हेच बहुधा बऱ्याच आजारांचे मूळ असते.

या सर्वांमध्ये जास्त आढळणारा आजार म्हणजे पित्त वाढणे किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर अॅसिडिटी. आजच्या काळात तर बहुतांश लोकांना हा त्रास असल्याचे आढळून आले आहे.

 

 

अन्नाचे पचन होताना त्यात विविध प्रकारचे पाचक रस मिसळतात त्याचप्रमाणे काही आम्ले म्हणजेच acid सुद्धा मिसळतात जे अन्नाचे पचन सोपे करतात.

जेव्हा शरीरातील आम्ल पातळी एका ठराविक प्रमाणापेक्षा वाढते तेव्हा सोप्या भाषेत पित्त वाढले आहे असे म्हटलं जातं. हा पित्तरस पित्ताशयात तयार होतो आणि अन्नात मिसळला जातो.

आजकाल पित्तावर सर्रास औषधं मिळतात मात्र काही घरगुती उपाय व पथ्य यामुळे या आजारातून लवकर व बऱ्यापैकी आराम मिळू शकतो.

पुढील काही उपायांमुळे पित्तावर मात करता येऊ शकते..

१. ठराविक वेळाने खाणे

जर शरीरात पित्तरस स्त्रवला असेल आणि काही अंन पोटात गेले नाही तर पित्त वाढू शकते.

 

 

म्हणूनच ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी ठराविक वेळाने काही ना काही खाल्ले पाहिजे मात्र ते जास्त असता कामा नये. यामुळे अन्नाचे पचन सहज होण्यास मदत होते.

२. तेलकट व तिखट पदार्थ टाळणे

अति तेलकट व तिखट पदार्थ पचायला जड असतात, जर खाल्ल्यामुळे पचन संस्थेवर ताण येऊ शकतो.

 

 

म्हणूनच तेलकट व तिखट पदार्थ शक्य तितके टाळावेत आणि कमी प्रमाणात खावेत.

३. कमी प्रमाणात खाणे

माणसाने आपले पोट अति भरेल एवढे खाऊ नये उलट दोन घास कमी खावेत असे पूर्वजांनी म्हटलं आहे.

 

 

त्याप्रमाणे खूप कमी खावू नये मात्र प्रमाणात खावे जेणेकरून पचन सुलभ होण्यासाठी मदत होईल.

४. नियमित व्यायाम करणे

प्रत्येकाने किमान आठवड्यातील ५ दिवस रोज अर्धा ते एक तास व्यायाम करणं गरजेचं आहे,

 

 

ज्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक घामाद्वारे निघून जातात व खाल्लेले अन्न पूर्णतः पचते.

===

हे ही वाचा – मधुमेह, लठ्ठपणा अशा गंभीर आजारांना निमंत्रण देणारी ‘ही’ सवय वेळीच बदला!

===

५. चहा, कॉफी कमी प्या

चहा व कॉफी ही उत्तेजक पेय आहेत.

 

 

ज्यात टॅनिन नावाचा घटक असतो तो माणसाला जागं ठेवण्यासाठी मदत करतो. या चहा कॉफीच्या सेवनाने पित्ताची पातळी वाढते.

६. ताक प्या

आयुर्वेदात ताक हे अमृत आहे असं सांगितलं आहे

 

 

ताक पचन व्यवस्थित होण्यास मदत करते.त्यामध्ये थोडे हिंग किंवा सैंधव घालून प्याले तर त्याची परिणामकारकता वाढते असही सांगितले जाते.  त्यामुळे रोज जेवण झाल्यावर ताक पिणे फार गरजेचे आहे.

७. थंड दूध

 

 

पित्त वाढलेल्या माणसाला थंड दूध हे एक उत्तम औषध आहे.

दूध शरीरातील पित्त शमावते तसेच त्यामुळे होणारी जळजळ थांबवते. त्यामुळे बरेच डॉक्टर रोज दूध पिण्याचा सल्ला देतात.

८. शीतपेय किंवा दारू यांचे सेवन करु नका

शीतपेय किंवा दारू यात अनेक असे घटक असतात की जे पचनात अडथळा आणू शकतात.

 

 

म्हणूनच य घटकांचे प्रमाण आपल्या आयुष्यातून कमी करणे अत्यंत आवश्यक आहे.

===

हे ही वाचा – उन्हाळ्यात उसाचा रस पिताय ? आधी त्याचे गुण अवगुण जाणून घ्या…

===

९. वजन कमी करा

 

 

काही तज्ज्ञांच्या मते पोटावर असणारी चरबी हे सुद्धा पित्त वाढण्याचे एक कारण ठरू शकते. म्हणूनच आपले वजन नियंत्रणात असणे गरजेचे आहे.

१०. गुळाचे सेवन करा

गुळात मॅग्नेशियम हा घटक मोठ्या प्रमाणात असतो जो पित्त शमन करण्यात मदत करतो

 

 

म्हणूनच आपल्याकडे आलेल्या माणसांना गूळ पाणी देण्याची पद्धत आहे.रोज थोड्या गुळाचे सेवन करणे सुद्धा आरोग्यासाठी चांगले आहे.

११. साजूक तूप खा

तूप हा सुद्धा आरोग्यासाठी उत्तम असा घटक आहे.

 

 

घरी तयार केलेले किंवा कोणतेही चांगले साजूक तूप रोज सेवन केल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास नक्की च मदत होते.

१२ . पुरेसंं पाणी प्या

आपल्या शरीराला ज्या प्रमाणात पाण्याची गरज असेल त्या प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.

 

 

मात्र जेवण करण्या आधी अर्धा तास व जेवण झाल्यावर अर्धा तास पाणी पिऊ नये असे काही तज्ज्ञांचे मत आहे.त्यामुळे पचनात अडथळे निर्माण होऊ शकतात.

===

हे ही वाचा – कोरोनामुक्त झाल्यावरही येणाऱ्या ‘अशक्तपणावर’ मात करण्याचे ७ सोप्पे घरगुती उपाय!

===

१३. झोपण्याआधी २ तास खाऊ नका

झोपण्या आधी २-३ तास काहीही खाऊ नये. त्यामुळे पाचक रस जास्त प्रमाणात स्त्रवतो आणि त्याचा परिणाम झोपेवर होतो.

या छोट्या गोष्टी आहेत ज्यातून आपण पित्ताचा त्रास घरगुती उपायांनी कमी करू शकतो.

मात्र जर हा त्रास सतत होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम. कारण एक साधा आजार खूप मोठा होऊ शकतो.

 

 

मात्र कोणत्याही आजपासून लांब राहण्यासाठी चांगले व वेळेवर जेवण, व्यायाम आणि उत्तम झोप या त्रिसूत्री चा अवलंब करण्यास हरकत नाही.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version