' कितीही मेहनत घेतली तरी या १३ सवयींमुळे यश नेहमी हुलकावणी देतं! – InMarathi

कितीही मेहनत घेतली तरी या १३ सवयींमुळे यश नेहमी हुलकावणी देतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

यशस्वी माणसाचं आयुष्य सगळ्यांनाच हवं असतं. कारण माणूस ओळखला जातो तो त्यामुळेच. मात्र आपण पाहतो की, काही काही लोक खूप हुशार असतात, पण ते यशस्वी नसतात.

यामागे काही कारणं आहेत, ज्याकडे कदाचित अशा लोकांचा कानाडोळा झाला असेल. म्हणूनच यशस्वी होण्याकरिता या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्या. 

 

१) स्वतःचे निर्णय स्वतः घेत नसाल तर

 

decision making inmarathi
CFA institue blogs

 

लोकांना आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात फार involve करू नका. कारण हे तुमचं आयुष्य आहे.

त्यामुळं जरी ते तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे लोक असतील तरी त्यांना न दुखवता आपल्या निर्णयावर ठाम रहा.

 

२) चुकांमधून शिकत नसाल  तर 

तुम्ही एखादा निर्णय घेतलाय आणि कदाचित त्या वाटेवरून जाणे अवघड आहे याची तुम्हाला कल्पना असेल आणि अपयशाची पण भीती असेल तर त्यावेळेस योग्य वाटेल तो निर्णय घ्या.

 

mistake inmarathi 1
tanias notes

 

परंतु केवळ भितीपायी एखादा निर्णय घेण्यास चुकू नका. कारण प्रत्येक वेळेस मिळणारा अनुभव तुम्हाला समृद्ध करून जातो.

चुकांमधून शिकता येते.

 

३) नकारात्मकता विचार येत असतील तर

 

frustrated employee
classaction.com

 

दिवसभरात तुमच्या मनात किती negative विचार येतात, किती नकारात्मक लोक तुमच्या अवतीभवती आहेत हे पहा.

अशा गोष्टींपासून दूर राहा. कारण नकारात्मकतेचा आपल्या आयुष्यावर फार वाईट परिणाम होतो.

 

४) भूतकाळात रमत असाल तर

बऱ्याचदा आपण पाहतो की, लोक कायम त्यांच्या मागील आयुष्याबद्दल बोलत राहतात.

 

man in past inmarathi
selipan.com

 

कधीकधी हे ठीक आहे परंतु सतत त्याचाच विचार करत राहीलात तर वर्तमानात जगणं अवघड होते म्हणून भूतकाळ विसरा आणि वर्तमानात रहा.

 

५) वेळेचे नियोजन नसेल तर

दिवसभरातल्या वेळेचे नियोजन करा, अगदी प्रत्येक मिनिट कसा घालवणार आहात त्याचा विचार करा.

 

no time management inmarathi
julianne pollan

 

थोडावेळ विचार करण्यात किंवा स्वप्न बघण्यात घालवली तरी कामावर लक्ष केंद्रित करा ज्यामुळे तुमचा भविष्यकाळ चांगला जाणार आहे.

 

६) घडलेल्या वाईट गोष्टींना चिकटून असाल तर

 

Stressed corporate job Feature Inmarathi

 

कधीकधी वाईट गोष्टी आयुष्यात घडतात. त्यामुळे निराशा येऊ शकते. पण आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करा.

आपल्या प्रगतीसाठी वाईट गोष्टींचा अनुभव उपयोगी पडतो.

 

७) अपयशाची भीती वाटत असेल तर

 

fear of failure inmarathi
cbc.co

 

बऱ्याचदा आपण सतत येणाऱ्या अपयशाने खचून जातो आणि प्रयत्न करायचे सोडून देतो.

परंतु कदाचित यश मिळण्यासाठी आणखी एक प्रयत्नच जरुरी असतो जो केला जातं नाही.

याबाबतीत एडिसनच उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचे. हजारवेळा अपयश येऊनही त्याने हार मानली नाही.

 

edison inmarathi
ITC voices

 

८) सोशल मीडियावर खूप वेळ घालवत असाल तर

आपणही बऱ्याचदा सोशल मीडियावर विविध गोष्टींवरून वाद घालत असतो आणि आपलं स्वास्थ्य आणि वेळ हरवून बसतो.

 

social media 4 inmarathi

 

म्हणून अशा गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवून, तिकडे फोकस केंद्रित करून काम केलं आणि आपले छंद जोपासले तर आपला वेळ सत्कारणी लागेल.

 

९) जीवनाचा आनंद घेण्यात कमी पडत असाल तर

नेहमीच कामात व्यस्त असणे फलदायी नसतं, कधीकधी जीवनात हसत खेळत राहण्याने पण जीवनाची लज्जत वाढते.

त्यासाठी एखादा चांगला मूव्ही बघणे, मित्रांबरोबर वेळ घालवणे, मजा करणे यातून पण आपली प्रॉडक्टिविटी वाढते.

 

couple watching movie
masterfile

 

आपल्या भावनांना न दडपता त्यांना मोकळी वाट करून देणं गरजेचं असतं, त्यातूनच तुमची क्रिएटिव्हिटी वाढते.

 

१०) हाती घेतलेलं काम ठराविक वेळेत पूर्ण करत नसाल तर

काही लोक आरंभशूर असतात, कुठलंही काम चालू करायला लगेच तयार होतात आणि कामाला सुरुवात झाली की मात्र पुढे येणाऱ्या अडचणी, संकटं यांची चाहूल लागली की मग त्यापासून पळ काढतात.

 

goals inmarathi
Inc.com

 

ते काम अर्धवट सोडतात. हे असे करणे बरोबर नाही. जर काही करायचे असेल तर आधीपासूनच त्याचे प्लॅनिंग तयार असावे. जेणेकरून, पुढे कितीही संकटे अडचणी आल्या तरी त्यांना तोंड देता येईल.

 

११) काय करायचे आहे याची जाणीव नसेल तर

 

confused boy-inmarathi
ngoexpress.com

 

जर तुम्हाला तुमच्या करिअरची सुरुवात करायची असेल तर त्या करिअर विषयी संपूर्ण माहिती आधीपासूनच घेतली पाहिजे. आज-काल इंटरनेटच्या माध्यमातून जे करिअर करायचे आहे त्याच्या विषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे.

ती सगळी माहिती संकलित करणे आणि त्यावर काम करणे महत्त्वाचे आहे.

 

१२) लोकांपर्यंत पोहचण्याची कला अवगत नसेल तर

नवीन गोष्ट जर तुम्ही चालू केली असेल तर त्यात नीटनेटकेपणा हवा. मात्र केवळ त्यावरच भर न देता तुम्ही जे निर्माण करत आहात त्याच्या क्वॉलिटी विषयी पण काळजी घ्या.

बऱ्याचदा लोक हॉटेल काढतात त्यामध्ये फर्निचर, इंटेरियर हे खूपच आकर्षक असतं, मात्र महत्त्वाचं जेवण खाणं मात्र फार चविष्ट नसतं. त्याऐवजी एखाद्या छोट्याशा गाळ्यामधील वडापाव पण छान असतो.

या दोन्ही उदाहरणांमध्ये तो वडापाव विकणारा आहे तो जास्त यशस्वी होतो, तर हॉटेल काढणाऱ्या माणसाला हॉटेल बंद करायची वेळ येते.

 

१३) कारणे देण्याची सवय असेल तर

आयुष्य जगताना सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो. माझी उंचीच कमी आहे, मला धावताना त्रास होतो, मी छोट्या गावात राहतो, इकडे मला काहीच करता येणार नाही अशा तक्रारी करून काही उपयोग नसतो.

तुम्ही जर असे करत असाल तर तुम्ही फक्त कारणं सांगत आहात. प्रत्येकालाच काही ना काही अडचण नक्कीच असणार आहे.

अमिताभ बच्चन यांनादेखील तुझा आवाज नीट नाही म्हणून बऱ्याचदा ऑडिशन मधून बाहेर काढण्यात काढण्यात आलं. पण तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही आणि आज त्यांचा आवाजच ही त्यांची जमेची बाजू आहे.

confused boy-inmarathi
ngoexpress.com

amitabh bachchan 1 inmarathi

म्हणूनच, आपल्यातील,’स्व’ ला ओळखा आणि आणि यशस्वी व्हा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?