Site icon InMarathi

वडिलांचा विरोध पत्करून चोरून चित्रपट पाहणारा मुलगा ते बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट….!

Amir Khan im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोहम्मद आमिर हुसेन खान म्हणजेच आमिर खान! बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट!

चित्रपटात मिळालेल्या पात्राला जीव ओतून न्याय देणारा आणि ती व्यक्तिरेखा जिवंत करणारा सिनेजगतातला एक कुशल अभिनेता.

उदाहरण घ्यायचं म्हणजे थ्री इडियट्स मधला विशीतला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी रँचो घ्या किंवा दंगल मधला साठ वर्षाचा पहिलवान महावीरसिंग फोगट घ्या. प्रत्येक पात्र तो तितक्याच ताकदीने रंगावतो.

 

 

imgpic.or

 

१९८८ ला आलेला जुही चावला सोबतचा ‘कयामत से कयामत तक’ हा आमिरचा पहिला लीड रोल मधला चित्रपट.

त्याच्या आधी बालकलाकार म्हणून आपल्या काकांच्या ‘यादो की बारात’ या चित्रपटात काम केलेलं ,तर १९८४ ला आलेल्या ‘होली’ मध्ये तो दिसला गेलेला. चित्रपट सृष्टी आमिर खान साठी काय नवीन नाही.

पण ‘अब्बा नही मानेंगे!’ सगळ्यांच्याच आयुष्यात हिटलर कुरेशी असतोच असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या मुलाने अभिनय सोडून दुसरं एखाद क्षेत्र करियर साठी निवडावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा. म्हणून, चित्रपट पाहण्यावर पण बंदी आली. पण, फरहान सारखे गुणी बाळ सगळ्यांनाच मिळतात असे नाही.

वडिलांची परवानगी नसताना सुद्धा लपून छपून सिनेमे पाहणे आमिर खानने सुरू केलं. पकडला गेला पण वेळ मारून नेण्यास यशस्वी ठरला. अशाच वळणावरची मुलं पुढे इतिहास घडवून जातात, हे वेगळं सांगायला नको.

 

 

तर पाहूया, आमिर खान बद्दलच्या काही अनभिज्ञ आणि रंजक अशा काही गोष्टी!

• मादाम तुसा संग्रहालयात स्वतःचा पुतळा लावायला नकार देणारा अभिनेता.

आमिर खान बॉलिवूडचे कोणतेच पुरस्कार घेत नाही हे जगजाहीर आहे. पण, मादाम तुसा संग्रहालयात स्वतःचा मेणाचा पुतळा ठेवण्यास पण याने नकार दिला.

आज पर्यंत शाहरुख, अमिताभ, हृतिक, प्रभास सारख्या अनेक भारतीय कलाकाराचे मेणाचे पुतळे तिथे लागले आहेत. पण आमिर खान ने त्यासाठी चक्क नकार दिला.

• राज्यस्तरीय टेनिसपटू.

 

 

आमिर खान तसा बहुआयामी आहेच. सुप्त गुण असणे स्वाभाविकचं आहे.

आमिर खान शालेय जीवनात महाराष्ट्रात राज्यस्तरीय टेनिस चॅम्पियन पण होता.

• आंतरराष्ट्रीय फॅन फॉलोअर्स.

 

 

कोणाचे नसतात? पण, इथे विशेष म्हणजे जगप्रसिद्ध चायनीज अभिनेता जॅकी चॅन हा सुद्धा आमिर खानचा चाहता आहे.

• प्रमोशनल वर्कर.

चित्रपटाच्या प्रमोशन साठी प्रत्येक प्रोडक्शन हाऊसची स्वतःची पीआर टीम असते. पण ऐंशी-नव्वद च्या दशकात चित्रपटसृष्टी मध्ये तेवढा पैसा नव्हता जेवढा आज आहे.

 

 

लहान सहान काम करायला कर्मचारी लवकर उपलब्ध होत नसत. ‘कयामत से कयामत तक’ च्या प्रमोशन साठी आमिर खान स्वतः बाजारात उतरलेला.

• स्वातंत्र्य संग्रामाची फॅमिली बॅकग्राऊंड.

जवळपास सगळ्यांनाचं माहीत आहे की, देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांच्या कुटुंबात आमिर खानचा जन्म झालेला आहे.

मौलाना आझाद हे आमिर खानचे पणजोबा!

• आमिर खानने आतापर्यंत फक्त एकच म्युझिक अल्बम केलेला आहे.

२००३ सालच्या रुपकुमार राठोडच्या ‘जब भी चूम लेता हू’ या अल्बम मध्ये आमिर फर्स्ट अँड लास्ट टाईम दिसला होता.

• दिल चाहता है मधला आमिर खान ने रोल केलेला आकाश कोणाला नाही माहीत? पण फरहान अख्तर ने आमिरला आधी सिडचा रोल ऑफर केलेला.

 

 

पण नंतर आकाशचं पात्र जास्त आवडल्याने त्याने त्याची मागणी केली. जी फरहान अख्तर ने मान्य देखील केली.

• शाहरूख आणि आमिर खानचा तसा एकत्र असा कोणताच सिनेमा नाही.

पण आशुतोष गोवारीकरच्या ‘पेहला नशा’ मध्ये या दोघांनी गेस्ट अँपीयरन्स दिलेला आहे.

ओम शांती ओम च्या गाण्यात सहभागी होण्यास नकार.

जिथे अर्धी चित्रपट सृष्टी फराह खानच्या ओम शांती ओम च्या त्या गाण्यात उतरलेली दिसली तिथे त्यात सहभागी होण्यास आमिर खान ने नकार दिलेला.

• तीन-तीन राष्ट्रीय पुरस्कार.

लगान, थ्री इडियट्स आणि तारे जमीन पर या चित्रपटांमधल्या उत्तम अभिनयासाठी आमिर खान राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेला आहे.

या चित्रपटामधला त्याचा अभिनय हा दाद देण्यासारखाच आहे.

 

absfly

 

पद्मश्री-पद्मभूषण आमिर खान.

चित्रपट सृष्टीमधल्या आपल्या भरीव योगदानाबद्दल आमिर खानला २००३ साली पद्मश्री तर २०१० साली पद्मभूषण या भारत सरकारच्या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे.

लगान मध्ये काम करण्यासाठी आमिर खान सुरवातीपासून नकारात्मक भूमिकेत होता.

आशुतोष गोवारीकरने जवळपास दोन ते तीन वर्ष आमिर खानच्या घराच्या आणि ऑफिस चे खेट्या मारण्यात घालवली. पण आमिरचा विचार काही बदलेना,आणि गोवारीकर सुद्धा आपला प्रयत्न सोडेनात.

नंतर काहीसा मस्का मारुन झाल्यावर आमिर आपल्या फॅमिलीला ती स्टोरी ऐकवण्यास तयार झाला.

 

imp awards

 

आणि सकाळच्या ब्रेकफास्टच्या टेबल वर गोवारीकरने आपली कथा मांडली. लगान ची स्टोरी आमिरची पहिली पत्नी रीना दत्त हिला खूप आवडली.

लगानच्याचं चित्रीकरणा दरम्यान आमिर आणि किरण रावचं सूत जुळलं आणि रिना दत्त सोबत त्याचे संबंध संपुष्टात आले.

• सचिन तेंडुलकर सोबत जुनी मैत्री.

 

bollywood bubble

 

वर सांगितल्याप्रमाणे आमिर हा स्टेट लेव्हल टेनिसपटू राहिलेला आहे ते आपण पाहिलं. अशाच कुठल्याशा स्पर्धे दरम्यान सचिन आणि आमिरची ओळख झाली.

तेव्हा सचिन १४ तर आमिर २१ वर्षाचा होता.

तेव्हा सचिन आताचा ‘सचिन तेंडुलकर’ नव्हता आणि आमिर आताचा ‘आमिर खान’ नव्हता, हे विशेष.

• एप्रिल २०१३ मध्ये आमिर टाइम्सच्या टॉप १०० विवादित व्यक्तींच्या यादीत झळकला होता.

 

hindustantimes.com

 

स्वतःचा ब्लॉग लिहिणारा आमिर खान हा पहिला अभिनेता आहे.

• आमिर ला मद्यपान करायची सवय नाही, पण राजा हिंदुस्थानीच्या ‘तेरे ईश्क मे नाचेंगे’ या गाण्याच्या चित्रीकरण च्या एक तास आधी त्याने एक लिटर वोडका पचवलेली.

उगाच त्याला परफेक्शनिस्ट चा टॅग मिळालेला नाही!

तर या आहेत आमिर खान विषयीच्या काही रंजक गोष्टी ज्या त्याच्या परफेक्शनिस्ट असल्याचं पुरेपूर अधोरेखित करतात.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version