Site icon InMarathi

‘गुळ असला की मुंगळे येतात’; यश-पैसा कमावलेल्या भगवानदादांचे शेवटचे दिवस…

Master Bhagwan InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

=== 

चित्रपटसृष्टी म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे अभिनेता- अभिनेत्री, त्यांच्याभोवती असलेलं प्रसिद्धीचं वलय, अमाप पैसा या गोष्टी येतात. सिनेसृष्टीत या सगळ्या गोष्टी निश्चितच आहेत, पण हे ‘स्टारडम’ टिकवणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं.

असे अनेक कलाकार आहे की जे कोणे एके काळी यशाच्या शिखरावर होते, पण काही कारणांमुळे त्यांचा अंत अत्यंत भयावह- करूण झालं आहे. यातीलच एक नाव म्हणजे मा. भगवान दादा.

 

the better india

 

“शोला जो भडके, दिल मेरा तडपे” हे गाणं लागल्यावर आजही सगळ्यांची पावलं थिरकतात. अलबेला या सुपरहिट हिंदी सिनेमातील हे गीत आणि हे गाणं ज्यांच्यावर चित्रित झालं ते नायक म्हणजे भगवानदादा.

‘अलबेला’ गाजला तो त्यातील गाण्यांमुळे आणि भगवानदादांच्या डान्समुळे. भगवानदादांनी हिंदी सिनेमा मध्ये नाचण्याची जी काही स्टाईल आणली त्याने पुढच्या अनेक नायकांना गाण्यामधला नाच सोपा गेला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

तसे भगवान दादांची शरीरयष्टी कुस्तीगीरची होती. परंतु अंगात संगीताचा एक ठेका मात्र भिनला होता.

कुठल्या गाण्यावर शरीर कसं हलवायचं, हाताच्या ॲक्शन काय करायच्या, कंबरचे कसे झटके मटके द्यायचे, पायांनी कसा ठेका धरायचा, नजरेने काय हालचाली करायच्या हे भगवान दादांना खूप छान जमायचं.

 

sanjeevani today

 

एक खट्याळ नटखटपणा त्यांच्या डान्स मध्ये दिसायचा. पुढे त्यांची हीच स्टाईल अमिताभ बच्चन, गोविंदा, मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या डान्स मध्ये वापरलेली दिसते.

भगवान दादांचा जन्म अमरावतीला १९१३ साली झाला. त्यांचं नाव भगवान आबाजी पालव.

मुंबईमध्ये त्यांचं करिअर हे मिल कामगार म्हणून सुरु होतं, परंतु सिनेमाचं वेड मात्र खूप होतं.

सिनेमामध्ये येण्यासाठी जे काय करता येईल ते करायची त्यांची तयारी होती. मग त्यांनी मुकचित्रपटांमधून एन्ट्री घेतली. तिकडे छोटे-मोठे रोल करायला सुरुवात केली.

मुकपटातील त्यांचा, ‘क्रिमिनल’ हा पहिला सिनेमा होता. त्यांनी फिल्म मेकिंगची सगळी तंत्रे जाणून घेतली.

 

patrika

 

सुरुवातीला काही दिवस सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ही काम केलं, ‘बहादुर किसान’ हा त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेला पहिलाच सिनेमा.

काही दिवसांनी स्वतः लो बजेट फिल्म बनवायला सुरुवात केली. त्यामध्ये निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, वेशभूषा अगदी सेटवरील लोकांना जेवण देण्यासहितची सगळी काम स्वतः केली.

त्याकाळात त्यांनी ६५ हजार रुपयांमध्ये सिनेमा बनवला होता. त्यांनी काही स्टंट सिनेमांचं दिग्दर्शनही केलं, असे सिनेमे हे कामगार लोक जास्त पहायचे.

त्यांनी एक तमिळ सिनेमा सुद्धा दिगदर्शित केला होता, त्याचं नाव होतं, ‘वन मोहिनी’. हा तमिळ मधला हिट सिनेमा ठरला. या सिनेमातील हीरोइन थावमणीदेवीला या सिनेमाने स्टारडम मिळवून दिलं.

आणि तिने पुढच्या सिनेमांमध्ये स्वतः ची वेशभूषा आणि केशभूषा मीच करणार अशी अट घालायला सुरुवात केली. या घटनेची यासाठी नोंद घेतली पाहिजे की, यातूनच कलाकार स्वतःचे मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसर ठेवायला लागले.

एका सिनेमांमध्ये त्यांच्यासोबत ललिता पवार होत्या. त्या सिनेमातील कथेनुसार त्यांना ललिता पवार यांच्या थोबाडीत द्यायची होती, आणि भगवान दादांनी ती इतक्या जोरात मारली की ललिता पवार यांचा डावा डोळा कायमचा अधू झाला.

yahoo sports

 

नंतर भगवानदादांनी सिनेमा निर्मितीला सुरुवात केली आणि आपल्या प्रोडक्शन हाऊसच नाव ठेवलं जागृती पिक्चर्स. त्यांनी चेंबूरला जागा खरेदी केली आणि तिकडे स्टुडिओ उभारला.

भगवान दादांचा ‘अलबेला’ हा सिनेमा सुपर डुपर हिट ठरला. यामध्ये त्यांच्याबरोबर हीरोइन म्हणून गीताबाली होत्या. हा सिनेमा केवळ कथेमुळेच नाही तर त्यातील सी.रामचंद्र यांनी दिलेल्या संगीतामुळे, गाण्यामुळे आणि भगवानदादांच्या नाचण्याच्या लकबी मुळे खूप गाजला.

 

 

भगवानदादा आणि सी. रामचंद्र या दोघांनीही सिनेमाविषयीची चर्चा मुंबईतील चर्चगेट येथे केली होती. आणि ह्या सिनेमाला सी.रामचंद्रांनी संगीत द्यायचं ठरलं होतं.

अलबेला ने भगवानदादांना सगळं काही दिलं. प्रसिद्धी, पैसा, नाव आणि मित्र. त्यावेळेस त्यांनी जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर २५ खोल्यांचा बंगला बांधला. त्यांच्या बंगल्यासमोर सात गाड्या उभ्या असायच्या.

त्या काळातील परदेशी बनावटीच्या या गाड्या होत्या.

असं म्हणतात की, ते आठवड्यातल्या प्रत्येक दिवसासाठी एक गाडी वापरायचे. अलबेला सिनेमाने प्रेक्षकांची नाळ बरोबर पकडली होती. नंतर मात्र भगवान दादांना हे करणं शक्य झालं नाही.

त्यांनी परत गीताबालींबरोबर झमेला आणि लाबेला हे सिनेमे केले पण ते अलबेला इतके हिट गेले नाहीत. अलबेलाची जादू भगवानदादांना परत आणता आली नाही.

 

cinestaan

 

त्यानंतर भगवानदादांनी अनेक चित्रपट काढले, निर्मिती केली, दिग्दर्शन केले परंतु कोणताही सिनेमा हिट गेला नाही. पण सिनेनिर्मितीच्या वेडापायी त्यांनी स्वतःचा तो जुहूचा पंचवीस खोल्यांचा बंगला आणि आपल्या सात कारही विकल्या.

नंतर ते मुंबईतील एका चाळीत राहायला लागले. नंतर नंतर त्यांना सिनेमातूनही कामही जास्त मिळेनाशी झाली. मग कुठल्याही सिनेमात छोटे छोटे रोल करायला सुरुवात केली.

शेवटच्या काळात चित्रपटात नृत्याच्या एखाद्या कडव्याकरीता किंवा एका स्टेप करीता त्यांना काम करावे लागले. अगदी रोजंदारीवरी काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

त्यात हे ‘झनक झनक पायल बाजे ‘आणि ‘चोरी चोरी’ या सिनेमातले त्यांचे काम थोडे लक्षात राहिले. पण काही सिनेमे अजिबात लक्षात राहीले नाहीत. नंतर तर एखाद्या गाण्यात, किंवा कुठेतरी छोटासा रोल असे मिळेल ते काम ते करायला लागले.

 

youtube

त्यांच्याभोवती जमलेले मित्र मात्र त्यांच्या पडत्या काळात त्यांच्यापासून दूर गेले. मराठीत एक म्हण आहे, ‘गुळ असला की मुंगळे येतात’ ही म्हण भगवानदादांच्या बाबतीत पूर्ण लागू पडली.

दिलीप कुमार, सी रामचंद्र, ओम प्रकाश ही मंडळी त्यांना भेटायला जायचे पण भगवानदादांनी कधीच कुणाकडे मदत मागितली नाही किंवा देऊ केली तरी घेतली नाही.

आपल्या कष्टाने जे मिळेल तेच मी खाईन असं ते म्हणायचे. सिनेसृष्टीतील जीवन किती अनिश्चित आहे, हे भगवान दादांच्या आयुष्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं.

 

enavakal.com

 

२००२ मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी भगवानदादा हृदय विकाराच्या झटक्याने गेले. त्यानंतर त्यांच्या जीवनावर आधारित एक मराठी सिनेमा आला होता त्याचं नाव होतं ‘एक अलबेला’.

 

teluguone.com

 

ज्यामध्ये मंगेश देसाई यांनी भगवान दादा ची भूमिका केली होती तर गीताबालीची भूमिका विद्या बालन यांनी केली होती. ‘कभी हां कभी ना’ या सिनेमामध्ये एक गाणं आहे,”वो तो है अलबेला, हजारो मे अकेला” हे भगवानदादांच्या बाबतीत खरं ठरलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version