Site icon InMarathi

‘टिकटॉक’च्या वेडापायी आपल्या मुलाचा जीव जाऊ नये असं वाटत असेल तर हे वाचाच….

tiktok inmarathi 7

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

मोबाईल फोन आणि इंटरनेट आता जगातील रोटी, कपडा और मकान या माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये अॅड झालेली गोष्ट आहे. मोबाईल मुळे आपल्या आयुष्यात अनेक चांगले बदल झाले असतील, तरी कधीकधी त्याचा वाईट वापरही होताना दिसून येत आहे.

आतातर माणसाच्या जीवावरच काही काही गोष्टी आल्या आहेत. मोबाईल मध्ये आपण अनेक ॲप्स डाऊनलोड करत असतो. अलीकडे सगळ्यात जास्त डाऊनलोड झालेलं ॲप म्हणजे ‘टिकटॉक’.

ह्या अँपमध्ये २० ते ३० सेकंदा पासून २ ते ३ मिनिटापर्यंत व्हिडिओ अपलोड करता येतात आणि म्हणूनच हे अॅप जगभर प्रसिद्ध झालं. सुरुवातीला केवळ काही विनोदी व्हिडिओ या ॲप वर यायचे.

 

rogue rocket

 

कधीकधी एक दोन मिनिटात लोकं आपली गाणं गायची हौस भागवून घ्यायचे, हे एवढ्या पर्यंत ठीक होतं.

पण पुढे पुढे यातून आपल्याला प्रसिद्धी मिळते आहे हे लक्षात आल्यावर तरुण पिढीतील काही मुलं झटपट प्रसिद्धी मिळवण्याकरिता काहीतरी विचित्र स्टंट करून तो व्हिडिओ टिकटोक वर अपलोड करायला लागले.

मग यात रेल्वेच्या दारात उभा राहून आणि बाहेर तोंड काढून काहीतरी वेगळे स्टंट करायचे किंवा रेल्वेच्या छतावर चढून स्टंट करायचे.

रस्त्यावर बाईक घेऊन स्टंट करायचे, यातून कधीकधी अपघातही झाले आणि त्यात काही तरुण मुलांनी आपला जीवही गमावला.

 

kalinga tv

 

आणि आता एक नवीनच फॅड येताना दिसते आहे. आणि ते म्हणजे “स्कलब्रेकर चॅलेंज”. नावाप्रमाणेच हा एक घातक खेळ आहे, स्पेनमधल्या एका शाळेमध्ये दोन मित्रांमध्ये गंमत म्हणून सुरु झालेला हा खेळ टिकटॉक वर आला.

आणि नंतर त्याचे भयानक परिणाम दिसून यायला लागले. ‘स्कलब्रेकर चॅलेंज’ म्हणजे काय तर, दोन मुलं किंवा दोघेजण उभे राहतात आणि मध्ये एकाला बोलवतात, मग तिघे एका रेषेत उभे राहतात.

कडेचे दोघेजण हे उडी मारतात आणि मधल्याला सांगतात की फक्त अशी उडी मारायची आहे. आणि मधला जेव्हा अशी उडी मारतो त्यावेळेस कडेचे दोघं त्याच्या पायात पाय घालतात आणि मग तो मधला जमिनीवर जोरात आपटतो.

 

too fab

याचाच व्हिडिओ टिकटॉक वर अपलोड करायचा. या स्कलब्रेकर चॅलेंज मध्येहा धोका आहे की तुमच्या डोक्याला गंभीर इजा होऊ शकते, अगदी तुमची डोक्याची कवटीही फुटू शकते.

हे स्कलब्रेकर चॅलेंज जेव्हा टिकटॉक वर आलं आणि बघता बघता लोकप्रियही झाल. त्यातही विशेषतः टीन एजर मुलं याकडे आकर्षिले गेले आहेत. मुलं असे व्हिडिओज शूट करत आहेत आणि ते टिकटोक वर अपलोड करत आहेत.

परंतु यातून खरोखरच काही गंभीर घटना घडल्या. या घटना यूरोप आणि अमेरिकेमध्ये जास्त प्रमाणात घडल्या. भारतामध्ये अजून याचं लोणं तितकं आलेलं नसलं तरी कधीही येऊ शकतं.

 

insider

 

म्हणूनच आई-वडिलांनी आता याकडे थोडंसं लक्ष देणे गरजेचे आहे. कारण जर खरोखरच खूप गंभीर घटना घडली तर यातील जखमी व्यक्ती आयुष्यभरासाठी अधू होईल.

म्हणूनच मुलांना विश्वासात घेऊन सांगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या वयातली मुलं फारसं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळेच हा एक मोठा टास्कच सध्याच्या आई वडिलांसमोर आहे.

काही काही जखमी झालेले व्हिडिओज् देखील टिकटॉक वर आलेले आहेत, त्यांचं पुढे काय झालं याबद्दल काहीही माहिती नाही. काही काही व्हिडिओमध्ये मुलं स्वतःच्या आई-वडिलांना देखील या गेम चॅलेंज मध्ये सामील करून घेताना दिसत आहेत.

डॉक्टर म्हणत आहेत की, या स्कलब्रेकर चॅलेंज मुळे तुमच्या पायालाही गंभीर दुखापत होऊन गंभीर इजा होऊ शकते. तुमचा गुडघा, तुमचे घोटे दुखावले जाऊ शकतात, सांध्यांना फ्रॅक्चर होऊ शकते.

डोके जमीनीवर जोरात आपटले तर डोक्याला इजा ही होणारंच.

 

metro

 

या गेम मधला धोका तेव्हा बाहेर आला जेव्हा अरिझोनामधील एका आईने फेसबुकवर या बाबतची पोस्ट टाकली आणि इतर पालकांना सावधानतेचा इशारा दिला.

मुलाचा फोटो फेसबुक वर शेअर केला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती, चेहऱ्यावरती टाके घातले होते. मुलाला विचारले की नक्की काय झालं होत, तेव्हा मुलाने सांगितले होते की मी स्कलब्रेकर हे चॅलेंज स्वीकारलं होतं.

स्कलब्रेकर चॅलेंजचा धोका संपतोय की नाही तोपर्यंतच आता नवीन एक चॅलेंज टिक टॉक वर आलेले आहे. आणि ते म्हणजे ‘सॉल्ट चॅलेंज’. यामध्ये तोंडामध्ये एकाच वेळेस जास्तीत जास्त मीठ भरायचं आणि नंतर ते थुंकून द्यायचं. 

पण काही काही जण हे मीठ गिळत आहेत. टिकटॉक वर हे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत.

 

gulf today

 

हे पण एक घातक चॅलेंज माणसासाठी आहे कारण एकाच वेळेस तुम्ही जर इतक्या प्रमाणात मीठ खाल्लं किंवा तुमच्या ते पोटात गेलं तर तुमच्या मेंदूला सूज येऊ शकते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सॉल्ट चॅलेंज देखील तितकेच खतरनाक आहे जितके स्कलब्रेकर. कारण सॉल्ट चॅलेंज मध्ये एकाच वेळेस खूप मीठ आपल्या शरीरात जाऊ शकतं.

आपल्या शरीरात आधीच सोडियम असतं, त्यामुळे अधिकच सोडियम जर शरीरात गेलं तर ते विषाचं काम करतं. त्यामुळे तुम्हाला सतत तहान लागू शकते, तुम्हाला उलटी होऊ शकते.

 

 

तुमचा मेंदू गरगरतो, तुम्हाला चक्कर येऊ शकते, तुम्ही बेशुद्ध होऊ शकता, कधीकधी तुम्हाला अटॅक पण येऊ शकतो आणि खूपच वाईट परिस्थिती असेल तर तुम्ही कोमातही जाऊ शकता.

म्हणून असे कुठलेही चॅलेंज करू नयेत ज्याने आपल्या जीवाला धोका आहे. टिकटॉक वर आज पर्यंत ब्लू व्हेल गेम चॅलेंज, मोमो चॅलेंज, लिप ग्लू चॅलेंज आली आहेत.

यामध्ये अनेकांची जीवनं उद्ध्वस्त होतात. म्हणूनच मोबाईलचा वापर या गोष्टींसाठी किती करायचा हे ठरवायची वेळ आली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version