Site icon InMarathi

२९ फेब्रुवारी ही तारीख चार वर्षांनीच का येते? वाचा, लीप इअर बाबतच्या या इंटरेस्टिंग गोष्टी

29th feb inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस येतात, त्यालाच लीप वर्ष म्हणतात हे सगळ्यांना माहीतच आहे. पण हे असं का झालं? दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस येतात, तर मग दर चार वर्षांनी एक दिवस अधिक करायचं कारण काय?

सगळ्यांनाच माहीत आहे की, पृथ्वी सूर्याभोवती साधारणपणे ३६५ दिवसात एक फेरी पूर्ण करते.

 

physics college

 

पण जर अगदी अचूक अंदाज काढायचा म्हटलं तर तर तिला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला साधारणपणे ३६५ दिवस पाच तास ४८ मिनिट आणि ४६ सेकंद लागतात. हे इजिप्शियन सम्राट ज्युलियस सीझरने दाखवून दिले.

म्हणून सगळ्यात कमी दिवस असलेल्या फेब्रुवारी महिन्यात एक दिवस दरवर्षी ॲड करण्यात आला. मग हे लीप ईयर ओळखायचं कसं, त्याचे मापदंड काय ठरवायचं!

 

the independent

 

तर ज्या वर्षाला ४०० ने भाग जातो ते वर्ष ‘लीप ईयर’ असं ठरवण्यात आले. मात्र आता असणाऱ्या ग्रेगेरियन कॅलेंडर मुळे वर्षाच्या दिवसांची गणना अचूकपणे करता येते.

त्यांनी असं सांगितले की, जे शतकी वर्ष असेल ते मात्र लीप ईयर नसेल म्हणजे २१०० हे साल लीप वर्ष नसेल.

हे लीप वर्ष सुरु झालं आणि त्याबरोबरच काही गमतीशीर गोष्टी त्याच्याशी जोडल्या गेल्या.

पोप ग्रेगेरियन दिलेल्या लीप इयरच्या सल्ल्याची इंग्लंडमध्येच सुरुवातीला खिल्ली उडवली गेली. इंग्लंड मधील एका नाटकात यावरून एक विनोद आला की,

“आजच्या दिवशी स्त्रियांनी स्वतःचे कपडे विकून पुरुषांसारखा पोशाख करावा आणि पुरुषांसारखं वागावं.”

अर्थात हे नाटक व्यंगात्मक होतं. मात्र तिथल्याच स्त्रीवादी चळवळीतील स्त्रियांनी ही कल्पना उचलून धरली आणि २९  फेब्रुवारी हा दिवस प्रपोज करण्यासाठी ठेवला.

 

आणि स्त्रिया त्यादिवशी आपल्या बॉयफ्रेंडला प्रपोज करायला लागल्या. समजा जर त्या पुरुषाने प्रोपोजलला होकार नाही दिला तर त्याला शिक्षा म्हणून एक किस देणे, सिल्क ड्रेस आणि बारा हातमोजे यांचे जोड त्या मुलीला द्यावे लागायचे.

आजही इंग्लंडमध्ये काही ठिकाणी २९ फेब्रुवारी हा दिवस बॅचलर्स डे म्हणून सेलिब्रेट करतात.

जगामधील चार लाख लोक हे लीप डे म्हणजेच २९ फेब्रुवारीला जन्मले आहेत.

 

birthday wishes expert

 

२९ फेब्रुवारी ला जन्मलेले प्रसिद्ध लोक हे खूप कमी आहेत. भारताचा विचार केला तर भारताचे माजी पंतप्रधान मुरारजी देसाई हे २९ फेब्रुवारीला जन्मले होते.

 

free press journal

 

परंतु ज्योतिषांच्या मते २९ फेब्रुवारी ला जन्मलेले लोक हे अत्यंत बुद्धिमान किंवा कुठल्याही वेगळ्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करतात.

उदाहरणार्थ पिकासो, २९ फेब्रुवारी ला जन्माला आणि प्रसिद्ध चित्रकार म्हणून जगला.

 

discover walks

 

ग्रीसमध्ये २९ फेब्रुवारी हा दिवस लग्नासाठी टाळला जातो कारण त्यांच्या प्रथेनुसार हा एक वाईट दिवस आहे.

नॉर्वेच्या कॅरिन हेंरिक्सेन या महिलेने तिच्या तीन मुलांना २९ फेब्रुवारी ला जन्म दिला. एक मुलगी २९ फेब्रुवारी १९६० साली जन्मली तर एक मुलगा २९ फेब्रुवारी  १९६४ आणि दुसरा मुलगा २९ फेब्रुवारी १९६८ साली जन्मला.

२९ फेब्रुवारी चा योगायोग एका माणसाच्या आयुष्यात चांगलाच आला. २९ फेब्रुवारीला जन्माला येणं एक वेळ आपण समजू शकतो मात्र २९ फेब्रुवारीला जन्म होऊन २९ फेब्रुवारीलाच मृत्यू येणं हे मात्र जरा अशक्य वाटतं.

पण हे घडलं टास्मानियाचा प्रधान ‘सर जेम्स विल्सन’ याच्या बाबतीत. तो २९ फेब्रुवारी १८१२ साली जन्मला आणि २९ फेब्रुवारी १८८० साली मृत्यू पावला.

 

तैवान मध्ये लग्न झालेल्या मुली लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात आपल्या माहेरी रहात नाहीत. कारण त्यामुळे आई वडिलांची तब्येत बिघडते असा समज आहे.

रशियामध्ये लीप वर्षाला अशुभ मानतात त्यावर्षी हवामान बिघडतं अशी त्यांची श्रद्धा आहे यावर्षी येणारे वाटाणे आणि बीन्स हे चुकीच्या पद्धतीने उगवतात असा त्यांचा समज आहे.

अमेरिकेतही लीप वर्षाला अशुभ वर्ष मानतात.

हाँगकाँगमध्ये २९ फेब्रुवारीला जन्मणाऱ्या मुलाचा वाढदिवस एक मार्चला करतात तर न्यूझीलंडमध्ये २९ फेब्रुवारीला जन्मणाऱ्या बाळाचा वाढदिवस २८फेब्रुवारीला करतात.

लंडनमध्ये लीप वर्षाच्या नावाने एक कॉकटेल प्रसिद्ध आहे त्याला ‘लीप डे कॉकटेल’ असे म्हणतात.

 

culinary ginger

 

ज्यात लेमन ज्यूस, जिन, ग्रँड मर्नियार वगैरे गोष्टी मिक्स करून घेतलं जातं आणि पिताना म्हटलं जातं,”it’s like a marriage in your mouth”

लीप वर्ष शुभ की अशुभ यावर वाद आहेत प्रत्येकाला ते कसं जाईल हे माहिती नाही मात्र जर तुम्ही एक वर्षासाठी तुरुंगात कैदी म्हणून असाल तर मात्र तुमच्यासाठी ते अशुभ आहे. कारण तुमचा कैदेतला एक दिवस वाढतो.

तसंच जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला पगार मिळत असेल तर ह्या वाढीव दिवसाचा पगार काही तुम्हाला मिळत नाही.

लीप वर्षाच्या इतिहासात काही काही महत्त्वाच्या गोष्टी जरूर घडल्या आहेत . बेंजामिन फ्रँकलिन यांनी १७५२ साली विजांमध्ये इलेक्ट्रिसिटी असते हे दाखवून दिलं.

कॅलिफोर्नियामध्ये सोन्याची खाण १८४८ मध्ये सापडली. सगळ्यांना माहीत असलेलं टायटॅनिक हे जहाज १९१२ साली बनलं आणि समुद्र सफरीला निघालं आणि त्यातच त्याचा अंतही झाला.

 

gettysburg.edu

 

असं हे लीप वर्ष आणि त्याच्या कथा. काही गमतीदार, तर काही विचार करायला लावणाऱ्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version