' नैराश्य, बॅड-मूड मधून बाहेर येण्यासाठी हे मस्त पदार्थ खा आणि आनंदी राहा! – InMarathi

नैराश्य, बॅड-मूड मधून बाहेर येण्यासाठी हे मस्त पदार्थ खा आणि आनंदी राहा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आज फीर जिने कि तमन्ना है । आज फिर मरनेका इरादा हैं ।।

वहिदा जेंव्हा हे गाणं म्हणत तिचा आनंदी मूड पडद्यावर साकारते तेंव्हा आपला मुड सुद्धा एकदम आनंदी होतो.

मूड म्हणजे काय तर थोडक्यात त्या त्या वेळी असलेली आपली मानसिक स्थिती.

आजकाल , “माझा मूडच नाहीये” , “त्याचा अचानक मूड गेला” , “आज मूड मस्त दिसतो आहे साहेबांचा ” अशी वाक्य आपण सर्रास ऐकतो.

 

 

मूड छान असेल तर जग जिंकू असा आत्मविश्वास आणि मूड वाईट असला तर सगळ्या जगाशी भांडण अशी माणस तुम्ही पाहिली असतीलच.

वेळोवेळी मूड बदलणारी लहरी माणसं फार कुणाला आवडत नाहीत.

वाईट मानसिक स्थिती मुळे फायदा शून्य आणि तुमचं नुकसानच अधिक. म्हणजेच ह्या लहरी मूड ची काळजी घेणं नक्कीच महत्वाचं आहे, हो कि नाही ?

मग करायचं तरी काय ?

आपल्या आहारात असे अनेक पदार्थ आहेत ज्याने आपला मूड आनंदी आणि उत्साहित होतो. तसंच काही पदार्थांच्या अतिसेवनाने आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं.

 

 

चला तर मग जाणून घेऊ की, मानसिक स्वास्थ्यासाठी काय खावं.

 

केळं

अगदी सहज आणि मुबलक मिळणार हे फळ, शिवाय स्वस्त. म्हणूनच कदाचित थोडं दुर्लक्षित.

 

 

केळ खर तर एक संपूर्ण फळ आहे. ह्यात ए, बी आणि सी जीवनसत्व , फायबर, पोटॅशिअम , लोह आणि कार्ब्स सगळंच आहे.

त्यातील कार्ब्स आणि व्हिटॅमिन बी मुळे सेरेटोनीन नावाचं हार्मोन शरीरात तयार होत आणि ज्यामुळे आपल मन प्रफुल्लित होत. झोप ही शांत लागते.

हे करून पहा : रोज सकाळी एक माध्यम आकाराचे केळ तुमच्या न्याहरी मध्ये समाविष्ट करा

 

डाळी

हा आपल्या जेवणातला महत्वाचा घटक.

डाळीचं सेवन योग्य प्रमाणात केल्याने आपल्याला लोह मिळते तसच रक्तातील साखरेचं प्रमाणही संतुलित राहते.

 

 

 

लोहाचे प्रमाण योग्य असल्यास तुम्हाला ऊर्जा मिळते आणि साहजिकच उत्साही वाटतं.

हे करून पहा : रोजच्या आहारात अर्धा कप डाळ नक्की खात जा. डाळ पचण्यास हलकी करण्यासाठी एक तास भिजवून त्या नंतर शिजवून घ्या

 

पालक

 

 

बी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे नैराश्य येऊ शकत कारण आपल्या मानसिक स्वस्थायची काळजी घेणारे सिरेटोनीन तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.

पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या मध्ये बी३ ,बी ६ आणि बी १२ असते , आणि त्यांच्या सेवनाने बी जीवन सत्व शरीरात जाते.

हे करून पहा : आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पालक सूप प्या किंवा कच्चा पालक सलाड सोबत घ्या.

 

चिकन 

योग्य अमिनो ऍसिड चिकन मधून मिळतात आणि त्याचा उपयोग शरीर सेरेटोनिन तयार करण्यासाठी करते.

तसंच मेलॅटोनीन देखील तयार होण्यास मदत होते आणि मेलॅटोनीन शांत झोप येण्यासाठी महत्वाचे आहे. शांत झोप झाल्यानंतर आपला उत्साह वाढतो आणि मूड देखील चांगला राहतो.

 

chicken-InMarathi

 

हे करून पहा : चिकनचे सूप आठवड्यातून किमान एकदा घेऊ शकता

 

डार्क चॉकलेट 

डार्क चॉकलेटे च्या सेवनाने मानसिक ताण कमी होतो तसाच मन शांत होण्यास मदत होते.

 

 

हे करून पहा : रोज एक छोटा चौकोन खा. अतिसेवन टाळा

 

दही 

दह्यामधून आपल्याला चांगले बॅक्टरीया मिळतात जे पचन क्रियेमध्ये मोलाचं काम करत असतात.

 

 

योग्य पचन झालं तर कोठा साफ राहतो आणि रोग प्रतिकारक शक्ती उत्तम राहते. आपोआपच त्यामुळे मन आनंदी राहायला मदत होते.

हे करून पहा : रोजच्या जेवणानंतर ताजे दही किंवा ताक आवर्जून प्या

 

मशरूम 

ड जीवनसत्व फार थोड्या अन्न पदार्थांमधून मिळत आणि त्यातील एक शाकाहारी पदार्थ म्हणजे मशरूम. हे खाल्ल्याने तुमचं नैराश्य पळून जाईल.

 

 

हे करून पहा : भाजी किंवा सूप बनवून खा

 

पाणी

आपलं शरीर ७० टक्के पाण्याने बनलेलं आहे आणि बरेच वेळा घाई गडबडीत पुरेस पाणी प्यायल जात नाही.

 

drink-water InMarathi

 

परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक व्याधी होऊ शकतात तसेच चिडचिड देखील होऊ शकते.

डीहयड्रेशन मुळे आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. म्हणून दिवस भरात योग्य प्रमाणात पाणी प्यायलाच हवं. पाणी पिऊन मन प्रसन्न आणि तजेलदार होत.

हे करून पहा : १ ते १.५ लिटर पाणी नक्की प्या , तसंच विविध प्रकारची घरगुती सरबत देखील घेऊ शकता.

टाळावयाचे पदार्थ : कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, अति गोड पदार्थ, बेकरी उत्पादने, मद्य, फ्रेंच फ्राईज.

थोडक्यात आशा पदार्थांमुळे थोड्या वेळासाठी जरी बरं वाटलं तरी नंतर त्याचा तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर त्यांचा वाईट परिणाम होत असतो.

शिवाय कोणत्याच पदार्थाचे अतिसेवन टाळावे.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार आहाराबरोबरच, व्यायाम, पुरेशी झोप ह्याही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.

तर मस्त खा आणि आनंदी राहा !!

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?