आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
जगात नेमकी कोणती गोष्ट आपल्याला थक्क करेल हे सांगता येत नाही.
भारतातच नव्हे तर संपुर्ण जगभरात आश्चर्य वाटाव्या अशा अनेक जागा, घटना, व्यक्ती आढळतात.
जगातली सात आश्चर्य हे त्याचं एक उदाहरण म्हणता येईल. आता भारतातील मंदिरंच बघा ना!
भारतीय लोकं अत्यंत श्रद्धाळू आहेत. इथले लोक परंपरा आणि श्रद्धा यांना मनापासून पुजतात.
भारतात विविध जाती-धर्मांची लोकं गुण्यागोविंदाने राहतात. त्यांची विविध श्रद्धास्थानं देखील भारतात आहेत.
भारतात अनेक देवी-देवतांची पुष्कळ मंदिरं आहेत.
दैवतांची देवळं उभारण्याचे संदर्भ जुन्या ग्रंथात देखील आहे आणि त्याकाळी कोण्त्याही सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक अवजारे नसताना देखील ही मंदिरे उभारण्यात आली.
इतिहासानुसार काही मंदिरांची बांधणी अगदी सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी देखील जाल्याचे स्पष्ट होते. रामायणा-महाभारत ह्या प्राचीन आणि आद्य साहित्यात देखील मंदिरांचा उल्लेख आढळतो.
एकाच देवतेची अनेक मंदिरे आहेत तशीच निरनिराळ्या देवतांचे देखील पुष्कळ मंदिरे आहेत.
माणसे भक्तीभावाने येथे पूजा-अर्चा करतात. या देवतांविषयी लोकांच्या मनात आदर असतो, श्रद्धा असते, विश्वास असतो की अडीअडचणीला हा परमेश्वरच आपल्याला शक्ती देईल, आपल्या पाठीशी उभा राहिल.
आपल्याकडची मंदिरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काहींची बांधणी अनोखी आहे तर काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींमूळे प्रसिद्ध आहेत.
काही घनदाट जंगलात आहेत तर काही ऊंच टेकड्यांवर किंवा डोंगरावर आहेत.
काही मंदिरे एकाच दगडातून बांधली आहेत तर काही टेकड्यांमध्येच कोरलेल्या मूर्त्या आहेत.
भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. इस्लाम, मोघल आणि इंग्रज ह्यांनी भारताचे अतोनात नुकसान केल्याच्या नोंदी आढळतात.
भारतीयांची श्रद्धास्थाने असणारी मंदिरे अत्यंत समृद्ध होती. सोन्याचा कळस, सोन्याच्या मूर्त्या, हिर्या-मोत्यांचे मुकुट तसेच दागदागिने, भरभरून ओसंडून वाहणार्या दानपेट्या (ज्यांचा उपयोग लोककल्याणाकरिता होई) अशी देवस्थाने होती.
ज्यांच्याकडे ह्या आक्रमकांचे लक्ष गेले आणि लोकांचा विश्वास, श्रद्धा नष्ट करून त्यांना धर्मांतर करायला लावायचे असे ह्या आक्रमकांचे धोरण होते असा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो.
आज आम्ही तुम्हाला उत्तर प्रदेशातील एका मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे बहुतेक देवतांच्या मूर्तींना मस्तक नाही.
वाटलं ना आश्चर्य? काहींना ही गोष्ट खोटी वाटेल तर काहीना भितीने अंगावर काटा येईल, काहीजण याला काळीजादु यांसारखी नावं देतील, तर काही विज्ञानाची मदत घेऊन याचा शोधही घेतील.
मात्र त्यापुर्वी या मंदिराची खरी वाचा.
हे मंदिर उत्तर प्रदेशच्या राजधानीपासून १७० कि.मी. अंतरावर असलेल्या प्रतापगडच्या गोंदे गावात आहे. हे मंदिर सुमारे ९०० वर्ष जुनं आहे.
आपल्याकडे खंडित, भग्न मूर्तींची पूज केली जात नाही, परंतु येथे या मूर्ती ९०० वर्षांपासून जपल्या गेल्या आहेत आणि त्यांची पूजा देखील केली जाते.
एएसआयच्या नोंदीनुसार, मुघल शासक औरंगजेबाने इ.स. १६९९ मध्ये सर्व हिंदू मंदिरे नष्ट करण्याचे आदेश दिले. त्यावेळी सगळीकडे हाहाकार उडाला.
मंदिरे वाचविण्यासाठी लोकं प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. त्यावेळी मंदिर वाचवण्यासाठी या अष्टभूजा मंदिराच्या पुजार्याने मंदिराचा मुख्य दरवाजा मशिदीच्या रूपाने बांधला होता. जेणेकरून औरंगजेबाच्या हल्ल्यापासून ते सुरक्षित राहिल.
मुघल सैन्य मंदिराच्या समोरून गेले. मशीद वाटून दुर्लक्ष करून सैन्य पुढे गेले परंतु एका सेनापतीची नजर मंदिरात असणार्या घंटेवर पडली.
तेव्हा त्याच्या लक्षात आले की हे मंदिर आहे. त्यानंतर सेनापतीने आपल्या सैनिकांना मंदिराच्या आत जाऊन तिथे स्थापित सर्व मूर्तीभंजन करण्यास सांगितले.
सैनिकांनी सर्व मूर्तींचे शिरच्छेद केले. आजही या मंदिराच्या मूर्ती त्याच अवस्थेत दिसतात.
मंदिराच्या भिंती, कोरीव काम आणि वेगवेगळे आकार पाहिल्यानंतर ११ व्या शतकातील इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ मानतात.
गॅझेटियरच्या म्हणण्यानुसार हे मंदिर सोमवंशी क्षत्रिय घराण्याच्या राजाने बनवले होते. मंदिराच्या द्वाराजवळील प्रतिमा मध्य प्रदेशातील प्रसिद्ध खजुराहो मंदिरासारखेच आहेत.
मंदिरात आठ हातांच्या (अष्टभुजा) देवीची मूर्ती आहे.
गावकरी सांगतात की, यापूर्वी या मंदिरात अष्टभुजा देवीची अष्टधातूची प्राचीन मूर्ती होती. १५ वर्षांपूर्वी चोरी झाली होती. यानंतर सामुहिक सहकार्याने ग्रामस्थांनी येथे अष्टभुजा देवीची दगडी मूर्ती बसविली.
या मंदिराच्या मुख्य द्वारावर एका विशिष्ट भाषेत काहीतरी लिहिलेले आहे.
बर्याच पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांना ती कोणती भाषा आहे हे समजण्यास अपयश आले आहे.
काही इतिहासकार त्यास ब्राह्मी लिपी म्हणतात आणि त्यातील काही इतिहासकार ती लिपी आणखी जुनी आहे असे मानतात, परंतु येथे काय लिहिले आहे, हे अद्याप कोणालाही समजले नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.