Site icon InMarathi

ओमिक्रोनचा धोका; इम्युनिटी वाढवण्यासाठी आहारात या १४ पदार्थांचा समावेश करा!

covid-immunity IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोरोनाचं संकट कमी झालं आणि आपण पुन्हा एकदा नव्या जोमाने आपापल्या कामाला लागलो, दोन वर्ष आपण घरून काढल्याने साहजिकच फिरायला जाण्याच्या निमित्ताने बाहेर पडलो, तोंडावर असलेला मास्क हळूहळू खाली येऊ लागला तोच बातम्या येऊ लागल्या की दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एक नवीन व्हायरस निर्माण झाला आहे.

ओमिक्रोन असे या व्हायरसचे नाव आहे, आधीच कोरोनामुळे अनेक देशांचे कंबरडे मोडले आहे, त्यात हा नवा भयानक विषाणू आल्याने सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरलेले आहे, आपल्या देशात सुद्धा काही शहरांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले काहीजण संशयास्पद आढळून आल्याने सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सरकारने खबरदारी म्हणून सध्या हवाई मार्ग बंद करण्याचे ठरवले आहे तर प्रत्येक राज्याच्या सरकारने देखील नियमावली बनवली आहे. सरकार जरी प्रयत्न करत असले तरी आपण प्रत्येकाने देखील खबरदारी घेऊन आपापली काळजी घ्यायला हवी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोरोनाकाळात जसे आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जसे उपाय बघितले तसेच उपाय आपण आता या नव्या विषाणूवर बघणार आहोत.

 

 

आता रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची म्हणजे नक्की काय करायचं? कारण आपण ज्यामुळे आजारी पडतो ते अतिशय सूक्ष्मजीव असतात. एखादा आपल्या शरीरात जातो आणि आपल्याला आजारी करतो.

आपली प्रतिकारशक्ती कमी होते, अशक्तपणा येतो. मग त्यासाठी काही सोपे उपाय आपल्याला दैनंदिन जीवनात करता येतील? मग आपलं डायट चेंज करावं का? का फक्त वनस्पतीयुक्त डायट खावं? असे अनेक प्रश्न मनात येतात.

 

 

माणसाची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे एक आपल्या संपूर्ण शरीरांतर्गत प्रणाली आहे, तो शरीराचा केवळ एक घटक नाहीये. म्हणूनच त्यात संतुलन असणं गरजेचं असतं.

रोगप्रतिकारक शक्ती जर प्रबळ असेल तर इतर कोणत्याही आजारांचा प्रादुर्भाव आपल्याला होत नाही. जरी कोणते सूक्ष्मजीव आपल्या शरीरात आले तरी आपल्या शरीराकडूनच त्यांच्यावर हल्ला होतो आणि त्या सूक्ष्मजीवांना संपवण्यात येते.

बाहेरील कोणतेही जीवजंतू आपल्या शरीरात वाढू नयेत अशी आपल्या शरीराची अंतर्गत रचना असते, परंतु जर आपली प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर मात्र अशा आजारांना आपल्या शरीरात थारा मिळतो.

 

हे ही वाचा – तुमच्या रोजच्या आहारात ज्वारीची भाकरी का हवी हे पटवून देणारे ८ फायदे!

म्हणूनच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करता येईल? हेल्दी लाइफस्टाइल ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आपल्याला करता येतील.

जसे की,

धूम्रपान करू नये.

डायट शक्यतो पालेभाज्या- फळं- कडधान्य यांनी युक्त असावं. मांसाहार करायचाच असेल तर ते पूर्ण शिजवून, उकडून खावं.

जर अल्कोहोल घेत असाल तर ते कमी प्रमाणात घ्यावं. त्यातही रेड वाईन उपयोगी.

रोज नियमितपणे व्यायाम करावा, किमान चाळीस मिनिटे रोज चालावं.

रोज सात ते आठ तास झोप घ्यावी.

 

 

छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेऊ नये

कुठलही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपले हात वारंवार साबणाने धुवावेत जर बाहेर ते शक्य नसेल तर सानीटायझर वापरावा.

हेल्दी लाईफ स्टाईल साठी आणखीन काय करता येईल हे आपण पाहू.

लिंबूवर्गीय फळ:

 

 

लोक बऱ्याचदा विटामिन सी हवं म्हणून लिंबूवर्गीय फळ खातात. पण ही फळे आपल्या आहारात दररोज असावीत.

सिझन प्रमाणे अशी फळं आपल्याला वर्षभर मिळत राहतात, म्हणजे उदाहरणार्थ संत्री, द्राक्ष, लिंबू .

लाल सिमला मिरची:

लाल सिमला मिरची ही खरं तर विटामिन सी वर्गीय फळांपेक्षा ही जास्त उपयुक्त आहे, कारण या मिरची मध्ये विटामिन सी बरोबरच बीटा कॅरोटीन असतं.

 

 

ज्याच्यामुळे केवळ प्रतिकार शक्ती वाढत नाही तर तुमच्या त्वचेचा टोन, स्किन टोन हा खूप छान राहतो.

ब्रोकोली:

 

 

ब्रोकोली मध्ये देखील विटामिन, मिनरल्स, एंटीऑक्सीडेंट, फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यात विटामिन ए, सी आणि ई असतात.

त्यामुळे ब्रोकोलीचा समावेश आहारात असावा.

लसूण:

 

हे ही वाचा – वृद्धत्व तसेच अल्झायमर पासून स्वतःला दूर ठेवायचं असेल तर हा पदार्थ आहारात समाविष्ट कराच!

लसूण, जगभरातल्या कुठल्याही कुझिन मध्ये वापरले जाते. लो बीपी साठी लसुण उपयुक्त आहे. शिवाय इन्फेक्शनचा सामना करण्यासाठी देखील लसुण कामाला येतं.

आलं:

 

 

आलं देखील जवळपास जगभरात सगळीकडे वापरला जाते. सर्दी, खोकला झाल्यावर तो आणखीन वाढू नये म्हणून बऱ्याचदा त्याचा वापर केला जातो.

आल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा आलेला नॉशिया कमी होतो. कोलेस्ट्रॉल कमी होतं, आणि दीर्घ काळातील दुखण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

पालक:

 

 

पालक हे देखील एक उत्तम अँटीआक्सिडेंट असून त्यात बीटा कॅरोटीन ही आहे ज्यामुळे कुठल्याही आजाराचा सामना करायला त्याचा खूप उपयोग होतो.

ब्रोकोली प्रमाणेच पालकही जर थोडसा उकडला तर त्यातील विटामिन ए जास्त ऍक्टिव्ह होतं, आणि त्याचा आपल्या शरीराला खूप उपयोग होतो.

दही:

 

 

घरात लावलेलं ताजं दही हे नेहमीच खूप उपयोगाचं असतं. पण विकत आणायचं असेल तर ग्रीक योगर्टचाही पर्याय वापरुन पहायला हरकत नाही. त्याचा आजाराशी सामना करायला खूप उपयोग होतो.

दही आणताना शक्यतो ते साधं असलेलेच जास्त चांगलं. फ्लेवर्ड योगर्ट वापरू नयेत कारण त्यात साखर मिसळलेली असते. जी हेल्थच्या दृष्टिकोनातून उपयोगाची नसते.

बदाम:

 

विटामिन ई मिळवायचा आणखीन एक स्त्रोत म्हणजे बदाम. रात्री बदाम भिजवून सकाळी त्याची साल काढून खाल्ल्यास ते आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहेत, विशेषतः हृदयासाठी.

हळद:

 

 

हळद, भारतीयांच्या स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा घटक असून अनेक एक भाज्या, करीज मध्ये वापरली जाते. हळद फक्त रंग येण्याकरिता वापरत नसून ती एक anti-inflammatory एजंट म्हणून वापरली जाते.

आपल्याला माहितीच आहे स्वयंपाक घरात थोडसं कापलं वगैरे तर लगेच आपण त्यावर हळद लावतो किंवा खोकला झाला तर हळदीचे दूध पितो.

आपल्या आजीबाईच्या बटव्यातील हळद हा महत्त्वाचा घटक असतो. हळदीचे हेच गुणधर्म लक्षात घेऊन आता परदेशांमध्ये ‘लात्ते टर्मरिक टी’ मिळतो.

ग्रीन टी:

 

 

ग्रीन टी, हे देखील एक उत्तम एंटीऑक्सीडेंट आहे. जपानमध्ये कुठल्याही हॉटेलात ग्रीन टी फ्री मिळतो. तो त्यांच्या डाएटचा भाग आहे. म्हणूनच कदाचित जपानी लोक आयुष्यभर हेल्दी राहतात, जास्त वजनही वाढत नाही आणि जास्त वर्ष जगतात.

पपई:

 

विटामिन सी चां स्त्रोत असलेलं आणखीन एक फळ म्हणजे पपई. पपई मुळे अन्नपचन प्रक्रिया सुधारते. विटामिन सी शिवाय , त्यात विटामिन बी आणि पोट्याशियम हे असते.

किवी:

 

 

किवी हे फळ देखील विटामिन सी ने उपयुक्त असून त्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी वाढतात, आणि इन्फेक्शनशी लढतात.

चिकन:

 

 

चिकन सूप तुम्हाला सर्दी, खोकल्याच्या वेळेस खूप उपयोगी पडतात. कारण पुढे होणारे आजार त्यामुळे कमी होण्याची शक्यता असते. चिकन आणि टर्की मध्ये विटामिन बी 6 हे मोठ्या प्रमाणात असते.

ज्यामुळे तुमच्या शरीरातील हेल्दी लाल पेशी( रेड ब्लड सेल) तयार होतात. बोन मॅरो मधून भरपूर प्रमाणात न्यूट्रियंट्स मिळतात.

सूर्यफुलाच्या बिया, अवाकाडो :

 

 

सूर्यफुलाच्या बिया यादेखील विटामिन बी 6 आणि विटामिन ई मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत याशिवाय ‘अवाकाडो ‘ हे फळ सुद्धा यासाठी उपयुक्त आहे.

शरीराला उपयुक्त झिंक मिळवण्यासाठी मासे वर्गातील खेकडे, कालवं, लॉबस्टर उपयुक्त आहेत.

या सगळ्या गोष्टी रेग्युलर आपल्या आहारात ठेवल्या आणि भरपूर व्यायाम केला, झोपेचे वेळापत्रक नीट पाळलं तर शक्यतो कुठलाही आजार होणार नाही किंवा झाला तरी त्याची तीव्रता कमी असेल.

आणि आपल्याला फार अशक्तपणा जाणवणार नाही. बऱ्याचदा ताण येऊन देखील आपण आजारी पडतो. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदय विकार याशिवाय डिप्रेशन सारख्या गोष्टी सारखे आजार माणसाच्या मागे लागतात.

हे टाळण्यासाठीच हेल्दी लाइफस्टाइल ठेवून शक्यतो अँटिबायोटिक्स न घेता देखील आजार कमी करता येतात. मात्र त्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती ही उत्तम असावी लागते.

===

हे ही वाचा – आहारात हे सोपे बदल करा आणि मिळवा तल्लख, तरतरीत बुद्धीमत्ता, वाचा!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version