माझ्याच बाबतीत असं का घडतं? या प्रश्नावर मात करणारा अप्रतिम उपाय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बर्याचदा आपले एखादं काम जर झालं नाही तर आपण बोलून जातो, “आज सक्काळी सक्काळी कोणाचं तोंड पाहिलं कोणास ठाऊक… आजचा दिवसंच धड नाही”. जणू काही आपला चेहरा पाहून लोकांची पटापट काम होत असावीत!
सतीशच्या बाबतीत आज असंच झालं. आज सतीशला ऑफिसात लवकर जायचे होते. आज त्याला महत्त्वाचं प्रेझेन्टेशन कंपनीत करायचे होते, आणि त्यावरच पुढचं डील मिळेल की नाही हे ठरणार होतं. त्यासाठी त्याची बरेच दिवस तयारीही सुरू होती.
अर्ध्या-पाऊण तासाचं प्रेझेंटेशन रेडी होतं म्हणून सकाळी उठून त्याने आवराआवर करायला सुरुवात केली होती, तितक्यात त्याला फोन आला की गावी एक मृत्यू झाला आहे त्यामुळे त्याने तिकडे जाणे जरुरीचे आहे.
तो म्हणाला की मी ऑफिसमधलं काम उरकून येईन. मग त्याने घाईत गाडी काढली पण आज गाडी सुरू होत नव्हती. म्हणून त्याने ओला, उबेरची टॅक्सी येते का हे मोबाईलवर चेक केलं, तर त्या टॅक्सीला यायला जवळपास पंधरा मिनिटे अवकाश होता.
वेळ जायला नको म्हणून मग त्याने रस्त्यावरच्या एका रिक्षाला हात करून त्यात चढून बसला, आणि रिक्षावाल्याला सांगू लागला की लवकर जाण्यासाठी शॉर्टकटचा रस्ता बघ आणि चल.
रिक्षावाल्याने रिक्षा एका बोळात घातली तर तिकडे ट्रॅफिक जाम झालेला, एक तर छोटासा रस्ता आणि वाहनांची गर्दी यामुळे रिक्षा बाहेर काढणे हे मुश्किल झालं. रिक्षात बसून राहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय सतीशकडे नव्हता. त्याने ऑफिसला फोन करून उशीर होत असल्याबद्दल कळवले.
कसाबसा रस्ता क्लिअर झाला आणि तो ऑफिसपर्यंत पोहोचला तरी त्याला पाऊण तास लेट झाला होता.
ज्यांच्यासमोर प्रेझेन्टेशन करायचं होतं त्या माणसाला जास्त वेळ नव्हता त्याने,’ फक्त दहा मिनिटात काय असेल ते सांग’, असं सांगितलं सतीशने ते सांगायचा आटोकाट प्रयत्न केला पण तरीही ते डील मात्र त्यांना काही मिळाले नाही.
आणि एक चांगली संधी हुकली याचं वाईट वाटलं. पण यामुळे सतीशची भयंकर चिडचिड झाली, आणि सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता हा प्रश्न पडला. शिवाय तो राग ऑफिसमध्ये, घरामध्ये सगळ्यांवर निघाला.
हे असे प्रसंग माणसाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी येत असतात. आपल्याला खूप महत्वाचं काहीतरी करायचं असतं आणि नेमकं त्याच वेळेला काहीतरी घडतं आणि जे काही आपल्याला हवं ते घडणार असतं ते बिघडून जात.
सकाळच्या वेळेत गॅस संपतो. ऑफिसला निघताना मुलंच रडारड चालू करतात मग त्यांना शांत करण्यात वेळ जातो. रस्त्यावरती ट्राफिक जाम झालेला असतो.
महत्वाच्या कामासाठी बँकेत जावं तर बँक बंद असते किंवा त्या बँक कर्मचाऱ्यांची जेवणाची वेळ झालेली असते. बरं हे सगळं जरी असलं तरी बँकेतला सर्व्हर डाऊन असतो आणि आपलं कोणतंही काम नीट होत नाही.
अशा वेळेस आपण आपल्यावर चिडतो आणि परिस्थिती अजूनच गंभीर करतो. पण खरंच याची गरज असते का? अशा परिस्थितीत काय करता येईल.
थोडा शांतपणे विचार केला तर कधीकधी खरोखरच, it’s not your day असं स्वतःलाच म्हणायला लागतं. आणि ते स्वीकाराव लागतं.
आणि याला कोणाचा चेहरा पाहिला होता अशी अंधश्रद्धा समजण्याची गरज नसते. एक तर त्या दिवसाचं सगळं चुकलेलं असतं. आणि परिस्थिती अशी काही असते की, आपण काहीच करू शकत नाही.
उगीच पॅनिक होण्यात अर्थ नसतो. तसंही सध्या फारशी बरी परिस्थिती नाही. जगभर करोना पसरलेला आहे त्याचं सावट आता सगळ्या क्षेत्रांवर पडताना दिसते आहे, व्यापार-उद्योग थंडावला आहे.
मोठमोठी इवेंट्स कॅन्सल होताहेत, शेअर मार्केट धडाधड कोसळत आहे, हवामान बदलते आहे. मग अशा वेळेस काय करायचं!!
काहीही झालं तरी इतकं ठरवायचं की बाहेरचा, आपल्या कामावरचा राग घरी न्यायचा नाही. घरी आनंदात जायचं, आणि घरातले फ्रस्ट्रेशन बाहेर काढायच नाही.
आपला मूड रिफ्रेश करण्यासाठी गाणी ऐकायची. यातूनही आपल्याला काहीतरी शिकायला मिळते हा अटीट्युड ठेवायचा. शक्य तितकं शांत राहायचं.
आयुष्यातले सगळेच दिवस सारखे नसतात कधीतरी खूप चांगला दिवस पण आपल्या आयुष्यात येतो यावर विश्वास ठेवायचा.
या एका दिवसामुळे लोक तुमच्याबद्दल काय बोलतील हा विचार न करता दुसऱ्या दिवशीचं काम आनंदाने करायचं. आणि स्वतःला कुठेही हरवून न देता पुढे जात राहायचे. काय चूक, काय बरोबर याचा विचार न करता यावेळेला काय योग्य आहे हे पाहणं जास्त महत्त्वाचं.
माझ्याच बाबतीत असं का घडतं? हा विचार करायचा नाही कारण प्रत्येकाच्याच बाबतीत कधी ना कधीतरी असं घडतंच. क्वचितच एखादा असेल की ज्याच्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असतील.
खूपच मूड गेला असेल तर बागेत जाणे किंवा टेकडीवर जाणे किंवा निसर्गाच्या सानिध्यात थोडावेळ व्यतीत करावा किंवा एखाद्या शांत मंदिरात जाऊन बसावं याने पण थोडी चिडचिड कमी होते.
या एका दिवसामुळे किती वाईट घडलं आणि किती नुकसान झालं याचा ताळेबंद मांडावा कारण पुढेही सुधारायची तुम्हाला संधी मिळू शकते.
आणि पुढे जेव्हा केव्हा अशीच परिस्थिती येईल तेव्हा ती कशी हाताळावी हे तुम्हाला माहीत झालेलं असेल त्यामुळे या गोष्टीकडे पॉझिटिव्हली पहा.
एखाद्या प्रसंगामुळे चिंता,काळजी, राग करून हाती काहीच लागत नाही आणि ना ही कोणती कारणे देऊन. आता त्या परिस्थितीला तुम्ही सामोरे कसे जाता हे महत्त्वाचं असतं, कदाचित आयुष्य आपली अशी परीक्षा घेत आहे असं समजायचं.
त्याच्याआधी आयुष्यात काही कठीण प्रसंग आले असतील तर ते आठवायचे. त्यापेक्षाही सध्याची सिच्युएशन फारच सोपी आहे असं म्हणायचं. स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करायाचा.
कारण आपल्या हातात तितकच असतं. आणि मै जिंदगी का साथ निभाता चला गया म्हणत पुढचा प्रवास सुरू करायचा….
—
- अपयशावर मात करून यशाचा प्रवास सुरु करा, अंगिकारा “या १०” सवयी!
- करिअरमधील अपयश टाळण्यासाठी, “ह्या १०” प्रश्नांवर विचार करायलाच हवा!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.