' धक्कादायक वास्तव : यशासाठी, “टॅलेंट”पेक्षा या १३ गुणांची जास्त गरज असते! – InMarathi

धक्कादायक वास्तव : यशासाठी, “टॅलेंट”पेक्षा या १३ गुणांची जास्त गरज असते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

यशस्वी व्हायला कोणाला नाही आवडत? आजच्या युगात तर प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे आणि प्रत्येकाला ती जिंकायची आहे. शिक्षणा, कला, व्यवसाय, नोकरी सगळीकडे स्पर्धा आणि जिंकण्याची धडपड!

यश सहजासहजी मिळतं का? ह्याचे उत्तर साहजिकच ‘नाही’ असंच येईल. मग काय….? तर यश मिळण्यासाठी नुसते टॅलेंट उपयोगी नाही ना!

त्यासाठी काही गुण हवेत मग ती हुशारी आणि हे गुण ह्यांच्या ताळमेळाने यश हमखास मिळते. मग हे गुण कोणते ते आपण आता जाणून घेऊया

प्रामाणिकपणा :

 

honesty inmarathi
ward family law group

 

आपल्याला एखाद्या कामात यश मिळवायचे असेल तर जे काम आहे ते प्रामाणिकपणे करावे. प्रामाणिकपणाने केलेल्या कामाचे यश दीर्घकालीनच नाही तर सर्वत्र वाहवा मिळवून देणारे असते.

प्रामाणिक मनुष्याला सर्वत्र गौरविले जाते. त्याच्यावर विश्वासाने कामे सोपवली जातात.

सहानुभूती :

 

empathy inmarathi
business envati tuts

 

दुसऱ्याच्या भावना जाणून घेणे, त्याच्या भावनांची कदर करणे म्हणजेच सहानुभूती. आयुष्यात यशस्वी व्ह्यायचे असेल तर अंगी सहानुभूती हवीच. दुसऱ्याचा विचार केला तर आपोआप आपण स्वार्थीपणा सोडून काम करू लागतो.

समोरच्याचे दुःख, वेदना जाणल्या तर आपोआप आपण त्याचे दुःख दूर व्हावे ह्यासाठी प्रयत्न करतो आणि यशाच्या जवळ जातो.

आपलं अस्तित्त्व दर्शविणे :

 

ranveer-inmarathi

 

आत्ताच्या युगात दर्शविणे (showing up) ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. जसे, एखादी कंपनी आपले उत्पादन कसे श्रेष्ठ आहे, ते किती फायदेशीर आहे, इत्यादी गोष्टींची जाहिरात करते तेव्हाच त्या उत्पादनाची विक्री वाढते.

त्याप्रमाणेच आपणही आपल्या अस्तित्त्वाची, गुणांची जाणीव करून द्यायची.

कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही :

 

women empowerment 3 inmarathi
bollywoodcat

 

आपण हातात घेतलेले काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचेच असा निश्चय करायचा. काहीही झाले तरी काम अर्धवट सोडायचे नाही. म्हटलेच आहे ना….

प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः
प्रारभ्य विघ्नविहिता विरमन्ति मध्याः।
विघ्नैः पुनःपुनरपि प्रतिहन्यमानाः
प्रारब्धमुत्तमजनाः न परित्यजन्ति॥

अर्थात्, विघ्न येईल ह्या भीतीने अधम लोक काम सुरूच करत नाहीत, कामाच्या मध्येच जर अडथळा आला तर मध्यम, साधारण लोकं ते काम अर्धवट सोडून देतात,

तर  कितीही वेळा विघ्ने आली तरी उत्तम लोकं सुरू केलेलं काम अर्धवट सोडत नाहीत. ज्यामुळे ते हमखास यशस्वी ठरतात.

‘धन्यवाद’ म्हणणे :

 

thank you inmarathi
thoughtco

 

अर्थात् ज्या लोकांनी आपल्याला वेळोवेळी मदत केली आहे, जे आपल्याला पाठिंबा देतात त्यांना धन्यवाद देणे, त्यांचे आभार मानणे.

ज्यांनी वेळप्रसंगी सहकार्य केले आहे त्यांना थॅंक्यू म्हणावे. त्यांच्यांबद्दल कृतज्ञता बाळगावी.

म्हणजेच ज्यांच्यामुळे आपल्याला यशाचा मार्ग मिळण्यास मदत झाली आहे त्यांचे आभार मानावेत.

वेळ पाळणे :

 

work-timer InMarathi
Hubstaff Blog

 

आपल्याला यश मिळवायचे असेल तर वेळ पाळणे अत्यावश्यक आहे. वेळेवर काम करणे हे यशस्वी माणसांचे लक्षण आहे.

स्पर्धा परीक्षा आहे १०:०० ची आणि एखादा पोहोचला १२:०० वाजता तर त्याला परीक्षा देता येईल का? नाही ना?

वेळेचे महत्त्व समजून घेणे खूप गरजेचे आहे. यश मिळवायचे तर वेळ पाळायलाच हवी.

प्रयत्न सुरू ठेवणे :

 

practice inmarathi
inc.com

 

एखाद्या कामात पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे होईलच असे नाही ना? एखाद्या वेळी अपयश येते पण म्हणून प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत.

एकदा एका चिमणीने घरटं बांधायला सुरुवात केली, वाऱ्याने तिने आणलेल्या फांदीवर ठेवलेल्या काटक्या सतत पडत होत्या पण चिमणीने प्रयत्न सोडले नाहीत तिने पुनः पुनः काटक्या आणल्या आणि अखेरीस छानसे घरटे बांधून तयार झाले.

आपल्या भोवतालच्या निसर्गातून खूप काही शिकता येते त्यातलीच ही एक गोष्ट!

आपणही एकाच झटक्यात चालायला लागलो का? नाही ना…. पडत, धडपडत प्रयत्न करून करूनच चालायला लागलो ना! मग हेच प्रयत्न कामाच्याही बाबतीत सुरू ठेवायला काय हरकत आहे? यश मिळणारच!

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता… किंवा प्रयत्नांती परमेश्वर ह्यासारख्या म्हणी कायम स्मरणात ठेवाव्यात.

प्रोत्साहन :

 

encouragement inmarathi
health essentials

 

यश मिळावे म्हणून प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असते. जसे, एखादा खेळाडू धावण्याच्या शर्यतीत धावत असेल आणि त्याला प्रोत्साहन म्हणून त्याला पाठिंबा देणारे त्याच्या नावाचा जल्ल्लोष करायला लागले तर त्याला प्रेरणा मिळते.

प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहन हे नेहमी सकारात्मकच ठरते. यशाकडे घेऊन जाणारे ठरते.

सकारात्मक दृष्टीकोन :

 

think positive inmararthi
paradigm san fransisco

 

आपल्याला जे काम करायचे आहे त्या कामाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. ज्यामुळे त्या कामाचा आपल्याला कंटाळा येणार नाही आणि वेळेत किंवा वेळेआधी सुद्धा ते काम पूर्ण होऊ शकते.

आपल्या कामाबाबत आपण जेवढे सकारात्मक राहू तेवढे आपल्याला ते काम करण्यास हुरूप येतो आणि सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या तब्येतीवर, शरीरावरही सकारात्मक परिणाम होतो.

कंटाळवाणे, निरुत्साही न वाटता प्रसन्न, उत्साही आणि आनंदी वाटेल. ह्यामुळे कामही योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने होईल.

अभिप्राय ऐकणे :

 

office inmarathi

 

आपल्या कामाची पावती म्हणजेच अभिप्राय! हा अभिप्राय कधी कधी प्रिय असू शकतो तर कधी अप्रिय! तर आपण कोणताही अभिप्राय शांतपणे ऐकून घ्यावा.

प्रिय अभिप्राय तर हवाहवासाच वाटतो पण….. अप्रिय अभिप्रायही ऐकून घ्यावा जेणे करून आपल्या कामात अचूकता येईल. समोरचा आपली चूक दाखवत असेल तर ते ऐकून घावी आणि परत ती चूक करण्याचे टाळावे.

 

ऊर्जा :

 

Office Fitness inmarathi
office fitness classes

 

कोणतेही काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी एनर्जी म्हणजेच ऊर्जा अत्यंत गरजेची असते. उत्साह, ऊर्जा असेल तरच कामाचा आनंद घेता येतो आणि कामात यश पण मिळण्यास मदत होते.

ऑफिसमध्ये बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही व्यायाम करून ऊर्जा मिळवू शकता.

कामात झोकून देणे :

 

office 1 inmarathi
livemint

 

आपल्याला जे काम मिळालंय किंवा आपण जे काही करत आहोत त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावे म्हणजे यश हमखास मिळते. इतिहासात ह्याचे खूप दाखले आहेत.

स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे ह्यांनी तहान भूक विसरून, दिवस-रात्र एक करून प्रयत्न केले तेव्हा त्यांच्या मेहनतीला यश मिळाले.

शास्त्रज्ञ हेही कामात झोकून देणारेच असतात त्यामुळेच ते निरनिराळे शोध लावू शकतात.

चिकाटी आणि मेहनत :

 

ants inmarathi

 

चिकाटी आणि मेहनत ही यशाची गुरुकिल्लीच म्हणायला हवी. चिकाटी आणि मेहनत ह्यामुळे मधमाशी मध गोळा करू शकते. एवढीशी मुंगी पण ती ही आपले अन्न मेहनतीने आणि चिकाटीने गोळा करते.

म्हणजेच मेहनत आणि चिकाटीने यश हमखास मिळते.

हे आहेत यश मिळवून देणारे गुण जे सगळ्या महान, यशस्वी लोकांमध्ये दिसून येतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?