Site icon InMarathi

“सोनं सापडलं!” – ऐकून बरं वाटतं! पण सोनं शोधण्याची ‘ही’ रंजक प्रक्रिया जाणून घेतलीत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जागतिक बाजारपेठेत सोन्याला नेहमीच खूप मागणी असते.

सोन्याचे भाव रोजच वरखाली होत असतात मात्र अलीकडे ते भलतेच चढे आहेत. रोजच्या बातम्यातही आज सोने ५०० रुपयांनी वधारले, तर कधी १०० रुपयाने घसरले हीच माहिती मिळते.

भारतात सोन्याच्या दागिन्यांना प्रचंड महत्त्व आहे. कुठलंही लग्नकार्य असो किंवा इतर काही धार्मिक कार्य, सोन्याचे दागिने हवेतच. सोन्याचे दागिने घालून मिरवायची इथल्या स्त्रियांना भारी हौस आहे. हल्ली ही हौस पुरुषांमध्येही दिसते.

पण हे सोनं कसं आणि कुठे मिळतं? सोन मिळवण्यासाठी काय करावं लागतं याची माहिती आता आपण पाहू.

 

 

 

जर तुम्ही Discovery किंवा History channel पहात असाल तर त्यावरील ‘ ट्रेजर हंट ‘ किंवा ‘ गोल्ड रश’ असे प्रोग्राम्स पाहिले असतील तर त्यात सोनं मिळवण्यासाठी काय काय करतात याची साधारण कल्पना येते.

जर सोनं कसं मिळतं ते जर पाहायचं असेल तर आपल्याला काही नवीन ठिकाणं शोधण्याची गरज नाही कारण सर्वसामान्य व्यक्तीला याबद्दल फारसे माहीत असण्याचं तसं काही कारण नाही.

 

 

आधी ज्या ठिकाणी सोने मिळाले आहे त्याचं ठिकाणी थोडेफार सोने मिळू शकतं.

पृथ्वीवर सोनं कोणकोणत्या ठिकाणी मिळू शकतो याची माहिती आपल्याला सध्या गुगल मॅप्स वरून मिळते. कुठेकुठे सोन्याच्या खाणी आहेत याची माहितीही आधुनिक तंत्रज्ञानामुळे मिळवणे सोपं झाल आहे.

केवळ एक छंद म्हणून किंवा एक वेगळा अनुभव घ्यायचा आहे म्हणून सोनं मिळणाऱ्या एखाद्या ठिकाणी (ज्वेलर्सचे दुकान सोडून) सोनं मिळतंय का यासाठी प्रयत्न करायला जाणं हा एखाद्या सुट्टीचा आनंद घेण्याचा भाग असू शकतो.

सोन्याच्या खाणी ज्या भागात आहेत त्या भागातला खडक हा कोणत्या प्रकारचा आहे हे कळलं, की मग खडकावरून सोने कुठे मिळेल याचा अंदाज बांधता येतो.

सोन्याच्या खाणींच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती ही कोणत्या प्रकारची आहे हे लक्षात घेणे उपयोगाचे ठरतात. जर खडकांमध्ये ग्रॅनाईट, स्किस्ट आणि गिनिस असतील तर, तिकडे तर तिथे सोने मिळण्याची शक्यता अधिक असते.

 

 

जमिनीवरील माती ही साधारणतः लाल रंगाची आणि जांभळ्या रंगाची असते. काही काही विशिष्ट वनस्पतींच्या जवळही सोनू मिळू शकते, फक्त ती वनस्पती किंवा गवत माहीत असायला हवे. एकूणच याबाबत थोडा अभ्यास असावा लागतो.

सोनं मिळण्याचा आणखी एक महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे पाणी.

जगातल्या कुठल्याही वाहत्या नदीच्या पाण्यात सोनं मिळू शकते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही नदीवर गेलात आणि थोड्या शोधानंतर तुम्हाला सोनं मिळणार आहे.

सोनं मिळेल या आशेवर तुम्ही संपूर्ण आयुष्य घालावलंत तरी तुम्हाला त्या नदीत सोन मिळणार नाही. परंतु प्रत्येक नदीत थोडं तरी सोन असतंच, असं भूगर्भीय अहवाल सांगतो.

 

 

सोनं मुळात तयार होण्याकरिता, तिथला खडक जास्त तापमानाला गरम व्हावा लागतो आणि लागलीच थंड व्हायला लागतो. पृथ्वीच्या पोटातील उष्णतेमुळे सोन्याचे साठे तयार झाले आहेत आणि बरचसं सोनं हे खडकाला चिटकून असतं. त्यामुळे त्या खडकावर प्रक्रिया करून सोनं काढणं कठीण काम आहे. त्या खडकाचा भुगा करून तो भुगा पाण्याने धुवून त्यातून सोने वेगळे केले जाते.

जुन्या वर्तमानपत्रातील लेख, भूशास्त्रीय खाण अहवाल, सरकारी अहवाल यातूनही सोन्याच्या स्त्रोतांचा उगम कळू शकतो.

पूर्वीच्या ठिकाणी कुठे खोदकाम झालेले आहे हे कळते आणि मग तिकडे जाऊन सोन्याचा शोध घेता येतो. परंतु जमिनीत खूप खाली खाली जर सोन मिळत असेल तर त्यासाठी खाण तयार करावी लागते.

एक लक्षात घेतले पाहिजे, की ज्या ठिकाणी सोनं मिळतंय, सोन्याच्या खाणी आहेत त्याठिकाणी सहजासहजी प्रवेश मिळत नाही.

 

 

तिथे बरीच कडक सुरक्षा व्यवस्था असते. सार्वजनिक क्षेत्रात उत्खनन करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते आणि तेही जर तुमच्याकडे उत्खननासाठी खूप मोठी साधने नसतील छोटीशीच काही असतील तर तुम्हाला तिथे उत्खनन करण्यासाठी, थोड्यावेळाकरता उत्खननाची परवानगी दिली जाते.

ज्या ठिकाणी कमी उत्खनन झाले आहे अशा दुर्गम ठिकाणी जाऊन उत्खनन केल्यास सोने मिळण्याची शक्यता जास्त असते. परंतु सोबत जर कोणी जोडीदार असेल तर त्याच्यासोबत जाणे जास्त चांगले कारण निर्जन ठिकाणी तुमच्यावर हल्ला होण्याची शक्यता असते.

सोनं शोधायला जाताना तुमच्या सोबत एक मजबूत वाहन, जेवणाची काही पॅकेट्स, फर्स्ट एड बॉक्स, जीपीएस नकाशा, होकायंत्र, बॅटरी, चांगले बूट, योग्य कपडे, बॅकपॅक सन स्क्रीन लोशन गोष्टी आपल्याजवळ असलेल्या बऱ्या.

बऱ्याच ठिकाणी नदीच्या पात्रातील वाळूमध्ये तुम्हाला सोन्याचे काही नगेट्स लगेच मिळू शकतात त्यावेळेस आपल्या सोबत एक चाळणी असेल तर तिचा उपयोग होतो. कारण सोनं हे जड असल्यामुळे ते वरती राहतो आणि बाकीची वाळू खाली पडते.

अधिक सोने मिळण्यासाठी किंवा अधिक सोने मिळाले असेल तर ते साफ करण्यासाठी आणि इतर धातू, माती यापासून वर्गीकृत करण्यासाठी मोठी यंत्र वापरावी लागतील. हायबँकर सारखी यंत्रे इकडे उपयोगी येते, तसंच आपल्या सोबत जर एखादे छोटे मुलं आले तरी त्यांनाही हे काम करायला मजा येते.

समुद्रकिनार्‍यावरील वाळूत ही सोने मिळण्याची शक्यता अधिक असते. अलास्का येथील बीच वर खूप प्रमाणात सोने मिळालं आहे. मिळालेलं सोनं एखाद्या योग्य व्यक्तीला (मुळरुपातील सोन्याचं संग्रह करणाऱ्या) विकणं श्रेयस्कर असतं. ज्वेलर्सकडे गेलात तरी तो ते सोनं वितळवून पाहणार तसंच त्यापासून दागिने तयार करण्यासाठी आपल्याला मिळालेले सोने वितळवावे लागेल आणि त्यात १५ ते २० टक्के घट होऊ शकते.

सोन्याचा शोध कायम घेऊ नका कारण आधी सोने मिळालेल्या ठिकाणी अजून सोने मिळणे अवघड असते. म्हणून त्यातच वेळ घालवू नका एखाद्या ठिकाणी भरपूर प्रमाणात सोनं सापडलं तर लोकांना फारशी माहिती होणार नाही याची काळजी घ्या आणि ते क्षेत्र आपल्या नावावर करून घ्या जेणेकरून पुढे काही उत्खनन करता येईल.

जगभरात असलेल्या सोन्याच्या खाणी आणि सोने उत्पादन करणारे देश- 

सगळ्यात जास्त सोनं उत्खनन हे चीनमध्ये होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, रशिया, अमेरिका, कॅनडा, इंडोनेशिया, पेरू, साऊथ आफ्रिका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं सापडते.

भारतात कर्नाटकमधील कोलार आणि रायचूर या शहरांमध्ये सोने सापडते तसेच झारखंडमध्ये चांदील येथे सोने सापडतं.

 

 

भारतात सोने मिळण्यासाठी सोन्याचा स्त्रोत कमी असला तरी भारतातील जवळजवळ प्रत्येक कुटुंबाकडे अगदी कमीतकमी एखाद्या तरी ग्रँमचा साठा असतोच, तर जास्तीतजास्त काही किलो सोने असते.

भारतात लोकांकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचा जर विचार करायचा झाला, तर त्यावर एखाद्या छोट्या देशाची अर्थव्यवस्था उभी राहू शकेल.

 

 

पूर्वीच्या काळी जेव्हा खाणीत काम करणाऱ्या लोकांसाठी कमी साधने होती त्यावेळेस खाण कामगारांचे भयानक हाल व्हायचे. खाणीत कमी असणारा ऑक्सिजन, धूळ, सुरुंगाच्या स्फोटाने निर्माण होणारं रेडिएशन यामुळे ते खाण कामगार फारतर ३५-४० वर्ष जगायचे.

पण सोनं मिळवण्याची हाव काही माणसाची सुटली नाही. जिकडे सोनं आहे याची जरा जरी माहिती मिळाली की माणूस त्यामागे धावतो. बऱ्याच ठिकाणचा त्याबाबतचा इतिहास रक्तरंजित आहे.

ऑस्ट्रेलियाचा शोध अगदी अलीकडील काळातला १८ व्या शतकातला. १८५६ साली तिथल्या Bendigo आणि Ballarat प्रांतात सोनं आहे याची माहिती झाली. आणि जगभरातून लोक तिकडे गेले.

सोन्याचा इतका मोठा साठा होता, की तिकडे अक्षरशः लूट सुरू झाली. नंतर ब्रिटिशांनी तिकडे खाण काढून त्यावर नियंत्रण मिळवलं. पण पुढच्या १०० वर्षात त्या खाणीतील सोनं जवळ जवळ संपवून टाकलंय.

 

 

आता ते टुरिस्ट स्पॉट झाले आहेत. आता त्या खाणीतील सोन्याचे उत्पादन बंद आहे पण खाण इतकी खोल खणलेली असल्यामुळे तिची देखभाल जरुरीचे असते.

एकूण सोन्याचं वेड हे त्याच्या जागतिक बाजारपेठेत असलेल्या किमतीवर आणि स्थानावर आहे. म्हणूनच सोन्याची तस्करी, चोरी होत असते.

सोन्याच्या गुणवत्तेनुसार ते किती कॅरेटचे आहे हे सांगतात. १८-२३ पर्यंतच्या कॅरेटचे सोने बाजारात उपलब्ध असते. २३ कॅरेट चे सोने शुद्ध सोने मानले जाते.

आजकाल सोन्यामध्ये Gold ETF माध्यमातूनही गुंतवणूक करता येते. त्यामुळे सोने प्रत्यक्षात घेतलं नाहीतरी कागदोपत्री त्याची नोंद असते, आणि हा सगळा व्यवहार तुमचं डिमॅट खाते असेल तर ऑनलाईन होतो आणि सोनं चोरीला जाईल याची भीती कमी होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version