Site icon InMarathi

पुरस्कार नाकारण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिलेल्या ‘या’ कारणांवर हसावं की रडावं?

bollywood celeb im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पुरस्कार सोहळे हे एक मोठं आकर्षण असतं.

त्यातही बॉलिवूडच्या कलाकारांना एखादा पुरस्कार मिळाला तर मग होणारी चर्चा आणि वाद हे आपल्यासाठी काही नवे नाहीत.

हे सोहळे फक्त पुरस्कार देऊन उत्तम कामगिरी करणाऱ्यांचं कौतुकच करत नाहीत तर अशी उत्तम कामगिरी करावी ह्याकरिता अनेकांना प्रोत्साहन देतात. आणि म्हणूनच ते महत्वाचेही असतात.

 

 

मात्र त्यातही अनेकदा वादंग निर्माण झाल्याचं दिसून येतं. नेपोटीजम आणि त्यावरून होणारे आरोप प्रत्यारोप जणू त्या सोहळ्याला लागलेलं ग्रहण. काही जणं पुरस्कार सोहोळ्यांकडे पाठ फिरवतात तर काही जणं पुरस्कारांकडेच!

आज आपण अशाच काही बॉलिवूड सेलिब्रिटीज बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी त्यांना मिळालेले प्रतिष्ठीत पुरस्कार नकारले आहेत.

१. शशी कपूर 

शशी कपूर म्हटलं की नमक हलाल ,शर्मिली, दीवार ह्यांसारख्या चित्रपटांची आठवण आल्यावाचून रहात नाही हेच खरं.

 

 

शशी कपूर हे फक्त अभिनेताच नाही तर चित्रपट निर्मातेसुद्धा होते. त्यांना ४ नॅशनल अवॉर्ड्स आणि २ फिल्मफेर अवॉर्ड्सनी सन्मानित करण्यात आलं होतं.

धर्मपुत्र या त्यांच्या चित्रपटातील ‘उत्कृष्ट अभिनयासाठी ‘ त्यांना नॅशनल अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं. मात्र प्रामाणिकपणा शिकावा तर ह्यांच्याकडून!

चित्रपटातील स्वतःचा अभिनय हा अजिबात बक्षिसपात्र नाही या विचाराने त्यांनी तो पुरस्कार नाकारला.

२. लता मंगेशकर 

आपल्याला लाभलेल्या अमूल्य रत्नांपैकी एक म्हणजेच गानकोकिळा लता मंगेशकर. दुर्दैवाने २०२२ च्या सुरुवातीलाच त्यांचं दुःखद निधन झालं.

संगीत क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार अशा मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या लतादीदी कायमच्या सगळ्यांच्या आठवणींमध्ये आहेत.

 

 

मात्र लतादीदींनी त्यांना मिळालेली पहिलीच फिल्मफेरची ट्रॉफी नाकारली होती. काय होतं बरं त्यामागचं कारण ?

त्याचं असं झालं की, फिल्मफेरला दिल्या गेलेल्या ट्रॉफीवर महिला विवस्त्र होती. त्यामुळे स्त्रीत्वाचा मान राखत नम्रतेने त्यांनी ट्रॉफी नाकारली.

 

 

मात्र कारण समजताच फिल्मफेरकडून ट्रॉफीचं डिझाईन बदलण्यात आलं व कपडे परिधान केलेली ट्रॉफी तयार करून दीदींना १९५८ साली देण्यात आली.

३. रीना रॉय 

अभिनेत्री रीना रॉय बॉलीवूडमधलं आणखी एक फेमस व्यक्तिमत्व.

 

 

१९७२ ते १९८५ ह्या काळात विविध चित्रपटांत प्रमुख भूमिकेत काम करत त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

१९७७ मध्ये रीना ह्यांना ‘अपनापन’ ह्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा अवॉर्ड फिल्मफेर मध्ये मिळाला मात्र त्यांनी तो नाकारला.

खरंतर ज्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्रीचा मान मिळत होता त्यात त्यांचं सहाय्यक नव्हे तर प्रमुख भूमिका होती आणि म्हणूनच त्यांनी तो नाकारला.

४.  वैजयंतीमाला 

नया दौर, आम्रपाली,संगम ह्यांसारख्या दर्जेदार चित्रपटांत आपण वैजयंतीमालेचे अभिनय तसेच नृत्यातील कलागुण पहिले आहेत.

 

 

क्लासिकल डान्सर म्हणून ओळखल्या जातात. १९५५ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभेनेत्री म्हणून बिमल रॉय ह्यांच्या ‘देवदास’ चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेर अवॉर्ड देण्यात आला. मात्र त्यांनीही हा पुरस्कार नाकारला.

खरंतर त्यांचीही भूमिका रीना रॉय सारखीच काहीशी होती. चित्रपटात सहाय्यक नव्हे तर प्रमुख भूमिका साकारली असल्याने त्यांनीही हा पुरस्कार नाकारला.

५. सुचित्रा सेन 

 

 

सुचित्रा सेन आणि आंधी हे जणू एका समीकरणासारखंच झालंय. ‘तेरे बिना जिंदगीसे कोई … ‘ गाणं आठवलं की सुचित्रा सेन आठवतातच. १९५५ साली बिमल रॉय ह्यांच्या देवदास चित्रपटात त्याही होत्या.

त्यांना भारतातील मनाचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्यांनीही तो पुरस्कार घेणं नाकारलं.

सुचित्रा सेन ह्यांना हा पुरस्कार जाहीर कार्यक्रमात घ्यायचा नव्हता. २००५ साली एखाद्या खाजगी कार्यक्रमात, राष्ट्रपती भवनात सन्मानाने तो पुरस्कार घ्यायचा होता.

परंतु आयोजकांनी मात्र त्यांची ही इच्छा पूर्ण करायला सहमती दर्शवली नाही.

६. कुमार सानू 

‘लडकी आंख मारे’ ह्या गाण्यातील ओळींमुळे पुन्हा एकदा कुमार सानू हे नाव सगळ्यांची ओठांवर आलं.

 

 

कुमार सानू हे बॉलिवूड मधील अतिशय उत्तम असे प्लेबॅक सिंगर म्हणजेच पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात. हिंदी आणि बंगाली चित्रपटात त्यांनी अनेक उत्तम गाणी गायली जी आजही गुणगुणली जातात.

१९९० ते १९९४ ह्या इतक्या लहान कालावधीत त्यांना सलग पाच वर्ष बेस्ट सिंगर म्हणून फिल्मफेर अवॉर्ड मिळाले.

पुढे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून त्यांना पहिला फिल्मफेअर मिळाला.

इतर नवोदितांनाही संधी मिळावी म्हणून त्यांनी अतिशय नम्रपणे पुरस्कार नाकारल्याचंही ऐकिवात आहे.

७. पृथ्वीराज कपूर 

पृथ्वीराज हे बॉलिवूडमधले प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांची ह्या क्षेत्रातील सुरुवात हिंदी मूकपटातून झाली.

 

 

भारतीय चित्रपटातील उत्तम कामगिरीसाठी त्यांना पद्मभूषण तसेच दादासाहेब फाळके हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पृथ्वीराज ह्यांनी मुघल -ए -आजम चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा filmfare पुरस्कार नाकारला कारण त्यांच्या मते ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारास पात्र होते.

८. सलीम खान 

बॉलिवूडमधील अतिशय उत्तम लेखक, अभिनेते, निर्माते तसेच सलमान खान ह्यांचे पिता सलीम खान ह्यांनी २०१५ मध्ये पद्मभूषण पुरस्कार नाकारला. त्यांच्या अनुमते त्यांची कामगिरी पद्मभूषण ह्या पुरस्कारापेक्षा मोठ्या पुरस्कारास पात्र होती.

९. सोनू निगम 

एक उत्तम पार्श्वगायक, गायक, सूत्रसंचालक अशा विविध रूपातील सोनू निगम सर्वांनाच भुरळ पडतो.

 

 

‘संदेसे आते है ‘ हे हृदयाला स्पर्श करणारं गाणं अतिशय गाजलं. ह्या गाण्यासाठी १९९७ मध्ये त्याला फिल्मफेअर देण्यात आला मात्र हे गाणं त्यांनी व रूप कुमार ह्यांनी गायलं असल्याने त्याने तो पुरस्कार नाकारला.

पुरस्कार मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे मात्र तो विनम्रतेने नाकारणंही सर्वांनाच जमेल असं नाही.

अर्थात एखादा पुरस्कार नाकारण्यामागे किती विविध भूमिका असू शकतात हेच ह्यावरून दिसून येतं. काहींच्या मते पुरस्कार नाकारणं हा कला आणि प्रेक्षकांचा अपमान असतो, तर काहींना आपली भूमिका महत्वाची असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version