' प्रक्षोभक जाहिरात ते विचित्र लग्न: मिलिंद सोमण आणि वादांचा इतिहास… – InMarathi

प्रक्षोभक जाहिरात ते विचित्र लग्न: मिलिंद सोमण आणि वादांचा इतिहास…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

५५ व्या वर्षीही चिरतरुण असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे मिलिंद सोमण. म्हणजे वयाचा त्याच्या एकूणच शरीरावर आणि शरीर बांधणीवर काही एक परिणाम झाल्याचं दिसत नाही. सफेद झालेले दाढी-मिशा आणि केस एवढाच काय तो वाढत्या वयाचा परिणाम.

मिलिंद सोमण म्हणजे अभियंता-मॉडेल-अभिनेता आणि सर्वात शेवटी फिटनेस आयकॉन! देशातला पहिला सुपरमॉडेल. मेड इन इंडिया अल्बममुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला कलाकार. कॅप्टन व्योममुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता.

५५ व्या वर्षीही मी किती फिट आहे हे दाखवून देण्यासाठी गोव्याच्या एका समुद्रकिना-यावर नग्न अवस्थेत धावतानाचा मिलिंद सोमण यांचा फोटो काही महिन्यांपुर्वी वा-याच्या वेगात व्हायरल झाला.

मिलिंद सोमण यांनी आपला नग्न अवस्थेतील फोटो पोस्ट करताच अवघ्या काही मिनिटांतच असंख्य भारतीयांचे फोन खणाणले.

काहींच्या भुवया उंचावल्या तर काहींनी नाक मुरडलं. अर्थात मिलिंद सोमणचे हे पब्लिसिटी स्टन्ट्स आणि लोकांच्या प्रतिक्रिया हे समीकरण काही नवं नाही.

अहमदाबाद ते मुंबई आई सोबत रनिंग असो किंवा आयर्न मॅन ही स्पर्धा १५ तासात पूर्ण करणारा फिटनेस फ्रिक. करियरच्या प्रत्येक फिल्ड मध्ये खणखणीत नाणं मिलिंद सोमणने कायमच वाजवलं आहे.

==

हे ही वाचा : मिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे?!

==

करियरच्या अगदी सुरवातीपासून ते आतापर्यंत बातम्यांच्या लाईम लाईट मध्ये सतत असलेलं एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे मिलिंद सोमण. बातम्यांमध्ये राहणं  पसंद आहे की नाही माहीत नाही, पण आपोआप कॅमेरे त्यांच्या कडे फिरले जातात.

वाद त्याची पाठ सोडत नाही म्हणायला हरकत नाही.

त्याच्या ‘मेड इन इंडिया’ या पुस्तकात त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) त्याचे असलेले संबंध यावर प्रकाश टाकला आहे. रूपा पै यांच्यासोबत त्यानं या पुस्तकाचं लिखाण केलं आहे.

आज काल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटलं तर वादाला निमंत्रण असतंच असतंच.

“उजव्या विचारसरणीच्या या संघटनेला आणि त्या संघटनेशी जोडलेल्या व्यक्तीला कमीपणा दाखवायचा म्हणजे दाखवायचा” असा काहीसा पिंड भारतात काहींनी घेतलेला दिसतो.

आता या सगळ्या नावांमध्ये मिलिंद सोमणचं नाव देखील अॅड झालं आहे.

 

rss inmarathi

 

मिलिंद सोमणचा संघाशी संबंध आला तो शिवाजी पार्कच्या शाखेत. खेळ, योग आणि बऱ्याच गोष्टीचा उल्लेख त्याने पुस्तकात केला आहे.

तर त्याचं म्हणणं असं की, आता संघाबद्दल जे वातावरण आहे किंवा बातम्यांमध्ये जे संघाबद्दल लिहिलं जातं, त्याचा अनुभव त्याला संघात असताना कधीच आलेला नाही.

साधं सरळ स्टेटमेंट! आणि त्याच्यावर संघी असल्याचा स्टॅम्प लावून वादाला तोंड फुटलं. आता वाद म्हणजे मिलिंद सोमणला नवीन नाही.

सगळ्यात जास्त मीडिया मध्ये चघळल गेलेलं त्याच प्रकरण म्हणजे त्याच दुसरं ‘लग्न’. आपल्या वयापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीशी त्याने वैवाहिक संबंध प्रस्थापित केले. आता प्रेम, लग्न हा ज्याच्या त्याच्या  वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न.

भारतात सेलिब्रिटींना वैयक्तिक आयुष्य नसतं. जनमानसात त्याचा जोपर्यंत चोथा होत नाही तोपर्यंत तो विषय चघळला जातो. मिलिंद सोमण सोबतही असंच झालं.

 

milind-soman-inmarathi

 

अर्ध्या वयाच्या मुलीसोबत त्याच्या प्रेम प्रकरणाचा सुगावा लागल्या पासून ते त्याच्या लग्नापर्यंत मीडिया अक्षरशः हात धुवून त्याच्या मागे लागली. लग्न झालं आणि कुठे ते प्रकरण शांत झालं.

तरी त्याच्या पत्नीच्या सोशल मीडिया वर टाकल्या जाणाऱ्या फोटोजवरून बातम्या होत असतातच.

 

milind soman hug inmarathi

 

संघ, त्याचं लग्न हे झाले त्याचे ताजे वाद! पाहूया काही भूतकाळातले वाद ज्याच्यामुळे मिलिंद सोमण बऱ्यापैकी प्रसिद्धीच्या झोतात राहिला.

जवळपास सगळ्यांना ज्ञात असलेली त्याची प्रसिद्ध काँट्रव्हर्सि म्हणजे त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि तत्कालीन मिस इंडिया मधू सप्रे हिच्या सोबतच फोटोशूट!

भारत तसा सांस्कृतिक देश! इकडे इतरांचं खाणं, पिणं सगळं मॅटर करतं आणि याला छेद दिला ते मिलिंद सोमण आणि मधू सप्रेच्या फोटोशूटने.

 

milind soman inmarathi 1

==

हे ही वाचा : अनवाणी मिलिंद सोमण + ५१७ किमी = Ultraman!

==

 

१९९५ मध्ये टॅर्फ शूजच्या कलरप्रिंट साठी यांनी चक्क ‘नग्न’ फोटो शूट केलं होतं. नग्न फोटो शूट केलंच पण त्याच शूट दरम्यान त्यांनी अंगावर अजगर (पायथन) देखील घेतला.

या एकाच फोटो शूटने दोन वेगवेगळ्या केस मध्ये या दोघांना गुंतवायचं काम केलं.

नग्न फोटो शूट मुळे मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा विभागाने केस केली तर वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत अजगराच्या वापरामुळे दुसरी केस झाली.

मॉडेल, फोटोग्राफर, डिस्ट्रिब्युटर,ऑर्गनायझर कंपनी या सगळ्यांना यात गोवलं गेलं.

दुसरं प्रकरण म्हणजे त्याचा पहिला विवाह. फ्रेंच अभिनेत्री मेलीन जॅम्पनोई सोबत तो विवाह बंधनात अडकला.

 

milind soman inmarathi 4

 

तर मेलीन ही त्याची को-स्टार होती ‘वॅली ऑफ फ्लॉवर’ या चित्रपटात. सुरवातीला त्यांचं काही खास पटलं नव्हतं. म्हणून चित्रपटाची स्टार मंडळी झोतात आली.

पुढे एका प्रमोशनच्या दरम्यान मिलिंदने तिला प्रपोज केला आणि मेलीन ने त्याला होकार दिला. न पटण्यापासून ते थेट लग्नाला मागणी यामुळे हे प्रेम प्रकरण जबरदस्त लाईम लाईट मध्ये आलं.

२००६ साली दोघे विवाह बंधनात अडकले. एवढं झालं नाही तेच २००९ ला या दोघांचा घटस्फोट झाला. गाजावाजा करून लग्न केलेलं हे कपल तीन वर्षात वेगळं झालं.

आणि पुन्हा मिलिंद सोमण विषयी चर्चा सुरू झाल्या.

 

milind soman inmarathi 6

 

यानंतर पुन्हा त्याचं आणि शहाणा गोस्वामी यांचं प्रेम प्रकरण चर्चेला आलं. सहा वर्षे चाललेल्या या नात्याला मिलिंद कडून ब्रेक दिला गेला अस छापलं गेलं. पुन्हा उलट सुलट चर्चेला माध्यमांना विषय मिळाला.

दिपानीता शर्मा आणि गुल पनाग या अभिनेत्री सोबतचे त्याचे संबंध पण काही लपून राहिले नाही. त्याचे रिलेशन-लग्न याव्यतिरिक्त त्याच्या काही वाखाणण्याजोगे कामामुळे पण तो चर्चेत राहिला.

२०१२ साली १५०० किलो मीटर अंतर ३० दिवसात धावून पूर्ण करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे आला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्याची नोंद झाली.

मानाची अशी आयर्न मॅन ही स्पर्धा १५ तासात त्याने पूर्ण केली आणि पुन्हा त्याच्या चर्चेला उधाण आले. स्विमिंग, रनिंग आणि सायकलिंग अशा विविध खेळ प्रकाराने परिपूर्ण अशा स्पर्धेत त्याने पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली.

 

milind soman inmarathi

 

 

पण आपल्या प्रेम प्रकरणांमुळे मिलिंद सोमण आता पर्यंत चर्चेत राहिला आहे. त्यात त्याचे झालेले दोन विवाह!

आणि आता नवीन रा.स्व. संघ आणि त्याचे संबंध यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संघ विरोधकांची बाजू बघायला गेलो तर तो आता आधी सारखा ‘हॉट’ राहिलेला नाही!

बाकी,

वर म्हटल्याप्रमाणे भारतात सेलिब्रिटींना वैयक्तिक असं आयुष्य नसतं, हे मिलिंद सोमणच्या एकूण काँट्रव्हर्सि आणि वादावरून अधोरेखित होतं.

==

हे ही वाचा : अनुप जलोटा, मिलिंद सोमण ला “हे सर्व ” कसं काय मिळतं? आणि जळणारे आपण…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?