' वाचा, सम्राट अशोकाच्या “सिक्रेट सोसायटी”बद्दल: ‘हे’ ९ जण जगाचं रक्षण करत आहेत! – InMarathi

वाचा, सम्राट अशोकाच्या “सिक्रेट सोसायटी”बद्दल: ‘हे’ ९ जण जगाचं रक्षण करत आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“सिक्रेट सोसायटी”

ह्या दोन शब्दांनी अनेक अभ्यासकांना वेड लावलंय. जगभरात अनेक गुप्त मंडळं स्थापन झाल्याची माहिती इतिहासात मिळते. प्रत्येक मंडळाचं ध्येय, उद्दिष्ट वेगवेगळं असतं.

कुणी आपले राजकीय, व्यावसायिक हेतू साध्य करण्यासाठी एकत्र येतात तर कुणी एखाद्या पारंपरिक शत्रूचा निःपात करण्यासाठी.

इल्युमिनाती हे अश्या सिक्रेट सोसायटी पैकी सर्वात प्रसिद्ध नाव. अश्या गुप्त संस्थांबाबत आपण ऐकतो त्यातल्या काही गोष्टी खऱ्या तर काही खोट्या वाटतात.

 

illuminati inmarathi

 

असंच एक गुप्त मंडळ स्थापन केलं होतं सम्राट अशोक ने. देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या भल्यासाठी. हा इतिहास ( – म्हटलं तर इतिहास, म्हटलं तर कपोलकल्पित कथा!) मोठा रंजक आहे!

 

Kalinga war

 

कलिंग च्या युद्धानंतर खचलेल्या शूर अशोक राजाने रक्तपात बंद केला. आक्रमणे बंद झाली. त्याला कळून चुकलं की मानव आपल्या बुद्धीचा वापर विध्वंसासाठी करू शकतो. बौद्ध धर्म आपलासा करून त्याने शांतता आणि अहिंसेचा प्रसार करण्यास सुरुवात केली.

काहींच्या मते – ह्या नंतरच सम्राट अशोक ने एक गुप्त “कॉऊन्सिल” स्थापन केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

असं म्हटलं जातं की भारतीय संस्कृती खूप प्रगत होती. भरपूर वैज्ञानिक गोष्टींचं व्यवस्थित ज्ञान अवगत होतं. हे ज्ञान मानवाच्या आकलनशक्तीच्या बाहेर होतं, ज्याचा वापर रक्तपात, विध्वंस आणि अधोगतीसाठी होऊ शकत होता.

ते ज्ञान कुणा वाईट व्यक्तींच्या हातात गेल्यास त्याचा वापर विध्वंसक कामासाठी होऊ शकणार होता…आणि हीच भीती अशोकाला स्वस्थ बसू देत नव्हती.

 

samrat ashok inmarathi

 

म्हणूनच ह्या नऊ लोकांच्या विशिष्ट मंडळाची सुरुवात झाली. त्यांना Nine Unknown Men असंही म्हणतात. अतिशय प्रगत अश्या वैज्ञानिक आणि सामाजिक ज्ञानाचा वापर चुकीच्या कामासाठी होऊ नये ही ह्या मागची भावना.

हे ज्ञान नऊ पुस्तकांमध्ये लिखित स्वरूपात होतं. आणि हे नऊ जण ह्या पुस्तकाचा सांभाळ करण्यासाठी नियुक्त केले होते.

 

book inmarathi

ह्या पुस्तकांत असं काय होतं?

  • प्रचार तंत्रज्ञान आणि मानसशास्त्राचा युद्धासाठी वापर
    ह्यात प्रचाराचे नियम आणि शास्त्र उलगडून सांगितलं आहे. युद्धासाठी शस्त्रांपेक्षा शत्रूच्या मानसिकतेवर हल्ला कसा करायचा ह्या बद्दल संपूर्ण माहिती आहे.
  • शरीरशास्त्र – मानवी शरीराबद्दल अनेक गूढ बाबी ह्यात आहेत. एखाद्या फक्त स्पर्शाने कसं जीवे मारता येऊ शकतं. नर्व्हस सिस्टिम च्या परिवर्तनाने – रिव्हर्सल ने होणाऱ्या मृत्यूबद्दल संपूर्ण माहिती. ज्युडो हा प्रकार ह्याच पुस्तकातून आलेला असल्याचे बोलले जाते.
  • सुक्ष्मजीवशास्त्र आणि त्यांचा आरोग्यवर्धनासाठी वापर – सूक्ष्मजीव त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती, त्यांचे फायदे आणि त्यांचा आरोग्यासाठी वापर ह्याबद्दल ह्या पुस्तकात स्पष्टीकरणं आहेत.
  • किरणोत्सर्गामुळे धातूंमधील बदल – मेटल ट्रान्सम्युटेशन म्हणजेच रेडिएशन मुळे धातूंमध्ये होणारे बदल. प्राचीन कथांनुसार जेव्हा दुष्काळ पडत असे तेव्हा मंदिरांना मोठ्या प्रमाणात शुद्ध सोन्याची मदत मिळे.
  • संपर्क आणि संवादशास्त्र  – ह्यात फक्त पृथ्वीवरच्याच कम्युनिकेशन बद्दल नव्हे तर पृथ्वीबाहेरच्या जगाशी कसा संपर्क करता येईल ह्याबद्दल माहिती आहे.
  • गुरुत्वाकर्षणाची गुपितं – अजूनही अशी बरीच रहस्ये आहेत जी आपल्याला माहित नाहीयेत त्याबद्दल ज्ञान आणि त्याचा वापर कसा करायचा हे ही सांगितलं आहे.
  • विश्व निर्माण होण्यामागची गाथा – अनाकलनीय असलेल्या विश्वाच्या उत्पत्तीबद्दल अनेक रहस्ये ह्या पुस्तकात उलगडली आहेत.
  • प्रकाश – प्रकाशातील ऊर्जा आणि त्याचा वापर ह्यावर लेखन.
  • समाजशास्त्र  -समाजाची जडण घडण आणि उत्क्रांतीचे नियम ह्याबद्दल सविस्तर लेखन.

 

nine

 

इंटरेस्टिंग गोष्ट ही – की अभ्यासकांच्या थियरी नुसार – हे नऊ लोक, पिढ्यान पिढ्या बदलत गेले, जुने जाऊन नवे आले…आणि हे गुप्त मंडळ आजही अस्तित्वात आहे….!

ह्या मंडळाची सगळी कामे गुप्तपणे होतात. हे नऊ जण आपलं काम करत जगाच्या हालचालीवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्याजवळ असलेली नऊ पुस्तके ते वेळोवेळी अपडेट करत असतात.

जगात काय चाललंय, ते मानवाच्या भल्यासाठी आहे का, त्याने काय त्रास होऊ शकतो…ह्यावर सतत विचारमंथन होतं. त्यावर काय उपाय योजना करता येईल ह्याचा धांडोळा घेण्यासाठी ते नेहमी सतर्क असतात.

ह्या नऊ जणांच्या अज्ञात मंडळाबद्दल एकोणिसाव्या शतकात फ्रेंच लेखक Jacolliot ह्याच्या लिखाणात पहिल्यांदा आलं. उर्जामुक्ती संकल्पना, किरणोत्सर्गाने निर्जंतुकीकरण, शत्रूवर मानसशास्त्राचा वापर करून कुरघोडी करणे ह्यावर हे लिखाण होतं.

प्लेग वर लस शोधण्यासाठी जेव्हा अलेक्झांडर येरसीन भारतात, मद्रास येथे होते तेव्हा त्यांच्याशी microbiology बद्दल काही गोष्टी शेअर केल्या गेल्या असल्याचे बोलले जाते. त्यातून च प्लेग व कॉलरा वरची लस तयार झाली.

 

alexander inmarathi

 

पण जाहीर रित्या ह्या नऊ जणांच्या मंडळाबद्दल लिखाण केलं ते Talbot Mundy ह्यांनी, १९२७ मध्ये. Talbot हे २५ वर्षे भारतात ब्रिटिश पोलीस फोर्स मध्ये होते.

तर हे नऊ जण कोण आहेत? ते आत्ता कुठे असतील? काय करत असतील? हे खरं आहे का? इत्यादी प्रश्न आपल्याला पडणं साहजिक आहे. पण ते आपलं काम करत राहतील, अविरत. आपला वारसा पुढे चालवत जातील.

…आणि वेळ येईल तेव्हा मदतीला धावून येतील सुद्धा…आपल्या नकळत…!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?