' अमेरिकेच्या CIA नुसार, भारतात UFO (एलियन्सचं यान) येऊन गेलं आहे! – InMarathi

अमेरिकेच्या CIA नुसार, भारतात UFO (एलियन्सचं यान) येऊन गेलं आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका – अभिज्ञा अदवंत

===

एलियन्स म्हणजे गुढ! असं गुढ  ज्याची सत्यता आपल्यासारख्या सामान्यांना पडताळता येत नाही. त्यांच्याशी निगडित सिनेमे निघतात. त्यांची चर्चा होते पण सरतेशेवटी ते अस्तित्वात आहेत की नाही ह्याबाबत परत तेवढेच साशंक असतो जेवढे सुरुवातीला असतो.

 

aliens-attack-inmarathi01

 

पण आता असे काही कागदपत्र समोर आलेत, ज्यावरून तुमचं मत बदलू शकेल.

१८ जानेवारी २०१७ रोजी अमेरिकेच्या केंद्रीय अन्वेषण विभाग (CIA) ने काही गुपित कागदपत्रे उलगडली आहेत. त्या कागदपत्रांची संख्या ९,३०,००० आहे. ज्यांच्या द्वारे १९६८ नंतर भारतावरून एकूण सहा वेळेस UFOs दिसल्याचे नमूद केले आहे. ह्याने जगभरात तर खळबळ उडाली आहेच पण भारतातसुद्धा ह्या बातमीची दाखल घेतली गेली आहे.

 

 

UFO-Meersburg-marathipizza

 

१९६८ साली एप्रिल महिन्याच्या रिपोर्टनुसार – लडाख च्या काही भागावरून एलियन्स ची स्पेसशिप दिसल्याची नोंद आहे. नंतरच्या काही महिन्यात हीच रिपोर्ट सिक्कीम, भूतान आणि नेपाळ च्या भागांमधून आल्याचे सांगितले जाते.

आताशा CIA ने एलियन्स चा विषय सोडला आहे (किमान तसं भासवतात तरी!). पण १९५० आणि १९६०च्या दशकात एलियन्स दिसण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या होत्या. तेव्हा CIA ने ह्याचा धसका घेतला. आणि त्यांच्या विज्ञान विभागातील तज्ज्ञांचे एक Advisory पॅनल बनवले. ज्यांचं काम फक्त ह्या घटनांवर संशोधन करणे हे आहे.

CIA च्या ह्या रिपोर्ट चं नाव आहे –

Particulars of bright objects seen over south Ladakh, north east Nepal, north Sikkim and western Bhutan.

तांत्रिक शब्दांत बघायला गेलं तर रिपोर्ट्स सांगतात, १ मार्च १९६८ रोजी एक वस्तू आकाशात दिसली. पूर्वेकडून पश्चिमेकडे चांगला, फुकचे ह्या लडाखच्या भागावरून जाताना आढळली. त्या वस्तूची नोंद रिपोर्ट अशी घेते,

 

aliensa InMarathi

 

One white light and simultaneously two blasting sounds were heard. Also, one reddish light followed by white smoke

म्हणजेच, दोन स्फोटांच्या आवाजासोबत एक प्रकाशमान वस्तू दिसली. ती वस्तू मागून एक लालसर लाईट आणि पांढरा धूर सोडून गेली.

 

UFO sighting marathipizza

 

त्यानंतर UFOs निदर्शनास आले ते २५ मार्च १९६८ रोजी नेपाळ मधल्या कास्की जिल्ह्यातून. बघणाऱ्यांनी वर्णन करताना ‘तेजस्वी वस्तू, जिच्यातून प्रकाश सारखा लुकलुकत होता’ आणि ते पुढे जाऊन ‘कोसळले.’ CIA च्या रिपोर्टमध्ये ‘सहा फूट रुंद आणि चार फूट उंच अश्या एका मोठ्या डिश सारख्या धातूच्या बनलेल्या यानाचे तुकडे’ बाल्टीचौर पाशी मोठ्या खड्ड्यात सापडले.

यासोबतच अजून दोन अशाच घटना घडल्या जिथे UFOs दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले होते. एक ४ मार्च आणि दुसरी २५ मार्च रोजी. लडाखवरून जाणारं हे UFO, रॉकेटसारख्या दिसत आणि त्यामागून १८ मीटर लांब धूसर पिवळी शेपूट सोडत डेमचोक गावाकडे जाताना दिसले.

 

aliens 1 InMarathi

 

जमिनीपासून जवळपास वीस ते पंचवीस हजार फूट वरून जात असल्याची नोंद रिपोर्ट मध्ये आहे.

पुढे १९ फेब्रुवारी १९६८, नेपाळच्या ईशान्येकडे तसेच सिक्कीम च्या उत्तरेकडे ‘a fast-moving and bright object’ दिसल्याची नोंद आहे. रात्री ९ वाजता हे object सिक्कीमच्या लाचुंग, लाचेन, थांगु, मुगुथांग या भागावरून गेलं. विजेच्या कडकडाटासारख्या आवाजासोबत सगळ्या भागाला प्रकाशमान करून गेलं.

===

===

या घटनेच्या तिसऱ्या दिवशी – २१ फेब्रुवारी ला सुद्धा एक वस्तू रात्री ९.३० वाजता भुतानच्या राजधानी, थिंपूवरून जात असताना दिसली. निळसर प्रकाश असलेल्या ज्या UFO सारख्या वस्तूने आवाज ना करता सुसाट वेगाने गेली. तिचा प्रकाश एवढा होता की त्याने भूतानचा सगळा भाग प्रकाशित झाला.

CIA ने उघड केलेल्या कागदपत्रांमध्ये पुढे झालेली कारवाई आणि शास्त्रज्ञांनी त्यावरून काढलेले निष्कर्ष अजूनही गुपित ठेवले आहेत. तसेच नेपाळच्या कास्की येथील विवरांमधल्या अवशेषांचं पुढे काय झालं हे सुद्धा अजून गूढ आहे.

 

aliens 2 InMarathi

 

पुढे मंगळावरील मनुष्य – अंतराळयान ह्यांच्याशी निगडित अनेक अनुमान लावल्या गेले. अंतराळात एलिअन्स असल्याच्या कथा सुद्धा ऐकवल्या जाऊ लागल्या पण त्यांचं खंडन CIA ने १९५२ च्या रिपोर्टमध्ये निष्कर्ष दिला तो असा,

Even though we might admit that intelligent life may exist elsewhere and that space travel is possible, there is no shred of evidence to support this theory at present.

म्हणजे अंतराळात आपल्या पेक्षा प्रगत जीवसृष्टी अस्तित्वात आहे. तसेच अंतराळप्रवास शक्य असल्याची पुष्टी देता येईल. पण त्याला आधार द्यायला प्रबळ पुरावा नाहीये.

 

aliens-attack-inmarathi02

 

CIA च्या सल्लागार कमिटीने ATIC (Air Technical Intelligence Centre) सोबत काम करताना ह्या सर्व घटनांचा अभ्यास आणि त्यांचा पृथ्वीला असलेला धोका ह्यावर संशोधन केलं. आणि काही मिटींग्स नंतर निष्कर्ष निघाला की,

ह्या घटनांचा पृथ्वी आणि रहिवासी यांना प्रत्यक्ष काहीही धोका नाही.

पण म्हणजे परग्रहवासियांचं भारतावर जास्त प्रेम आहे, असं का? – नाही!

UFOs दिसण्याच्या घटना दक्षिण कोरिया, इरान, मोरोक्को, कझाकिस्तान स्पेन आणि रशिया या देशात सुद्धा झाल्या.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?