Site icon InMarathi

रेल्वेमधील AC I, II आणि III tier मधला नेमका फरक काय? नीट समजून घ्या…

train-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येकानेच कधीना कधी तरी रेल्वेतून प्रवास केला असेल.

जवळचा प्रवास असेल तर सहसा आपण जनरल डब्यातून प्रवास करतो पण प्रवास एका दिवसापेक्षा जास्त असेल तर मात्र रिझर्वेशन शिवाय पर्याय नाही.

 

 

मग अश्यावेळी आपण कोणत्या क्लासचे तिकीट बुक करावे बरं? या संभ्रमात पडतो.

सहसा लोक स्लीपर क्लासकडेच मोर्चा वळवतात. बाकी रेल्वेच्या इतर क्लासेसचे बुकिंग करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कारण त्या इतर क्लासेसचे तिकीट जास्त असते आणि मुख्य म्हणजे आपल्याला त्या क्लासेस बाबत पुरेशी माहिती देखील नसते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज हीच माहिती आम्ही तुमच्या समोर उलगडणार आहोत.

जेव्हा तुम्ही रेल्वेचं तिकीट बुक करता किंवा खरेदी करायला जाता तेव्हा तुमच्यासमोर एकूण ७ रेल्वे क्लासेसचे पर्याय असतात. ते क्लासेस म्हणजे –

AC 1 TIER (1 AC)

AC 2 TIER (2 AC)

AC 3 TIER (3 AC)

NON-A/C SLEEPER

A/C CHAIR CAR (CC)

NON-A/C CHAIR CAR (SS) आणि

UNRESERVED!

आता आपण या AC 1, 2 आणि 3 tier मधला फरक जाणून घेण्यासोबत इतरही क्लासेस बद्द्ल माहिती घेऊया.

AC 1 TIER :

 

 

AC 1 TIER मध्ये प्रवाश्याला स्वतंत्र छोटेखानी खोली दिलेली असते. ज्यात चार किंवा दोन बेड असतात. याचे दरवाजे तुम्ही बंद करू शकता.

सोबतच विमानात जशी attendant असते तसे मदतनीस देखील दिलेली असते.

AC 1 TIER मधून प्रवास करणं अतिशय सुखाचं आणि आरामदायक असतं. यातील बर्थ सीटमध्ये देखील कन्व्हर्ट करता येतात.

या क्लासचे डब्बे केवळ लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्येच आढळून येतात आणि याच्या तिकीटाची किंमत AC 2 TIER च्या दुप्पट असते.

तुम्हाला कोणतीही गरज भासल्यास attendant तुमच्या सेवेमध्ये हजर होते. तुमचे बेड लावून देण्यापासून ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट बसल्या जागी आणून देण्याचे काम हे attendants करतात.

यामध्ये असणाऱ्या बेडजवळ reading light आणि तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चार्ज करण्यासाठी एक स्वतंत्र पावर प्लग दिलेला असतो. वॉशरूम वेस्टर्न स्टाईलचे असतात आणि वेळोवेळी स्वच्छ केलेले असतात.

AC 1 TIER तुम्हाला कुठेही घाण दिसणार नाही हे विशेष!

AC 2 TIER 

 

 

AC 2 TIER आणि AC 1 TIER मध्ये काही मोठा फरक नाही.

फक्त यात तुम्हाला खोलीचा दरवाजा बंद करण्याची सोय आणि सामान ठेवण्यासाठी अधिकची जागा दिली जात नाही. पण यातून प्रवास करणे देखील आरामदायक ठरतं.

तुम्हाला बेडमध्ये AC 1 TIER प्रमाणे उशी, ब्लँकेट आणि बेडशीट दिली जाते.

AC कमी अधिक प्रमाणात करता येतो. तसेच या क्लासमधील बर्थ देखील सीटमध्ये कन्व्हर्ट करता येतात. AC 2 TIER मध्ये reading light असतो.

परंतु इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चार्ज करण्यासाठी दिलेला पावर प्लग हा चार प्रवाश्यांना शेअर करावा लागतो. इथे इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही प्रकारचे वॉशरूम उपलब्ध करून दिले जातात.

AC 3 TIER 

 

हे ही वाचा – जगातल्या या अद्भुत रेल्वेतून प्रवास केलात, तर वा-याच्या वेगात पोहोचाल

AC क्लासेसमधील सर्वात स्वस्त क्लास म्हणजे AC 3 TIER होय. या क्लासची फक्त एकच त्रासदायक गोष्ट आहे ती म्हणजे यात 2×2 सिटींग ऐवजी 3×2 सिटींग असते.

स्लीपर क्लासप्रमाणे या क्लासची सिटींग अरेंजमेंट असते. त्यामूळे AC 2 टायर आणि AC 1 TIER पेक्षा AC 3 TIER मध्ये जास्त प्रवासी असतात.

AC 2 TIER आणि AC 1 TIER प्रमाणे AC 3 TIER च्या खिडक्यांना सुरक्षा पडदे लावलेले नसतात.

परंतु एक चांगली गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळेस प्रवाश्यांना बेड पुरवला जातो.

या क्लासमधील चार्जिंग प्लग्ज हे इतर प्रवाश्यांबरोबर शेअर करावे लागतात. बहुतांश वेळा ते बंदच असतात! इथे इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही प्रकारचे वॉशरूम उपलब्ध करून दिलेले असतात.

आता तुम्हाला AC 1, 2 आणि 3 tier मधला फरक नक्कीच कळला असेत आणि त्यांच्या भल्यामोठ्या किंमतीं मागची कारणे देखील लक्षात आली असतील.

आता वळूया रेल्वेच्या इतर क्लासेसकडे!

 

NON-A/C SLEEPER

 

 

या क्लासमध्ये 3×2 चा 3 TIER सिटींग फॉर्मेट असतो आणि AC ची सोय नसते.

याची तिकीटही सर्वसामन्यांना परवडण्याजोगी असल्याकारणाने या क्लासमध्ये प्रवाश्यांची मांदियाळी पाहायला मिळते.

या क्लासमध्ये रात्रीच्या वेळेस बेड दिला जात नाही. त्यामुळे रात्रीची झोप व्यवस्थित काढायची असेल तर बसल्या जागी डुलक्या मारण्याचं तंत्र शिकलेलं बरं!

कधीकधी वेटिंगमध्ये तिकीट असणारे आणि काही फुकटे थेट या स्लीपर क्लासमध्ये शिरतात आणी टी.सी. ला विनंती करुन किंवा दंड भरून आरामात हळूहळू स्थिरस्थावर होतात.

त्यामुळे NON-A/C SLEEPER क्लासचा प्रवास म्हणावा तितका सुखाचा आणि आरामदायक नसतो. या डब्ब्यांची स्वच्छता नावापुरती केली जाते. खिडक्या देखील साध्या स्वरूपाच्या असतात.

पंखे चालू होतील की नाही याची शाश्वती देता येत नाही. येथे देखील इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही प्रकारचे वॉशरूम उपलब्ध करून दिले जातात.

हे ही वाचा – भारतीय रेल्वेच्या RORO सेवेबद्दल तुम्हाला किती माहिती आहे?

A/C CHAIR CAR (CC)

 

 

लहान पल्ल्यांच्या गाड्यांना हे क्लास जोडलेले असतात. वारंवार प्रवास करणाऱ्या सुखवस्तू प्रवाश्यांसाठी A/C CHAIR CAR हा क्लास परिपूर्ण ठरतो.

विमानाप्रमाणे या क्लासची सिटींग अरेंजमेंट असते आणि समान ठेवण्यासाठी वरच्या बाजूस जागा दिलेली असते. येथे एक चार्जिंग पॉइंट तीन प्रवाश्यांना शेअर करावा लागतो. १ तासापेक्षा कमी प्रवासासाठी या क्लासने प्रवास करणे सुखाचे ठरते.

वॉशरूम इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही प्रकारचे असून वेळोवेळी स्वच्छ केले जातात.

 

NON-A/C CHAIR CAR (SS)

 

 

NON-A/C CHAIR CAR क्लास हा A/C CHAIR CAR क्लासपेक्षा अतिशय वाईट अवस्थेत असतो.

येथे चार्जिंग पॉइंट मिळणे देखील दुरापास्त असते. वॉशरूमची अवस्था देखील अतिशय वाईट असते.

परंतु कमी तिकीट किंमतीमुळे आणि लहान प्रवासामुळे प्रवाशी या क्लासला जास्त पसंती देतात.

UNRESERVED

 

 

UNRESERVED म्हणजे जनरल क्लास! याबद्दल तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही.

अस्सल भारतीय गर्दीचा अनुभव घ्यायचा असेल तर UNRESERVED क्लासशिवाय पर्याय नाही. यात जो पहिला घुसेल त्याला सीट मिळते.

बहुतांश “साहसी प्रवासी”  तर दरवाज्यालाच आपली सीट मानतात. त्यामुळे यापुढे रेल्वे प्रवास करताना आपल गरज. प्रवासाचं ठिकाण आणि खर्च या सगळ्याचा विचार करून योग्य त्या क्लासचं तिकीट काढा

===

हे ही वाचा –रेल्वे स्टेशनच्या बोर्डवर समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते, का ते जाणून घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version