Site icon InMarathi

हे २० फोटो पहा, भारतीय कशाप्रकारे नियम मोडण्यात पारंगत आहेत ते बघाच

epic photos inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखाद्या गोष्टीला विरोध केला किंवा एखादी गोष्ट करू नये म्हटलं की त्याबाबत आपसूकच कुतूहल निर्माण होतं आणि ती गोष्ट करायची इच्छा निर्माण होते.

विरोध पत्करून असं करण्यात एक वेगळाच पराक्रम गाजल्यासारखा त्यांना वाटतो. काही गोष्टी ह्या गमतीशीर असतात तर कधी कधी काही गोष्टी बघून आपण निःशब्द आणि हतबल होतो.

तर आज आपण असेच वीस फोटो बघणार आहोत ज्यात आपल्याच बांधवांनी नियम कसे धाब्यावर बसवले आहेत ते आपल्याला दिसून येईल.

१.

 

ह्या फोटोत चक्क स्त्रियांच्या राखीव आसनावर पुरुषमंडळी बसल्याचं दिसून येतंय. इतकं स्पष्ट लिहूनही आम्ही ह्या गावचेच नसल्याच्या आविर्भावात  ते बसल्याचं दिसतंय.

अशा गोष्टी आपल्याला वारंवार दिसून येतात. कधी बसमधे तर कधी मेट्रोत. वेळप्रसंगी महिलांनी पुरुषांना राखीव असनांवरून उठवल्याच्याही घटना आपण पहिल्या असतील.

त्यावेळी त्यांचा झालेला खजील चेहराही आपल्यापैकी अनेकांना ज्ञात असेल.

२.

 

“रस्ता सोडून आता ह्या बाईक्स फूटपाथ वर यायला लागल्या तर हे विधात्या आम्ही रस्त्यावर झोपणाऱ्यांनी काय करावं? कोणी रिकामं फूटपाथ देतं का फूटपाथ?” अक्षरशः असा डायलॉग लिहायची वेळ आली आहे, असं हा फोटो बघून वाटतं.

रस्त्यावर ट्रॅफिक जॅम असल्यावर सर्रास असे बाईकस्वार असा शॉर्टकट निवडताना आपण पाहिले असतीलचं.

३.

kuttysuvar.com

 

(अ) स्वच्छ भारत अभियान? आता हे दृश्य काही आपल्याला नवखं नाही आणि म्हणूनच आपण स्वच्छ भारत अभियान हाती घेतलंय की अस्वच्छ भारत अभियान तेच कळत नाही.

कचरापेटी असूनही त्याच्या सभोवताली कचरा टाकण्यात काय समाधान मिळतं देवच जाणे. ‘आम्ही बदलणार नाही’ असं ठरवलेल्या माणसांचं करायचं तरी काय?

४.

 

बसायला आसन नाही म्हणून काय झालं? अहो आम्ही आमचं स्वतःच आसन घेऊन फिरतो! बॉस ये पोर्टेबल चिझो का जमाना है.

एखाद्या गोष्टीतून तोडगा कसा काढावा ते ह्या माणसाकडून शिकावं.

५.

 

महिला सबलीकरणाचं हे अगदीच उत्तम उदाहरण म्हणता येईल. डिवायडरच्या पलिकडे स्कुटी उचलून नेण्यातही आम्ही कमी नाही हेच जणू त्यांना दर्शवायचं असेल.

६.

 

 

आम्हाला पाळणा इतका आवडतो की मोठं झाल्यावरही आम्हाला तो सोडवत नाही. अगदी बालपणीचा दोस्त अशा गरजेच्या वेळी उपयोगी पडल्याचं दिसतंय ह्यात.

ह्यांच्या कल्पनाशक्तीला सलाम.

७.

 

गाडी चालवताना फोनवर बोलणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच.

त्या “हेल्मेट” ला चलेजाव म्हणायलाही मागेपुढे बघणार नाही.

८.

 

पुन्हा येरे माझ्या मागल्या. आता स्त्रियांच्या डब्ब्यात ह्या पुरुषांचं काय काम? पण तरीही नाममात्र राखीव डब्ब्यात पुरुष मंडळींनी शिरकाव केला आहे.

९.

 

आता कायद्याच्या रक्षकांनीच कायदा हातात घेत नियम मोडले तर भाबड्या जनतेनं करायचं तरी काय?

पण अंगावर वर्दी आहे म्हणजे आम्हीच हिरो आणि आम्ही करू ते योग्य असाच काहीसा attitude ह्यांचा दिसून येतोय.

१०.

 

धूम 4 चं शूटिंग सुरू झालं की काय????

ह्या फोटीतली व्यक्ती हा असा काही स्टंट करतेय की ते बघून नक्कीच ह्याला चित्रपटात रोल मिळवायचा असेल असं वाटतंय.

गाडी चढवण्यासाठी ते बांधलंय असंच दिसतंय.

११.

 

 

‘यहा पेशाब करना (मना?) है. ‘तो’ mana’ अनेकजण वाचूनही न वाचल्यागत करतात आणि रस्त्याचं शौचालय करून मोकळे होतात.

आणि वर हीच मंडळी नाक दाबून दुर्गंधी आली की टीका करतात. मात्र स्वतः मध्ये काडीचाही बदल करत नाहीत.

१२.

 

 

माणसांपेक्षा प्राणी बरे म्हणतात ते काय उगीच? अहो मनुष्य प्राण्याला बुद्धीचं मिळालेलं वरदान तो वाया घालवतोय आणि तो बिचारा मुका जीव मात्र (आवश्यकता नसूनही) नियम पाळताना दिसतोय.

काय म्हणावं याला? शिका शिका! प्रण्यांकडून काहीतरी शिका!

१३.

 

एकतर आपल्याला चपला नीट रांगेत काढणं म्हणजे नक्की काय असतं हेच ठाऊक नसतं आणि जरी असलं तरीही आपल्याला ते करायचं नसतं.

चपला वाट्टेल तशा भिरकावण्यात आणि जिथे काढू नये तिथे काढण्यातच आपल्याला अमाप आनंद मिळतो!

१४.

 

असा पार्किंग मध्ये ‘नो पार्किंग’ चा बोर्ड कोणी लावतं का? हा रस्ता आमचा आहे आम्ही पार्क करणारच आणि रस्ताही अडवणारच.

त्यामुळे ट्रॅफिक झालं तरी आम्हीच शिव्या घालणार. (नो पार्किंग मध्ये गाड्या पार्क करणं अगदीच सवयीचं झालंय)

१५.

 

 

रोहित शेट्टी यांचा mtv वर सध्या चाललेला खतरों के खिलाडी हा शो बघून आम्हालाही भलतचं स्पुरण चढलंय. पुढच्या पर्वात सहभागी होण्यासाठी जणू तयारीच सुरू आहे.

१६.

 

 

आजकाल फूड ट्रक वगैरे आपण बघतोच.ही जणु चालती फिरती भाजी मंडई असल्या सारखीच वाटतेय नई?

१७.

 

“यात्री कृपया ध्यान दे” हे जणू आपल्याला पाठच झालेलं असतं. मात्र काही जणं त्या सुचनेकडे कानाडोळा करत आपल्याला हवं ते करतात.

मित्रांनो ट्रेनच्या आतमध्ये बसायचं असतं वर नव्हे.!

१८.

 

 

ह्या कृती बद्दल बोलावं तरी काय? आपल्या पानाच्या लाल लाल पिचकाऱ्यांनी नको तिथं होळी खेळणारे महाभाग आजही बघायला मिळतात.

त्यांच्या दारात अशी कृती करून ‘होळी है’ ओरडायची वेळ आली आहे.

१९.

 

असं म्हणतात की, पुरुषात पण स्त्री दडलेली असते. म्हणूनच की काय पण कदाचित ही सर्व मंडळी स्त्रियांच्या बस मधून प्रवास करतायत.

तुम्हाला स्त्री कशी दिसेल? ती दडलिये ना.

२०.

 

 

आता कुठे फोटो काढायला बंदी आहे असं विचारलं तर नीट दाखवता यावं म्हणूनच की काय पण हा फोटो काढण्यात आला आहे.

आपल्याकडे सगळंच ‘जनहित मे जारी’ असतं नाही का?

हे असे अनुभव आपल्याला नेहमीच येत असतात. कधी ह्या वागण्यावर हसू येतं तर कधी डोक्याला हात लावायची वेळ येते.

मित्रांनो, आपल्यामुळे दुसऱ्यावर अशी वेळ येणार नाही एवढी दक्षता मात्र नक्की घ्या! घ्याल ना?

सर्व छायाचित्रांचा स्रोत : kuttysuvar.com

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version