होळी साजरी करताना करोनाची भिती भेडसावतीय? मग हे नक्की वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या करोना व्हायरसच्या भीतीने संपूर्ण जगाला ग्रासलं आहे.
जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये याच्याविषयी काळजी घ्या आणि सतर्क रहा अशा सूचना देण्यात येतं आहेत, लोक बाहेर पडायला घाबरत आहेत. आणि आता कोरोना व्हायरस भारतातही आला आहे.
आजपर्यंत भारतात 39 रुग्ण हे करोना व्हायरसचे सापडले आहेत. त्यामुळेच संपूर्ण देशात भीतीचं वातावरण आहे.
एक तर सोशल मीडिया व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर ,या सगळ्या वरती रोज काहीतरी कोरोना व्हायरस संदर्भात वेगळे मेसेज येत आहेत. त्यामुळे भारतातल्या अगदी खेड्यापाड्यातही आता कोरोनाची भीती पसरली आहे, आणि हे फक्त भारतातच मर्यादित नाही तर संपूर्ण जगभरच त्याच्याविषयी भीती पसरलेली दिसून येते.
चीन मधून येणार्या मालाचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे कुठल्याही गोष्टीचा तुटवडा जाणवू शकतो, म्हणून लोक दोन-तीन महिन्यांचे सामान आणून ठेवत आहेत.
जगभरातल्या मोठ्या शहरांमध्ये सुपर मार्केट मध्ये आतापासूनच तुटवडा जाणवत आहे, आणि आता भारतातही तशीच परिस्थिती येण्याची चिन्हं आहेत.
कोरोना व्हायरसची सगळ्यात जास्त लागण चीनमध्ये झाली आहे. आतापर्यंत जवळपास एक लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली असून, साडेतीन हजार मृत्यू आतापर्यंत झालेले आहेत.
त्याखालोखाल इराण आणि इटलीमध्ये कोरोनाने आणि मृत्यू झालेले आहेत. जपान अमेरिका आणि युरोप मध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.
भारतात आता होळीचे दिवस आहेत. सध्या मथुरा, वाराणसी याठिकाणी होळी सुरू झालेली आहे.
मथुरेत तर पाच दिवस होळीचा उत्सव चालतो. पण यावर्षीच्या होळीवर कोरोनाचे सावट आहे, कारण आपल्याला माहीत आहे की होळीचे रंग हे चीनमधून येतात.
आणि त्याच अनुषंगाने एक मेसेज व्हाट्सअप आणि फेसबुक वर फिरताना दिसून येतो तो म्हणजे,” होळीसाठी वापरण्यात येणाऱ्या रंग, पिचकारी या सगळ्या गोष्टी चीनमध्ये बनतात. त्यासाठी प्लास्टिक आणि पोलिमर लागतं, ज्याचं उत्पादन चीनमध्ये होतं.
आणि सध्या चीनमध्ये वूहान प्रांतात कोरोना व्हायरसने धुडगूस घातला आहे. तिकडे कोरोना मुळे लोकांचे मृत्यू होत आहेत.
त्यामुळे चीनमधून येणाऱ्या प्लास्टिक पिचकारी आणि रंग यांचा वापर होळीसाठी करू नका, कारण त्यामुळे तुम्हालाही कोरोना व्हायरसचा त्रास होऊ शकतो.”
आता ही गोष्ट खरी आहे की चीनमधल्या वूहान प्रांतामधून कोरोना व्हायरस संपूर्ण जगभर पसरला.
पण म्हणून तो आता तिथून येणाऱ्या सामानमधून पण येऊ शकेल का? आणि खरोखरच होळीचे रंग खेळल्यामुळे कोरोना व्हायरस होईल का?
या संदर्भात जेव्हा डॉक्टरांशी चर्चा झाली, तेव्हा ते म्हणाले की या गोष्टीत काहीही तथ्य नाही कोरोना व्हायरस हा कुठल्याही सामनामधून म्हणजेच निर्जीव गोष्टीतून कोणालाही होऊ शकत नाही.
करोना व्हायरस हा माणूस आणि जनावरांकडून येऊ शकतो, आणि याची वाढ ही माणसाच्या शरीरातच होते.
करोना व्हायरस माणसाची प्रतिकारशक्ती कमी करत नेतो आणि एका माणसापासून दुसर्याला त्याचा संसर्ग होऊ शकतो.
जर करोना बाधित व्यक्ती तुमच्यापाशी उभी असेल आणि त्या व्यक्तीच्या शिंकण्यायातून, खोकल्यातून जो द्रव पदार्थ बाहेर पडेल त्याच्या संपर्कात तुम्ही आलात तर तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते.
हवेतून त्याचे जंतू तुमच्या शरीरात श्वासाद्वारे गेले तरी तुम्हाला कोरोना ची लागण होऊ शकते.
आणि हे भारतातल्या डॉक्टरांचंच म्हणणार नाही तर हे (WHO) जागतिक आरोग्य संघटनेचेही हेच म्हणणे आहे. (WHO) च्या संशोधनानुसार हा व्हायरस कुठल्याही वस्तूच्या पृष्ठभागावर जास्त काळ जिवंत राहू शकत नाही.
WHO ने त्यांच्या वेबसाईटवर देखील हे सांगितलं आहे की, चीनमधून येणार्या वस्तू ह्या संपूर्ण सुरक्षित आहेत.
कोणत्याही वस्तूंमुळे कोरोना व्हायरस होत नाही. त्यामुळे व्हाट्सअप वरचा मेसेज नुसार चीनमधून येणाऱ्या रंग आणि पिचकाऱ्या मुळे कोरोना व्हायरस होतो हे म्हणणं चुकीचं आहे.
या बाबतीत जेव्हा दुकानदारांनी सांगितलं की, हे मेसेजेस सगळीकडे पसरत आहेत. पण खरंतर ह्या अफवा आहेत, कारण चीनमधून येणाऱ्या रंग आणि पिचकार्यांमुळे कोरोना होणार नाही.
कारण हे रंग आणि पिचकाऱ्या यांचं ॲडव्हान्स बुकिंग मे-जूनमध्ये होतं आणि नोव्हेंबरपर्यंत सगळा माल भारतात येतो. सध्यातरी आमच्या विक्रीमध्ये फारसा फरक पडला नाही.
लोकं रंग विकत घेत आहेत शंभर पैकी पाच लोकांना मात्र काही शंका आहेत आम्ही त्यांच शंकानिरसन करत आहोत.
मग होळी खेळताना करोना होणार नाही याची गॅरंटी आहे का? तर तीही नाही, कारण होळी खेळताना बरेच लोक एकाच ठिकाणी असतील, आणि त्यातील कुणी जर कोरोना व्हायरस बाधित असेल तर तुम्हाला कोरोना व्हायरस होण्याचा धोका अधिक असणार आहे.
आता बऱ्याच देशातून लोक आपल्या देशात येत असतात किंवा आपल्या देशातील लोक दुसऱ्या देशात जाऊन येत असतात त्यामुळे करोना व्हायरस पसरण्याचा धोका अधिक आहे.
व्हॉट्सअप फेसबुक ही साधनं म्हणजे डॉक्टर नाहीत हे लक्षात ठेवा. सोशल मिडीयावरून येणा-या बातम्या या अफवा आहेत का याची पडताळणी करून घेणं सर्वात महत्वाचं आहे.
natural news
अनेकदा साध्या परिस्थितीतही अशा अफवा वाचून आपण पॅनिक होतो, आणि संकटाला निमंत्रण देतो.
होळीच्या सामानामुळे करोना होत नाही हे जागतिक आरोग्य संघटनेनंही सांगितलं, मात्र यावेळी ज्या मोठ्या संख्येने लोकं जमा होतील, त्यांच्यापासून करोनाचा धोका आहे.
अद्याप आपल्या शहरात हा धोका जाणवत नसला, तरी गर्दीतील नेमक्या एका व्यक्तीसही याची लागण झाली असेल, तर तुम्हालाही त्याचा धोका असु शकतो.
आता घाबरून सण साजरा न करणं हे यावरचं उत्तर नाही, तर सण साजरा करताना काळजी घेणं हा त्यावरचा सर्वात चांगला उपाय आहे.
म्हणून होळी खेळायची असेल तरी ती पुर्ण योग्य काळजी घेऊन फारशी गर्दी न करता खेळावी आणि सणाचाही आनंद घ्यावा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.