आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
साऱ्या जगाला ‘इन्व्हेस्टमेंटचा’ वस्तुपाठ घालून देणाऱ्या वॉरन बफे यांच्या काही रंजक गोष्टी जाणून घ्या!
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून श्रीमंत झालेले वॉरन बफे हे आता सगळ्यांनाच माहिती आहेत. गुंतवणूकीबरोबरच व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी जपणारा माणुस अशीही त्यांची ओळख आहे. ‘ओरॅकल ऑफ ओहामा’ म्हणून ओळखले जाणारे वॉरन बफे यांच्याबद्दल अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत.
त्यांनाही सगळ्यांप्रमाणेच आयुष्यातील चढ-उतार यांना तोंड द्यावे लागले. हार्वर्ड बिझनेस स्कूलने त्यांना रिजेक्ट केले होते त्यांच्या सासर्यांनी देखील तू यशस्वी होणार नाहीस, असं सांगितलं होतं.
परंतु स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आणि हुशारीचा वापर करून ते यशस्वी झाले. अजूनही नोकियाचा फोन ते वापरतात.
वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली, या वयामध्ये मुलं साधारणपणे खेळणे किंवा कॉमिक्स वाचणे यात वेळ घालवायचे.
त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा शेअर्स घेतले $38 एक याप्रमाणे सिटी सर्विसेस या कंपनीचे शेअर्स घेतले. वॉरन बफे हे केवळ हुशार नव्हते तर मेहनती देखील होते.
जेंव्हा त्यांचं कुटुंब ओमाहा ला शिफ्ट झालं त्यावेळेस त्यांनी तिकडे सकाळी पेपर टाकायचे काम केले. त्यातून ते महिन्याला १७५ डॉलर मिळवायचे. वापरलेले गोल्फ बॉल्स आणि collector stamps विकूनही त्यांनी पैसे मिळवले.
वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत त्यांच्याकडे ५३००० डॉलर होते. इतक्या कमी वयात यशस्वी झालेले ते कदाचित पहिलेच असावेत.
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी हार्वर्ड स्कूल ऑफ बिझनेस इथे पुढच्या शिक्षणासाठी अप्लाय केलं परंतु त्यांचं सिलेक्शन झालं नाही म्हणून मग त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीत पुढचं शिक्षण केलं. तिकडे त्यांचे आवडते प्रोफेसर बेंजामिन ग्रॅहम आणि डेव्हिड डॉड होते.
वारेन बफे हे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे, यांचं डायट किंवा जेवण बघितलं तर आश्चर्य वाटेल कारण ते रोज कोकाकोला पितात. कधीकधी नाश्त्यासाठी बटाट्याचे स्टिक्सचं एक कॅन संपवतात आणि दिवसभरात काहीतरी गोड आणि एक बाउल आईस्क्रीम खातात.
जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की इतके मीठ असलेले पदार्थ, गोड पदार्थ आणि कोकाकोला तुम्ही घेता तरी तुम्ही इतके तरुण आणि हेल्दी कसे दिसता?
त्यावर त्यांचं म्हणणं होतं की मी याचा अभ्यास केला, आणि कुठल्या वयातली लोकं सगळ्यात कमी दगावतात हे पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं ती सहा वर्षे वयाची मुलांना धोका कमी असतो, म्हणून मग मी सहा वर्षे वयाच्या मुलाचा डायट फॉलो करतो.
इतकी श्रीमंत अरबपती व्यक्ती कशी राहत असेल याचा जर विचार केला तर आपल्या मनात काय येतं, की अशा लोकांची खूप मोठी मोठी घरे असतील, मोठे मेंशनस असतील, प्रत्येक हिल स्टेशनच्या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी घर असेल.
त्यांच्याकडे सगळ्यात महागड्या कार असतील पण त्यांच्या बाबतीत मात्र हे काही खरं नाही ते अजूनही १९५८ साली घेतलेल्या आपल्या पाच बेडरुमच्या घरात राहतात. त्याकाळी त्यांनी ते घर ३१५०० डॉलर्समध्ये घेतले होते.
जेव्हा त्यांनी लग्न करायचं ठरवलं त्यावेळेस त्यांच्या होणाऱ्या सासर्यांनी त्यांना मीटिंगसाठी बोलवलं.आणि वॉरन बफेंशी बोलून त्यांचे भविष्यातील प्लांनस् ऐकून त्यांच्या सासर्यांनी त्यांना सांगितलं की तू यशस्वी होणार नाहीस.
यात माझ्या मुलीला उपाशी मरावं लागेल पण त्यांचं हे म्हणं म्हणणं वॉरन बफे यांनी चुकीचं ठरवलं.
वॉरन बफें बरोबर बोलायला त्यांच्यासोबत जेवायला कुणाला आवडणार नाही? मराठीत यशस्वी माणसाबरोबर बोलल्यानंतर ही बऱ्याच गोष्टी शिकता येतात म्हणून लोक त्यांच्या भेटीसाठी उत्सुक असतात आणि मग अशी भेट जेवणाच्या टेबलवर झाली तर तर!!
लोक पैसे देऊन वॉरन बफें बरोबर जेवणासाठी तयार आहेत हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी असे पैसे घेऊन ते पैसे एखाद्या चँरिटी साठी वापरायचे ठरवले.
आणि सॅन फ्रान्सिस्को ग्लाईड या गरीबी विरुद्ध काम करणाऱ्या या संस्थेला द्मायचे ठरवले. आणि त्यांच्या बरोबर जेवण्यासाठी eBay ऑक्शन सुरू झाले, लोक त्यासाठी बोली लावायचे.
आणि सगळ्यात जास्त बोली लावणाऱ्या माणसाच्या सात मित्रांनाही पुढे त्यांच्याबरोबर जेवण्यासाठी आमंत्रण जायचे. यामध्ये लोक ३.४ दशलक्ष डॉलर पर्यंत बोली लावायचे.
२०१२ ते २०१६ या कालखंडात कालखंडात जवळजवळ वीस दशलक्ष डॉलर हे ‘लंच विथ बफे’ या कार्यक्रमांतर्गत त्या संस्थेला मिळाले.
२०१३ च्या शेवटी त्यांच्याकडे ५९ अब्ज डॉलर इतकी संपत्ती होती. त्याकाळात ते सदोतीस दशलक्ष डॉलर एका दिवसात मिळवायचे. वयाच्या साठाव्या वर्षानंतर त्यांना अजून जास्त पैसे मिळायला लागले.
वॉरन बफे ट्विटर वर आले आणि जगाला माहिती व्हावी म्हणून त्यांचे पहिले ट्विट होतं,” Warren is in house “.
त्यांच्या ट्विटर अकाउंटला १२५ कोटी फॉलोवर्स असूनही ते स्वतः मात्र कोणाचे फॉलॉवर नाहीत. पण त्या अकाउंटवर ही त्यांचे एकूण फक्त नऊ ट्विट्स आहेत आणि तेही त्यांनी लिहिलेले नाहीत.
काळासोबत राहण्यासाठी त्यांनी ते अकाउंट ओपन केलं, तेही त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून. पण त्यावर ते फार वेळ घालवत नाहीत. ई-मेल ही ते फारसे वापरत नाहीत
वॉरेन बॅफे यांच्याकडे २० सूट आहेत. पण त्यांनी एकाही सूट चे पैसे दिलेले नाहीत. मॅडम ली या त्यांच्या सूट डिझायनर आहेत. त्याची एक गमतीदार गोष्ट आहे.
वॉरन बफे हे चीन मध्ये प्रसिद्ध आहेत. एकदा ते चीनमध्ये गेले होते, तिथे हॉटेलमध्ये त्यांच्या रूम मध्ये दोन माणसे आली आणि त्यांनी त्यांचं माप घ्यायला सुरुवात केली
आणि कुठलाही सूट तुम्ही निवडा, मॅडम ली तुम्हाला सूट देऊ इच्छितात असे सांगितले. वॉरन बफे यांनी एक सूट निवडला. नंतर बफे आणि मॅडम ली यांची भेट झाली, त्यांच्यात प्रोफेशनल डीलही झालं आणि पुढे त्यांचे सूट मॅडम ली यांनीच शिवले.
वॉरन बफे दरवर्षी आपल्या एम्प्लॉईज मध्ये एक कॉन्टेस्ट घेतात,ज्यामध्ये त्यांना NACC म्हणजे बास्केटबॉल च्या टीम मध्ये कोणते प्लेयर येतील याचा अंदाज करायचा असतो!
आणि कोणाचे सगळ्यात जास्त बरोबर येतात त्याला काही बक्षीस दिलं जातं. जर एखाद्याने १६ पैकी १६ बरोबर सांगितले तर त्याला दहा कोटी डॉलर बक्षीस त्यांनी ठेवल आहे पण अजून पर्यंत हे बक्षीस कोणी घेतलं नाही आतापर्यंत ५० हजार डॉलर बक्षीस गेलं आहे.
वॉरन बफे यांच्याकडे अजूनही नोकियाचा फ्लिप फोन आहे त्याविषयी त्यांना विचारलं तर ते म्हणतात गंमतीने म्हणतात की,” ग्रॅहम बेलने मला हा गिफ्ट दिला आहे “
यातली गंमत सोडा पण कुठलीही वस्तू ते वीस पंचवीस वर्ष वापरतात, वापरून खराब झाल्यावरच ते ती वस्तू टाकतात.
अगदी त्यांनी अॅपल या कंपनीत एक अब्ज डॉलर गुंतवले आहेत पण फोन मात्र नोकियाचा वापरतात.
वॉरन बफे जेंव्हा अठरा वर्षांचे होते त्यावेळेस त्यांना एक मुलगी आवडायची मात्र त्या मुलीला एक बॉयफ्रेंड होता तिचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी वॉरन बफे यांनी उकुलेले नावाचे एक वाद्य वाजवायला शिकले,
जे त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला वाजवता येत नव्हतं. मात्र त्या मुलीने तिच्या बॉयफ्रेंडला सोडलं नाही पण वॉरेन बफे मात्र आता कधीतरी ते वाद्य वाजवतात.
वॉरेन बफे यांनी त्यांच्या बर्कशायर हाथवे या कंपनीचे ८५ टक्के शेअर्स हे चारिटी साठी राखून ठेवलेले आहेत. बिल आणि मिरिंडा गेटच्या फाउंडेशन साठी त्यांनी १.२ अब्ज डॉलर देणगी म्हणून दिले आहेत.
जेव्हा कोकाकोलाने, चेरी फ्लेवर चीनच्या मार्केटमध्ये आणला, त्यावेळेस मर्यादित काळासाठी कोकाकोलाच्या कॅनवर वॉरन बफे यांचा चेहरा होता. कारण वॉरन बफे चीन मध्ये खूप प्रसिद्ध आहेत.
वॉरेन बफे यांना टीव्हीवरील ‘ ब्रेकिंग बॅड ‘ हा टीव्ही शो आवडायचा ते त्याचे फॅन होते.
कधीतरी मार्केट जेव्हा धडाधड कोसळतं त्यावेळेस वॉरन बफे हे कविता करतात आणि इन्वेस्टरसना धीर देतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.