मधमाश्यांचे अस्तित्व अतिआवश्यक, त्यांच्याशिवाय होतील हे गंभीर परिणाम!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“जर मधमाश्या या भूतलावरून नामशेष झाल्या तर मानव फक्त जास्तीत जास्त चार वर्ष या पृथ्वीवर जिवंत राहू शकतो”अल्बर्ट आईन्स्टाईनचं हे वाक्य आपण कुठे ना कुठे ऐकलं किंवा वाचलं असेलच!
सृष्टीच्या जीव चक्रात एकूण एक सजीव हा एकमेकांना कोणत्या न कोणत्या प्रकारे अवलंबून असतो. शाळेत आपण हे शिकलेल आहोतच.
तर, या जीवचक्रातला एक जरी जीव कमी अथवा जास्त झालं की सृष्टीचं संतुलन हे बिघडतं. या थिअरी वर आईन्स्टाईनचं हे वक्तव्य अवलंबून होतं.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
पण, जीव शास्त्रज्ञांच्या मते आईन्स्टाईनच्या या वक्तव्याला आधार नाही. मात्र आईन्स्टाईनची ही थिअरी खरी निघाली तर? बघूया मधमाश्या नामशेष झाल्या तर काय आणि कोणत्या प्रकारच्या परिणामाला आपल्याला सामोरे जावे लागेल.
जस आपल्याला माहीत आहे, मधमाश्या या आकाराने जरी लहान असल्या तरी त्यांच्या समूहाने अशक्य अशी भरपूर काम केलेली आहेत.
–
- नर माश्यांशी समागम ते रोज हजारो अंडी; वाचा, कसं असतं आयुष्य ‘राणी माशी’चं!
- मधमाश्या जपण्यासाठी ‘मॅकडॉनल्ड’ ने उचललेले हे पाऊल खूप कौतुकास्पद आहे!
–
मध साठवण्यापासून ते फुल-फळांच्या योग्य वाढी पर्यंत, मधमाश्या जर नामशेष झाल्या तर?
१. मध मिळणे काय मध पाहणे दुर्मिळ होऊन जाईल.
शुद्ध मध हे मधमाश्यांच्या पोळ्यातूनच मिळतो. जर मधमाशाच नसतील तर मधाचा गोडवा चाखता येणार नाही.
धातूचा शोध लागल्यापासून मानव मध गोळा करून त्याचा वापर करतोय.हजारो वर्षापासूनचा हा शेती सोबतचा जोड धंदा आहे.
फुलांच्या आणि फळांच्या शेतीसाठी मधमाश्या या आवश्यक आहेत.परागकण एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहचविण्याचं काम तेच चोख पार पाडत असतात.
जगभरात एकूण ९४.५ हजार मेट्रिक टन इतकं मधाच उत्पादन घेतले जाते.
हजारो करोडचा वार्षिक टर्न ओव्हर मध मार्केट हे होत असत.
त्यामुळे मधमाश्यांशिवाय आपल्याला हेल्दी आणि टेस्टी प्रॉडक्ट मिळणार नाही, शिवाय अब्जावधीचा बिझनेस पाण्यात जाईल ते वेगळं.
२. फुल आणि फळ वाढायची बंद होतील.
संयुक्त राष्ट्र संघाच्या रिपोर्ट नुसार जगात होणाऱ्या एकूण फूड सप्लाय (पीक उत्पादन) पैकी ७०% पीक उत्पादनाला मधमाश्या जबाबदार आहेत. ते पराग कणांच्या वहनांच्या त्यांच्या कार्यमुळे.!
सुका मेवा तर मार्केट मधून गायबच होईल! काजू,बदाम,अंजीर,खजूर आणि बरेच. शिवाय मसाल्याचे पदार्थ,कॉफी हे सुद्धा मधमाश्या सोबत नामशेष होऊन जातील.
३. नैसर्गिक लागवडी साठी मानवाला स्वतःला मेहनत घ्यावी लागेल.
डोंगर-दऱ्या मध्ये ट्रेकिंग ला किंवा फिरायला गेल्यावर जे जंगली फळांचा आपण आस्वाद घेतो ते या मधमाश्यामुळे!
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फळ आणि फुल वाहून नेण्यासाठी मानवाला स्वतःला मैदानात उतरावं लागेल.
४. डेअरी प्रॉडक्ट्सला फटका
आता तुम्ही म्हणाल, दुधाचा आणि मधमाश्यांचा काय संबंध.? तर, गायी जो चारा किंवा गवत खातात त्याच्या वाढीसाठी सुद्धा मधमाश्याच जबाबदार असतात.
अमेरिका/युरोपात डेअरी गायींना अल्फाल्फा जातीच गवत दिलं जातं. जे पूर्णपणे मधमाश्यांच्या परागीभवनावर अवलंबून आहे.
मधमाश्यांशिवाय या गवतांच उत्पादन घेणं अशक्य आहे. या गवतामुळेच या गायीचं पोषण योग्य प्रकारे होत. युरोप-अमेरिकेत जे बीफ खाल्लं जात त्यातल्या १७% या डेअरी गायीचं असत. विचार करा, या गायीचं पोषण हे गवतावर आणि हे गवत मधमाश्यांवर किती अवलंबून आहे ते!
तसेच काही ठिकाणी दुधात बदामाचं पाणी मिसळून ते घट्ट करून विकल जातं.
दुधाची क्वालिटी वाढवण्यासाठी आणि किंमत कमी करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. जर मधमाश्याचं नसतील तर बदाम कुठून येणार?
५. कापूस शेतीवर परिणाम.
प्रत्येक झाडाचा केवळ खाद्यपदार्थांसाठीच नाही, तर त्याचे इतरही अनेक उपयोग केले जातात. उदाहरणार्थ कापूस! कापसाचे परागीभवन पण मधमाश्यांच्या माध्यमातूनचं होतं.
कापसाचं मेन ऍप्लिकेशन आहे कपडे बनवण्यासाठी. विचार करा कपड्याशिवाय आजच्या घडीचा माणूस.
आता तुम्ही म्हणाल कापसा व्यतिरिक्त पण आर्टीफिशियल धाग्यांनी पण कपडे बनतातचं ना? पण मित्रांनो, रोजच्या वापरातले अंतर्वस्त्रे, पायातले सॉक्स, उन्हापासून संरक्षण देणारे कॉटनचे कपडे याला कापूसचं लागतो.
त्याशिवाय, हात रुमाल,बेडशीट,लहान मुलांचे डायपर,टिश्यू पेपर ऑर टॉयलेट पेपर हे कापसा पासूनच बनतात.!
मधमाश्यांच्या शिवाय कापूस सुद्धा इतिहास जमा होईल!
६. आहारात बदल
१०० मधली ७० पीक अशी आहेत जी मधमाश्यांच्या माध्यमातून परागीभवनामुळे चांगली उगवतात.
या ७० पिकांमध्ये आपल्या रोजच्या आहारात जी प्रथिने असतात तिचा समावेश असतो. आता प्रथिनेसाठी मांसाहार हा पर्याय ठरू शकतो. पण जास्त मांसाहार हा अनेक रोगांना निमंत्रण आहे हे जगजाहीर आहे.
मानवी आरोग्याला आहारात सुद्धा वेरीएशन ची गरज असते.ती मिळाल्यावर मानवी शरीराची योग्य वाढ ही होत असते. आणि यासाठी मधमाश्यांची गरज आहेच!
७. अन्नधान्याची किंमत आकाशाला गवसणी घालेल
आता पर्यंतच्या जी यादी आपण पाहिली त्यात या ना त्या प्रकारे नैसर्गिक खाद्यपदार्थ यावर मधमाश्यांचा प्रभाव दिसला. जर ते नसतील तर काय परिणाम होईल ते पण पाहिलं. आणि मागणी जास्त,पुरवठा कमी तर किंमत ही वाढतेच! मग ते काहीही असो!
२०१२ मध्ये स्कॉटलंड मध्ये तीन चतुरतांश मधमाश्या या मारल्या गेल्या होत्या, त्यावर्षी जीवनावश्यक वस्तूंचा दर हा भयानक वाढलेला.
आणि तेव्हापासून स्कॉटलंड वासी हे मधमाश्यांच्या जतनाला आपलं कर्तव्य मानू लागले.
८.कुपोषण
२०१२ च्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या रिसर्च नुसार मधमाश्या या व्हिटॅमिन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम युक्त बीजांचं परागीभवन मोठ्या प्रमाणात करत.
आवश्यक अन्न घटक आणि त्या मार्फत प्रथिने,जीवनसत्व यांचा अभाव नक्कीच कुपोषणाला निमंत्रण देतो. त्याशिवाय स्कर्वी, बेरिबेरी सारखे रोग पण आहेतच.
हे सर्व आपल्याला आजारी,बोरिंग आणि अशक्त बनवते. जखम बरी होण्यास जास्त वेळ लागेल. काही लोकांना सामान्य सर्दी सारख्या सामान्य आजारांना फेस करण्यास त्रास होईल.
–
- चक्क मधमाश्यांसाठी सुरु झालाय जगातलं सर्वात छोटं “मॅक्डोनाल्ड रेस्टोरंट”!
- घराघरांत मधमाशांची पोळी लावून ही कंपनी कमावतीये पैसा, जोडीला पर्यावरण रक्षणपण!
–
आणि विशेष गोष्ट म्हणजे मध या दोन्ही समस्यांना औषध म्हणून उत्तम आहे.! अन्न धान्यात जास्तच कमतरता राहिली तर कॅन्सर सुद्धा लांब नाही.
९. संभाव्य आर्थिक मंदी
कॉफी,मध,कापड इंडस्ट्री तर रातोरात बंद होतील. भारतासारख्या ज्यांची शेतीप्रधान अर्थव्यवस्था आहे ती कोसळायला कितीसा वेळ लागेल?
इंडस्ट्री मध्ये कापड इंडस्ट्री चं उदाहरण घेऊ. अमेरिका कापड उत्पादनात जगात तिसरी आहे.सव्वा लाख कामगार आणि १२५ बिलियन डॉलरची इंडस्ट्री क्षणात कोसळेल.
डेअरी इंडस्ट्री. भारत जगातला सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश.
१ करोड दूध उत्पादक शेतकरी,९६००० लोकल डेअरी, १७० युनियन, १५ राज्य युनियन आणि ५% वार्षिक विकास दर यासोबत १०५२७ बिलियन रुपयेचं मार्केट!
एवढा मोठा कारभार हा क्षणात मातीमोल. करोडोच्या घरात जर बेरोजगारी असेल तर अर्थव्यवस्था किती वेळ तग धरेल.?
१०. दुष्काळ
आता निसर्गात एवढी उलाढाल होत असताना परिणामी दुष्काळ आहेच. जीव चक्रात बदल टेंड्स टू नॅचरल क्रायसेस. दुष्काळाला निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. पिकांचं कमी उत्पादन,पिकांचा नाश म्हणजे दुष्काळी लक्षण.
त्यामुळे मधमाश्या लहान जरी असल्या तरी त्यांच्या नाशा नंतर मानवी जीवन किती वेळ टिकाव धरू शकेल.! एका अर्थाने अतिशयोक्ती नाही पण आईन्स्टाईनचं म्हणणं थोडंफार हे सिद्ध होऊ शकतं!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.