Site icon InMarathi

पाठदुखीच्या वेदना असह्य होतायत? आहारातील “या” ६ सवयी आजच बदला…

back pain inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शरीराची जेव्हा अती झीज होते तेव्हा त्याचं थेट रूपांतर हे अंगदुखी मध्ये होतं. उदाहरण घ्यायचं तर जास्त चालणं किंवा खांद्यावर जास्त ओझं उचलणं. पाठदुखी आणि पाय दुखणे दुसऱ्यादिवशी पासून सुरू.

एवढंच कशाला, जिम मध्ये थाईज आणि काम्फ साठी हेवी वेट वर्क आऊट केल्यानंतर जवळपास सगळ्याच नवख्या लोकांना आपण रडताना पाहिलं असेल.

हीच गोष्ट शरीराच्या प्रत्येक भागाला लागू पडते.

शरीराला त्याची सवय व्हावी किंवा तेवढा भार करावा म्हणून व्यायाम करा हे सर्रास सांगितलं जातं. त्याच खुमखमीत जिम पण जॉईन केलं जातं.

 

 

रोज सकाळी व्यायाम सुद्धा केला जातो पण नकळत विसरली जाणारी गोष्ट म्हणजे आहार.

हेवी वेट वर्क आऊट करणारी, जिमला जाणारी प्रत्येक व्यक्ती ही प्रोटीन डाएट वर असते किंवा तत्सम घरचा आहार.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आपल्या पाठीला सपोर्ट हा लहान लहान गोलाकार अस्थींनी तयार झालेला मणका किंवा कणा, स्पिनल कॉर्ड याचा असतो. त्याची बांधणी जरी लहान लहान हाडांनी झालेली असली तरी आहे तर हाडाचा सांगडाच ना!

म्हणून, त्याची पण इतर हाडाप्रमाणे झीज होत असते आणि त्याला पोषण सुद्धा तेवढेच गरजेचं आहे.

 

prevention.com

 

पाठदुखी टाळण्यासाठी पाठीचे व्यायाम करताना आपण लोकांना पाहिलं असेल. मग पुन्हा तोच प्रश्न आहाराचं काय? गरजेचा आहार घेतला जातो का?

पथ्य पाळली जातात का? नियंत्रित आहार रोजच्या रोज होतो का? शरीर बांधणी साठी आहार गरजेचा असल्या कारणाने हे प्रश्न उद्भवणे साहजिकच आहे.

तर, आपल्या पाठ दुखीला आणि एकूणच आपल्या अंग दुखीला कोणते आहारातील गोष्टी जबाबदार आहेत, ते जाणून घेऊ.

• साखर किंवा ‘शुगर अँडेड’ खाद्य पदार्थ.

 

 

जवळपास सगळ्या शरीर संबंधी तक्रारींना कारणीभूत असलेला एकमेव पदार्थ.

साखरेमुळे वजन वाढतं आणि वजन वाढीचा थेट परिणाम हा पाठीवर होत असतो.

डाएट करणारी एखादी व्यक्ती जर ओळखीत असेल तर त्याच्याकडून साखरेच्या वाईट परिणामांबद्दल नक्की जाणून घ्या.

• वनस्पती तूप/तेल

 

time

 

वनस्पती तूप म्हटलं की डालडा माहीत नाही असं होणार नाही.

यामध्ये ओमेगा ६ फॅटी ऍसिड हे मोठ्या प्रमाणात असतं. शरीराला ओमेगा ६ फॅटी ऍसिड हे उपयुक्तचं आहे. पण त्याचं प्रमाण हे ओमेगा ३ फॅटी ऍसिड पेक्षा वाढलं तर त्याचा थेट परिणाम हा हाडांवर होतो.

आणि इतर हाडांच्या मानाने पाठीच्या मणक्यावर जरा लवकर होतो. म्हणजे,पाठ दुखीला निमंत्रण. म्हणून, आहारात डालडा वापरायला घरातली स्त्री तरी धजावत नाही.

वनस्पती तेल जर वापरायचंच असेल तर ऑलिव्ह ऑइल त्याला उत्तम ऑप्शन असू शकतो. कारण या मध्ये मोनोअनसॅच्युरिटेड फॅट हे जास्त प्रमाणात असतात.

 

• रिफाईन किंवा पॉलिश केलेले धान्य.

 

 

रिफाईन/पॉलिश अन्न खाण्यापेक्षा साधे अन्न धान्य (व्होल ग्रेन्स) हे कधीही उत्तम. म्हणून तर आजकल लोक व्हाईट ब्रेड पेक्षा व्होल व्हीट ब्रेडची मागणी करताना जास्त दिसतात.

पिझ्झा, सिरल्स, व्हाईट ब्रेड आणि फास्ट फूड हे रिफाईन गहू/धान्या पासून तयार केलेले असतात. म्हणून फास्ट फूड/जंक फूड जास्त खाणारी लोक जाड झालेली दिसतात.

सॅच्युरेटेड कर्बोदके या मध्ये जास्त प्रमाणात असतात आणि शरीराला याची तेवढी आवश्यकता देखील नसते.

रिफाईन धान्यांमुळे शरीरातील इन्सुलिनची लेव्हल ही अतिरिक्त वाढली जाते.आणि इन्सुलिनची वाढ म्हणजे वजन वाढ आहेच.

 

• डेअरी प्रोडक्ट/दुग्धजन्य पदार्थ.

 

exporters india

 

सगळ्यांनाचं याचा प्रॉब्लेम होत नसतो. पण एक्सेसिव्ह चीज आणि बटर खाणं हे मारक आहेच.

दूध/दही/पनीर हे जेवढं जास्त शरीरात जाईल तेवढं उत्तम.

पण सर्व मानवी शरीराची लॅक्टोज पचवायची कपॅसिटी ही सारखी नसते. दूध पचवणे पोटाला कठीण जातं आणि पोटावर ताण आला की त्याचा परिणाम पाठीवर झालाच समजा.

 

• प्रोसेस/प्रक्रिया केलेला मका/मक्याचे पदार्थ

हल्ली कॉर्न फ्लिक्स दुधासोबत नाश्त्याला सर्रास खाल्ले जातात. मका शरीराला उत्तम आहे.पण तो प्रोसेस्ड नसावा.

प्रोसेस्ड मक्यामुळे शरीरात इन्सुलिनची वृद्धी होते आणि इन्सुलिनची वृद्धी म्हणजे थेट वजनवाढीला निमंत्रण.

 

• लाल मांस 

 

sciencedaily.com

 

ह्यामध्ये खूप प्रोटिन असतात. शरीरासाठी उत्तम आहेच.

पण तुम्हाला पाठ दुखी असेल तर तुम्हाला हे मांस कितीही आवडत असले तरी टाळणं गरजेचं आहे.

लाल मांस मध्ये एन-ग्लायकोलीलिनेयुरेमिक (neu5gc) हे मूलद्रव्य सापडतं. जे इंफ्लामेशन साठी कारणीभूत आहे.

शिवाय सॅच्युरिटेड फॅट हे देखील या मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं जे की शरीराला घातक आहेच!

• रसायन/केमिकल युक्त अन्न पदार्थ.

 

 

केमिकल युक्त पदार्थ खाणे टाळणे कधीही उत्तमच.

रसायने, प्रिझर्व्हेटिव्ह हे आपल्या शरीराला अनभिज्ञ आहे. जे कधीही आपल्या शरीरात पचले जात नाहीत. त्यामुळे ते शरीराच्या बाहेर पूर्णपणे टाकले पण जात नाहीत,आणि शरीरात ते अनावश्यक मूलद्रव्या सारखे चिकटून बसतात.

याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो पाठीला. म्हणून या पुढे कधी पॅकेट खाद्य पदार्थ घ्याल तेव्हा त्यावरचे घटक वाचूनच घ्या.

पाठ दुखी रोजच्या जगण्याच्या गुणवत्तेवर गंभीरपणे परिणाम करू शकते आणि त्याचा इलाज करणे कठीण आहे.

बॅकपेन कमी करण्यासाठी आणि त्या मूलभूत स्थितीचा उपचार करण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा.

 

everydayhealth.com

शेवटी औषधोपचार आणि शस्त्रक्रिया देखील आवश्यक असू शकतात, परंतु हे विसरू नका की जीवनशैलीच्या निवडीमुळे आपल्या वेदनांमध्ये देखील खूप फरक पडतो.

वर सांगितलेले पदार्थ टाळले तरी नैसर्गिकरित्या पाठदुखीला रामराम ठोकता येईल. सवय झाली असेल तर ती मोडायला वेळ लागेल पण होऊन जाईल.

निव्वळ सकाळच्या चहा/कॉफी मधली साखर जरी आपण टाळली तर खूप चांगले परिणाम आपण पाहू शकतो. पाठदुखी तर जाईलच सोबत वजनवाढी सारखे प्रश्न पण सुटून जातील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version