Site icon InMarathi

सांधेदुखीसाठी कडवट औषधांपेक्षा हे गोड उपाय तुम्हाला नक्कीच आवडतील

joint pain women inmarathi

jointflex

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

मानवी शरीर हे जणू एका गूढ यंत्राप्रमाणे आहे. आणि यंत्र म्हटलं की त्यात लहान मोठे बिघाड होणं स्वाभाविक आहेच.

यंत्रात बिघाड झाला की त्याची दुरुस्ती केली जाते तसेच ते खराब होऊ नये म्हणून त्याला वंगणही दिलं जातं.

 

 

आपल्या देहाचं सुद्धा तसंच आहे की!

आपल्या शरीरात काही बिघाड झाला म्हणजेच जर आपण आजारी पडलो तर आपण त्यावर उपयोजना करतो आणि आपली तब्बेत बिघडू नये याकरिता काळजीही घेतो.

जसं यंत्रातील भाग महत्त्वाचे असतात तसंच आपलेही जॉइंट महत्वाचे असतात.  जर आपल्या सांध्यांमध्ये वेदना होत असतील तर आपलं यंत्र सुरळीतपणे कसं बरं चालेल?

त्याही वर्षांपुर्वीपर्यंत सांधेदुखीची तक्रार केवळ वयोवृद्ध लोकांकडून केली जात असली तरी आपण घेत असलेल्या औषधी गोळ्यांचे साईड इफेक्ट जाणवण्याची शक्यता असते.

 

 

आणि म्हणूनच घरगुती आणि हानिकारक नसलेल्या काही पदार्थांचे सेवन केल्यास नक्कीच सांधेदुखीशी तुम्ही दोन हात करू शकता.

ह्या द्रव पदार्थांचे सेवन तुमच्या शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. जे सांधे दुखण्याचं मूळ कारण आहे.

पेयांच्या सेवनामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहण्यासही मदत मिळते. म्हणूनच आज आपण सांधेदुखीवर डॉक्टरांनी दिलेल्या त्या कडवट औषधांपेक्षा कोणती पेय घेऊ शकतो ते पाहणार आहोत .

१. पाणी 

मानवी शरीरात तब्बल 70 टक्के पाण्याचा समावेश असतो हे आपल्याला ज्ञात आहेच.

 

bbc good food

 

आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास सांधे दुखणं सुरू होऊ शकतं कारण पाण्याच्या घटलेल्या पातळीमुळे शरीरातून टॉक्सीन बाहेर टाकण्याचं प्रमाण कमी होऊन जळजळ निर्माण करणारे पदार्थ शरीरात तसेच साठून राहतात.

शिवाय पाण्याच्या कमतरतेमुळे जणू हाडांचं वंगण नाहीसं होतं आणि त्याचा परिणाम सांध्यांच्या लवचिकतेवर होऊन साध्या साध्या क्रिया करणं सुद्धा कठीण होऊन बसतं.

म्हणूनच दररोज किमान 2 लिटर पाणी प्यायलं जायला हवं.

२. रेड वाईन 

रेड वाईन मद्य असलं तरीही शरीरासाठी ते उपयुक्त आहे.

रेड वाईन मध्ये ‘Resveratrol’ नामक अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतो त्यामुळे सांधेदुखी करता ह्याचं सेवन नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.

 

 

मात्र जास्त प्रमाणात सेवन केल्यास डीहायड्रेशनही होण्याची शक्यता असते. कारण अती तिथे माती.!

आणि मद्यसेवन करावयाचे नसल्यास तुम्ही लाल द्राक्ष किंवा लाल द्रक्षचं सरबतही ग्रहण करू शकता. त्यातही ‘Resveratrol’ हा घटक समाविष्ट असतो.

३. चेरी ज्यूस 

खरंतर फळांचा बंद बाटलीतील ज्यूस तब्बेतीसाठी हितकारक नसतो कारण बऱ्याचदा त्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि त्या प्रमाणात फळामध्ये तंतुमय पदार्थ नसल्याचं दिसून येतं.

अति साखरेमुळेही जळजळू शकतं. म्हणूनच त्या ऐवजी फळांचा ताजा रस घेणं कधीही चांगलं. कारण त्यात योग्य प्रमाणात साखर व फायबर असतात.

 

 

परंतु ह्याला अपवाद म्हणजे चेरीचा ज्यूस.! तो मात्र तुमची जळजळ तसेच सूज कमी करण्यास मदतनीस म्हणून काम करतो.

४  स्मुदी 

आजकाल विविध फळांच्या तसेच भाज्यांच्या स्मुदी तयार करून प्यायल्या जातात. ह्यात yogert चा वापर केला जातो.

 

 

स्मुदीमध्ये अँटीओक्सिडंट असतात. त्यामुळे शरीरातील इतर जळजळ निर्माण करणाऱ्या घटकांवर नियंत्रण मिळवता येतं. दररोज स्मुदी प्यायल्यास नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल.

५. कॉफी 

खरंतर कॉफीबद्दल दोन विभिन्न मतं पहायला मिळतात. कॉफी Arthritis साठी कारणीभूत मानली जाते तसेच कॉफी मुळेच ‘gout arthritis ‘ bara होण्यास मदत मिळते.

 

shutterstock

 

मात्र कॉफी मध्ये जळजळीला प्रतिबंध करणारा ‘ polyphenols’ नावाचा घटक असतो हे विसरून चालणार नाही.

त्यामुळे तुमची सकाळची कॉफी नक्कीच तुमच्या गुडघेदुखीला पळवून लावायला मदत करेल. मात्र दिवसातलं कॉफीचं प्रमाण मात्र नक्कीच नियंत्रित करा.

६. चहा

सगळ्यांचा जीव की प्राण असणारा चहा देखील तुम्हाला उपयुक्त असतो.

 

 

ग्रीन टी , व्हाईट टी आणि ब्लॅक टी ह्यांमध्ये अँटीओक्सिडंटस् कमीजास्त प्रमाणात असतात.

ग्रीन टी मध्ये सर्वात जास्त अँटीओक्सिडंटस् असतात. त्यानंतर व्हाईट आणि ब्लॅक टीचा नंबर लागतो. ग्रीन टी मधील EGCG हा घटक तुमची हाडं व त्याभोवती असलेलं आवरण सुदृढ ठेवण्यास उपयुक्त असतं.

त्याप्रमाणेच सांध्यांमधली जळजळ आणि दुखणं कमी करण्यास त्याची मदत होते.

७. आल्याचा चहा

आलं हे दाहकता कमी करण्यास मदत करतं. आल्यामध्ये prostaglandin and leukotriene तसेच जळजळीस कारण ठरणाऱ्या cytokine ला मज्जाव करण्याची ताकद असते.

 

 

आल्यामधील gingerol सांधेदुखी तसेच जळजळ कमी करण्यास मदत करतं.

त्यामुळे आल्याचा चहा सर्वतोपरी उत्तम म्हणायला हरकत नाही. चहाच नाही तर आलंयुक्त इतर पेयही तुम्ही नक्कीच पिऊ शकता. मात्र सखरयुक्त ginger soda घेऊ नये.

८.चिकन ब्रोथ 

सांधेदुखीसाठी कॅपसुल तसेच पावडर सप्लिमेंट घेतली जाते. त्यात glucosamine and chondroitin he घटक असतात.

 

 

चिकन ब्रोथ मध्येही हे घटक आढळून येतात. म्हणूनच चीकनब्रोथ तुम्हाला दुखण्यापासून रिलीफ देतं.

९.दूध 

लहानपणापासूनच दूध पिण्याची सवय आपल्याला लावली जाते.

दुधामध्ये अनेक पोषमूल्य असतात. दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. ह्यामुळे हाडं मजबूत राहायला मदत होते.

 

theindusparents

 

सांधेदुखी ही हाडांच्या आरोग्यावर अवलंबून असते. त्यामुळे हाडं पूर्णतः निरोगी रहातील ह्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. मात्र दुधाची अॅलर्जी असल्यास हिरव्या भाज्या खाणं पसंत करावं.

थोडक्यात काय तर हाडांना येन केन प्रकारे पोषण मिळणं महत्त्वाचं आहे.

१०. गोळ्यांचा वापर

क्वचित गरज पडल्यास पेन किलर गोळ्यांचा वापर करण्यासही हरकत नाही. परंतु शरीरातील पाण्याचं प्रमाण सुयोग्य ठेवणं हे निरोगी रहण्यामागचं मूळ आहे. म्हणूनच हे घरगुती उपाय नक्कीच फायद्याचे ठरतील.

 

 

तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हालाच त्याचा फरक जाणवेल. आपलं शरीर रुपी यंत्र कायम व्यवस्थित सुरू रहावं म्हणून आपणच योग्य ती काळजी घ्यायला हवी.

गाडीची जशी वेळोवेळी सर्व्हिसिंग करून तिला सुस्थितीत ठेवलं जातं काहीसं तसंच म्हणा ना.!
काय मग हे उपाय कधी करून बघताय? उशीर व्हायच्या आधीच सतर्कतेचं हे पहिलं पाऊल उचला.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version