मूल होत नाही म्हणून टेस्टट्यूब बेबीचा विचार करताय? मग हे कायदे तुम्हाला माहीत हवेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
बाळाची चाहूल लागणं हा वैवाहिक जीवनातील एक खूप आनंदाचा क्षण असतो.
विवाहानंतरचं पुढचं पाऊल म्हणजे आईवडिल होण्याचं स्वप्न. काही जोडपी तातडीने बाळाचा विचार करतात, तर काहींना प्लॅनिंगची गरज भासते.
मात्र हल्ली स्पर्धेच्या धावत्या युगात बाळाचा विचार काही वर्ष लांबणीवर टाकण्याकडे अनेक जोडप्यांचा कल असतो. करिअरच्या रेसमध्ये टिकण्यासाठी गरोदरपणासाठी वेळ नाही असं महिला स्पष्टपणे सांगतात.
काहीअंशी हे कारण योग्य असलं, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाढतं वय, स्ट्रेस, बदलती जीवनशैली यांमुळे महिलांमधील प्रजनन क्षमता घटत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आई वडील होण्याचे हे भाग्य सर्वच जोडप्यानं सहजासहजी मिळत नाही.
अशा वेळी अनेकांकडे कृत्रिम गर्भ धारणेशिवाय पर्याय नसतो. गेल्या काही दशकात यावर भरपूर संशोधन झालं आहे आणि त्यामुळे नवनवीन शोध लागले आहेत.
ह्या सर्व प्रकारात डॉक्टर कडून योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे असते. भारतामध्ये अलीकडे सर्रास ह्या टेकनॉलॉजि चा वापर केला जातोय. परंतू ह्या विषयी अजूनही जनमानसात अनेक गैरसमज आहेत.
फारसे कायदे या बाबतीत झालेले नाहीत. मात्र केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये 19 फेब्रुवारी रोजी ART विधेयक संमत झाले आहे. हे विधेयक आता लोकसभेमध्ये आणि राज्यसभेत मंजूर झाल्यावर, राष्ट्रपतींच्या सही नंतर संविधानातील कायदा बनेल.
===
हे ही वाचा – प्रेग्नन्सीमध्ये येणारं नैराश्य टाळा, होणाऱ्या आईसोबत कुटुंबियांनी घ्यावयाची काळजी!
===
कृत्रिम गर्भधारणे विषयी अनेक नियम ह्यात नमूद करण्यात आले आहेत. 2008 पासून ह्यावर काम चालू होते आणि आता हा कायदा अंतिम टप्प्यात आला आहे.
ह्या कायद्याच्या मदतीने कृत्रिम गर्भधारणा पद्धतीला कायद्याची चौकट मिळणार आहे. ह्या पद्धतीचा गैरवापर होऊ नये तसच ह्याचा अवलंब करणाऱ्या कुणाचीही फसवणूक होऊ नये हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे.
ह्या कायद्याबद्दल अधिक जाणून घेवू
कृत्रिम गर्भधारणेच्या तिन्ही प्रकारांचा ह्यात समावेश करण्यात आला आहे.ह्या
1.इन विट्रो फ़र्टिलाइजेशन (IVF)- ह्या पद्धतीत स्री बीज आणि पुरुष शुक्राणू यांच्या पासून गर्भाशयाच्या बाहेर भ्रूण बनवून नंतर ते गर्भाशयात सोडले जातात.
2. इंट्रा यूटेराइन इनसेमिनेशन (IUI) –
स्री गर्भाशयात पुरुषाचे शुक्राणू सोडले जातात( ह्यात नवरा किंवा पार्टनर आणि अनोळखी शुक्राणू दाता दोन्हीपैकी काहीही असू शकत.
3. क्रायो प्रिजर्वेशन
पुरुष शुक्राणू आणि स्री बीज ह्यांना फ्रिज करून ठेवले जाते, जेणेकरून भविष्यात भ्रूण बनवण्यासाठी त्यांचा वापर करता येतो.
तसच ह्यात सरोगसीचा देखील समावेश करण्यात आला आहे.
ह्या प्रस्तावात पुढील बाबी चा समावेश आहे.
===
हे ही वाचा – कृत्रिम शुक्राणूंचा शोध लागलाय, प्रयोग म्हणून सुरु असलेलं उंदीर प्रजनन यशस्वी होतंय!
===
1. केंद्र सरकार National Advisory Board for Assisted Reproductive Technology ह्या नावाने एक महामंडळ नेमेल. ज्यात २१ सदस्य असतील.
2. हे महामंडळ ART सुविधा देणाऱ्या दवाखाने व इस्पितळावर अंकुश ठेवेल. तिथले सर्व कामकाज नियमाप्रमाणे होत आहे किंवा नाही याची शहनीशा करेल.
तेथील कर्मचारी नेमणूक कशा पद्धतीने केली जाते. कुठली टेक्नॉलॉजी वापरली जाते,तसेच योग्य ट्रेनिंग दिले जाते की नाही ह्या सर्व बाबी हे महामंडळ तपासेल, शिवाय या क्षेत्रातील संशोधनावर भर देण्यात येईल.
3. भ्रूण संशोधना करता कोणती टेक्नॉलॉजी वापरली जात आहे , आणि ती टेक्नॉलॉजी कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही हे पडताळले जाईल. कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होत नाही, हे काटेकोरपणे पाहण्यात येईल.
4. राज्य पातळीवर असेच महामंडळ बनवले जाईल.
5. ART क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व clinics ना महामंडळात रजिस्टर करावं लागेल.
6. शुक्राणू बँक आणि स्री बीजावर संशोधन करणाऱ्या प्रत्येक क्लिनिक ला देखील ह्या महामंडळामध्ये रजिस्टर करणे बंधनकारक असेल.
7. ह्या सर्व रजिस्टर्ड संस्थांवर ह्या प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती देणे हे बंधनकारक असेल. संस्थेमध्ये ART साठी येणाऱ्या सर्व रुग्णांना ह्या प्रक्रियेचे फायदे आणि नुकसान दोन्ही बाबत माहिती द्यावी लागेल. संस्थेला त्यांच्याकडे येणारे शुक्राणू आणि स्री बीज दोन्ही संपुर्ण पडताळणी नंतरच स्वीकारता येतील.
8. कोणत्याही ART क्लिनिकला ही प्रक्रिया सुरु करण्याआधी लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
9. शुक्राणू देणाऱ्या पुरुषाचे वय २१ ते ४५ च्या दरम्यान असावे. स्रीबीज देणाऱ्या स्री चे वय २१ ते ३५ असावे.
असे ह्या विधेयकात नमूद करण्यात आले आहे . वयाची अट काटेकोर पणे पाळण्यात येईल. शिवाय स्री आणि पुरुष दोघांची ही संपूर्ण शारीरिक आणि मानसिक चाचणी करून त्यांना कसलाही आजार नसल्याची खात्री करण्यात येईल.
10. पुरुष डोनर जास्तीत जास्त ७५ वेळा दान करू शकतो.
11. स्री डोनर संपूर्ण आयुष्यात जास्तीत जास्त ६ वेळा स्रीबीज दान करू शकते आणि दोन डोनेशन मध्ये कमीत कमी ३ महिन्याचे अंतर अत्यावश्यक असेल.
12. पुरुष वीर्याचा एक नमुना एका वेळी एकाच स्री साठी वापरता येऊ शकतो .
13. ह्या संपूर्ण प्रक्रिये मध्ये दात्याचे नाव आणि त्याची ओळख , तसेच रुग्णाचे नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल.
14. वरील नियमांचे उल्लंघन करताना दोषी आढळ्यास तीन वर्ष कारावास आणि दंड भरावा लागेल , दुसऱ्यांदा हाच गुन्हा करताना आढळ्यास ५ वर्ष कारावास आणि दंड होऊ शकतो.
देशात ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संथांचा एक डेटा बेस बनवण्यात येईल. आणि त्यांच्यावर काटेकोर पणे देखरेख करण्यात येईल.
===
हे ही वाचा – मुलगा होणार की मुलगी, हे कसं काय ठरतं? वैज्ञानिक उत्तर जाणून घ्या!
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.