आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“आत्याबाईला मिशा असत्या तर….काका म्हटलं असतं”, अशी एक मराठी मध्ये म्हण आहे. अर्थात केवळ विनोदनिर्मिती साठी ही म्हण वापरली जाते.
निसर्गाने पुरुषात आणि बाई मध्ये जो फरक केलाय त्यातला हा एक म्हणता येईल की पुरुषाला दाढी-मिशा असतात, आणि बाईला नसतात.
परंतु काही रेअर केसेस अशा असतात की, एखाद्या बाईला देखील ‘ दाढी ‘ आणि ‘ मिशा ‘ असते. आणि अर्थातच हे कोणाच्या लक्षात आलं तर त्या बाईची खिल्ली उडवली जाते.
अगदी तोंडावर कोणी काही बोलणार नाही, मात्र पाठीमागे याच्याविषयी गॉसिप केलं जातं. त्यावरून विनोद केले जातात. पण हे कशाचं लक्षण आहे याचा कोणी जास्त विचार करत नाही.
त्या स्त्रीला काहीतरी आजार आहे, किंवा वेगाने घडणाऱ्या हार्मोनल चेंजेस मुळ हे होतं, हे समजलं तर अशी एखादी स्त्री दिसली तर कोणी त्यावर हसणार नाही.
हनुवटीवर केस असतील तर तसं चिंतेचे कारण नाही कारण सगळ्यांनाच थोड्याफार प्रमाणात तिकडे केस असतात.
परंतु वयोमान, हार्मोनल चेंजेस या सगळ्यांचा परिणाम होऊन कधी कधी मोठे आणि जाड केस येतात पण त्यांची संख्या कमी असते, त्यामुळे ते सहजपणे काढता येतात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
परंतु अचानक खूप केस तुमच्या हनुवटीवर आले विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत हे झाले, तर लगेचच डॉक्टरांना दाखवणे श्रेयस्कर ठरेल.
हनुवटीवरती जे केस येतात त्यांना ‘ पीच बझ्झ ‘ असं म्हटलं जातं.
–
- दाढी-मिशा नाहीत, मग पुरुषांना प्रवेश नाही! प्राण्यांमधील माद्यांनाही नो एंट्री…
- खरं वाटणार नाही पण पुरुषांच्या दाढीमुळे स्त्रियांना होत आहेत गंभीर आजार
–
या केसामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहतं.
पौगंडावस्थेतून यौवनावस्थेत जाताना प्रत्येकाच्या शरीरात “अँड्रॉजेन” नावाचं हॉर्मोन्स मोठ्या प्रमाणात स्त्रवतात. त्यामुळे शरीरात कोश तयार होऊन शरीराच्या काही भागांमध्ये लांब, खडबडीत आणि गडद केस येतात.
पुरुषांमध्ये हे हार्मोन्स तयार होण्याची पातळी ही स्त्रियांपेक्षा खूप जास्त असते म्हणून पुरुषांना हनुवटीवर आणि त्यांच्या ओठांच्या वर जास्त केस येतात.
प्रत्येकाच्या शरीरातील हार्मोनची पातळी हे ह्याच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात बदलत असते.
त्यातही तुमचं वय, तुमचं वजन याबरोबरच स्त्रियांमध्ये प्रेग्नेंसी आणि मेनोपॉज या काळात हार्मोन्स वाढतात. त्यामुळे स्त्री पुरुषांमध्ये चेहऱ्यावर केस येतात.चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करता येतात.
तसं हनुवटीवर हे केस येणे ही फार हार्मफुल गोष्ट नाही.
स्त्रियांसाठी हे अनावश्यक वाढलेले केस काढण्यासाठी खूप सोप्या पद्धती वापरता येतात. जसं की चिमट्यात पकडून, दाढी करून किंवा थ्रेडिंग करून, वॅक्सिंग करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लेसर ट्रीटमेंट करून किंवा एलेक्ट्रोलिसिस करून. दाढी करणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे,
मात्र असाही समज आहे की त्यामुळे केस लवकर लवकर येतात आणि दाढी वारंवार करावी लागते.
हनुवटी किंवा चेहऱ्याचा कोणताही भाग यावर जर केस अचानक वाढले तर तुमच्या शरीरात काहीतरी बदल होतोय, ह्याचं हे लक्षण आहे हे समजून घ्यायचं.
महिलांमध्ये असे केस वाढणे म्हणजे त्या महिलेला ‘ हर्सुटिझम ‘ नावाचा आजार होत आहे याचं लक्षण आहे.
सर्वसाधारण पाच ते दहा टक्के महिलांना प्रेग्नेंसी च्या काळात हर्सुटिझम होऊ शकतो. हनुवटीवर, ओठांच्या वर, छातीवर, ओटीपोट आणि क्वचित पाठ याठिकाणी केस वाढतात.
हर्सुटिझम होण्यासाठी नक्की कारणं माहीत नाहीत. कधीकधी वेगवेगळी औषधे घेऊनही अनावश्यक केस वाढू शकतात.
ही लक्षणं दिसत असतील, तर सावधान
स्त्रियांमध्ये अनावश्यक केस वाढण्याचे, आणखीन एक कारण म्हणजे तिच्या प्रेग्नेंसीच्या काळात अंडाशयात अल्सर झाला असेल तर केस वाढू शकतात.
तसेच त्याकाळत अँड्रोजेन किंवा इतर पुरुष संप्रेरकाचा प्रमाण वाढलं तर
मासिक पाळी अनियमित झाली तर असे केस वाढतात. सोबतच वजन वाढणे
मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होणे.
चेहऱ्यावरती मुरमं वाढणे किंवा चेहऱ्यावरती पॅचेस येणं याला मराठीत वांग असेही म्हणतात.
डोकेदुखी सुरू होणं. या आजाराची सुरुवात ठरु शकते.
‘ कुशींग सिंड्रोम’ हा एक यातील दुर्मिळ आजार म्हणता येईल.
बऱ्याच स्त्रियांना या आजाराचा सामना करावा लागतो. कुशिंग सिंड्रोम हा शरीरातील कार्टीसोल हार्मोन्स वाढल्यामुळे होतो.
–
- विविध समाजांमध्ये ‘पौरुषत्व’ सिद्ध करण्याच्या या प्रथा तुमची झोप उडवतील
- पत्त्यांमधले तीन राजे मिशीवाले, एकाला मात्र मिशीच नाही! कारण कळलं तर हसूच येईल…
–
जर तुम्ही कार्टीसोल स्टिरॉइड्स घेत असाल तर कुशिंग सिंड्रोम होऊ शकतो. यामध्ये फक्त चेहऱ्यावर केस येणे एवढंच न होता वजन वाढतं. शिवाय तुमची हाडं आणि स्नायू कमजोर होतात. स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमित होते, आणि चेहऱ्यावर जांभळ्या रंगाचे पॅचेस दिसायला लागतात.
गंभीर आजार
याशिवाय काही दुर्मिळ परिस्थितीत, जन्मजात होणारे किंवा जेनेटिक्स मध्येच काही बदल झाले असतील तर ‘ अड्रेनाल हायपरप्लासिया ‘ होऊ शकतो.
ज्यामध्ये स्त्रियांना चेहऱ्यावर केस येतात आणि समोरच्या भागात टक्कल पडते मासिक पाळी अनियमित होते, गर्भधारणा होत नाही. बऱ्याचदा अनुवंशिक परिस्थितीतही हा आजार होतो.
म्हणजे तुमची आई, आजी, बहिण यापैकी कोणालाही हा आजार असेल तर तुम्हालाही हा आजार होण्याची भीती असते.
क्वचितच एखादीला अंडाशयात अड्रेनाल ग्रंथीचा ट्यूमर होऊ शकतो. ज्याची लक्षणं म्हणजे चेहऱ्यावर केस येण्याबरोबरच पुरुषांसारखं टक्कल पडायला लागतं. वजन वाढतं आणि आवाजात बदल होतो.
सर्वसाधारणपणे स्त्रियांमध्ये चेहऱ्यावर केस वाढतात. तुमची मासिक पाळी अनियमित होते आहे, मासिक पाळीत रक्तस्त्राव जास्त होतो आहे, वजन वाढतं आहे.
अशा गोष्टी मुळे तुम्हाला त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जाणे आणि त्यानुसार औषध उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण हा शेवटी तुमच्या शरीरामध्ये होणारा बदल आहे.
बाहेरून काही लावून करून हा त्रास कमी होणार नाही, त्यासाठी डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक आहे. कारण त्याचे योग्य निदान केवळ डॉक्टरंच करू शकतात.
फक्त हनुवटीवर थोडेफार केस आले तर ते जास्त चिंताजनक नाहीये, ते तुम्ही घरातही वेगवेगळे उपाय करून काढू शकता. पण अचानक राठ केस येण्याचे प्रमाण वाढलं तर मात्र फक्त डॉक्टरांकडेच याचा इलाज होऊ शकतो.
फक्त याबद्दल कुठलाही न्यूनगंड न बाळगता किंवा डॉक्टरांकडे जाण्यासाठी कोणताही संकोच मनात न आणता जायला हवे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.