' फास्ट फूड: फक्त अन्नच धोकादायक नाही! कॅन्सरचा एक वेगळाच धोका! – InMarathi

फास्ट फूड: फक्त अन्नच धोकादायक नाही! कॅन्सरचा एक वेगळाच धोका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बाहेर असल्यावर पोटात कावळे ओरडायला लागले की आपण सरळ मोर्चा वळवतो फास्ट फूडकडे! मान्य आहे हे फास्ट फूड जिभेला अगदी रुचकर लागतं, सोबत कमी खर्चात पोट देखील भरून देतं, पण आजवर फास्ट फूडबद्दल जेवढी संशोधने झाली आणि त्यातून जो काही निष्कर्ष निघाला तो हेच सांगतो की फास्ट फूड खाणं म्हणजे आरोग्याची हानी करणं होय. बरं या फास्ट फूडमध्ये केवळ बर्गर, पिझ्झाच आले असे नाही तर सामोसा, टिक्की, कचोरी यांसारख्या रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांचा शरीरावर केला जाणारा अतिरेक देखील आपण टाळायला हवा.

रस्त्यावरून हिंडताना कधी या पदार्थांची दुकाने नजरेस पडली की आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि आपण निवांत दूरवर कोठेतरी बसून किंवा घरी पार्सल घेऊन जाऊन हे पदार्थ खाऊ या विचाराने ते विकत घेतो. मग दुकानदार देखील जुने पेपर, प्लास्टिक बॅग्ज, मळलेले कागद आणि कश्याकश्यात गुंडाळून ते पदार्थ आपल्या हवाली करतो. पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की काहीवेळा पदार्थांपेक्षा ते पदार्थ ज्या गोष्टींमध्ये आपल्याला गुंडाळून मिळतात अर्थात त्यांची पॅकेजिंग शरीराला जास्त हानिकारक ठरू शकते.

fast-food-chemicals-in-packaging-marathipizza00

स्रोत

जर तुमचा या गोष्टीवर विश्वास नसेल तर तुमचा विश्वास बसेल असे सत्य आज तुमच्यासमोर उलगडणार आहे. एका नव्या निरीक्षणानुसार पिझ्झा, बर्गर फ्रेंच फ्राईज सारखे पदार्थ ज्या greaseproof papaer मध्ये येतात. त्या पेपर्समधील पदार्थ खाल्ल्यामुळे लहान मुलांच्या विकासामध्ये बाधा उत्पन्न होते, मनुष्याची प्रजननक्षमता कमी होते आणि मुख्य म्हणजे कॅन्सरचा धोका बळावतो.

या निरीक्षणातून असे समोर आले आहे की फूड पॅकेजिंग मध्ये दोन डझन अतिविषारी highly fluorinated chemicals असतात. यामध्ये PFAS (per- and polyfluoroalkyl substances) नामक fluorinated घटकाचा देखील समावेश असतो. हा घटक जुन्या, पुनर्वापर केलेल्या पदार्थांपासून किंवा इतर विघटन न झालेल्या पदार्थांमधून येतो.

या निरीक्षणाचा उलगडा करताना शास्त्रज्ञांनी सांगितले की,

fluorinated घटक हे निसर्गत: अतिशय विषारी असतात. ते पॅकेजिंगच्या माध्यमातून पदार्थांमध्ये अतिशय सहजपणे मिसळू शकतात आणि पदार्थ दुषित करतात. या दुषित रसायनांमुळे अनेक भयंकर आजार उद्भवू शकतात. या रसायनांचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर होतो कारण त्यांचे शरीर हे वाढीस लागलेले असते आणि अश्या विकसित शरीरासाठी fluorinated घटक अतिशय घातक ठरतात.

पॅकेजिंगयुक्त फास्ट फूड पदार्थांचे दीर्घकाळ सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता डळमळीत होते तसेच शरीराची इतर कार्ये देखील निष्क्रिय होतात. त्यांचे परिणाम लगेच दिसून येत नाहीत परंतु जस जसे वय वाढते तसं तसे आजारांच्या रुपात त्याचे परिणाम जाणवू लागतात.

fast-food-chemicals-in-packaging-marathipizza01

स्रोत

या निरीक्षणाअंतर्गत शास्त्रज्ञांच्या गटाने काही पॅकेजिंग सॅम्पल्सचा अभ्यास केला, ज्यातून हे निष्पन्न झाले की अर्ध्याहून अधिक पेपर ज्यांमध्ये पदार्थ गुंडाळून दिले जातात (बर्गर किंवा पेस्ट्री बग्ज) आणि २० टक्के पेपरबोर्ड सॅम्पल्स (फ्राईज आणि पिझ्झासाठी वापरले जाणारे बॉक्सेस) यांमध्ये fluorinated घटक आढळून आले. आईस्क्रीम किंवा ब्रेडसाठी देखील जी पॅकेजिंग वापरण्यात येते, त्यात सुद्धा fluorinated घटक मोठ्या प्रमाणावर आढळून आले. हाच निष्कर्ष रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांना देखील लागू आहे.

मुख्य म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे fluorinated घटकांच्या सेवनाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे- कॅन्सर!

म्हणून यापुढे फास्टफूडचा अतिरेक टाळा आणि निरोगी राहा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?